The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

by द पोस्टमन टीम
16 September 2025
in इतिहास
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मानवी इतिहासात अनेक प्रकारची यु*द्धं झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान जसजसं बदलत गेलं तसतसं यु*द्धतंत्रंही बदलत गेलं. सध्याच्या काळात विकासित तंत्रज्ञानामुळे यु*द्धाचे स्वरूप बदलले आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या काळातल्या यु*द्धाचं तंत्र आणि त्यांचा निकाल लागण्यासाठी लागणारा वर्षानुवर्षांचा कालावधी, याचा विचार केला तर तशा यु*द्धांत त्या योद्ध्यांच्या शौर्यापेक्षाही धैर्य आणि चिकाटीची परीक्षाच अधिक पाहिली जात असावी.

आताच्या काळात लढाऊ विमानांपासून ते हजारो किलोमीटरवर अचूक मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांपर्यंत सर्व प्रकारची शस्त्रास्त्रं उपलब्ध आहेत त्यामुळे शत्रूचे किल्ले, लष्करी ठाणी किंवा दळणवळणाचे मार्ग यांना वेढा वगैरे घालून शत्रूची नाकाबंदी करण्याची पद्धत कालबाह्यच ठरली आहे. आताच्या पद्धतीत संगणक हॅक करून आणि जगाशी जोडलेल्या अर्थकारणात खोडा घालून लांबूनच शत्रूची ‘नाकाबंदी’ करणं अधिक प्रभावी ठरतं.

पूर्वीच्या काळातील यु*द्धतंत्रात मात्र वेढा घालून शत्रूची रसद तोडणे आणि अखेर गुडघ्यावर आणून त्यांचे पारिपत्य करणे हाच सर्वांत महत्वाचा भाग होता. नजीकच्या भूतकाळात १९४१ सालचा लेनिनग्राडचा वेढा हा दुसऱ्या महायु*द्धापर्यंतच्या काळातला सर्वांत कठीण वेढा मनाला जातो. मात्र, मध्ययुगीन काळातील मोठ्या वेढ्यांची माहिती घेतली तर हा वेढा फारच सुसह्य वाटायला लागेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भयानक वेढ्यांची गोष्ट सांगणार आहोत.

१. ड्रेपानाचे युद्ध:



सिसिली बेटाच्या पश्चिमेस असलेला ‘ड्रेपाना’ हा कार्थेज राजवटीच्या सर्वात महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक सागर किनाऱ्यावरचा किल्ला! प्युनिक यु*द्धादरम्यान (इ.स. पूर्व २६४ ते २४१) रोमन नौदलाने समुद्रातून आणि पायदळाने जमिनीवरून हल्ला करून या किल्ल्याला वेढा घातला. हा वेढा (इ.स.पूर्व २४९ ते इ. स. पूर्व २४१ असा तब्बल ८ वर्ष चालला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

अखेर रोमनांचा वेढा फोडून कार्थेजिनियन सैन्याने रोमच्या नौदलाचा ताफा ताब्यात घेतला. रोमन नौदलाकडे असलेल्या ९३ यु*द्धनौका कार्थेजच्या हाती पडल्या. कार्थेजच्या ताफ्यात असलेल्या १२३ यु*द्धनौकांपैकी एकीलाही ओरखडासुद्धा उठला नाही.

मात्र, जमिनीवरचा वेढा सुरूच राहिला. अर्थात त्याच वर्षी रोमन नौदल अधिक मजबूत ताफ्यासह पुन्हा दाखल झालं आणि त्यांनी कार्थॅजिनियन्सचा पराभव केला. या वेढ्याबरोबरच पहिल्या प्युनिक यु*द्धाचा देखील अंत झाला. हे यु*द्ध संपवण्यासाठी दुसऱ्या स्वारीत रोमन नौदलाने तब्बल २०० यु*द्धनौका आणल्या होत्या.

