The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या शास्त्रज्ञाच्या संशोधनामुळे घराघरात वीज पोहोचवणं आपल्याला शक्य झालं होतं

by द पोस्टमन टीम
8 July 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


इलेक्ट्रिसिटी’ – आजच्या काळाची एक मूलभूत गरज. छोट्या दिव्यापासून ते मोठ्या लिफ्टपर्यंत तिच्या करामती थक्क करणाऱ्या आहेत.

पण ह्याच विद्युत ऊर्जेला तुमच्या घरात पोहोचण्यासाठी एक मोठा प्रवास करावा लागतो. औष्णिक, जल, अणुभट्टी, पवन विद्युत केंद्रातील जनरेटर्सपासून ते तुमच्या घरातील विद्युत उपकरणापर्यंत.

ही वीज वाहून आणण्यासाठी एका मोठ्या ‘वीज पुरवठा प्रणाली’चा उपयोग होतो. ही आधुनिक वीज पुरवठा प्रणाली विकसित होण्यामागे योगदान होतं ते एका होतकरू संशोधकाचं. त्याचं नाव ‘ निकोला टेस्ला’.

निकोला टेस्ला हा एक सर्बियन – अमेरिकन विद्युत अभियंता आणि संशोधक होता. लहानपणी विद्युत उर्जेविषयी निर्माण झालेल्या कुतुहुलाने एक महान संशोधक घडवला. समाकलन गणितासारखी (Integral Calculus) अवघड गणिते मनात सोडवण्याची प्रतिभा त्याच्यात होती.

विद्युत ऊर्जा आणि तारांद्वारे होणाऱ्या संदेशवहनाच्या (communication) सैद्धांतिक अभ्यासाबरोबरच त्यांनी प्रात्यक्षिक अनुभवही (practical experience) घेतला. विविध कंपन्यांमध्ये काम करत असतानाच त्यांच्यातील संशोधकवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सरतेशेवटी त्यांनी या नोकरीला राम राम ठोकला आणि तिथूनच संशोधनाच्या पर्वाला सुरुवात झाली.



25 Rare and Unique Photographs of Nikola Tesla

टेस्ला यांनी न्यूयॉर्कमध्ये एक प्रयोगशाळा सुरू केली, ज्याचा उपयोग त्यांनी संशोधनासाठी व नवनवीन उपकरणे विकसित करण्यासाठी केला. संशोधनासाठी लागणारी आर्थिक मदत मिळवण्यासाठी त्यांनी गुंतवणूकदार शोधण्याची मोहीमच हाती घेतली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

या प्रयोगशाळेत विकसित केलेल्या AC इंडक्शन मोटरचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. प्रचलित एकेरी फेज आणि दुहेरी तार प्रणालीला पर्यायी नवीन तिहेरी फेज, तिहेरी तार प्रणाली विकसित केली, जी तीन पटीने अधिक शक्ती उपलब्ध करून देते.

सोप्या भाषेत सांगायचं तर आपली आद्योगिक उपकरणे जी जास्त शक्ती वा ऊर्जेवर चालतात त्यांना उच्च दाबाने वीज पुरवठा करावा लागतो. या संशोधनामुळे कारखाने, उद्योग इत्यादी उच्च दाब वीजेची गरज भागवणे सोपे झाले.

इंडक्शन मोटार आणि पोलिफेज AC च्या पेटंटने त्यांना भरपूर फायदा कमवून दिला, ज्याचा उपयोग त्यांनी खाजगी कामासाठी न करता त्यांच्या भविष्यातील प्रयोग व संशोधनावर गुंतवणूक म्हणून केला.

त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ हा नवनवीन संशोधन करण्यात गेला. त्यांनी विकसित केलेल्या उपकरणांची यादी जर लेखात दिली तर हा लेख मर्यादित शब्दांपेक्षा मोठा होईल.

The lost Journals of Nikola Tesla

निकोला टेस्ला स्वतः विकसित केलेल्या उपकरणांची आणि विविध प्रयोगांची प्रात्यक्षिक लोकांसमोर घेत, ज्यामध्ये विद्युत ऊर्जेचे नयनरम्य व चमत्कारीक शक्ती बघून लोक अवाक होत.

निकोला टेस्लाना भविष्यवादी म्हणणं ही चुकीचं ठरणार नाही कारण त्यांनी म्हटल्यानुसार “भविष्यकाळ हा बिनतारी संदेशवहनाचा (Wireless Communication) असेल” ही गोष्ट तंतोतंत खरी ठरली आणि आज आपण सर्वजण त्यागोष्टीचा अनुभवही घेत आहोत.

तेस्लांनी आपल्या आयुष्यातला एक मोठा भाग हा ‘विद्युत ऊर्जेचे बिनतारी वहन’ या त्यांच्या महत्वाकांक्षी (the transmission of electrical power without wires) संशोधनात घालवला. त्यांना वीज कोणत्याही तारांचा (माध्यमाचा) (Conductor) वापर न करता जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवायची होती. या संशोधनावर त्यांची जवळपास पूर्ण कमाई खर्च झाली.

जर त्यांचं हे संशोधन यशस्वी झालं असत तर आजचं जग वेगळच असतं यात तिळमात्र शंका नाही.

त्यांनी केलेल्या व्यावसायिक चुका, पैशाच फसलेले नियोजन, महत्वाकांक्षी संशोधांनवर केलेला वारेमाप खर्च यामुळे वयाच्या उत्तरार्धात त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.

त्यांचं संशोधनावरच प्रेम हे इतकं निर्भेळ होत की त्यांनी स्वतःकडील एक अन एक रुपया त्याच्यावर खर्च केला. त्यांनी बहुतेक शोधांचं पेटंटही करवून घेतलं नव्हतं. त्यांचे कितीतरी अविष्कार पैशांच्या अभावी सत्यात न उतरता कागदोपत्रीच राहिले.

टेस्लाच्या खूप कल्पना ह्या नंतरच्या काळात संशोधकांनी सत्यात उतरवून दाखवल्या. पैशासाठी त्यांनी हजारो गुंतवणूकदारांचे उंबरठे झिजवले.

आयुष्यतला एकेक क्षण त्यांनी संशोधन करण्यात, समजून घेण्यात-देण्यात, त्याचं नियोजन करण्यात, नवनवीन कल्पना सत्यात उतरवण्यात व्यतीत केला. अशा अवलीयाबद्दल लिहावं तितकं कमीच.

अशा या अनेक अविष्काराच्या जनक असलेल्या ध्येयवेड्या शास्त्रज्ञाने जगाचा निरोपही एकांतात, हॉटेलमधील खोलीत घेतला कारण त्यांना पूर्ण हयातीत घर घेणंही योग्य वाटलं नाही. किंबहुना त्यांनी त्याच्यासाठी पैसे खर्च करण टाळलं.

निकोला टेस्लाच्या कामाची परतफेड म्हणून विद्युत-चुंबकीय शास्त्रामधील ‘चुंबकीय प्रवाह घनता’ (Magnetic Flux Density) चे एकक म्हणून ‘टेस्ला’ हे नाव वापरलं जातं.

‘निकोला टेस्ला’ अशा या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तीबद्दल तूर्तास इतकंच !


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: nicola teslaScience
ShareTweet
Previous Post

जगातला सर्वात कुल सायंटिस्ट – द क्युरिअस केस ऑफ मिस्टर फाईनमन

Next Post

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

पुणे शहराच्या अगदी जवळची ही पाच पर्यटनस्थळे पाहिली नसतील तर स्वतःला पुणेकर म्हणू नका!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.