The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठीचा संघर्ष – मानवी बुद्धिमत्तेची अटीतटीची कसोटी

by द पोस्टमन टीम
7 April 2020
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब

===

सध्या जगभर कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आदानप्रदान थंडावले आहे. या नव्या व्हायरसवर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असले तरी, सामाजिक अंतराशिवाय सध्या कोणताच प्रभावी उपाय अजूनही सापडलेला नाही. परंतु, यामुळे जगभरातील सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले असून जणू जग एकाच ठिकाणी बंदिस्त झाल्याचा भास निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने सर्वच क्षेत्रांचे अतोनात नुकसान होत आहे.

सामाजिक अंतर पाळण्यासाठी प्रत्येकजण स्वतःच्याच घरात बंदिस्त आहे. यामुळे रोजच्या गरजा भागवणे देखील असहज बाब बनली आहे. सामान्य जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यासाठी कोरोनाव्हायरसची लस निर्माण करणे अत्यावश्यक आहे.

कोणत्याही आजारावर लस निर्माण करण्यासाठी किमान काही वर्षांचा कालावधी लागतोच. परंतु, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा वेग पाहता वर्षभराची वाट न पाहता जैवतंत्रज्ञान कंपन्या यावर लस शोधण्यासाठी वेगाने आणि तातडीने कामाला लागल्या आहेत.

संपूर्ण जग या व्हायरसच्या संक्रमणाने घायकुतीला आले असल्याने संशोधक आणि औषधनिर्माण क्षेत्रातील तज्ञ लवकरात लवकर ही लस सर्वजनिक रित्या कशी उपलब्ध करून देता येईल यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. यासाठी हे तज्ञ अगदी अत्याधुनिक लस निर्माण प्रक्रीयेचाही वापर करत आहेत. परंतु, अशा प्रक्रियेतून निर्माण झालेली लस यापूर्वी कधीही मोठ्या प्रमाणावर वापरत आणली गेली नव्हती.



शास्त्रज्ञांचे हे प्रयोग यशस्वी झाल्यास मात्र लवकरच कोव्हीड-१९ च्या महामारीला आवर घालण्यासाठी आपल्याकडे एक प्रभावी उपाय असेल.

लस बनवण्याची प्रक्रिया

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

शरीरात एखादा नवा विषाणू संक्रमण करतो तेंव्हा त्याच्याशी लढणारी प्रतिजैविके बनवण्यात शरीराला काही आठवड्यांचा कालावधी लागतो. या आठवड्याच्या कालावधीत शरीरात संक्रमित झालेले हे विषाणू कित्येक पटीने वाढतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास माणूस आजारी पडतो. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीलाही स्मरणशक्ती असते.

एखादा विषाणू जर त्याच्यासाठी आधीपासुनच परिचयाचा असेल तर, त्याला मारण्यासाठी लागणारी प्रतिजैविके बनवण्याचे काम शरीराकडून युद्धपातळीवर सुरु होते आणि नैसर्गिकरित्याच या विषाणूंचा नयनाट केला जातो.

ज्यामुळे विषाणूमार्फत होणाऱ्या संक्रमणावर अला घातला जातो आणि रुग्ण संपूर्ण बरा होतो. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती अशा प्रकारे कार्य करते. शरीराच्या या गुणधर्माचा विचार करूनच एखाद्या विषाणूवरील लस बनवण्यात येते. भविष्यात एखाद्या विषाणूचे संक्रमण होईल या अंदाजाने त्याविरोधात लढण्यासाठी शरीर आधीच सक्षम व्हावे ही कल्पना ध्यानात घेऊन लस बनवली जाते. सर्व लसी याच धरतीवर बनवल्या जात असल्या तरी, प्रत्येकाची प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची क्षमता एकसारखी नसते. सुरुवातीची प्रतिकारशक्ती शक्ती जितकी अधिक मजबूत असेल त्यानुसारच लस देखील प्रतिक्रिया देते.

यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. परंतु, कसलीच तयारी नसण्यापेक्षा किमान पूर्वतयारी म्हणून लस घेणे केंव्हाही चांगलेच.

लस तयार करण्याच्या आणि ती वापरण्याच्या पारंपारिक पद्धतीत रुग्णाच्या शरीरात त्याच प्रकारचे निष्क्रिय विषाणू सोडले जातात. या निष्क्रिय विषाणूंमुळे कोणी आजारी पडत नाही. परंतु शरीराला या विषाणूची ओळख होते आणि त्याविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कामाला लागते. भविष्यात जर याप्रकारच्या विषाणूंचे संक्रमण झालेच तर, शरीराची लढण्याची शक्ती आधीच तयार झाली असल्याने त्यामुळे रुग्णाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता संभवत नाही.

परंतु अशाप्रकारे निष्क्रिय जीवाणू तयार करण्याची प्रक्रिया ही काहीशी संथ, गुंतागुंतीची आणि तितकीच धोकादायक देखील आहे. म्हणून मोठ्याप्रमाणावर अशी लस बनवण्यासाठी दीर्घ कालावधी जावा लागतो.

म्हणूनच जेंव्हा एखाद्या विषाणूवर लस किंवा औषध उपलब्ध नसते तेंव्हा मोठ्याप्रमाणात लस तयार करण्यासाठी असे निष्क्रिय विषाणू निर्माण करणे धोक्याचे ठरू शकते. दुर्दैवाने हेच विषाणू अपघाताने हवेत पसरले तर आधीच्या गुंतागुतीच्या स्थितीत अजून मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

कोरोना व्हायरसने जगभर असे थैमान घातले असताना जवळपास पन्नास सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळा यावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांना कमीतकमी वेळेत कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरेल अशी लस शोधून काढायची आहे. परंतु आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव व्यापक प्रदेशांत पसरलेला असल्याने त्यावर लस तयार करत असताना संपूर्ण विषाणू तयार करण्याऐवजी त्या विषाणूचा एखादा घटक घेऊन तो सुद्धा इंजेक्शनद्वारे व्यक्तीच्या शरीरात सोडता येतो का हेही तपासून पहिले जात आहे. त्याच विषाणूतील एक घटक म्हणजे त्याच्यातील प्रथिने घेऊन त्यापासूनही लस बनवली जाऊ शकते.

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती विषाणूच्या पृष्ठभागावरील ही प्रथिने सहज ओळखू शकते. जेंव्हा सक्रीय विषाणू शरीरात संक्रमण करतो तेंव्हा त्याच्या पृष्ठभागावरील ही प्रथिने ओळखून रोगप्रतिकारशक्ती त्याविरोधात लढण्यास सज्ज होते. लस बनवण्यासाठीचा हा एक सोपा, जलद आणि सुरक्षित मार्ग आहे. छोट्या पेशीमध्ये अशाप्रकारच्या प्रथिनांची निर्मिती करणे सहज शक्य आहे. कोव्हीड-१९ या विषाणूच्या वरच्या टोकदार आवरणातून त्याच्यातील प्रथिने घेता येणे शक्य आहे. यापूर्वी HPV सारख्या संसार्गात अशाच पद्धतीने लस बनवण्यात आली होती

व्हायरसचा वापर करून लस बनवण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत फारच सोपी आहे. तरीही अशा पद्धतीने लस बनवायची म्हंटले तरी किमान एक वर्षाचा कालावधी लागेलच. सध्या याही पेक्षा जलद गतीने आणि कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही अशी लस बनवणे हेच या संशोधकांचे एकमेव उद्दिष्ट आहे. यासाठी हे संशोधक जनुकीय विज्ञानाचा आधार घेत आहेत. व्यक्तीच्या शरीरातच हे ‘व्हायरस प्रोटीन’ तयार झाल्यास त्यातून त्याच्यातील रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळू शकते. अशा पद्धतीच्या जनुकीय संशोधनात व्यक्तीच्या डीएनएचा वापर करण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते.