२. मध्य युगातलातील थेस्सालोनिका बंदरातला तुर्कांचा वेढा!: 

ऑटोमन सुलतान मुराद (द्वितीय) याने आपल्याच वंशाच्या बंडखोरीचा प्रयत्न करणाऱ्या बायझंटाईन पॅलेओलोगोई राजघराण्याला शिक्षा करण्यासाठी थेस्सालोनिका काबीज करण्याचा निर्णय घेतला. हे शहर म्हणजे महत्वाचं व्यापारी बंदर आणि बायझंटाईन साम्राज्यातलं दुसरं सर्वात महत्वाचं शहर!

सुलतान मुरादने सन १४२२ साली थेस्सलोनिका बंदराला वेढा घातला. शहराच्या आजूबाजूचा प्रदेश आधीच तुर्कांनी ताब्यात घेतला होता. बायझंटाईन साम्राज्याचा स्थानिक प्रशासक अँड्रोनिकॉस पॅलिओलोगोस याने शहर वेढ्यात असतानाच त्याच्या संरक्षणाची जबाबदारी व्हेनिस प्रजासत्ताकाकडे सुपूर्द केली.

अँड्रॉनिकोसच्या निर्णयामुळे सुलतान मुरादने त्याचा मित्र दक्षिण ग्रीसमधल्या व्हेनेशियन प्रदेशांवर हल्ला केला. त्यानंतर मात्र व्हेनेशियन राज्यकर्त्यांनी मध्ये पडण्यास नकार दिला.

आणखी एक कथा अशी सांगितली जाते की, बायझंटाईन्सने हे शहर व्हेनेशियन लोकांना विकलं. खरं तर, बायझंटाईन्स अगदी कॉन्स्टँटिनोपलसुद्धा व्हेनेशियन लोकांच्या ताब्यात द्यायला तयार होते, अशी एक वदंता आहे. मात्र, हा फक्त तुर्कांकडून करण्यात आलेला अपप्रचार होता, अशीही समजूत आहे.

व्हेनेशियन सैन्य सन १४२३ मध्ये थेस्सालोनिकी इथे आलं. मात्र, शहर राखण्याची काय किंमत मोजावी लागेल, याची त्यांना कल्पना नसावी. सुलतान मुराद (दुसरा) त्या काळात शहराची नाकेबंदी चोख ठेवण्याबरोबरच व्हेनेशियन आणि इतर अनेक शत्रूंविरुद्ध लढाया करण्यात गुंतला होता. शेवटी मुरादने आपल्या सर्व शत्रूंना साम, दाम, दंड, भेदाने वश केलं आणि आपल्या बाजूला वळवलं. त्यांचंच एकत्रित सैन्य घेऊन त्याने २९ मार्च १४३० रोजी शहर ताब्यात घेतलं. हा वेढाही सलग ८ वर्ष सुरू राहिला.

३. जपानमधील इशियामा – होंगन-जी युद्ध:

जपानमधलं इशियामा यु*द्ध हे जगातलं एक विचित्र यु*द्ध मानलं जातं. हे यु*द्ध राजकीय वर्चस्वासाठी नव्हतं, भूप्रदेशासाठी नव्हतं की संपत्तीसाठीही नव्हतं. शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणारा बौद्ध धर्माचा एक पंथ आणि जपानला एकसंध करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामुराई यो*द्ध्याची संघटना यांच्यामध्ये हा संघर्ष होता आणि तो तब्बल १० वर्ष चालला.

‘जोडो शिनशु होंगन-जी टेंपल फोर्स,’ अर्थात ‘इक्को इक्की’ पंथ आणि नोबुनागा ओडीए या सामुराई यो*द्ध्यांची संघटना हे या संघर्षात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. नोबुनागाच्या इतर पंथांचे बौद्ध भिक्खू, सर्वसामान्य शेतकरी आणि कामगारवर्ग होता, तर टेंपल फोर्सचं स्वतःचं खाजगी सैन्यच होतं. इक्को इक्की पंथाचा नोबुनागा कट्टर विरोधक होता. त्याने या पंथाचे अनेक मठ आणि मंदिरं उद्धवस्त केली होती.

