The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हणून या हंगेरियन शास्त्रज्ञांना ‘द मार्शियन्स ऑफ सायन्स’ म्हणतात

by केतकी भाले
14 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


दुसऱ्या महायु*द्धाच्या धामधुमीचा तो काळ. इतर राष्ट्रांप्रमाणेच अमेरिकाही अ*ण्वस्त्रे बनवण्याच्या स्पर्धेत उतरली होती आणि अमेरिकेचा पहिल्या क्रमांकाचा प्रतिस्पर्धी होता – जर्मनी. हि*टल*र जर्मनीमधल्या शास्त्रज्ञांना हाताशी धरून अ*णुबॉ*म्ब बनवेल आणि साऱ्या जगाचा विनाश करेल, अशी भीती अमेरिकेला वाटत होती. त्यामुळेच अमेरिका त्यांच्या अ*णुबॉ*म्ब बनवण्याच्या ‘The Manhattan Project’साठी सिद्ध झाली होती.

या प्रोजेक्टसाठी अमेरिकेने जगातील निवडक शास्त्रज्ञ ‘लॉस अलमॉस’ या गावी एकत्र केले होते. हे शास्त्रज्ञ अनेक विषयांवर गप्पा – गोष्टी करत असत. असेच एका दिवशी त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या त्या ‘परग्रहावरील जीवसृष्टी’ या विषयावर. एक गट परग्रहावरील जीवसृष्टीचे समर्थन करत होता आणि दुसरा गट अर्थातच विरोध.

“हे विश्व अफाट आहे. अगणित ग्रह – ताऱ्यांनी भरलेले. सर्वसाधारण सजीव हे निसर्गनियमानुसार झपाट्याने विकसित होत जातात. या विश्वात जर आपल्यापेक्षाही प्रगत अशी जीवसृष्टी अस्तित्वात असेल तर आतापर्यंत त्यांनी किमान ही आकाशगंगा व्यापून टाकायला हवी होती. आपल्या पृथ्वीसारखा सुंदर ग्रह त्यांच्याकडून कसा बरं दुर्लक्षित राहिला असेल? आणि जर ते खरंच अस्तित्त्वात असतील तर आतापर्यंत ते पृथ्वीवर यायला हवे होते. तर कुठे आहेत ते?”

असा एक मार्मिक प्रश्न विरोधी पक्षातल्या ‘एन्रिको फर्मी’ या विख्यात इटालियन शास्त्रज्ञाने विचारल्याबरोबर लिओ त्सिलार्ड या अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि तेवढ्याच हजरजबाबी शास्त्रज्ञाने ताडकन उत्तर दिले – “ते आपल्यामध्येच आहेत. फक्त आता ते स्वतःला ‘हंगेरियन’ म्हणवून घेतात.”



लिओ त्सिलार्ड हा स्वतः हंगेरियन होता.

हा सत्य प्रसंग रेखाटला आहे ग्योर्गी मार्क्स या शास्त्रज्ञाने आपल्या ‘The Martian’ (शब्दश: अर्थ – मंगळवासी) या पुस्तकामध्ये. ग्योर्गी मार्क्सने ‘The Martian’ ही संज्ञा हंगेरीच्या प्रख्यात शास्त्रज्ञांसाठी वापरली आहे. अर्थात हंगेरीच्या सर्वच शास्त्रज्ञांना ती लागू होत नाही. त्यातही काही अपवाद आहेतच.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, तसेच दुसऱ्या महायु*द्धाच्या धुमश्चक्रीमध्ये युरोपातील अनेक शास्त्रज्ञ ना*झी / कम्युनिस्ट विचारसरणीला कंटाळून अमेरिकेमध्ये स्थलांतर करत होते. यामध्ये मुख्यत्वेकरून ज्यू निर्वासितांचा भरणा होता. हंगेरीच्या विख्यात शास्त्रज्ञांनी देखील अमेरिकाचा रस्ता धरला होता, ज्यांनी पुढे चालून अमेरिकेच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये भरपूर हातभार लावला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

ग्योर्गी मार्क्स सांगतो की, या अलौकिक बुद्धीच्या शास्त्रज्ञांचे नाव हंगेरीचे एखादे शहर तर सोडाच, पण साध्या गल्ली-बोळाला किंवा चौकाला देखील दिलेले नाही. पण यांनी आपले नाते पार दुसऱ्या ग्रहांशी जोडले आहे. मार्क्सला असे वाटणे स्वाभाविक आहे कारण चंद्रावरील विवरांना (खळग्यांना) त्सिलार्ड, फॉन न्युमन, फॉन कारमन या हंगेरियन शास्त्रज्ञांची नावे दिली आहेत.

thepostman

अनेक हंगेरियन स्वतःला अभिमानाने मंगळवासी किंवा त्यांचे वंशज म्हणवून घेतात. अर्थात ‘हंगेरियन मंगळावरून आले’ या सिद्धांताला पुरावा असा काहीच नाही. अनेक वर्षांपूर्वी बुद्धी आणि तंत्रज्ञानाने प्रगत असे मंगळवासी सध्या आपण ज्याला हंगेरी म्हणतो त्या प्रदेशात उतरले आणि अगदी बेमालूमपणे इथल्या लोकांमध्ये मिसळून गेले. कदाचित आताही त्यांचे काही वंशज आपल्यामध्ये अगदी गुण्यागोविंदाने नांदत असतील. असे या सिद्धांताचे साधारणतः स्वरूप आहे.

बर, पण मग कोणी या हंगेरियन लोकांना मंगळवासी का म्हणावे?

