The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डबघाईला आलेल्या ‘ॲपल’ कंपनीला स्टीव्ह जॉब्सने कसं वाचवलं? जाणून घ्या..

by द पोस्टमन टीम
24 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


ॲपल हा ब्रँड जगभरात आज आपल्या युनिक प्रोडक्टससाठी प्रसिद्ध आहे. ॲपलचे युनिक टेक प्रॉडक्टस आज जगाच्या मार्केटवर अधिराज्य गाजवत आहे. ॲपलच्या आयफोन, आयपॅड, आयपॉड आणि मॅकबुक ह्या प्रॉडक्टसला आज जगभरात मोठी डिमांड आहे.

आज सर्वत्र ॲपलचा बोलबाला असून गर्भ श्रीमंत मंडळींपासून ते मध्यमवर्गीय लोकांपर्यंत सर्वांनाच ॲपलचे वेड लागले आहे. आज ॲपल ही जगात स्वतःची वेगळी सॉफ्टवेयर असलेली एक कंपनी असून तिच्या ह्याच युनिकनेसमुळे तिला जगभरात पर्सनल टेक प्रॉडक्टसच्या क्षेत्रात मोठी मागणी आहे.

ॲपलचा एक मोठा दिग्गज ब्रँड उभा करण्यात जर कोणाचा निर्विवादपणे मोलाचा वाटावा आहे तर तो आहे ॲपलचे संस्थपाक स्टीव्ह जॉब्ज यांचा, प्रसंगी नुकसान सोसून या माणसाने आपलं बिझनेसचे तत्व निरंतर पाळून हा ब्रँड मोठा केला आहे.

ॲपलला वाचवण्यात एक मोठा रोल स्टीव्ह जॉब्ज यांनी बजावला आहे.



सुरुवातीचा काळात स्टीव्ह जॉब्ज हा एक परफेक्शनिस्ट माणूस होता. त्याला कुठलीही गोष्ट परफेक्ट झालेली हवी होती. अगदी त्याने आणि त्याच्या कंपनीने मॅकिन्टॉश कॉम्पुटरच्या निर्मितीवर तब्बल ३ वर्षांचा वेळ खर्ची केला होता. त्याने शेवटची परवानगी देईपर्यंत त्याचं कॉम्प्युटर परफेक्ट आहे की नाही, याची अगदीच बारीक सारीक तपासणी केली होती.  परफेक्शनच्या ह्या नादात त्याने आपल्या कंपनीच्या प्रसिद्ध आणि प्रतिभावंत कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करताना देखील मागे पाहिलं नव्हतं.

तो त्यांच्या डिझाइन्स आणि अगदी पूर्णत्वास आलेले प्रोजेक्ट्स हे त्याला पसंत पडले नाही म्हणून सरळ त्या प्रोजेक्ट्सला तो कचऱ्याच्या डब्ब्यात पाठवायचा. तो अगदीच एखाद्या खडूस बॉसप्रमाणे आपले काम करत असायचा.

त्याच्या ह्या अशा वागणुकीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी ॲपलला सोडचिट्ठी दिलेली असली तरी आज ॲपलच्या प्रॉडक्टसमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात आलेली ही क्रांती देखील त्याच्या ह्याच परफेक्शनिझमचा परिणाम आहे. त्याला जरी सुरुवातीचा काळात त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या वागणुकीसाठी शिव्या हासडल्या असतील तरी त्याच्या त्या वागणुकीमुळे आज आधुनिक तंत्रज्ञान युगात प्रवेश करणे शक्य झाले आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पण त्याकाळी त्याचा हा स्वभाव त्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करत होता, इतका की एकदा त्याचे त्याचा कंपनीच्या सीईओ असलेल्या जॉन स्कली यांच्याशी वाद झाले होते.

याचा परिणाम फार गंभीर झाला आणि स्टीव्ह जॉब्जची त्यानेच स्थापन केलेल्या कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली.

जॉब्जने त्याकाळात आपल्या आयुष्यातील एक खूप मोठं अपयश पाहिलं होतं. त्याला त्यानेच मोठ्या केलेल्या आणि घाम गाळलेल्या कंपनीतून हद्दपार करण्यात आलं होतं. पण हार मानेल तो स्टीव्ह जॉब्ज कसला?

स्टीव्ह जॉब्जने नेक्स्ट आणि स्पिन पिक्सर नावाच्या दोन कंपन्यांची स्थापना केली, यासाठी लुकास या कंपनीच्या दोन ऍनिमेशन डिपार्टमेंट्सला विकत घेतले. पुढे त्याने त्या कंपन्या इतक्या मोठ्या केल्या की पडझडीला येऊन पोहचलेल्या ॲपलला सावरण्यासाठी त्याला आमंत्रित करण्यात आलं आणि १९९७ साली स्टीव्ह जॉब्जचे ॲपलमध्ये पुनरागमन झाले.

