The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लष्कर-ए-तोयबाला माहिती पुरवल्याबद्दल अटक झालेले IPS अधिकारी अरविंद नेगी कोण?

by द पोस्टमन टीम
28 February 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


२०२२ साली राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शिमलाचे माजी पोलीस अधीक्षक आणि IPS अधिकारी अरविंद नेगी यांना अटक केली होती. आता हे IPS अधिकारी अरविंद नेगी नक्की कोण आहेत? त्यांनी असे काय केले आहे की NIA ने त्यांना अटक केली? अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

आजपर्यंत अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे पोलीसांना अटक झाली आहे, मग ते पोलीस शिपाई असोत की IPS अधिकारी, पण मग अरविंद नेगी यांचेच नाव चर्चेत का? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अरविंद नेगी कोण आहेत, ते आधी माहिती पाहिजे. तर अरविंद नेगी हे थेट IPS नाहीत. अरविंद नेगी हे हिमाचल प्रदेश पोलीस सेवेचे अधिकारी आहेत. त्यांना २०११ साली IPS स्तरावर बढती मिळाली आणि ते NIA मध्ये अधीक्षक पदावर रुजू झाले. विशेष बाब म्हणजे २०१७ साली नेगी यांना उत्तम कामगिरीसाठी शौर्य पदकाने देखील सन्मानित करण्यात आले होते. नेगी यांनी NIA मध्ये ११ वर्षें काम केले आहे.

अरविंद नेगी हे अत्यंत कार्यक्षम अधिकारी होते. हुर्रीयत नेत्यांविरुद्धच्या प्रकरणात व काश्मीरमधील द*हश*तवादाच्या अनेक प्रकरणांची चौकशी नेगी यांनी केली होती. हिंदुत्व द*हश*तवादी प्रकरणांची चौकशी करण्याऱ्या टीमचा ते भाग होते. २००७ अजमेर दर्गा ब्लास्ट, २००८ मालेगाव ब्लास्ट , समझौता एक्सप्रेस ब्लास्ट या सर्व द*हश*तवादी प्रकरणांच्या चौकशींमध्ये नेगी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जम्मू काश्मीर पोलीसचे माजी उपअधीक्षक दविंदर सिंग यांचे हिजबुल द*हश*तवाद्यांशी संबंध होते या प्रकणाची ही चौकशी नेगी करीत होते.

झालं असं की, कलम ३७० हटवल्यानंतर देखील काश्मीरमध्ये द*हश*तवादी घटना सुरूच होत्या. हा द*हश*तवाद पसरवण्यात लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दोन द*हश*तवादी संघटना अग्रेसर होत्या. २०२१ साली जम्मू-काश्मीरमध्ये तथाकथित ह्युमन राईट्स आक्टिविस्ट असलेल्या खुरर्म परवेझला राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली. राष्ट्रीय तपास संस्थेने खुरर्म परवेझची चौकशी सुरू केली व या चौकशी दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेला समजले की खुरर्म परवेझ हा द*हश*तवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा ओव्हर ग्राऊंड वर्कर (Over Ground Worker) आहे.

ओव्हर ग्राऊंड वर्कर (Over Ground Worker) म्हणजे काय?

OGW हे द*हश*तवादी संघटनांच्या पाठीचा कणाच म्हणावा लागेल. द*हश*तवादी संघटनांना लागणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, कट्टरतावादाचा प्रचार करणे, द*हश*तवादी संघटनांसाठी भरती करणे, फुटीरतावादी नेते आणि त्यांचे राजकीय उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संघटित गुन्हेगारांशी समन्वय साधणे, हवाला व्यवहारामार्फत द*हश*तवादी संघटनांना पैसे पुरवणे, या अशा विघातक गोष्टी हे OGW करतात. आता यावरून खुरर्म परवेझ हा किती ‘मानव अधिकार’ संबंधित कामे करत असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल.



भारताच्या गुप्तहेर खात्याकडून (IB) राष्ट्रीय तपास संस्थेला टीप मिळाली होती की NIA मधून कुणीतरी लष्कर-ए-तोयबा या द*हश*तवादी संघटनेला गोपनीय माहिती व गोपनीय दस्तऐवज पुरवत आहे. ही टीप राष्ट्रीय तपास संस्थेने गांभीर्याने घेतली आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडे तपासासाठी सोपवण्यात आलेल्या सर्व संवेदनशील प्रकरणातील अधिकाऱ्यांवर, NIA ने बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. आणि यामुळे अरविंद नेगी राष्ट्रीय तपास संस्थेच्या रडारवर आले. 

