The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात वसवलंय अवाढव्य ‘रिअल इस्टेट’ साम्राज्य!

by द पोस्टमन टीम
25 April 2020
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
trump the postman
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत असून अमेरिकेच्या भारताशी असलेल्या संबंधांना वृंधिगत करण्यासाठी ट्रम्प यांची ही भारत भेट महत्वाची ठरणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतात जसे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून येत आहे तसेच ते एका बिझनेसमनच्या भूमिकेतून देखील भारताला भेट देणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प हे एक मोठे उद्योगपती होते.

एक रियल इस्टेट उद्योजक म्हणून ते अमेरिकेत प्रसिद्ध असून त्यांच्या नावावर शेकडो डॉलर्सची प्रॉपटी आणि शेयर्स आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात बांधकाम क्षेत्रापासून केली.  त्यांच्या वडिलांच्या एलिझाबेथ ट्रम्प अँड सन्स ह्या उद्योग समूहात त्यांनी काम करायला सुरुवात केली. पुढे ट्रम्प यांच्या नेतृत्वात हा उद्योग भरभराटीला लागला आणि त्यांनी ह्या समूहाचे नामकरण ट्रम्प ऑर्गनायजेशन असे केले. इतकंच नाहीतर न्यूयॉर्क शहराच्या अत्यंत गजबजलेल्या अशा आणि प्रसिद्ध अशा मॅनहॅटन ह्या भागातील अनेक टोलेजंग इमारती ह्या ट्रम्प यांच्या मालकीच्या आहेत. जगभरात अनेक देशात श्रीमंत लोकांसाठी गोल्फ कोर्स उभारण्याचे काम देखील ट्रम्प यांच्या कंपनीने केले आहे.

१९९६ ते २०१६ पर्यंत अमेरिकेतल्या गर्भ श्रीमंत लोकांच्या पीझन्ट कार्यक्रमाला देखील ते हजेरी लावायचे.



ते जसे अनेक व्यवसायात यशस्वी ठरले त्याचप्रमाणे ते अनेक व्यवसायात अपयशी देखील ठरले आहेत. त्यांचे अनेक कॅसिनो आणि हॉटेल दिवाळखोरीत निघाले आहेत. पण त्याचा असा विशेष परिणाम त्यांच्या श्रीमंतीवर झालेला नाही. २०१६ साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यावर त्यांनी आपल्या ट्रम्प ऑर्गनायजेशनमधील सगळ्या जबाबदार पदांवरून राजीनामा दिला आहे. आज ही कंपनी ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि एरीक ट्रम्प दोघे चालवत आहेत. ट्रम्प ऑर्गनायजेशन ही आज ५०० कंपन्यांचा मोठा समूह आहे.

आज कंपनीचे वार्षिक उत्पन्न ५ हजार कोटी रुपये इतकं आहे. फक्त ट्रम्प यांच्या अध्यक्ष म्हणून असलेल्या कारकिर्दीसाठी ह्या कंपनीने परदेशात गुंतवणूक केलेली नाही आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आज भारतात ट्रम्प यांच्या कंपनीची मोठी गुंतवणूक आहे. २०१३ साली ट्रम्प ऑर्गनायजेशनने भारतातील रियल इस्टेट अर्थात बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकले. लोढा ग्रुप, पंचशील ग्रुप, एम ३ एम, ट्रिबेका आणि युनिमार्क ह्या भारतातील प्रसिद्ध बांधकाम कंपन्यांशी ह्या ट्रम्प ऑर्गनायजेशनने संधान बांधले आहे. फक्त ब्रँड नेम ट्रम्प ऑर्गनायजेशनने भारतीय कंपन्यांना वापरण्यास दिले. कुठलीही ठोस आर्थिक गुंतवणूक केलेली नाही.

आज बांधकाम क्षेत्रात ट्रम्प यांच्या सोबत काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांचे म्हणणे आहे, ट्रम्प यांच्या नुसत्या नावाचा आम्हाला मोठा फायदा झाला असून आज भारतातील आमचा व्यवसाय निव्वळ ह्या नावामुळे ४० टक्क्यांनी वधारला आहे.

