The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शंभर वर्षांनी का होईना पण सिद्ध झालं की ती राष्ट्राध्यक्षांचीच मुलगी होती…!

by द पोस्टमन टीम
22 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची प्रेमप्रकरणं हा प्रकार नवीन नाही. उत्तम राजकीय कारकीर्द करुनही या प्रेमसंबंधांमुळे गोत्यात आलेले अमेरिकन अध्यक्ष हे जगभरातील बातम्यांचा आणि गॉसिप कॉलमचा विषय बनले आहेत. अमेरिकेचे २९वे राष्ट्राध्यक्ष वॉरेन जी हार्डिंग यांचा लौकीकही विवाहबाह्य प्रेमसंबंध असणारी व्यक्ती असा होता. त्यांचं आणि त्यांच्या शेजारणीचं प्रेमप्रकरण काही वर्षांनंतर या दोघांनी परस्परांना लिहिलेल्या प्रेमपत्रांद्वारे चव्हाट्यावर आलं. ही नुसतीच प्रणयाराधन करणारी पत्रं नव्हती तर एखाद्या प्रौढांसाठीच्या चित्रपटात शोभावी अशी भाषा असणारी प्रेमपत्रं होती. यात शरीरसुखाबद्दल मोकळेपणानं दोघं एकमेकांशी बोलले आहेत. या पत्रांनी सर्वत्र एकच खळबळ माजविली.

हे सगळं घडत असतानाच १९२७ साली आणखीन एक खळबळजनक खुलासा समोर आला. नान ब्रिटन या माजी सचिव महिलेनं तिची मुलगी एलिझाबेथ ही वॉरेन हार्डिंग यांची मुलगी असल्याचा दावा केला.

अमेरिकेचे २९ वे अध्यक्ष वॉरेन हार्डिंग हे त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे अनेक स्त्रियांच्या दिल की धडकन वगैरे होते. वॉरेन यांना पूर्ण कल्पना होती की त्यांचं व्यक्तिमत्व स्त्रियांना भुरळ पाडणारं आहे. त्याचा त्यांनी पुरेपूर वापरही करून घेतला. महिलांना मतदानाचा हक्क आहे हे डंके की चोट पे सांगणारे हे अध्यक्ष वास्तव जीवनात एकाच वेळेस तीन स्त्रियांना आपल्या प्रेमपाशात गुंतवून ठेवत होते हा विरोधाभास गंमतीशीर म्हणायला हवा.

त्यांची पत्नी, फ़्लॉरेन्स किडनीच्या आजारानं त्रस्त होती. तिची सतत काही न काही आजारपणं, दुखणि चालू असत. यांच्या शेजारी रहाणारं कॅरी आणि जेम्स हे जोडपं. यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यं होती. यातला मुलगा आकस्मात मरण पावल्यानंतर जेम्सला नैराश्यानं घेरलं. इतकं की त्याला मानसोपचार केंद्रात दाखल व्हावं लागलं. पतिच्या आजारपणानं त्रासलेली कॅरी आणि पत्नीच्या आजारपणानं त्रस्त हार्डिंग मनानं एकत्र यायला वेळ लागला नाही.



हे मनानं एकत्र येणं प्रेमप्रकरणात बदललं ज्याची चाहूल दोघांच्याही जोडीदारांना तात्काळ लागली. हार्डिंग यांची पत्नी फ़्लॉरेन्स कॅरीवर संतापली. हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं की फ़िलिप्स परिवाराला अमेरिका सोडून युरोपला जावं लागलं. एकिकडे कॅरीसोबत गहिरे प्रेमसंबंध चालू असतानाच तिकडे हार्डिंग यांच्या कार्यालयात आणखीन एक प्रकरण आकार घेत होतं.

नान ब्रिटन यांचे वडिल सॅम्युअल ब्रिटन यांनी हार्डिंग यांना गप्पांच्या ओघात आपली मुलगी त्यांची दिवानी कशी आहे हे सांगितलं. हार्डिंग जेंव्हा नानला भेटले तेंव्हा त्यांनी तिला समजावलं की एक ना एक दिवस तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटेल. हार्डिंग विवाहित होते आणि त्याचवेळेस ते कॅरीसोबत प्रेमसंबंधातही गुंतले होते.

१९१४ साली हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ब्रिटन न्यूयॉर्कमध्ये आली. सचिव म्हणून कारकीर्द करण्याचा तिचा मानस होता. तिनं केलेल्या दाव्यांनुसार तिची कारकीर्द आणि हार्डिंग यांच्यासोबत प्रेमसंबंध यांना एकाच वेळेस सुरवात झाली. हार्डिंग यांची पत्नी फ़्लोरेन्स यांना पतीचे प्रेमसंबंध नविन नव्हतेच. अशी अनेक प्रेमप्रकरणं त्यांनी पतीची प्रतिष्ठा जपण्यासाठी दाबून टाकली होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

फ़्लोरेन्स कॅरी प्रकरणात व्यस्त असताना तिकडे हार्डिंग आणि ब्रिटन प्रेमप्रकरण रंगलं होतं. हार्डिंग यांनी ब्रिटनला एक घरही घेऊन दिलं जिथे ते दोघं मजेत रहात होते. या दोघांच्या प्रेमसंबंधातून पुढे ब्रिटनला एक मुलगीही झाली, जिचं नाव एलिझाबेथ ठेवण्यात आलं. कालांतरानं ब्रिटन हिनं लिहिलेल्या विवादास्पद पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला आहे.