ऑगस्ट १५७० साली नोबुनागा आपल्या किल्ल्यातून ३० हजारांची फौज घेऊन खाली उतरला. त्याने आपल्या सेनाधिकाऱ्यांना इक्को इक्कीचं मुख्य ठिकाण असलेल्या इशियामाच्या अवतीभवती चौक्या उभारण्याचे आदेश दिले. सुरुवातीच्या झटापटीच्या लढाईत भिख्खूंच्या सैन्याने नोबुनागाच्या सैन्याला काहीसं मागे रेटलं. पण त्यांनी पुन्हा आपले मोर्चे हस्तगत केले.

असेच ह*ल्ले प्रति*हल्ले सन १५७५ पर्यंत होत राहिले. आता नोबुनागाने आक्रमक धोरण स्वीकारण्याचा निश्चय केला. इकडे टेंपल फोर्सचा धीर सुटत चालला होता. मंदिरात आवश्यक अन्न-धान्याचा साठा संपत आला होता. त्यामुळे इक्को इक्कीने नोबुनागाबरोबर चर्चा करण्याची तयारी दर्शवायला सुरुवात केली.

एप्रिल १५७६ मध्ये नोबुनागाच्या ३ हजार सैन्याने अचानक इशियामा मंदिरावर ह*ल्ला चढवला. मात्र, भिख्खू बेसावध नव्हते. त्यांचं तब्बल १५ हजारांचं सैन्य प्रतिकारासाठी उभं ठाकलं. या ह*ल्ल्यात सामुराई सैन्याच्या हाती काहीच लागलं नाही. उलट त्यांच्या एका महत्वाच्या सेनाधिकाऱ्याला जीव गमवावा लागला.

दीर्घकाळ ठाण मांडून बसल्यावरही फारसं काही घडत नसल्याने आपल्या रणनीतीचा फेरविचार करणं नोबुनागाला भाग पडलं. त्याने वेढा आणखी आवळला. मंदिरात आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी बिळं बुजवली. इक्को इक्कीचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अन्य ठिकाणांवरही चौक्या बसवल्या.

अखेर सन १५८० साली भिख्खूंचे नेतृत्व करणाऱ्या मोरीने मिकी येथील त्यांचा मोक्याचा किल्ला गमावला. तोपर्यंत वेढाही असह्य होऊ लागला. इक्कीचे बहुसंख्य मित्र आधीच त्यांच्यासोबत किल्ल्याच्या आत असल्यामुळे बाहेरून मदत करणारं कोणी शिल्लकच राहिलं नव्हतं. दारूगोळा आणि अन्नही जवळजवळ संपलं.

मठाधिपती कोसाने आपल्या सहकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली. त्यात शरणागतीचा निर्णय घेण्यात आला. खुद्द शाही दरबाराकडून त्यांना यु*द्ध थांबवण्याचा सल्ला देणारे पत्र देण्यात आलं होतं.

काही आठवड्यातच कोसा आणि त्याच्या मुलाने आत्मसमर्पण केलं आणि दहा वर्ष चाललेला वेढा आणि त्यापेक्षा अधिक वर्ष चाललेल्या जीवघेण्या झटापटींचा अंत झाला. नोबुनागाने सगळ्यांना जीवदान दिलं. मंदिर मात्र जाळून बेचिराख केलं आणि यु*द्धकाळात शत्रूबाबत सहानुभूती दाखवल्याबद्दल स्वतःच्या तिघा सहकाऱ्यांना नारळ देऊन निरोप दिला.

४. कॅंडियाचा वेढा: 

हा जगभरच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चाललेला वेढा आहे. हा वेढा सन १६४८ ते १६६९ अर्थात, तब्बल २१ वर्ष चालला.

