The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना निर्बंधांना वैतागून आता लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत..!

by द पोस्टमन टीम
25 January 2022
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गेली दोन वर्षं संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे जखडून गेल्यासारखं झालेलं होतं. मास्क आणि सोशल डिस्टंन्सिग यासोबत लसीकरणाचं हत्यार मदतीला आलं आणि आता हळूहळू जग याच्या कचाट्यातून सुटू पहात आहे. बहुतेक देश आता हे निर्बंध शिथील करत आहेत. प्रारंभीच्या काळात असणारी कडक लॉकडाऊन आता कालबाह्य ठरू पहात आहेत. या व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी लस घेण्यावर जोर दिला गेला मात्र अनेक पाश्चिमात्य देशांनी लस घेणंही बंधनकारक न करता ऐच्छिक केलेलं आहे.

काही देश मास्कमुक्त झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्रुसेल्स देशातील मात्र कोविड निर्बंधांवरून पेटलं आहे, बेल्जियम मीडियाच्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसच्या निर्बंधांच्या विरोधात ब्रुसेल्स येथे करण्यात आलेल्या निदर्शनात पोलिस आणि निदर्शक आमने सामने आले, या दरम्यान जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईत तीन पोलिस कर्मचारी आणि बारा प्रदर्शक जखमी झालेले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या निर्बंधांच्या विरोधात रविवारी साधारण ५० हजारांचा जमाव बेल्जियमच्या राजधानीत रस्त्यावर उतरला. हातात निषेधाचे फ़लक घेऊन घोषणा देत हा जमाव रस्त्यावर उतरला. या जमावाला नियंत्रणात आणताना पोलिसांनी अश्रू धूर आणि पाण्याच्या फ़वार्‍यांचा वापर करावा लागला. यामधे तीन पोलिस कर्मचारी आणि १२ निदर्शक जखमी झाले तर जवळपास ७० जणांची धरपकड करण्यात आली.

बीएक्स वन वृत्तवाहिनीनुसार निदर्शक वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना या निदर्शनांचं चित्रांकन करण्यापासून थोपवत होते. यामधे पत्रकारांचे कॅमेरे हिसकावू घेण्याचेही प्रकार झाले. तसेच हा प्रचंड जमाव पत्रकारांना मागे रेटत होता. निदर्शकांनी युरिपियन संघाच्या विदेश नीती मुख्यालयाला निशाणा बनविण्यात आलं होतं. जोसेफ़ बोरेल यांनी या इमारतीच्या उध्वस्त भागाचं छायाचित्र ट्विटरवर पोस्ट करत या हिंसाचाराला मुर्खपणा असं संबोधलं.

कोरोना व्हायरसच्या झपाट्यानं प्रसार होणार्‍या सध्याच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट्मुळे लागू करण्यात आलेले निर्बंध आणि लसीकरण याच्या विरोधात प्रदर्शनकारी एकत्र जमले होते. यापैकी काही फ़्रान्समधून, काही जर्मनीमधून तर काही इतर देशांतून आले होते.हजारोंचा हा जनसमुदाय रविवारी रस्त्यावर “लिबर्टी”च्या घोषणा देत उतरला.



बेल्जियमधे ७७ टक्के पूर्ण लसीकरण झालं आहे आणि ५३ टक्के बुस्टर डोस झालेले आहेत. ब्रुसेल्समधे या महामारीत २८ हजार ७०० हून अधिक जणांचा बळी गेलेला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

ShareTweet
Previous Post

समुद्रात तेलगळती झाल्यामुळे ‘पेरु’ने तीन महिन्यांची ‘एन्व्हायरन्मेंटल इमर्जन्सी’ घोषित केलीये

Next Post

Explainer – बहुराष्ट्रीय औषध कंपन्याच आजच्या काळातल्या सर्वात मोठ्या माफिया आहेत

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

Explainer - बहुराष्ट्रीय औषध कंपन्याच आजच्या काळातल्या सर्वात मोठ्या माफिया आहेत

हायस्पीड इंटरनेटला मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देणारा फिनलंड हा जगातला पहिला देश बनलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.