The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चेन मेसेजिंगमुळे आपल्या भारतात शैक्षणिक क्रांती झालीये

by केतकी भाले
5 April 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“नमस्कार, आम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करत आहोत. हा संदेश मिळाल्यानंतर आठ दिवसांत तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुम्हीसुद्धा हा संदेश दहा जणांना पाठवा, अन्यथा……”

असे ई-मेल/चेन मेसेजेस तुम्हालाही आयुष्यात कधी ना कधी मिळालेले असतीलच. मानवी भावनांना आवाहन करण्याचा अर्थातच इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर आढळून येतो.  विज्ञाननिष्ठ मंडळी असे संदेश सरळ फाट्यावर मारतात. पण काही श्रद्धाळू, भाविक मंडळी अगदी डोळे झाकून असे ई-मेल / मेसेजेस सर्रास पुढे सरकवून देतात.

आजकाल व्हाट्सॲप आणि इमेलच्या जमान्यात तर जास्त विचारही करावा लागत नाही. एका क्लिकवर असे संदेश दहाच काय पन्नास लोकांनापण पाठवणे फार अवघड नाही. पण जरा विचार करा की एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा फोन तर दूर पण टेलिग्रामचासुद्धा शोध लागायचा बाकी होता, त्या काळामध्ये हे चेन मेसेजेस अर्थात साखळी संदेश स्वतः हस्तलिखित प्रती तयार करून वाटायचे, हे किती तापदायक काम असेल?

होय, या संदेश साखळीचा इतिहास आपल्याला घेऊन जातो ते थेट इसवी सन १८०१, पंजाब प्रांतामध्ये. पण त्या काळात तरी कोणाला काय गरज पडली होती या संदेश साखळीची? यासाठी आपल्याला ओळख करून घ्यावी लागेल ‘शेर-ए-पंजाब’ – महाराजा रणजितसिंहाची.



thepostman

राजा रणजितसिंह वयाच्या १०-१२व्या वर्षापासूनच आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून अफगाणी टोळ्यांविरोधात लढाईच्या मैदानात उतरले होते. लहानपणीच देवीच्या साथीमुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती. आपल्या तरुण वयातच त्यांनी भरपूर लढाया लढून अफगाणी टोळ्यांना पार हुसकावून लावले होते. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी स्वतःला तत्कालीन पंजाब प्रांताचा महाराजा म्हणून घोषित केले होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

राजा रणजितसिंहाने आपल्या राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये खूप सुधारणा करवून घेतल्या. त्यांच्या राजवटीमध्ये पंजाब प्रांताने चांगलीच भरभराट केली होती. राजा रणजितसिंहाच्या सैन्यात आणि मंत्रिमंडळात शिखांसोबत हिंदू, मुस्लिम आणि चक्क काही ब्रिटीशसुद्धा होते. व्यापार-उदीमाच्या उद्देशाने भारतात आलेल्या या ब्रिटीशांनी पुढे काय काय उपद्व्याप केले तो इतिहास आपण जाणतोच.

तर राजा रणजितसिंहाच्या मृत्युनंतर पंजाब साम्राज्याच्या पतनास सुरुवात झाली. त्यांच्या वंशजांच्या ह*त्या झाल्या आणि पुढे चालून ब्रिटिशांनी पंजाब प्रांत ताब्यात घेतला. संपूर्ण भारत ताब्यात आल्यावर ब्रिटिशांनी भारतीय शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे ठरवले.

ब्रिटीश शिक्षणतज्ञ मेकॉले याने तर सांगितले होते की, “भारतावर अधिराज्य गाजवायचे असेल तर सर्वप्रथम त्यांची परंपरागत चालत आलेली शिक्षण पद्धती बदला.”

त्याच्या निवेदनानुसार भारतात शिकवल्या जाणाऱ्या संस्कृत आणि पर्शियन भाषा बाद करून त्यांच्या जागी इंग्रजी ही अधिकृत भाषा म्हणून शिकवण्याचे ब्रिटिशांनी ठरवले.

इसवी सन १८४९ साली लॉर्ड लोगन याने तत्कालीन भारतीय शैक्षणिक पद्धतीवर एक अहवाल तयार केला होता. या अहवालानुसार त्यावेळी पंजाबची राजधानी असलेल्या लाहोरमध्ये केवळ ४ मदरसे होते. तरीही पूर्ण लाहोरमध्ये ८७% लोकांना पर्शियन भाषा लिहिता-वाचता येत होती. तर संपूर्ण पंजाब प्रांतामध्ये ७८% लोकांना पर्शियन भाषा लिहिता-वाचता येत होती. महत्त्वाची बाब म्हणजे सुशिक्षित महिलांची संख्या ही सुशिक्षित पुरुषांपेक्षा अधिक होती. या अहवालामुळे ब्रिटीश पार चक्रावून गेले. केवळ ४ मदरसांच्या आधारावर ही करामत झाली तरी कशी?

ही शैक्षणिक क्रांती घडवून आणली होती राजा रणजितसिंहाने. राजा रणजितसिंह हे स्वतः निरक्षर होते पण आपल्या प्रजेने शिक्षणाच्या बाबतीत आपला आदर्श समोर ठेवू नये, अशी राजाची इच्छा होती. आपल्यासाठी कोणत्याही सूचना किंवा प्रजेचा आपल्यासोबत कोणताही संवाद हा पत्र व्यवहारातूनच झाला पाहिजे, असा हुकूमच त्यानी काढला होता. आपल्या शिक्षण मंत्र्याच्या मदतीने त्यांनी पर्शियन आणि मुलभूत बीजगणिताच्या अभ्यासासाठी एक पुस्तिका तयार केली होती.

या पुस्तिकेच्या तब्बल ५००० हस्तलिखित प्रती तयार करून त्यांनी खेडोपाडी वाटल्या होत्या. ३ महिन्यांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रत्येकाने त्या पुस्तिकेच्या आणखी ५ हस्तलिखित प्रती तयार करून वाटायच्या आणि त्यांच्या नावांची नोंद सरकार दरबारी करायची – अशी अधिकृत सुचना त्या पुस्तिकेमध्ये लिहिली होती.

अशा प्रकारे ही अभ्यासाची साखळी सतत वृद्धिंगत होत राहिली होती. ब्रिटिशांनी विचारही करायच्या फार आधीच भारतामध्ये शैक्षणिक क्रांतीचे बीज राजा रणजितसिंहाने रोवले होते.

आपणही आपल्या पुर्वजांचा कित्ता गिरवला नाही तर काय फायदा?

म्हणूनच तुम्हीसुद्धा आता हा लेख ताबडतोब दहा जणांना पाठवा, नाहीतर…


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

लॉकडाऊनमध्ये स्वतःचे दागिने गहाण ठेऊन घरोघरी राशन पोहचवत आहे तृतीयपंथी समाज

Next Post

समाजातील ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत कबीरांनी मृत्यूसाठी मगहर हे ठिकाण निवडले

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

समाजातील ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत कबीरांनी मृत्यूसाठी मगहर हे ठिकाण निवडले

लिंकन यांनी पॉप्युलर केलेल्या टॉपहॅटने एका प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवलं आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.