The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या तरुणीने दुसऱ्या महायु*द्धादरम्यान ना*झींच्या पोटात गोळा आणला होता!

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


ना*झी गेस्टापोंनी महिला आणि मुलांसाठी उभारलेल्या छळछावणीतून गलितगात्र झालेल्या दोन महिलांना दोन स्ट्रेचरवरून बाहेर काढलं. त्या दोघींबरोबरच एक तरुणीही चालत होती. गेस्टापो या तिघींना घेऊन व*धस्थळाकडे निघाले. त्या ठिकाणी पोहोचल्यावर स्ट्रेचरवरच्या दोघींना उचलून खाली ठेवण्यात आलं. तरुणीला गुडघ्यावर बसण्याची आज्ञा झाली.

मरण समोर दिसत असताना त्या दोघींना त्याचं भान नव्हतं आणि तरुणीला त्याचं भय नव्हतं. गेस्टापोंच्या सार्जंटने पिस्तूल काढलं. तरुणीने इतर दोघींचे हात हात घेतले आणि निर्भयपणे मृत्यूच्या नजरेला नजर भिडवून बसून राहिली. सार्जंटने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि तिघींचा व*ध केला.

या पैकी तरुण मुलगी म्हणजे दुसऱ्या महायु*द्धात ना*झी जर्मनीच्या पोटात गोळा आणणारी गुप्तहेर व्हॉयलेट झाबो ! तिला मरणोत्तर जॉर्ज क्रॉससह अनेक शौर्य पदके प्रदान करून गौरविण्यात आले.

तिच्या थरारक कामगिरीवर ‘Carve Her Name With Pride’ हा चित्रपटही प्रसिद्ध झाला. ज्या सुंदर मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर हॉलीवूडचं प्रचंड आकर्षण होतं; अभिनेत्री बनण्याची आस होती, तिने देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आणि त्यावरच चित्रपट काढून तिचा सन्मान केला गेला.

नाझीच्या छळछावणीत रावण होण्यापूर्वी केवळ चार वर्षांपूर्वी ती व्हॉयलेट बुशेल नावाची एक सुंदर, पॅरिसमध्ये जन्मलेली, दक्षिण लंडनमध्ये बॉन मार्चे डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये परफ्यूम विकण्याचं काम करत होती. तिची भेट एटीन झाबो या एक उमद्या, आकर्षक तरुणाशी झाली.



एटीन फ्रेंच फॉरेन लीजनमध्ये अधिकारी होता. पहिल्या भेटीनंतर अवघ्या पाच आठवड्यांनंतर त्यांनी लग्न केलं. मात्र, त्यानंतर काही काळातच एटीन उत्तर आफ्रिकेला रवाना झाला. एल अलामीनच्या दुसऱ्या लढाईत एटीन मारला गेला. त्याला मरणोत्तर क्रॉइक्स डी ग्युरे हा युद्धातील शौर्यासाठी सर्वोच्च फ्रेंच लष्करी पुरस्कार प्राप्त झाला. परंतु मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये जन्मलेली त्याची मुलगी तानिया आणि तो एकमेकांना कधीही पाहू शकले नाहीत.

त्यानंतर, व्हायोलेट लंडनमध्ये एका विमानाच्या कारखान्यात काम करत होती. मात्र, तिला ना*झींच्या विरोधात प्रत्यक्ष यु*द्धात उतरायची इच्छा होती. त्यासाठी योग्य संधी शोधत असताना ब्रिटिश सैन्यात ‘स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह’ची भरती करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला भेटली आणि सरळ सिक्रेट एजंट म्हणून प्रशिक्षणाला दाखल झाली.

ती अस्खलित फ्रेंच बोलू शकत होती. युरोपियन महिलांच्या दृष्टीने कमीच म्हणावी अशी होती, केवळ ५. ५ उंची असली तरी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

घरातच बंदुका आणि पिस्तूल हाताळण्याची सवय आणि नेमबाजीचा सराव असलेली व्हायोलेट कठोर सैनिकी प्रशिक्षणानंतर एक अव्वल नेमबाज बनली. एक ‘अत्यंत चिकाटी असलेली, कठोर शारीरिक परिश्रम करण्याची तयारी असलेली आणि धैर्यवान मुलगी,’ या शब्दात तिच्या प्रशिक्षकांनी तिचं वर्णन केलं आहे.

फेब्रुवारी १९४४ पर्यंत, व्हायोलेट पॅराशूट प्रशिक्षण पूर्ण करून फ्रान्समध्ये तिच्या पहिल्या मिशनला रवाना होण्यासाठी तयारी करत होती.

