The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका हॉलिवूड चित्रपटातल्या पात्रावरून एक धर्म अस्तित्वात आलाय त्याचं नाव ड्युडेइझम

by द पोस्टमन टीम
24 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तुम्ही हॅपिनेस कोट्स पाहिले असतीलच. ‘हॅपिनेस इज’ने सुरू होणारे हे कोट्स आज मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. त्यांचे वैशिष्ट्य हे की छोट्या छोट्या गोष्टींमध्येही किती आनंद दडला आहे हे ही वाक्ये अधोरेखित करतात. रात्री मित्रमैत्रिणींच्या सहवासात प्यालेली कॉफी, बाहेर पाऊस पडत असताना समोर येणारा वाफाळता चहा, रविवारी मस्त लोळत पडणे, आईच्या कुशीत शिरणे, इथपासून ते बाबांनी पहिला नंबर आल्यावर बक्षीस दिलेले रिस्ट वॉच आणि बसमध्ये मिळालेली विंडो सीट इथपर्यंत सुखाच्या अनेक कल्पना आहेत. 

मोठ्या सुखांच्या मागे लागताना आपण हे छोटे क्षण अनुभवायचे विसरून जातो, हे आपले दुर्दैव; पण जगात एक धर्म नेमकी हीच शिकवण देतो. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती किंवा आचरणाची रीत. जगात आज अनेक धर्म आणि पंथ अस्तित्वात आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, यहुदी हे जगातील प्रमुख धर्म आहेत. याखेरीज प्रत्येक धर्मांत अनेक पंथ आहेत, शाखा उपशाखा आणि विचारधारा आहेत. प्रत्येक धर्माने संमत केलेली काही तत्त्वे असतात. त्या धर्माचे अनुयायी ही तत्त्वे मनापासून अनुसरतात, किमान त्यांच्याकडून तशी अपेक्षा असते.

मानववंशशास्त्रज्ञ आणि उत्क्रांतीच्या अभ्यासकांनी धर्म या संज्ञेबद्दल सखोल विवेचन केले आहे. कालानुरूप विविध धर्म आणि पंथ कसे उदयाला आले, त्यांचा प्रवास आणि प्रसार कसा झाला याबद्दल अनेकांनी लिहून ठेवले आहे. आजही धर्म हा मुद्दा अतिशय संवेदनशील मानला जातो. आपल्या धर्माबद्दल असलेला कडवा अभिमान हे इतिहासातदेखील अनेक यु*द्धांचे कारण ठरला आहे. याचे कारण धर्म हा माणसाच्या संस्कृतीशी जवळचा, साधर्म्य दर्शवणारा पैलू आहे.

तुलनेने नवीन असलेल्या अशाच एका धर्माची आपण इथे चर्चा करणार आहोत. त्याचे नाव आहे ड्युडेइझम. आज या धर्माप्रती असलेले आकर्षण वाढते आहे, कारण हा धर्म वा पंथ बऱ्यापैकी आधुनिक जगाशी नाळ जोडलेला समकालीन असा आहे.



तर काय आहे हा नवा धर्म?

ड्युडेइझम हा धर्म, तत्त्वज्ञान किंवा जीवनशैली प्रामुख्याने एका चित्रपटावरून प्रेरणा घेत उदयाला आला आहे. कोएन ब्रदर्सच्या १९९८ साली प्रसारित झालेल्या द बिग लेबोव्स्की नामक चित्रपटाचा नायक “द ड्यूड” याच्या नावावरून या धर्माला हे नाव मिळाले आहे. चीनी ताओवादाच्या आधुनिक स्वरूपाचा प्रचार करणे हे या धर्माचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ताओवादाचे वर्णन लाओझी (इसपू ६वे शतक) याने ताओ ते चिंग या ग्रन्थात केले आहे. त्याच्याच जोडीला हा धर्म प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता एपिक्यूरस (इसपू ३४१-२७०) याच्या धर्मविषयक संकल्पनांनाही प्रोत्साहन देतो.

ताओवादाची मुळे किमान इसपू चौथ्या शतकापर्यंत जातात. ताओवादानुसार, अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा स्रोत आणि सार म्हणजे ताओ. ताओवाद परिपूर्णता प्राप्त करण्यासाठीचे विविध मार्ग शिकवतो. ताओवादी नीतिशास्त्र विशिष्ट स्कूलनुसार बदलते, परंतु सर्वसाधारणपणे त्याचा भर वू वेई (निर्हेतुक भावनेने केलेली कृती), नैसर्गिकता, साधेपणा, उत्स्फूर्तता आणि करुणा, मितव्यय आणि नम्रता यावर असतो.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

जेफ्री “द ड्यूड” लेबोव्स्की या पात्राच्या जीवनशैलीवरून या धर्माने आपली तत्त्वे घेतलेली आहेत. विनोदी चित्रपट संदर्भ वापरल्यामुळे आणि पारंपारिक अर्थाने धर्म या मुद्द्यावर अधूनमधून टीका केल्यामुळे ड्युडेइझमला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्याचे अनेक अनुयायी मात्र या धर्माची शिकवण गांभीर्याने घेतात.