ॲपलमध्ये पुनरागमन झाल्यावर स्टीव्ह जॉब्जचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. त्याला आपल्या रागावर आणि करारी बाण्यावर विजय मिळवणे शक्य झाले होते.

आपल्या कर्मचाऱ्यांना कशी वागणूक द्यायची याची त्याला जाणीव झाली होती. त्याने अत्यंत खेळीमेळीचे वातावरण ॲपलमध्ये निर्माण करण्यास सुरवात केली.  त्याच्या हातात ॲपलची सूत्रे आल्यामुळे आणि त्याने अत्यंत युनिक आयडीयाज ॲपलमध्ये आणल्या. त्याच्या हाकालपट्टीनंतर डबघाईला आलेल्या ॲपलमध्ये त्याने नवीन प्राण फुंकले.

ॲपलमध्ये स्टीव्ह जॉब्जच्या परतीनंतर अनेक बदल झाले. स्टीव्ह जॉब्जच्या ॲपलने स्वतःच्या आयओएस नामक ऑपरेटिंग सिस्टिमला जन्म दिला. मायक्रोसॉस्टला आवाहन देण्याचे काम ह्या सिस्टीमने केलं.

स्टीव्ह जॉब्जमुळे अमेरिकन कॉम्प्युटर मार्केटमध्ये एक क्रांतिकारी बदल घडून आला. त्याने पुढे आयपॉडचा आविष्कार केला, जो लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. आयपॉडने म्युझिक प्रेमी तरुण मंडळींमध्ये केवळ क्रेझ निर्माण केलं नाही तर अनेकांना वेड लावलं. जगभरात ॲपलचा गाजावाजा झाला.

स्टीव्ह जॉब्जने पुढे मोबाईल फोनच्या क्षेत्रात क्रांतिकारी असा त्याचा ‘आयफोन’ उतरवला.

त्याकाळात फक्त एका विशिष्ट वर्गासाठी हा फोन होता आणि त्याच्या युनिक फीचर्समुळे तो मोठ्या प्रमाणात फोफावला. आज आयफोनचे १६ पेक्षा जास्त व्हर्जन्स बाजरात असून आजही जगभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. स्टीव्ह जॉब्जच्या धोरणी कारभारामुळे आणि वेगळेपण जपण्याच्या ध्यासामुळे आज ॲपल जगातल्या टॉप मोबाईल ब्रँडसमध्ये सर्वोच्च स्थनावर विराजमान आहे.

आयफोनच्या प्रायव्हसी पॉलिसीची आणि ऑपरेटिंग सिस्टीमची रचना स्टीव्ह जॉब्जने घालून दिलेल्या आदर्शांवर करण्यात आल्यामुळे आजदेखील ॲपल जगातील सर्वात सुरक्षित असा फोन आहे.

स्टीव्ह जॉब्जच्या संकल्पनेतून आलेल्या आयपॅडने देखील मोठा क्रांतिकारी बदल आणला होता. कॉम्प्युटर सारखी प्रणाली आणि अत्यंत सहज हाताळणी पद्धत तसेच टच स्क्रीन टेक्नॉलॉजी ह्याच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या ह्या टॅबलेटने देखील जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली होती.

५ ऑक्टोबर २०११ ला स्टीव्ह जॉब्जचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर अनेक बदल कंपनीने केले असले तरी आजही कंपनीचा मूळ गाभा निर्माण करण्याचे काम स्टीव्ह जॉब्जने घालून दिलेल्या नाविन्यतेच्या तत्त्वज्ञानावरच चालतो.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात क्रांतिकारक बदल घडवून आणण्यात स्टीव्ह जॉब्ज यांचे योगदान निर्विवादपणे प्रशंसनीय आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Apple CompanyInnovationTechnology
ShareTweet
Previous Post

पुलवामा हल्ल्यात ‘तो’ शहीद झाला, त्याच्या स्मरणार्थ आता ‘ती’ स्वतः सैन्यात दाखल झालीय!

Next Post

दरोडेखोरांच्या एका टोळीने सरकारला ‘ईंटेलिजन्स ब्युरो’ ची स्थापना करण्यास भाग पडले होते

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

दरोडेखोरांच्या एका टोळीने सरकारला 'ईंटेलिजन्स ब्युरो' ची स्थापना करण्यास भाग पडले होते

चीनची आ*ण्विक ताकद जाणून घेण्याच्या भारताच्या प्रयत्नात अमेरिकेने केली होती अभूतपूर्व मदत!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.