मिशनवर असताना आलेली माहिती कोणाकडून आली आहे याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक एजंटला एक कविता ‘कोड’ म्हणून दिली जात असे. एजंटने आपले निरोप आणि माहिती त्या ‘कोड’सह पाठवणे गरजेचे होते. मात्र, व्हायोलेट मूळची फ्रेंच आल्याने इंग्रजी कविता लक्षात ठेवणं आणि बिनचूक स्पेलिंगसह लिहिणं तिला कठीण जात होतं. या छोट्याशा कारणाने ती हताश व्हायची. स्वतःवरच चिडायची.

मात्र, तिची मन:स्थिती ओळखून कोडमास्टर लिओ मार्क्स यांनी परिस्थिती कौशल्याने हाताळली. त्यांनी स्वतः त्यांच्या अपघातात मरण पावलेल्या प्रेयसीला उद्देशून लिहिलेली एक छोटीशी सोपी कविता तिला कोड म्हणून दिली आणि तिचं काम सोपं झालं. अपरिचित कवीची अप्रसिद्ध असलेली छोटीशी कविताही ‘डीकोड’ करणं जर्मनांना कठीण जाईल असा लिओ यांचा कयास होता आणि तो खरा ठरला.

व्हायोलेट तिच्या मिशनचे तपशील घेऊन मिशनवर जायला निघाली. तिला चेरबर्ग जवळ सोडण्यात आलं. तिथे तिला शत्रूच्या पायाभूत सुविधांचा विध्वंस करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि जर्मन सैन्याला यु*द्धसामग्री पुरवणाऱ्या औद्योगिक वसाहतींची हेरगिरी करण्याची कामगिरी तिच्यावर सोपवण्यात आली. ही कामगिरी तिने एका महिन्यात पूर्ण केली आणि ती पॅरिसमध्ये मनसोक्त शॉपिंगसाठी गेली. तिथे पहिलं मिशन यशस्वीपणे पार पडल्याच्या आनंदात तिने स्वतःसाठी आयुष्यातला सर्वात महागडा ड्रेस खरेदी केला. एका काउटरियरमध्ये एका काळ्या ड्रेससाठी तिने तब्बल ८ हजार ५०० फ्रँक खर्च केले.

७ जून १९४४ रोजी मित्र राष्ट्रांच्या सैन्याने नॉर्मंडीच्या समुद्रकिनाऱ्यांवर ह*ल्ला केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हायोलेटला जर्मन दळणवळण विस्कळीत करण्यासाठी पुन्हा फ्रान्समध्ये पाठवण्यात आलं. जॅक डुफोर नावाचा तरुण एजंट तिच्याबरोबर होता. १० जून रोजी सकाळी दोघे कारने कामगिरीवर निघाले. व्हायोलेटाने तिची सायकल गाडीच्या मागे ठेवली आणि तिची स्टेन गन घेऊन समोर बसली.

सलोन-ला-टूर जवळ आल्यावर त्यांना रस्त्यावर जर्मन सैनिकांनी नाकाबंदी केल्याचं आढळून आलं. जॅकने सैनिकांपासून सुमारे ५० यार्डांवर कार थांबवली. व्हायोलेटला, पळून जा, असे सांगत त्याने गाडीतून उडी मारली आणि त्याच्या मशीन गनमधून जर्मन सैनिकांवर गोळीबार सुरु केला.

थोड्याच वेळात त्याला लक्षात आलं की व्हायोलेट पळून न जाता त्याच्या बरोबरच आहे आणि तिच्या स्टेन ग*नने गोळीबार करत आहे. अनेक जर्मन सैनिक तिने यमसदनी पाठवले. त्याने तिला कव्हर देत गव्हाच्या शेताकडे धाव घेण्याची सूचना केली. ती तिथे पोहोचल्यावर तिने तिच्या बाजूने जर्मनांवर गोळीबार सुरू केला त्यामुळे जॅकला तिच्याकडे यायला उसंत मिळाली. उंच गव्हाच्या शेतातून दोघे जंगलाकडे धावू लागले.

काही वेळातच त्यांना पाठलाग करणाऱ्या जर्मन सैनिकांच्या वाहनाचा आवाज ऐकू आला. त्यांनी सुरक्षित ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला केला. मात्र, अशी जागा कुठेच दिसत नव्हती. व्हायोलेट जखमी झाली होती. जखमांमधून रक्तस्त्राव सुरू होता. तिचे कपडे फाटले होते. ती थकली होती. तिने जॅकला आग्रहाने तिथून पळून जायला सांगितलं. आपण पुढे येऊ शकत नसल्याचंही सांगितलं.