काही काळानतंर अरविंद नेगी यांची बदली पुन्हा त्यांच्या होम कॅडर म्हणजेच हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आली. हिमाचल प्रदेशला शिमला येथे अरविंद नेगी हे पोलीस अधीक्षक पदावर रुजू झाले. जरी NIA ने नेगी यांना होम कॅडरला पाठवले असले तरी ही ते अजूनही NIA च्या रडारवर होते. याच दरम्यान ६ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने लष्कर-ए-तोयबाच्या OGWs ना पकडायची मोहीम सुरू केली या मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्थेला यश मिळालं. या मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्थेने लष्कर-ए-तोयबाचे ६ OGWs जेरबंद केले आणि त्यांची चौकशी सुरू झाली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

चौकशी दरम्यान या सहा OGWs कडून राष्ट्रीय तपास संस्थेने त्यांच्याशी संबंधित अनेक गोपनीय दस्तऐवज जप्त केले. जेव्हा या गोपनीय दस्तऐवजासंदर्भात, NIA ने अजून कसून चौकशी केली त्यावेळी या सहा OGWs ने खुरर्म परवेझचे नाव घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे हा तोच खुरर्म परवेझ आहे, ज्याच्या घरावर अरविंद नेगी आणि त्यांच्या पथकाने २०२० साली धाड टाकली होती पण त्यावेळी सबळ पुरावे न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आले होते. 

चौकशी दरम्यान सहा OGWs ने खुरर्म परवेझचे नाव घेतले म्हणून २२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने श्रीनगरमधील सोनवार परिसरात खुरर्म परवेझच्या घरावर आणि श्रीनगरमधील अमीराकदाल या परिसरात खुरर्म परवेझच्या कार्यालयावर धाड टाकली व यावेळी खुरर्म परवेझला NIA ने अटक केली. चौकशी दरम्यान खुरर्म परवेझने हे गोपनीय दस्तऐवज खुद्द राष्ट्रीय तपास संस्थेचे अधीक्षक अरविंद नेगी यांनी पुरवल्याची कबुली दिली.

यानंतर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अरविंद नेगी यांचा शिमला येथील घरावर आणि किंनौर येथील घरावर राष्ट्रीय तपास संस्थेने छापे टाकले. या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेला तिथे असे काही पुरावे मिळाले ज्याने हे सिद्ध झाले की अरविंद नेगी हेच लष्कर-ए-तोयबाच्या OGWsना राष्ट्रीय तपास संस्थेचे गोपनीय दस्तऐवज आणि इतर गोपनीय माहिती पुरवत होते. राष्ट्रीय तपास संस्थेचा प्रथमदर्शनी अंदाज हा आहे की अरविंद नेगी यांनी हे सर्व पैशासाठी केले.

अरविंद नेगी यांच्यावर भारतीय दंड संहिते अंतर्गत कलम १२० बी(गुन्हेगारी कट), १२१ (देशाविरुद्ध यु*द्ध छेडणे, छेडण्याचा प्रयत्न करणे, सरकार विरुद्ध यु*द्ध पुकारणे), १२१-ए (कलम १२१ द्वारे दंडनीय अपराध करण्याचा कट), आणि UAPA कायद्या अंतर्गत कलम १७ (द*हश*तवादी कृत्यासाठी निधी गोळा करणे), कलम १८ (षड्यंत्र), कलम १८ बी (द*हश*तवादी कृत्यांसाठी व्यक्ती किंवा व्यक्तींची भरती करणे) हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धक्कादायक म्हणजे, विशेष एनआयए न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी अरविंद नेगी यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कायदेशीर दिलासा दिला आणि तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. तसेच २ जून २०२२ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद नेगी यांना जामीन मंजूर केला. तर डिसेंबर २०२२ मध्ये हिमाचल प्रदेश सरकारने IPS अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांचे निलंबन मागे घेतले आहे. त्यांची सेवा पूर्ववत करण्यात आली असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

शंभर वर्षांनी का होईना पण सिद्ध झालं की ती राष्ट्राध्यक्षांचीच मुलगी होती…!

Next Post

प्राण्यांना आगामी संकटाची चाहूल नेमकी कशी लागते?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

प्राण्यांना आगामी संकटाची चाहूल नेमकी कशी लागते?

निकोटीनमुळे व्यसन लागत नाही असं सिगारेट कंपन्यांनी शपथेवर सांगितलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.