तिच्यामते हार्डिंग यांनी एलिझाबेथला त्यांची औरस मुलगी म्हणून स्वीकारण्याचं निश्चित केलेलं होतं. तिला त्यांची अधिकृत मुलगी आणि ब्रिटनला कुटुंब म्हणून ते स्वीकारणार होते. मात्र हार्डिंग यांचा अकस्मात मृत्यू झाला आणि ब्रिटन एकाकी पडली. फ़्लोरेन्सला नंतर ब्रिटन प्रकरण समजल्यावर ती चवताळली आणि तिनं एलिझाबेथला हार्डिंगची मुलगी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. 

एलिझाबेथ ही नेहमीच हार्डिंगची अनौरस मुलगी बनून राहिली. एकिकडे पैशाची चणचण, भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज नाही, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची अधिकृत पत्नी बनून सुखानं संसार करण्याची स्वप्नं पहात असतानाच दुर्दैवानं घातलेला घाला, अशा पेचप्रसंगात ब्रिटन अडकली. अखेर तिनं या सगळ्याला शब्दात उतरवून लोकांसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. तिचा एकमेव हेतू हा होता की एलिझाबेथवर बसलेला अनौरस अपत्याचा शिक्का पुसणं.

ब्रिटननं लिहिलेल्या पुस्तकात हार्डिंगचं चित्र एक रमणीबाज असं रंगवलं होतं. यानं हार्डिंगचे चाहते आणि त्यांचं कुटुंब संतापलं. १९२७ साली प्रकाशित झालेल्या “द प्रेसिडण्ट्स डॉटर” या पुस्तकानं अपेक्षित खळबळ माजविली. या पुस्तकात तिनं हार्डिंग यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या संपूर्ण कारकिर्दी दरम्यान तिचं त्यांच्यासोबत रखेल म्हणून राहणं आणि त्यांचे संबंध याबद्दल सांगितलं आहे. त्या दरम्यान दोघांत काय काय घडलं? बाहेर जे घडत होतं त्याचे परिणाम त्यांच्या संबंधावर कसे होत होते? या सगळ्याचं वर्णन केलं आहे.

व्हाईट हाऊसमधल्या कोट क्लोजेटमधे त्यांच्यात शरीरसंबंध कसे घडून आले याचं वर्णन तिनं केलं आहे. हार्डिंग यांनी ब्रिटनला वचन दिलेलं असलं तरिही ते पूर्ण करण्यात मात्र ते अपयशी ठरले. त्यांच्या मृत्यू पश्चात फ़्लॉरेन्सनं या मायलेकींना जवळपासही फ़िरकू दिलं नाही. कौटुंबिक हिस्सा आणि वारसा तर दूरच राहिला.

दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर अखेर ८० च्या दशकात ब्रिटन एलिझाबेथ आणि तिच्या विस्तारीत परिवारासह या काळीम्यापासून दूर जावं म्हणून न्युयॉर्क सोडून ओरेगॉनला स्थलांतरीत झाली. इथून पुढील आयुष्य तिनं तिच्या नातवंडं आणि पतवंडात सुखानं व्यतीत केलं. १९९१ साली ब्रिटनचा ओरेगॉन येथेच वयाच्या ९४ व्या वर्षी मृत्यू झाला.

शेवटच्या श्वासापर्यंत ती कायमच एलिझाबेथ हार्डिंगची मुलगी असल्याचं ठामपणानं सांगत राहिली. तिच्या मृत्यूनंतर चोवीस वर्षांनी २०१५ साली Ancestry.com नं हार्डिंग यांचे बंधू आणि ब्रिटन यांच्या नातवाच्या वंशंजांचं डीएनए परिक्षण करुन एलिझाबेथ हार्डिंगचीच मुलगी होती हे सिध्द केलं. यानंतर कदाचित ब्रिटनच्या बाबतीत ‘रेस्ट इन पिस’ हे खर्‍या अर्थानं घडलं असावं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

उमाबाई कुंदापुर: स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांपासून आश्रय देणारी निर्भीड क्रांतिकारक

Next Post

लष्कर-ए-तोयबाला माहिती पुरवल्याबद्दल अटक झालेले IPS अधिकारी अरविंद नेगी कोण?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

लष्कर-ए-तोयबाला माहिती पुरवल्याबद्दल अटक झालेले IPS अधिकारी अरविंद नेगी कोण?

प्राण्यांना आगामी संकटाची चाहूल नेमकी कशी लागते?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.