एका गवताच्या गंजीमागे पवित्रा घेतला आणि जर्मनांच्या दिशेने गोळीबार करू लागली. अर्ध्या तासाच्या गोळीबारानंतर तिच्याकडचा दारुगोळा संपला. तिचा गोळीबार थांबताच जर्मन सिनिक तिच्या दिशेने धावले. खोदून खोदून जॅक कुठे गेला या बद्दल चैकशी करू लागले. एका कसलेल्या गुप्तहेराप्रमाणे ती जर्मन सैनिकांकडे पाहून तुच्छतेने हसली आणि म्हणाली, तो खूप दूर गेला आहे. तुम्हाला जायचं तर जा त्याच्या मागे!

व्हायोलेटला ताब्यात घेऊन जर्मन गुप्त पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. चौकशीच्या नावाखाली त्यांनी तिचा अतोनात छळ केला. अमानुष लैंगिक अत्याचार केले. मात्र, तिने त्यांच्या ताकास तूर लागू दिला नाही. अखेर तिला गेस्टापोच्या ताब्यात असलेल्या एका कारागृहात नेण्यात आलं. तिथे पुन्हा तिला छळ आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं.

मित्र राष्ट्रांच्या प्रतिहल्ल्याच्या भीतीने तिला सतत वेगवेगळ्या छावण्या आणि तुरुंगांमध्ये हलवलं. तिला आणि इतर कैद्यांना एका रेल्वेमध्ये बसवून कुठल्या तरी छळछावणीकडे नेलं जात असताना पॅरिसजवळ ब्रिटीश विमानांनी या रेल्वेचे काही डबेच हुक लावून उचलले. मात्र, व्हायोलेट असलेल्या डब्याला हुक लागला नाही.

या ब्रिटिश विमानाला रोखण्यासाठी गाडीतून जर्मन सैनिकांनी गोळीबार केला. त्याला ब्रिटिश सैनिकांनीही विमानातून प्रत्युत्तर दिले. या गोळीबाराच्या फैरींमध्ये गाडीतले अनेक कैदीही जखमी झाले. स्वतः जखमी असताना, अमानुष अत्याचारांना सामोरी गेलेली असतानाही व्हायोलेट गप्प बसली नाही. तिने स्वच्छतागृहात जाऊन एका भांड्यात पाणी आणलं आणि जखमींच्या जखमा स्वच्छ करण्याच्या, त्यांची सुश्रुषा करण्याच्या कामाला लागली.

सन १९४४च्या अखेरीस व्हायोलेटला रेवेन्सब्रुक या छळछावणीत आणण्यात आलं. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्या अंगावरचे कपडे बदलू देण्याचं सौजन्यही गेस्टापोंनी दाखवलं नाही. अनेक महिने ती त्याच कपड्यात होती. तिथे तिला डेनिस ब्लॉच आणि लिलियन रॉल्फ या आणखी दोघी महिला एजंट भेटल्या. गेस्टापोंनी त्यांचे हाल हाल करून त्यांना मरणासन्न करून टाकलं होतं. मारहाण, अ*त्याचार, खड्डे खणण्यासारखी अपार कष्टाची कामं हेच तिथलं ‘रुटीन’!

त्यांच्या बरोबरच्या हजारो स्त्रिया क्षयरोग आणि अतिसारासारख्या आजारांनी बळी पडत होत्या. मात्र, एवढ्या हाल अपेष्टांनंतरही व्हायोलेट ना मनाने खचली ना शरीराने! तिने त्या ही परिस्थितीत पळून जाण्याच्या अनेक योजना आखल्या पण त्या प्रत्यक्षात आणता आल्या नाही. अखेर आपल्या दोन मरणासन्न सहकारी गुप्तहेर मैत्रिणींसह व्हायोलेट ताठ मानेनं वीरासारखी मरणाला सामोरी गेली.

महायु*द्ध संपल्यानंतर तिच्या देशाने तिच्या शौर्याला साजेशी मानवंदना तिला देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. बकिंगहॅम पॅलेसमध्ये एका शाही कार्यक्रमात स्वतः ब्रिटनचे राजे जॉर्ज (सहावे) यांनी व्हायोयोलेटची ४ वर्षाची लाडकी तानिया झाबो हिला जॉर्ज क्रॉस पदक बहाल केलं. देशासाठी प्राण वेचणाऱ्या तिच्या आईच्या शौर्याचा आणि धैर्याचा हा सन्मान होता. संपूर्ण देशाने तिला दिलेली मानवंदना होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आरोग्य टिकवायचं आहे? तर वाईन ‘प्या,’ पण प्रमाणातच…

Next Post

ॲपलच्या एका निर्णयामुळे फेसबुकचा पार बाजार उठलाय!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

ॲपलच्या एका निर्णयामुळे फेसबुकचा पार बाजार उठलाय!

यूकेमधील हे 'पॉयझन गार्डन' अशा वनस्पतींचे घर आहे ज्या कोणाचाही काटा काढू शकतात

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.