या धर्माची स्थापना तशी अगदी अलीकडची. २००५ मध्ये चियांग माई, थायलंड येथे राहणारे पत्रकार ऑलिव्हर बेंजामिन यांनी हा धर्म स्थापन केला. त्याचे अधिकृत संस्थात्मक नाव ‘ द चर्च ऑफ द लॅटर-डे ड्यूड’ असे आहे. जगभरात या धर्माचे लाखो अनुयायी धर्मगुरू म्हणून नियुक्त केले गेले आहेत.

हा धर्म जरी नवा असला तरी त्याच्या अनुयायांचा असा विश्वास आहे, की हा धर्म अधिकृतरीत्या आत्ता अस्तित्वात आला, पण त्याचे तत्त्वज्ञान मानवी संस्कृती उदयाला आली तेव्हापासून अस्तित्वात आहे. आक्र*मकता आणि हव्यास यांसारख्या अनिष्ट सामाजिक प्रवृत्ती सुधारण्यासाठी त्याची योजना होती. लाओझी, एपिक्युरस, हेराक्लिटस, बुद्ध आणि येशू ख्रिस्त यांसारख्या व्यक्ती याच धर्माचे पालन करत होत्या असाही दावा केला जातो.

या धर्माची श्रद्धा आणि शिकवण हे ताओवादाचे आधुनिक रूप आहे. जीवनातील अडचणींना तोंड देताना आपल्या मूळ प्रकृतीशी सुसंगत राहण्यासाठी ड्युडेइझम “प्रवाहाबरोबर राहा”, “डोके शांत ठेवा”, आणि “डगमगून जाऊ नका” अशी शिकवण देतो. थोडक्यात ‘टेक इट इझी’ हा मंत्र जपायला हा धर्म प्रोत्साहन देतो.

समाजात निर्माण होणाऱ्या अपुरेपणाच्या भावना दूर करण्याचा त्याचा उद्देश आहे. खूप मोठ्या आकांक्षा ठेवत त्या साध्य करण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा साध्यासोप्या गोष्टींमधून सुख मिळवणे हे या धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार जास्त श्रेयस्कर मानले जाते. मग ते आंघोळ करणे, क्रिकेट खेळणे आणि मित्रांसोबत फेरफटका मारणे असे काहीही असू शकते. ड्यूडने स्वतः चित्रपटात म्हटल्याप्रमाणे, “द ड्यूड अबाइड्स” हा याचा फंडा आहे, ज्याचा अर्थ फक्त अस्तित्वात असणे असा आहे. थोडक्यात जगा आणि आयुष्य पूर्ण उपभोगा अशी याची शिकवण आहे.

ड्युडेइझमच्या अधिकृत संकेतस्थळावर वर्णन केल्यानुसार या धर्माची कल्पना अशी आहे: ‘आयुष्य लहान आणि गुंतागुंतीचे आहे आणि त्याचे काय करावे हे खरेतर कोणालाही माहिती नाही. त्यामुळे काहीही करू नका. आरामात राहा. आपण अंतिम फेरीत प्रवेश करू की नाही याची काळजी करणे थांबवा. काही मित्र आणि थोडासा ओट सोडा यांच्या सोबत रिलॅक्स व्हा आणि कुठल्याही परिस्थितीत स्वत:शी आणि इतरांशी प्रामाणिक राहा.’

हरघडी वाढणारी अनुयायांची संख्या हे या धर्माच्या लोकप्रियतेचे माप आहे. त्याचे कारणही त्याच्या शिकवणीत आहे. तुम्हाला काय वाटते?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

बंगालच्या गावातील हाताने शटलकॉक्स बनवण्याची कला चीनमुळे धोक्यात आलीये..!

Next Post

ही आहेत दुसऱ्या महायु*द्धातील फारशी प्रसिद्ध नसलेली स्पेशल ऑपरेशन्स..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

ही आहेत दुसऱ्या महायु*द्धातील फारशी प्रसिद्ध नसलेली स्पेशल ऑपरेशन्स..!

विमान अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या सहकाऱ्यांचं मांस खाऊन ते १६ लोक जिवंत राहिले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.