The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातला सर्वात कुल सायंटिस्ट – द क्युरिअस केस ऑफ मिस्टर फाईनमन

by अनुप देवधर
11 May 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


दु:ख पराभवाचं नसतं, पण दु:ख होतं, ते वाट्याला आलेल्या परिस्थितीचं. प्रॉब्लेम्स कोणाला नसतात? ते सगळ्यांनाच असतात. प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर असतंच, असं म्हणतात. फक्त ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसे, तर कधी माणूस. महाभारतात कर्णाचं जीवन जसं संघर्षपूर्ण होतं, तसं ते दैदिप्यमानही होतं.

एकोणिसाव्या शतकाचा अखेर तसा अनेक महत्त्वाच्या घडामोडींनी होत होता. युरोपमध्ये ज्यू लोकांविरुद्ध पेटलेल्या वातावरणातून अनेकांनी युरोपातून पळ काढला होता.

१८९५ साली असाच एक छोटा मुलगा राशियातून अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या बंदरात आला. पुढं अमेरिकन मातीत जगण्यासाठी शब्दश: रंग, कपडे, लॉन्ड्री पर्यंत सगळे उद्योग करत राहिला. मेलविल फाईनमन. आपल्या अपूर्ण स्वप्नं आणि वेगवेगळ्या आवडी आपल्या मुलामध्ये बघत पुढं जाऊन जग अनेक कारणांनी गाजवणाऱ्या मुलाला जन्म दिला.

रिचर्ड फाईनमन.



एक ना धड भाराभर चिंध्या म्हणल्यासारखं, विज्ञानापासून संगीतापर्यंत, आणि खगोलशास्त्रापासून गणित, चित्रकलेपर्यंत असणारी सगळ्या विषयांची गोडी नकळत रिचर्डमधली संशोधक वृत्ती वाढवत गेली. एकीकडं शाळेत गणिताच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन नंबर मिळवणे, दंगा-मस्करी करणे चालू असताना दुसरीकडं खिशात स्क्रू-ड्रायव्हर घेऊन रेडिओ दुरुस्त करणाऱ्या छोट्या ‘मॅड जिनिअस’ची कथा नोबेल मिळल्यावर सगळ्यांनीच ऐकली. 

पण शेवटी माणसाला जगायला पैसा लागतोच. कुटुंबाची आर्थिक चणचण रिचर्डला एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करण्यापर्यंत घेऊन आली. हॉटेलमध्ये काउंटरवर कोणाचं तरी विसरलेलं पुस्तक वाचून परत रिचर्डमधल्या संशोधकाला संजीवनी मिळाली.

सगळ्या विद्येत पारंगत असूनही ज्याप्रमाणं कर्णाला द्रोणाचार्यांनी केवळ क्षत्रिय नसल्यामुळं प्रवेश नाकारला होता, तसाच चांगले मार्क असूनही केवळ ज्यू असल्यानं अनेक विद्यापीठांनी त्याला प्रवेश नाकारला. पण अथक प्रयत्नांनी रिचर्डने अमेरिकेतल्या MIT या नामवंत विद्यापीठात प्रवेश मिळवला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

गणितात मात्र रिचर्ड अतिशय वेगवान होता. पुटनॅम नावाची गणिताची अत्यंत अवघड परीक्षा, जिथं बुद्धीमान मुलं निम्मे प्रश्न पण सोडवू शकत नसायचे, त्याचा पेपर वेळेच्या आधी सोडवून रिचर्डने मिळणारी हार्वर्डची स्कॉलरशिप नाकारली होती आणि यथावकाश गणित, फिजिक्स, पुढं क्वांटम फिजिक्स, अणुविज्ञान, क्वांटम एलेक्ट्रोडायनॅमिक्स यांच्यातील जन्मतः असणाऱ्या आवडीनं तो अर्थातच संशोधनाकडं वळला.