भारतात ट्रम्प ऑर्गनायजेशनचे काही प्रमुख प्रोजेक्ट्स आहेत, जे भारतातील अत्यंत मोक्याच्या जागांवर आहेत.  ते प्रोजेक्ट्स कोणते त्याची आपण आता माहिती घेऊयात …

१) ट्रम्प टॉवर्स, पुणे

पुणे शहरातील पंचशील ग्रुप सोबत ट्रम्प ऑर्गनायजेशनने संधान बांधले असून कल्याणीनगर परिसरात २३ मजल्यांचे दोन विशाल ट्रम्प टॉवरर्स उभारण्यात आले आहेत. ह्यात एकूण ४६ सिंगल स्टोअर अपार्टमेंट्स आहेत. २०१२ साली ह्याचे लॉन्चिंग करण्यात आले होते. २०१९ साली हे टॉवर्स बांधून पूर्ण झाले आहेत. ह्यावर १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून १३,५०० वर्गमीटरच्या मोठ्या क्षेत्रात हे पसरले आहेत. ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांचे ह्या टोलेजंग इमारतीत प्रत्येकी एकी फ्लॅट आहे.

२) ट्रम्प टॉवर, मुंबई

गोल्डन माईल, वरळी ह्या मुंबईच्या एका उच्चभ्रू भागात मुंबईच्या प्रसिद्ध लोढा ग्रुपने हे ट्रम्प टॉवर उभारले आहे. ह्या टॉवरमध्ये एकूण ७५ मजले असून ह्यात जवजवळ ३०० अपार्टमेंट्स आहेत. २०१३ साली ह्या प्रोजेक्टचे काम हाती घेण्यात आले होते. २०१९ साली हे काम पूर्ण झाले आहे. ह्यातील एका फ्लॅटची किंमत ही ९ कोटी रुपयांपासून सुरु होणार आहे. ह्या टॉवरचे वैशिष्ट्य आहे यातील प्रायव्हेट जेट सर्व्हिस आणि ट्रम्प कार्ड.

३) ट्रम्प टॉवर,  कोलकाता

कोलकाता शहराच्या ईस्टर्न रिच बायपास रोड वरील एका अत्यंत उच्चभ्रू अशा भागात हे टॉवर उभारलं जात आहे. ह्या टॉवरच्या निर्मतीचे काम युनिमार्क आणि आरडीबी तसेच ट्रिबेका ग्रुपकडून केले जाणार आहे. ह्या टॉवरमध्ये एकूण ३९ मजले आहेत. ह्यात एकूण १४७ अपार्टमेंट आहेत. येथील एका फ्लॅटची किंमत ही ३.४९ कोटी इतकी आहे. अजूनही ह्या टॉवरच्या निर्मितीचे काम सुरु असून २०२० पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. स्कायटोप स्कायलॅब, हीटेड पूल आणि सन टेरेस हे ह्या टॉवरचे वैशिष्ट्य असणार आहेत.

४) ट्रम्प टॉवर, गुरुग्राम

ट्रिबेका ट्रम्प टॉवर्स हे गुरुग्राम येथे असून त्याची निर्मिती एम ३ एम ग्रुपकडून केली जाणार आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ६५ मध्ये हे दोन ट्रम्प टॉवर्स उभारले जात असून ह्यात प्रत्येकी ५० मजले असणार आहेत. ह्यात एकूण २५८ अपार्टमेंट्स देखील असणार आहेत. ह्याचे लॉन्चिंग २०१८ साली करण्यात आले होते. २०२३ साली हा प्रोजेक्ट पूर्ण होणार असून ह्यातील एका फ्लॅटची एकूण किंमत ५.५ कोटी रुपये असणार आहे. ह्यात प्रायव्हेट लिफ्ट आणि २२ फूट उंच डबल हाईट लिव्हिंग रूम आहे.

५) आयरियो ट्रम्प टॉवर, गुरुग्राम

आयरियो ग्रुप ह्या टॉवर्सची निर्मिती करत असून ह्या गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स परिसरात हे टॉवर्स असणार आहेत.

अशा प्रकारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मोठे भांडवल भारतात गुंतलेले नसले तरी त्यांच्या नावाच्या ट्रेडमार्कवर मोठी ब्रॅण्डिंग करून मोठे पैसे ट्रम्प यांना मिळणार आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Donald TrumpTrump Towers
ShareTweet
Previous Post

नौदलाच्या अवघ्या २० सैनिकांनी सुरु केलेल्या उठावाने ब्रिटीश सत्ता खिळखिळी केली होती

Next Post

पुलवामा हल्ल्यात ‘तो’ शहीद झाला, त्याच्या स्मरणार्थ आता ‘ती’ स्वतः सैन्यात दाखल झालीय!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post
nikita the postman

पुलवामा हल्ल्यात 'तो' शहीद झाला, त्याच्या स्मरणार्थ आता 'ती' स्वतः सैन्यात दाखल झालीय!

डबघाईला आलेल्या 'ॲपल' कंपनीला स्टीव्ह जॉब्सने कसं वाचवलं? जाणून घ्या..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.