The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Back to the future : टाईम मशीनची संकल्पना साक्षात समोर उभी करणारा अफलातून हॉलीवूडपट

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“अरे यार… आत्ता माझ्याकडे टाईम मशीन असली असती ना… ”

काय मंडळी, तुमच्याही मनात हा विचार कधी ना कधी आलाच असेल ना? खरच जर अशी टाईम मशीन अस्तित्वात आली तर? भूतकाळामध्ये जाऊन केलेल्या चुका सुधारण्याची किंवा भविष्यात काय घडणार आहे हे बघण्याची संधी मिळाली तर? हीच मध्यवर्ती संकल्पना रॉबर्ट झेमेकीस आणि बॉब गेल या जोडगोळीने Back to the Future मध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडली.

स्टिव्हन स्पिलबर्ग निर्मित आणि Adventure, emotions, Sci-fi, Rom-com असे All in one package असलेल्या या तीन भागांच्या सिरीजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.

आज तब्बल तीन दशकांनंतरही या चित्रपटाचे गारुड रसिकांच्या मनावर कायम आहे. चित्रपटाची कथा सुरु होते १९८५ मध्ये. आपल्या कथेचा हिरो आहे मार्टी मॅकफ्लाय. मार्टीच्या कुटुंबामध्ये आहेत त्याचे वडील – जॉर्ज मॅकफ्लाय – हा जॉर्ज अतिशय साधा भोळा आहे. मार्टीची आई लॉरेन ही आपल्या नवऱ्याच्या नेभळट स्वभावाला वैतागलेली आहे आणि पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेली आहे. मार्टीला एक रिकामटेकडा भाऊ आणि बहीण देखील आहेत.

अरे हो, प्रत्येक कथेत खलनायक हवाच की. आपल्या कथेतला खलनायक आहे बिफ टॅनेन. हा बिफ अगदी मोगॅम्बो किंवा गब्बरसिंगच्या तोडीचा आहे बरं का.



सर्वांशीच तुसडेपणाने वागणारा, दुष्ट, मग्रूर, कपटी (शब्द कमी पडत आहेत ) असा हा बिफ दुर्देवाने जॉर्जचा बॉस देखील आहे. आपले सगळे काम धाकदपटशाने जॉर्जकडून करून घेण्यात बिफ माहीर आहे. ह्या सर्वांसोबत आपल्याला भेटतो मार्टीचा जिवाभावाचा मित्र – डॉक्टर इमेट ब्राउन ऊर्फ डॉक.

हा डॉक एक विक्षिप्त शास्त्रज्ञ आहे. मार्टीपेक्षा वयाने भरपूर मोठा असला तरी ह्या दोघांची मैत्री अतिशय जिव्हाळ्याची आहे.

डॉक आपल्या चित्र-विचित्र शोध आणि प्रयोगांची माहिती वेळोवेळी मार्टीला देत असतो. डॉकने एका कारमध्ये भरपूर बदल करून एक टाईम मशीन बनवली. या टाईम मशीनमध्ये डॉकने Flux Capacitor नावाचे यंत्र बसवले आहे, ज्यामध्ये प्लुटोनियमद्वारे 1.21 Giga Watt इलेक्ट्रिसिटी उत्पन्न होऊन टाईम मशीन सर्किट ॲक्टिव्हेट होत असतात. त्यानंतर ही कार ८८ मैल प्रती तास (किंवा १२८.७ किलोमीटर प्रति तास) या वेगावर पोहोचल्यावर इच्छित काळामध्ये पोहोचत असते. ही टाईम मशीन चालवण्यासाठी आवश्यक असा प्लुटोनियमचा साठा डॉकने लीबियन अतिरेक्यांकडून चोरलेला असतो. अर्थातच अतिरेकी डॉकचा काटा काढण्याच्या प्रयत्नात असतात.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

डॉक मार्टीला ही टाईम मशीन दाखवण्यासाठी एका मध्यरात्री मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये बोलावतो. टाईम मशीनची सगळी हकीकत ऐकून आणि तिचे प्रात्यक्षिक बघून मार्टी चांगलाच आश्चर्यचकित होतो. दुर्दैवाने ह्या ठिकाणी अति*रेकी येतात आणि डॉकवर गोळी*बार करतात. मार्टी स्वतःला वाचवण्यासाठी कारमध्ये जाऊन बसतो.

कारमध्ये बसून पळून जाण्याच्या प्रयत्नात मार्टीकडून चुकून टाईम मशीन ॲक्टिव्हेट होते आणि वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळे कार प्रती तास ८८ मैल वेगावर पोहोचताच मार्टी जाऊन पोहोचतो ते थेट भूतकाळात – नोव्हेंबर १९५५ मध्ये.