या वेढ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वेढ्यामध्ये जैविक अस्त्रांचा वापर करण्याचा विचार करण्यात आला. कॅंडिया शहर (सध्या हेराक्लिओन, ग्रीस) हे कॅंडिया (क्रेट) (रेग्नो डी कॅंडिया) या राज्याची राजधानी होती, ती सन १२०४ साली चौथ्या धर्मयु*द्धात (क्रुसेड) झालेल्या कॉन्स्टँटिनोपलच्या पतनापासून व्हेनेशियाच्या ताब्यात गेली होती. व्हेनेशिया आणि ऑटोमनदरम्यान झालेल्या यु*द्धांचा ती केंद्रबिंदूच होती. या शहराचं भूसामरिक वैशिष्ट्य म्हणजे भूमध्य समुद्रावर नजर आणि जरब ठेवण्यासाठी या शहराचा ताबा आवश्यक होता.

 

 

या युद्धाला तात्कालिक कारण मात्र वेगळंच घडलं. सन १६४४ साली माल्टाच्या सैनिकांनी अलेक्झांड्रियाहून कॉन्स्टँटिनोपलला जात असलेल्या ऑटोमन सैनिकांच्या ताफ्यावर ह*ल्ला करून त्यांना लु*टलं. या ताफ्यात मक्काच्या यात्रेवरून परत आलेल्या काही जणांचा समावेश होता. त्यापैकी काही शाही घराण्यातलेही होते.

या प्रकारामुळे संतापलेल्या सुलतानाने युसूफ पाशाच्या नेतृत्वाखाली तब्बल ६० हजारांची फौज व्हेनेशियाकडे रवाना केली. या फौजेने केनिया (सध्या चनिया) आणि रेटिमो (सध्या रेथिम्नो) ही शहरं ताब्यात घेतली. त्यानंतर ही फौज राजधानीकडे रवाना झाली.

सन १६४८साली कॅंडियाचा वेढा सुरू झाला. ओटोमन सैनिकांनी पुढच्या ३ महिन्यांत शहराची कडेकोट नाकाबंदी केली. शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्याचे परिणाम पुढे १६ वर्षांपर्यंत कॅंडिया शहराने भोगले.

दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू केले. सागरी लढायांमध्ये सरशी मिळवत ऑटोमन सैनिकांची रसद तोडण्यात व्हॅनेशियन सैन्याला सुरुवातीला यश आलं. त्यांच्यासाठी युरोपकडून मदतही येऊ लागली. अशा झटापटी आणि खडाखडी वर्षानुवर्ष सुरूच राहिल्या.

सन १६६७ साली व्हेनेशियन लष्करी अभियंता कर्नल अँड्रिया ब्रोझी हा ओटोमानांच्या गळाला लागला. त्याने आपल्या सैन्यातल्या त्रुटी आणि कमतरता उघड केल्या. फ्रान्सने सन १६७७ साली व्हेनेशियासाठी नौदल आणि पायदळ पाठवून वेढा उठवण्यासाठी दुहेरी मोहीम राबवली. मात्र, ती सपशेल फसली. वेढा तर उठला नाहीच; फ्रान्सला ९०० टनांची ५८ तोफा तैनात असलेली यु*द्धनौका गमावण्याची पाळी आली.

या यु*द्धनौकेवर ‘अपघाताने’ स्फोट झाला आणि ती रसातळाला गेली. या घटनेनंतर काही काळातच व्हेनेशिया आणि मित्रराष्ट्रांनी शरणागती पत्करली आणि कॅंडिया ओटोमनांच्या ताब्यात आलं.

या वेढ्यात ऑटोमन सैनिकांना प्लेगने संक्रमित करायचं, प्लेगग्रस्तांच्या प्लीहा आणि अन्य स्त्रावांपासून मोठ्या प्रमाणावर साथ पसरवायची आणि शत्रुसैन्यात हाहा:कार उडवून त्यांना वेढा उठवायला भाग पाडायचं, अशी योजना व्हेनेशियाच्या गुप्तचर खात्याने आखली होती. त्यासाठी चोख नियोजन करण्यात आलं. प्राणघातक मिश्रण तयार होतं. तरीही हा जैविक ह*ल्ला काही कधी केला गेला नाही.