एकीकडं संशोधनात झपाटलेला असताना, व्यक्तिगत आयुष्यात मात्र एकामागून एक धक्के मिळतच होते. शाळेतली मैत्रीण, अर्लिन, जिला रिचर्डनं आयुष्याची साथीदार म्हणून निवडलं होतं, तिला टीबी डिटेक्ट झाला होता. पण प्रेम ही अशी विलक्षण गोष्ट असते, की रिचर्डला अर्लिनच्या आजाराबद्दल माहिती झाल्यावरही तिच्याकडून रिचर्डनं लग्नाचं वचन घेतलं, आणि दोन अनोळखी लोकांच्या साक्षीनं लग्न करून आपल्या नव्या घरी, म्हणजेच ‘न्यू जर्सी’मधल्या एका हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी गृहप्रवेश केला.

Richard Feynman story in marathi the postman
Arline and Richard Feynman Photo from Brain Pickings

 

काळ एखाद्या माणसाची परीक्षा घ्यायची ठवल्यावर वाट्टेल त्या मार्गानी घेतोच. एकीकडं अर्लिनचं आजारपण, तिचं उरलेलं अत्यल्प आयुष्य, तिचा सहवास आणि सुश्रुशा करण्याचं रिचर्डनं ठरवलं असतानाच, दुसऱ्या महायु*द्धाची चाहूल लागली. आक्र*मक हि*टल*रच्या आधी अ*णुबॉ*म्ब बनवणं ही जगाची प्राथमिकता झाली. रिचर्डला देशासाठी नाईलाजानं अ*णुबॉ*म्ब बनवण्याच्या, ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ वर कामाला लागावं लागलं.

‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ आणि आणि अर्लिनचं आजारपण असं दुहेरी यु*द्ध रिचर्डनं नेटानं लढत होता. शेवटी १९४५ मध्ये अर्लिननं रिचर्डचा निरोप घेतला, आणि त्यांची कहाणी अधुरीच राहिली.

सुरुवातीला ‘मॅनहॅटन’बद्दल कोणालाच पूर्ण माहिती दिली नव्हती. आपण काय करतो आहोत, हेच कोणाला माहीत नव्हतं. शेवटी मात्र सगळं उघड झालं. शेवटच्या टप्प्यात ‘ग्राउंड झिरो’ वर अ*णुबॉ*म्बची चाचणी घेण्याचं ठरवलं. जुलै १९४५ मध्ये झालेली चाचणी रिचर्डनं धाडसानं उघड्या डोळ्यांनी, गॉगल न घालता बघितली.

एवढी वर्ष सतत सुट्टी न घेता झपाटून काम केल्यावर मॅनहॅटन प्रोजेक्ट संपला आणि त्यातल्या बहुतांश संशोधकांना नैराश्य आलं. त्यात अमेरिकेनं तेच अ*णुबॉ*म्ब वापरून हिरोशिमा आणि नागासाकी बेचिराख केल्यावर हे नैराश्य दुणावलं. त्यातून बाहेर येण्यासाठी रिचर्डला खूप वेळ लागला आणि आयुष्याची संध्याकाळ विद्यापीठात मुलांना शिकवून करण्याची ठरवलं. तरुण मुलांसोबत संशोधन आणि अध्यापनानं आयुष्याला थोडं स्थैर्य दिलं. अनेक संशोधनांना त्यानं मूर्त रूप दिलं. नोबेल मिळालं. 

richard feynman the postman
richard feynman

तसं रिचर्ड फाईनमनच्या आयुष्यात स्थिरपणा आलाच नाही. कधी भरकटला. स्वतःमध्ये एक खोडकर मूल घेऊन वादळी आयुष्य जगला. आयुष्यात प्रचंड चढ-उतार बघितले. अर्लिनला मृत्यूनंतर लिहिलेलं आणि नवा पत्ता माहिती नसल्यानं न पाठवलेलं पत्र वाचत दिवस काढले. नोबेल मिळालं, पण अर्लिनच्या प्रेमाला आयुष्यभर मुकला, आणि शेवटी कॅन्सरनी गाठलं.

‘मॅड जिनिअस’ होताच तो!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: richard feynman
ShareTweet
Previous Post

सामान्य जीवनाला कंटाळून हा माणूस शेळी बनून जगतोय

Next Post

या शास्त्रज्ञाच्या संशोधनामुळे घराघरात वीज पोहोचवणं आपल्याला शक्य झालं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या शास्त्रज्ञाच्या संशोधनामुळे घराघरात वीज पोहोचवणं आपल्याला शक्य झालं होतं

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.