आता परत १९८५ मध्ये येण्यासाठी आवश्यक असा प्लुटोनियम मार्टीकडे अर्थातच नसतो. परत कसे जावे ह्या विचारात असतानाच मार्टीची भेट तरुणपणीच्या जॉर्ज, लॉरेन आणि बिफसोबत होते. तरुण लॉरेन जॉर्जऐवजी मार्टीच्याच प्रेमात पडते आणि इथून पुढे अक्षरशः सावळा गोंधळ सुरु होतो. ह्या गोंधळातून कसा बसा निसटून मार्टी आपला मित्र डॉक्टर इमेट ब्राउनला शोधून काढतो.

तरुणपणीच्या डॉकला मार्टी समजाऊन सांगतो की तो भविष्यातून आलेला आहे आणि १९८५ मध्ये परत जाण्यासाठी त्याला डॉकची मदत हवी आहे. भविष्यात आपल्या हातून टाईम मशीन तयार होणार आहे हे ऐकून डॉकला स्वर्ग अक्षरशः दोन बोटांवर राहतो.

डॉकच्या मते, मार्टीमुऴे त्याच्या आई-वडिलांची पहिली भेट होऊ शकलेली नाही आणि म्हणूनच मार्टीने भविष्यात जाण्याआधी ताबडतोब त्यांची भेट होईल असा काही तरी मार्ग शोधून काढावा कारण ही भेट झाली नाही तर मार्टीचा भविष्यात जन्मच होणार नाही.

मार्टी आपल्या आई-वडिलांची भेट घडवून आणण्यासाठी काय काय खटपटी करतो? ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बिफ काय काय आडकाठ्या आणतो?

सगळ्या अडचणींमधून मार्ग काढणाऱ्या डॉकला मार्टीला भविष्यात परत पाठवण्यासाठी काय काय उचापती कराव्या लागतात, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

Fun Facts –

चित्रपटामध्ये मार्टीचा रोल केला आहे मायकल जे. फॉक्स ह्या गुणी अभिनेत्याने. जॉनी डेपनेसुद्धा ह्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. परंतु हा रोल मिळवला होता एरिक स्टोल्ट ह्याने. बरेचसे शूटिंग झाल्यावरही एरिकचा अभिनय दिग्दर्शकास फारसा पसंद न पडल्यामुळे तब्बल ३० लाखांची आर्थिक तरतूद करून मायकल जे. फॉक्सची वर्णी चित्रपटात लागली आणि मायकलने मार्टीच्या भूमिकेचे अक्षरशः सोने केले.

चित्रपटामध्ये टाईम मशीन म्हणून वापरली गेलेली डी लोरीयन कार ही DMC (De Lorean Motor Company) ने बनवलेले कारचे एकुलते एक मॉडेल.

कंपनीने केलेल्या जाहिरातीच्या मानाने आणि कारच्या अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे सुरुवातीला ही कार लोकांच्या पसंतीस फारशी उतरली नव्हती. परंतु बॅक टू द फ्युचर सिरीजमध्ये टाईम मशीन म्हणून मानाने मिरवलेली ही कार चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर एक स्टेटस सिम्बॉल म्हणून विलक्षण प्रसिद्ध झाली. Time Travel हे संपूर्ण मनुष्य जातीला पडलेले आणि न सुटलेले कोडे आहे. चित्रपटामध्ये Time Travel शी संबंधित अनेक संज्ञा वापरलेल्या आहेत, वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. ह्यापैकी कोणताही सिद्धांत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही तरीही त्या सर्व सामान्य माणसाला समजण्यासाठी अत्यंत सोप्या आणि खात्रीच्याच वाटतात. चित्रपटाचे यश कदाचित यातच दडलेले असावे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Back To The FutureMovieMovie ReviewScience Fiction
ShareTweet
Previous Post

भयानक विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या परिणामांवरचे बघायलाच हवेत असे ७ थरारक चित्रपट

Next Post

सध्या ट्रेंड होत असलेल्या डाल्गोना कॉफीचं भारताबरोबर एक नातं आहे..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सध्या ट्रेंड होत असलेल्या डाल्गोना कॉफीचं भारताबरोबर एक नातं आहे..!

अमेरिकन लोक लॉकडाउनमध्ये कोंबडीचे पिल्लू विकत घेण्यासाठी रस्त्यावर गर्दी का करत आहेत?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.