आपले आचार-विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच आपल्या शंका-कुशंकांचे निरसन करण्यासाठी भाषेचा वापर, नवीन प्रदेश शोधून काढण्याची खुमखुमी आणि चौकस बुद्धी हे मानवी प्रगतीमधले अतिशय महत्त्वाचे टप्पे आहेत. मंगळ ग्रहावरही कदाचित अशाच मनोवृत्तीचे लोक असतील.

तर हंगेरियन लोकांना मंगळवासी म्हणण्यामागे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची भाषा. हंगेरियन भाषा ही इतर युरोपियन भाषांपेक्षा अतिशय वेगळी आणि क्लिष्ट अशी आहे. या भाषेवर नक्कीच एक वेगळा प्रभाव जाणवतो. दुसरे म्हणजे त्यांची भटकंतीची आवड. हंगेरीमधील जिप्सी लोक तसेही भटकंतीसाठी प्रसिद्ध आहेतच. तिसरे म्हणजे असामान्य बुद्धिमत्ता. फ्रांझ अलेक्झांडर, पीटर लॅक्स, जॉर्ज ओलाहसारखे अनेक विख्यात शास्त्रज्ञ हंगेरियन आहेत.

या हंगेरियन शास्त्रज्ञांच्या कामाचे अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर लिओ त्सिलार्ड याने nu*clear chain reaction चा वापर करून अ*णुबॉ*म्ब बनवण्याचा पाया रचला. जॉन फॉन न्युमनचा व्यासंग तर फार मोठा. बीजगणित, भूमिती, Fluid Dynamics, Quantum Mechanics च्या या अभ्यासकाने आजच्या अद्ययावत संगणकाचा पाया रचला होता. त्या काळात त्याने sorting techniques व computer virus वर देखील अभ्यास केला होता.

thepostman

एडवर्ड टेलरला तर ‘हायड्रोजन बॉ*म्बचा जनक’ असे म्हणले जाते. भौतिकशास्त्रामध्ये नोबेल मिळवणाऱ्या विग्नर याने प्लुटोनियमचे उत्पादन करू शकेल अशी पहिली अणुभट्टी बांधली. याच विग्नर आणि लिओ त्सिलार्डने अल्बर्ट आईनस्टाईनच्या मदतीने अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट यांना पत्र पाठवून अ*णुबॉ*म्ब बनवण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी प्रेरित केले होते. त्याचीच परिणीती ‘The Manhattan Project’मध्ये झाली आणि पुढचा दुर्दैवी इतिहास  आपण सगळे जाणतोच. पण अश्या या अनन्यसाधारण बुद्धिमत्तेच्या जोरावरच हे हंगेरियन स्वतःला अभिमानाने ‘The Martians’ म्हणवून घेतात.

एन्रिको फर्मीचा ‘या विश्वात आपण एकटेच आहोत’ हा निष्कर्ष अनेक जणांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यासाठी सबळ असा पुरावा देता आला नाही. संपूर्ण पृथ्वीवर कुठेही गेलो तरी कोणत्याही माणसाला अगदी वेगळा असा कोणताच अवयव नाही. फक्त वेगवेगळ्या प्रदेशाच्या वातावरणातील फरक आणि वांशिक गुणसूत्रांमुळे त्वचेचा/ केसांचा/ डोळ्यांचा रंग आणि चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये फरक जाणवतो.

बाकी भारतामधला भिल्ल असो किंवा आफ्रिकेमधला झुलू असो, पृथ्वीवर मानवाची आंतर्बाह्य शरीर रचना ही सारखीच आहे. मंगळावरीलच काय पण इतर कोणत्याही ग्रहावरील लोकं कधीकाळी पृथ्वीवर येऊन स्थायिक झाले, असे जर मानले तर त्यांनापण पृथ्वीवरील मानवाप्रमाणे दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान, एक नाक होते असे मानावे लागेल, त्यांची त्वचाही मानवी त्वचेप्रमाणेच असली पाहिजे आणि त्यांच्या ग्रहावरील वातावरणदेखील पृथ्वीप्रमाणेच असले पाहिजे. पण असे गृहीत धरायला विशेष असा कोणताच पुरावा नाही.

thepostman

पृथ्वीवरील मानवासारखी प्रगत जीवसृष्टी या विश्वामध्ये जर असेल, तर आतापर्यंत त्यांनी आंतरतारकीय संदेशाचे/प्रवासाचे तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे होते, जे की पृथ्वीवरील मानवाने गेल्या अवघ्या काही वर्षांत मिळवले आहे. पण असा एकही संदेश अजून पृथ्वीवासियांना मिळालेला नाही किंवा मंगळावरीलच काय पण इतर कोणत्याही ग्रहावरील लोकांनी पृथ्वीला भेट दिल्याचा कुठे पुरावाही मिळत नाही.

त्यामुळेच हंगेरीच्या शास्त्रज्ञांना ‘The Martians’ म्हणत असले तरीही एन्रिको फर्मीच्या ‘या विश्वात आपण एकटेच आहोत’ या निष्कर्षाला ग्राह्य धरायला हरकत नाही. फक्त पुढे-मागे कधी एखाद्या ग्रहावरून असा एखादा संदेश आला, तरचं एन्रिको फर्मीचा निष्कर्ष हा अंतराळामध्ये विरून जाईल.

संदर्भ : ”ह्या विश्वात आपण एकटेच आहोत काय” – श्री. मोहन आपटे


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: martians
ShareTweet
Previous Post

या डॉक्टरांच्या प्राचीन वस्तू जमा करण्याच्या छंदातून केळकर म्युजियम उभं राहिलंय

Next Post

खाण कामगारांसाठी बनवलेल्या जीन्सला हॉलिवूडने जगभर फेमस केलं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

खाण कामगारांसाठी बनवलेल्या जीन्सला हॉलिवूडने जगभर फेमस केलं

गोर्टा कांड - हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.