The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या भारतीय युवकाने चंद्रावर हरवलेलं ‘विक्रम लँडर’ शोधण्यात यश मिळवलंय!

by द पोस्टमन टीम
27 October 2021
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
vikram lander lost the postman
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

७ सप्टेंबरमध्ये भारताच्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडर यानाशी मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात संपर्क तुटला होता. हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले आणि कुठेतरी जाऊन पडले. त्याचे मिशन जरी अयशस्वी ठरले असले तरी त्याचे स्थान शोधणे देखील महत्वाचे होते.

त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून अमेरिकेची अंतराळ संस्था नासादेखील इस्रोला मदत करत होती. नासाने ह्या यानाच्या अवशेषांचा शोध लावला देखील होता. ह्यासाठी त्यांना एका भारतीय शास्त्रज्ञाने मदत केली होती.

षन्मुगा सुब्रमण्यम असे भारतीय संशोधकांचे नाव आहे. ते इंजिनियर असून सध्या नासामध्ये कार्यरत आहेत.



२ डिसेंबर रोजी नासाने लुनार रेकोनायसेंन्स ऑर्बिटर ह्या अंतराळ दुर्बिणीच्या सहाय्याने काही महिन्यांपासून त्या चंद्राच्या पृष्ठभागावर कुठेतरी आदळलेल्या विक्रम लँडरच्या अवशेषांना शोधले आहे.

१७ सप्टेंबरला भारतीय अवकाश संस्था इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संबंध तुटून एक आठवडा देखील उलटला नव्हता त्यावेळी नासाने ह्या आपल्या अवकाशस्थ लुनार रेकोनायसेंन्स ऑर्बिटर ह्या दुर्बिणीला परिसराच्या समीक्षेच्या कामाला लावले.

 

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

 

परंतु चंद्रावरचा १४ दिवसीय अंधाराचा काळ जवळ येत होता. यामुळे सर्वत्र अंधार पसरणार होता, यामुळे नासाला प्रतीक्षा करणे अपरिहार्य होते. त्यातल्या त्यात विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण गोलार्धात उतरले होते.

दक्षिण गोलार्धात सुर्य फक्त १९ अंश वर आकाशात कलत असतो त्यामुळे त्या भागात बहुतांश काळ हा अंधारच असतो.

सूर्यप्रकाशामुळे चांद्रवरच्या फक्त डोंगर दऱ्याची बाजू दृष्टिक्षेपास पडत असते. बाकी भागात घनगर्द अंधार आणि प्रकाशित भागाची सावली पसरलेली असते. अशा ह्या अत्यंत प्रतिकूल भागात विक्रम लँडरचा शोध घेणे म्हणजे एकप्रकारचे अग्निदिव्य म्हणायला हवे.

नासदेखील ह्याचा अडचणीचा सामना करावा लागत होता, त्यामुळे विक्रम लँडरचा शोध लावणे नासाला अवघड होऊन बसले होते.

नासाने त्याची काही छायाचित्रे २६ सप्टेंबरला प्रकाशित केली होती. अनेकांनी ह्या छायाचित्रांच्या आधारावर संशोधन करायला सुरुवात केली. ह्यात सुब्रमण्यम हा चेन्नईत स्थित मेकॅनिकल इंजिनियर देखील होता. जी गोष्ट नासा शोधू शकली नाही, ती आपण का म्हणून नको शोधायला ? ह्या साठी त्याने शोध घेण्यास सुरवात केली.

लार्सन अँड टर्बो ह्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारा सुब्रमण्यम हा तमिळनाडूच्या तिरुनवेली ह्या जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. लहानपासून त्याला रॉकेट आणि अंतराळाचे विशेष आकर्षण होते.

लहानापासून त्याला रॉकेट आकाशात उड्डाण घेताना बघून प्रचंड आनंद होत होता आणि यातूनच पुढे तो अवकाशसंबंधित गोष्टीत रस घेऊ लागला.

सुब्रमण्यमने जी मदत नासाला केली होती, ती नासापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

सर्वात आधी त्याच्याकडे विक्रम लँडरच्या मार्गाबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नव्हती. पण सीस बसा नामक नेदरलँडच्या एका अंतराळवीराने ट्विट केलं होतं की विक्रम लँडरने उत्तर ध्रुव पार केला आहे.

ह्या अत्यंत तोडक्या माहितीच्या आधारावर त्याने विक्रम लँडर उत्तर ध्रुवावर असू शकतो अशी शक्यता निर्माण झाली. सुब्रमण्यम पुढील काही दिवस नासाने प्रकाशित केलेल्या चंद्राच्या फोटोंचे अधिक निरीक्षण केले.