५. फिलाडेल्फियाचा वेढा:  

सन १३३७ मध्ये ऑटोमन तुर्कांनी निकोमिडिया ताब्यात घेतल्यानंतर फिलाडेल्फिया हे शहर आशिया मायनरमधलं अनेक दशकांपासून ख्रिश्चनधर्मीयांचा प्रभाव असलेलं आणि बायझंटाईन साम्राज्याचा घटक असलेलं शेवटचं शहर उरलं. फिलाडेल्फियाचं लिडियन टेकड्यांमधलं दुर्गम स्थान, मजबूत तटबंदी आणि १४ व्या शतकात अनाटोलिया लुटणाऱ्या तुर्क आणि इतर अनेक धर्मांध मुस्लिमांच्या टोळ्यांना पाणी पाजल्यामुळे ऍनाटोलियातल्या इतर शहरांप्रमाणे त्याची दुर्दशा झाली नव्हती.

सन १३७६-७९ च्या गृहयु*द्धात ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन सम्राट जॉन व्ही पॅलेओलोगोस याला गादी परत मिळविण्यासाठी मदत केली. मात्र, त्यासाठी बायझेंटियमवर ऑटोमनांनी हक्क सांगितला. ही मागणी पूर्ण होईपर्यंत सम्राट जॉन (पाचवा) यांचा मुलगा मॅन्युएल याला प्रौसा इथे ऑटोमन सुलतान बायझिद (प्रथम)च्या दरबारात ‘सन्मान्य ओलिस’ म्हणून पाठवण्यात आलं. या काळात मॅन्युएलच्या डोळ्यादेखत तुर्कांनी अनेक ग्रीक शहरांचा वि*ध्वंस केला.

यादवी यु*द्धात तुर्कांनी पाठींबा द्यावा म्हणून बायझंटाईन्सने सन १३७८ पासून फिलाडेल्फिया तुर्कांच्या ताब्यात देण्याचं मान्य केलं होतं. फिलाडेल्फियाने मात्र, तुर्कांना शरण जायला साफ नकर दिला. त्याचा परिणाम म्हणून सन १९३० साली सुलतान बायझिदने बायझेंटियमचे सम्राट जॉन (सातवे) आणि मॅन्युएल (दुसरे) यांना तुर्की सैन्यासोबत फिलाडेल्फियावर आक्रमण करण्याचे आदेश दिले. या मोहिमेत फिलाडेल्फियाला वेढा घालणार्‍यांच्या तुर्कांच्या छावणीत तुर्की पाशांच्या घोड्यांच्या शेपटीला आपला शाही ध्वज लटकावल्याचं लाजिरवाणं दृश्य बघत त्यांनी शरणागती पत्करली.

यु*द्धाच्या काळात केली जाणारी आक्र*मणं, आखल्या जाणाऱ्या मोहिमा, डावपेच यांच्यामध्ये प्रत्यक्ष यु*द्धाच्या पलीकडली किती प्रकारची राजकारणं चालतात हे या या सगळ्यातून दिसून येतं. या मोहिमांचा कालावधी जेवढा मोठा, त्यात सहभागी राज्यांचा आणि राजांचा आकडा जेवढा मोठा; तेवढाच या कारस्थानांचा आणि कुरघोड्यांचा आवाकाही मोठा हे स्वाभाविकच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हिऱ्यांच्या किंमती अवाढव्य असण्यामागे एक मार्केटिंग टेक्निक आहे..!

Next Post

कृष्णवर्णीयांना शारीरिक दुःख होत नाही ही अंधश्रद्धा आजही पाश्चात्य डॉक्टर मानतात!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कृष्णवर्णीयांना शारीरिक दुःख होत नाही ही अंधश्रद्धा आजही पाश्चात्य डॉक्टर मानतात!

मोजक्या भांडवलावर सुरु केलेली ही कंपनी आज त्या क्षेत्रातील "ब्रॅण्ड" आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.