कोरोना व्हायरसच्या प्रोटीनची सांकेतिक भाषा ठरवणारे जे जनुक असेल ते इंजेक्शनच्या मध्यमातून व्यक्तीच्या शरीरात सोडले जाते. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या पेशी मध्ये ते प्रोटीन तयार होईल असा अंदाज असतो.

पण अशा पद्धतीने मानवी शरीरात पुरेसे प्रथिन तयार होईल की नाही याची शंभर टक्के खात्री देता येत नाही आणि त्या विषाणू विरोधात मजबूत रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल याचीही खात्री देता येत नाही. अशा पद्धतीने तयार करण्यात येणारी लस कितपत यशस्वी ठरेल याबाबत संशोधक देखील साशंक आहेत. तरीही FDA ने अशा प्रकारच्या संशोधनाला मान्यता दिली आहे. कारण कदाचित यातून एक आशेचा किरण सापडू शकतो.

२०१६ मध्ये अशाच पद्धतीने ‘झिका लसी’ची निर्मिती करण्यात आली होती. सध्या INOVIO फार्मास्युटिकल, इंक. देखील कोरोना व्हायरससाठी याप्रकारची लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

याचा थेट, जलद आणि प्रभावी परिणाम शोधण्यासाठी काही काही संशोधक DNA ऐवजी RNA द्वारे लस बनवण्याचे तंत्रज्ञान देखील वापरत आहेत. यापद्धतीने बनवलेली लस जास्त परिणामकारक ठरू शकते, असा त्यांचा दावा आहे. कारण RNA पेशीमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यापासून प्रोटीनची निर्मिती होते. आणि DNA च्या तुलनेत RNA चे विघटन जलद होते. RNAद्वारे बनवण्यात येणारी लस ही टेस्ट ट्युब्ज मध्ये तयार केली जाते. पारंपारिक लस निर्माण करण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत जास्त सोपी, जलद आणि सुरक्षित आहे असे मानले जातेशिवाय अशा पद्धतीने लस बनवण्याची प्रक्रिया ही काही तासातच पूर्ण होते. म्हणून काही फार्मास्युटिकल कंपन्या या तंत्रज्ञानाचा वापर करूनही लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अर्थात, कोव्हीड-१९ वरील लस बनवण्यात नेमका किती कालावधी जाईल हे सध्यातरी निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. यासाठी अनेकविध पद्धतींचा वापर करणे अपरिहार्य आहे.

अनेक कंपन्यानी अशा प्रकारे अनेक मार्ग वापरून यावरील लस शोधण्याचा प्रयत्न केल्यास किमान एकातरी पद्धतीने यश मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. यातून लवकरात लवकर जी लस तयार होईल ती बाजारपेठेत उपलब्ध करणे आणि महत्वाचे म्हणजे किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे ही आजची खरी गरज आहे. असे झाल्यास आज जी सर्वत्र अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर नियंत्रण मिळवण्यात थोडेफार यश नक्कीच येईल. कोरोनाला पायबंद घालण्यात ही लस प्रभावी ठरल्यास पुढील संसर्गाचा धोका देखील टाळता येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: CoronaCorona VaccinationCorona VirusCovid 19
ShareTweet
Previous Post

पुणेकर मित्रांनी मिळून सुरू केलेली कोरोना हेल्पलाईन ९०० वृद्धांसाठी वरदान ठरलीये!

Next Post

या भारतीय स्टार्टअप्सच्या कामामुळे कोरोनाविरोधातल्या जागतिक लढ्याला बळ मिळालंय…

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
Next Post
my lab

या भारतीय स्टार्टअप्सच्या कामामुळे कोरोनाविरोधातल्या जागतिक लढ्याला बळ मिळालंय...

बांधावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांपासून वर्षाला साडेपाच लाख रुपये उत्पन्न!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.