त्याला त्यात अनेक चुकीच्या पण आश्वासक अशा गोष्टी आढळून आल्या, अनेक ट्विटर युझर्सने देखील त्याला त्याची चूक दाखवून दिली.

पुढे अशाच एका ट्विटवरून तो रेडिट ह्या संकेतस्थळावरील एका फोरममध्ये जाऊन पोहचला आणि त्याठिकाणी त्याला हवी असलेली माहिती सहज उपलब्ध झाली आणि त्याने त्या माहितीच्या आधारावर इस्रोच्या लाईव्ह इमेजेस बघायला सुरुवात केली.

त्या आधारावर त्याने निष्कर्ष काढला की विक्रम लँडर नक्कीच त्याच्या प्रस्तावित लँडिंग साईटच्या आसपास कुठेतरी पडलं असेल.

त्यानुरूप त्याने विक्रम लँडरच्या प्रस्तावित लँडिंग साईटच्या १ किलोमीटर  इतक्या आजूबाजूच्या क्षेत्रफळाचा आढावा घेण्यास सुरुवात केली.

प्रस्तावित लँडिंग साईटच्या उत्तरेला त्याला काहीतरी आढळून आलं.आधी त्याला अनेक चुकीच्या पण आश्वासक असा जागा सापडल्या पण उत्तरेला त्याला काहीतरी आढळून आलं आणि ते विक्रम लँडरचे अवशेष असले पाहिजे असं त्याला जाणवलं. त्याने तत्काळ नासाशी संपर्क साधला.

त्याने नासा आणि एलआरओ ह्या दुर्बिणीच्या नियंत्रक मंडळाला विक्रम लँडरच्या संभावित जागेविषयी सूचना केली आणि त्यांनाही त्याठिकाणी फोकस केल्यावर विक्रम लँडरचे अवशेष आढळून आले.

सुब्रमण्यमने ट्विटचा माध्यमातून नासाला विक्रम लँडरच्या संभावित साईट संदर्भात सूचना केली होती. ११ नोव्हेंबरला नासाच्या एलआरओ दुर्बिणीने चंद्रावरील विक्रम लँडरच्या अवशेषांना शोधून काढले होते.

नासाने आपल्या एका फोटोत प्रस्तावित लँडिंग साईटच्या उत्तरेला असलेल्या विक्रम लँडरचा अवशेषांचे व्यवस्थितपणे हायलायटिंग करून दाखवले होते. त्यात ते किती फरफटत चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले याची देखील नोंद घेण्यात आली होती.

२५०० फूट लांबीवर ते विक्रम लँडर जाऊन आदळले होते. २६ सप्टेंबरच्या फोटोत अत्यंत यशस्वीपणे विक्रम लँडरचा शोध घेतलेला आढळतो आहे.

जॉन केलर जे एलआरओ दुर्बीण अभियानाचे सहप्रमुख आहेत त्यांनीही विक्रम लँडरच्या संशोधनातील सुब्रमण्यमच्या योगदानाबद्दल त्याचे आभार व्यक्त केले आहे.

त्याचा निरीक्षण कौशल्यामुळे आम्हाला विक्रम लँडर गवसले असे त्यांनी म्हटले आहे. एलआओ च्या टीमने हे दाखवून दिलं आहे की विक्रम लँडरच्या अवस्थेत कुठलाच बदल होत नसून यावरून ते त्याचेच अवशेष असल्याचे स्पष्ट झाले आहे. एलआरओने आपल्या ट्विटच्या माध्यमातून सुब्रमण्यम यांचे आभार व्यक्त केले आहे.

तर सुब्रमण्यम यांनी देखील एलआरओचे आभार व्यक्त केले आहे. त्यांच्या दुर्बिणीच्या सहाय्यानेच त्याला हा शोध घेणे सहज शक्य झाल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. सर्वत्र त्याचे कौतुक होत असून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Moon MissionNASAScienceSpace ResearchSpace ScienceVikram Lander
ShareTweet
Previous Post

या ब्रिटिश संशोधकामुळे भारताचा अश्मयुगीन इतिहास जगासमोर आला आहे

Next Post

भारतात फिजिक्स शिकणारा असा एकही विद्यार्थी नसेल जो ‘या’ माणसाला ओळखत नाही

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

भारतात फिजिक्स शिकणारा असा एकही विद्यार्थी नसेल जो 'या' माणसाला ओळखत नाही

या राजाने नालंदा विद्यापीठाला जगातील सर्वोत्तम विद्यापीठ बनवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.