The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर टेस्लाचा सायबरट्र्क लाँच झाला..!

by Heramb
3 December 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इलॉन मस्क यांच्या टेसला कंपनीने २००८ पासून इलेक्ट्रीक कार्सची निर्मिती करायला सुरुवात केली. २०२० पर्यंत टेसलाने कार्सच्या निर्मितीमध्येच पूर्ण ताकद लावली होती. मागच्या काही वर्षांत कंपनीने इलेक्ट्रीक ट्रक्सबद्दल अजून कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे दिसते. इलेक्ट्रीक ट्रक्सची निर्मिती करण्याचा दावा करणारी आणखी एक कंपनी होती — निकोला. पण तो एक फ्रॉड असल्याचे समोर आले आहे. २०२२ साली टेसला कंपनीने इलेक्ट्रीक ट्रकचा मॉडेल सर्वांसमोर आणला. ‘सेमी’ असे त्या इलेक्ट्रीक ट्रकचे नाव.

टेसला कंपनी फक्त यावरच थांबली नाही तर त्यांनी पुढे एक पिकअप ट्र्क देखील तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर काम देखील सुरु केले. गेली काही वर्षे या प्रोजेक्टवर काम सुरु असूनही त्याची अंशतः पूर्तता यावर्षी झाली आहे. २०१९ साली, टेस्ला कंपनीचे डिझायनर फ्रांझ वॉन होलझॉसेन यांनी सायबरट्रकच्या खिडक्यांवर मेटल बॉल फेकून त्या किती टणक आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयोग फसला आणि त्या खिडक्या फुटल्या. या घटनेनंतर सुमारे ४ वर्षे या प्रोजेक्टवर काम सुरु होते.

 ‘सायबरट्रक” नावाने प्रसिद्ध झालेला हा इलेक्ट्रीक पिकअप ट्रक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी लाँच झाला. २०२४ साली सायबरट्रक्स ग्राहकांपर्यंत पोहोचले. नेमकं काय खास आहे या सायबरट्रक्समध्ये, जाणून घेऊया या लेखातून..

दिसायला हा सायबरट्र्क एखाद्या अत्याधुनिक एलियनची गाडी असल्यासारखा वाटेल, पण आजच्या काळातील लिडिंग आणि सर्वोच्च क्षमतेच्या समजल्या जाणाऱ्या पिकअप ट्रक्सच्या ब्रॅण्ड्सना देखील हा सायबरट्र्क टक्कर देऊ शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्टीलची मजबूत, बुलेटप्रूफ बॉडी, ६०० हॉर्सपॉवरच्या दोन मोटर्सचा एक मॉडेल – ‘ऑल व्हील ड्राइव्ह’ आणि ८४५ हॉर्सपॉवरच्या तीन मोटर्सचा मॉडेल – ‘सायबरबीस्ट’ अशा दोन व्हेरिएंट्स बाजारात आल्या आहेत.



‘सायबरट्रक’ ११ हजार पाउंड अर्थात ५ हजार किलोपर्यंतचे वजन वाहून नेऊ शकतो आणि एका चार्जमध्ये ट्र्क सुमारे ३४० मैल अर्थात ५४७ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो असा टेस्लाचा दावा आहे. तर १५ मिनिटे केलेल्या चार्जमध्ये हाच ट्रक सुमारे १२८ ते १३६ मैल अर्थात २००-२२० किलोमीटर आणखी धावू शकतो.

टेस्लाने अजूनही आपल्या सायबरट्र्कमधील बॅटरीजची क्षमता स्पष्ट केलेली नाही. तरी कंपनीच्या मते, सायबरट्रकच्या ऑल-व्हील-ड्राइव्ह मॉडेल १५ मिनिटे केलेल्या चार्जिंगमुळे १३६ मैल अर्थात २१८ किलोमीटर धावू शकतं, तर सायबरबीस्ट हे मॉडेल १२८ मैल म्हणजेच सुमारे २०६ किलोमीटर धावू शकतं.

वर सांगितल्याप्रमाणे टेस्लाच्या मते, ऑल-व्हील-ड्राइव्ह हे मॉडेल एका पूर्ण चार्जनंतर सुमारे ५४७ किलोमीटरचा प्रवास करू शकतं, तर सायबरबीस्ट हे मॉडेल एका पूर्ण चार्जनंतर सुमारे ५१४ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं. याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ऑप्शनल रेंज एक्सटेन्डर बॅटरी पॅकच्या सहाय्याने ऑल-व्हील-ड्राइव्ह हे मॉडेल ४४० मैल अर्थात ७०८ किलोमीटर तर सायबरबीस्ट मॉडेल सुमारे ४७० मैल अर्थात ७५६ किलोमीटरचा प्रवास करू शकतं. ऑप्शनल रेंज एक्सटेन्डर बॅटरी पॅक ट्रकच्या कार्गोबेडमध्ये सेट करता येते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

सायबरट्रकमध्ये एकूण ६ लोक बसू शकतात. शिवाय ट्रकच्या डॅशबोर्डवर १८.५ इंचाची एक टचस्क्रीन देखील पाहायला मिळते. याशिवाय कार्गोबेडची १२१ क्युबिक फूट इतकी जागा आहे. याशिवाय या ट्रकचे टेलगेट देखील मोठे आहे ते उघडल्यास या ट्र्कमध्ये एक चारचाकी वाहन आणि मोटारसायकल देखील मावू शकते.

 

सायबरट्रकमध्ये डॅशबोर्डच्या मध्यभागी १८.५ इंचाची मोठी टचस्क्रीन आहे. याशिवाय मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी देखील सेंट्रल कन्सोलच्या मागील बाजूस ९.४ इंच टचस्क्रीन देखील आहे. एकूणच टेसलाची ही निर्मिती भविष्याचा वेध घेणारी ठरणार आहे.

 

सायबरट्रकच्या लाँच इव्हेंटदरम्म्यान इलॉन मस्कने एक गोष्ट सांगितली, त्याचा मुलगा त्याला नेहमी विचारतो, “भविष्य हे भविष्यासारखं का नाही दिसत?” त्याच्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांतच त्याने या ट्रकचे डिझाईन केले असावे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पेप्सीकोकडून ४ हजार करोडची ऑफर असूनही त्यांनी कम्पनी विकली नाही

Next Post

स्वतः उभारलेल्या कंपनीतून हकालपट्टी झालेला सॅम अल्टमन पहिलाच नव्हता..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

स्वतः उभारलेल्या कंपनीतून हकालपट्टी झालेला सॅम अल्टमन पहिलाच नव्हता..!

या पठ्ठ्याने आपला फ्लॅट विकून मोफत हेल्मेट द्यायची मोहीम हाती घेतलीये..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.