The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोलंबसच्या पाचशे वर्ष अगोदर या व्हायकिंग खलाशाने अमेरिकेचा शोध लावला होता

by द पोस्टमन टीम
6 March 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


गेल्या शतकामध्ये अमेरिकेने जगावर आपला ठसा उमटवून दाखवला आहे. खरे पाहता अमेरिका नावाचा खंड आहे आणि अमेरिका असे एका देशालासुद्धा संबोधले जाते. जागतिक महासत्ता म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या देशाचे संपूर्ण नाव म्हणजे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’.

ही सगळी संयुक्त संस्थाने भौगोलिकदृष्ट्या एकत्र आहेत त्यामुळे त्यांच्यापासून एकसंघ असा अमेरिका संघराज्य नावाचा देश तयार झाला. या संघराज्यात एकूण ५० देश आहेत. खरे पाहता १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेचा इतका बोलबाला कधीच नव्हता. भारताप्रमाणे अमेरिकासुद्धा इंग्रजांची एक वसाहत होती. अमेरिकेची स्थापना झाली ती इतिहासातील सुप्रसिद्ध अशा ‘बोस्टन टी पार्टी’पासून.

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी बोस्टन शहरातील एका उद्योजकाचा माल जप्त केला आणि तेव्हा इंग्रजांविरुद्ध असंतोषाची लाट तिथे उफाळली. आता ही घटना आहे साधारणपणे १७७३ मधली. तेव्हा बोस्टनसह संपूर्ण भूमीवर इंग्रजांनी एकूण १३ वसाहती स्थापन केलेल्या होत्या आणि या वसाहतींमधून इंग्रजांना भरभरून नफासुद्धा मिळत होता. अमेरिकेत इंग्रजांनी जवळ जवळ अडीच लाख आफ्रिकन लोक गुलाम म्हणून तोपर्यंत आयात केले होती.

त्यावेळी बोस्टनमध्ये स्वबळावर भरभराटीला आलेले अनेक व्यापारी होते. त्यांना इंग्रजांचा हा जाच सहन होईना. त्या वर्षी ब्रिटीश संसदेने चहावरचा आयातकर अव्वाच्या सव्वा वाढवला. जो चहा इंग्लंडमधून बोस्टनमध्ये आयात केला जात होता त्यावर लोकांना कारण नसताना दुप्पट तिप्पट आयात कर भरावा लागणार होता.



thepostman

या घटनेमुळे सगळ्या १३ वसाहती होत्या तिथे राहणाऱ्या लोकांच्या असंतोषाचा भडका उडाला. या अन्यायी कराविरुद्ध आंदोलन करणारे आंदोलक बोस्टन बंदरात उभ्या असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावर गेले ज्यात अनेक चहाची खोकी ठेवलेली होती. या आंदोलकांनी चहाची अनेक खोकी बोस्टन बंदरातील खाडीत फेकून दिली. त्या फेकून दिलेल्या चहाची आजची किंमत जवळपास १० लाख डॉलर्स होईल.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ही घटना अमेरिकन स्वातंत्रलढ्यात मोठा परिणाम करणारी ठरली. याच घटनेला बोस्टन टी पार्टी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर या वसाहतवाल्यांनी इंग्रजांबरोबर यु*द्ध पुकारले. १७७६ रोजी त्यांनी अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा देखील काढला, जो आजही इतिहासात प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांबरोबर झालेले यु*द्ध जिंकून या १३ वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी स्थापन केले तेच आजचे अमेरिकन संघराज्य.

विसाव्या शतकात अमेरिकेने जगभरात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. पण या अमेरिका खंडाचा इतिहास जर पाहिला तर सुमारे ४० हजार वर्षांपासून या खंडावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळतात. ज्यांना मूळ अमेरिकन लोक म्हटले जाते ते आशिया खंडातून अलास्काच्या मार्गे आजच्या अमेरिकन संघराज्यात आले असे मानले जाते. तिथूनच हे लोक संपूर्ण दक्षिण अमेरिका आणि उतर अमेरिका येथे पसरले. त्यांची स्वत:ची अशी संस्कृती नंतर विकसित होत गेली.

या अमेरिकेचा शोध कोणी लावला याबद्दल बरेच मतभेद आहेत. कोलंबसने १४ व्या शतकात अमेरिकेचा शोध लावला अशी माहिती समोर आली, त्यांनतर कोलंबसआधीसुद्धा एक खलाशी व्हेस्पुसी अमेरिगो याने अमेरिकेचा शोध लावला अशीही माहिती समोर येते. अर्थात सगळ्यात अगोदर अमेरिकेच्या भूमीवर पाय कोणी ठेवला याबाबत बरीच मतमतांतरे आहेत.

आज आपण अशा एका माणसाची कहाणी बघतोय ज्याने कोलंबस किंवा व्हेस्पुसी अमेरिगो यांच्या अगोदर दहाव्या शतकात उत्तर अमेरिकेच्या खंडावर पाउल ठेवले होते. तो माणूस म्हणजे लेफ एरिकसन.

कोलंबस पूर्वी ५०० वर्ष अगोदर या लेफ एरिकसनने उत्तर अमेरिका खंड शोधून काढले होते. हा लेफ व्हायकिंग जमातीचा होता. व्हायकिंग खलाशी हे नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या स्कँडीनेव्हीयन कंट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांतील आहेत. या देशांतील खलाशी हे साहसी दर्यावर्दी म्हणून ओळखले जातात. अगदी सिंदबादसारखे.

thepostman

सतत समुद्रात राहणे आणि नवीन नवीन प्रदेशाच्या सफरी करणे हा या लोकांचा छंद होता. लेफ एरिकसन याचे वडील एरिक द रेड यांनी ऐतिहासिक ग्रीनलंड नावाचे बर्फाळ बेट शोधून काढलेले होते. ते त्या बेटाचे प्रमुख किंवा मुखिया देखील बनले होते. लेफ एरिकसन आपल्या वडिलांचे दुसरे अपत्य. याचा जन्म अंदाजे १० व्या शतकातील मानण्यात येतो.

आपल्या वडिलानंतर लेफ एरिकसन ग्रीनलंड बेटावरचा कप्तान बनला होता. वडिलांच्या मृत्यनंतर त्याचा साहसी स्वभाव त्याला बेटावर बसू देईना. त्यामुळे एरिकसनने ग्रीनलंड सोडून नॉर्वे देशाकडे सागरी सफरीसाठी कूच केले होते. त्याला नॉर्वेचा राजा किंग ओलाफला भेटण्याची इच्छा होती. जेंव्हा तो नॉर्वेला आला आणि राजाला भेटला तेव्हा राजाने त्याचा आदर सत्कार केलाच, पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे राजाने त्याचे त्यावेळच्या प्रचलित ख्रिश्चन धर्मामध्ये मध्ये धर्मांतर करवले. तसेच पुन्हा ग्रीनलंडला जावून तेथील रहिवाश्यांना ख्रिश्चन धर्मात परिवर्तीत करण्याची जबाबदारीसुद्धा त्याच्यावर सोपवली.

राजाकडून नॉर्वेवरून ग्रीनलंडला परतीचा प्रवास करताना एरिक्सनला एक नवीनच बेट लागले. तो त्या भूमीवर उतरला खरा. ग्रीनलंड हा बर्फाळ हवामानाचा अत्यंत कडाक्याची थंडी असलेला प्रदेश पण ही जी नवीन भूमी सापडली होती तिथले वातावरण प्रसन्न होते, सगळीकडे हिरवळ पसरली होती आणि जमीन देखील सुपीक दिसत होती. संपूर्ण भूमीवर त्याला द्राक्षाने लटकलेले घोस दिसले त्यामुळे त्याने या भूमीला ग्रीनलंडच्या जवळचे वाटावे असे विनलंड असे नाव दिले.

thepostman

त्यानंतर एरिक आणि त्याचे खलाशी त्या भूमीवर वर्षभर राहिले. तिथे त्यांनी स्वत:ची वस्ती देखील बनवली पण लेफ एरिक्सन तेथे फार काळ रमला नाही. वातावरण उत्तम असूनसुद्धा त्याने आपले ग्रीनलंड बेट गाठले. ठरल्याप्रमाणे ख्रिस्ती धर्माचा प्रचारसुद्धा केला. त्याच्यानंतर अनेक व्हायकिंग खलाशी या नवीन विनलंडला जाऊन आले. हळूहळू युरोपियन लोकांनी येथे वस्ती केली त्यानंतर जगभरातील लोक येथे आले. अमेरिकन सरकार १९६४ सालापासून एरिक्सनच्या स्मृतीप्रीत्यर्थ ९ ऑक्टोबर हा दिवस ‘लेफ एरिक्सन दिवस’ म्हणून साजरा करत आहे.

लोकांच्या लक्षात फक्त कोलंबस राहिला, पण ज्याने १० व्या शतकात पहिल्यांदा अमेरिका खंड शोधून काढला आणि युरोपियन लोकांना एका नव्या खंडाची माहिती दिली असा एरिक्सन मात्र काळाच्या पडद्याआड हरवून गेला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: leif erikson
ShareTweet
Previous Post

ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नीळ लागवडीची सक्ती केली आणि एका बंडाला तोंड फुटलं

Next Post

जगाने अत्या*चार केलेल्या ज्यू धर्मियांना भारताने प्राचीन काळापासून आश्रय दिलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

जगाने अत्या*चार केलेल्या ज्यू धर्मियांना भारताने प्राचीन काळापासून आश्रय दिलाय

आणि जगाला वेड लावणारे मसालेच भारताच्या गुलामगिरीचे कारण बनले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.