The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेशी युद्ध झाल्यास इराण किती शस्त्रसज्ज?

by Nachiket Shirude
2 November 2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
iran missiles the postman

The National Interest

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

८ जानेवारीच्या मध्यरात्री इराणने आपल्या जनरल सुलेमानीच्या मृत्युचा बदला म्हणून इराकमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच घोषणा केल्याप्रमाणे आता अमेरिका इराणला प्रतिक्रिया देणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

दरम्यान तीन दिवसांपूर्वीच इराकच्या संसदेने अमेरिकेने इराकमधील आपलं सैन्य व बस्तान हलवावं असं म्हटलं आहे. आता अमेरिकेने जर इराणवर प्रतिहल्ला केला तर युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

युद्ध भडकल्यावर प्रश्न निर्माण होतो दोन्ही देशांच्या शस्त्र सज्जतेचा. अमेरिका हा जगातील सर्वात बलाढ्य देश आहे ज्याने स्वतःची लष्करी शक्ती प्रचंड वाढवली आहे की तो संपूर्ण जगाला नेस्तनाबूत करण्या इतपत शस्त्रास्त्रांची ताकद बाळगून आहे.

आज अमेरिकेला जर इराण युद्धाचे आव्हान देतो आहे तर इराणने आपल्या शस्त्रसज्जतेचा विचार नक्कीच केला असणार आहे. इराण हा अमेरिकेच्या तुलनेत शस्त्रसज्जतेच्या बाजूने किती भरभक्क्म आहे, त्याचा हा उहापोह..



इराण हा आण्विक अस्त्र विरहित देश म्हणून आण्विक अस्त्र प्रसार बंदी कराराचा एक सहभागी देश आहे. १९७० सालापासून इराण ह्या कराराने बांधला गेलेला असला तरी २००२ साली इराणने जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन नामक एका संयुक्त कृती दलाचे सदस्यत्व स्वीकारले होते.

ह्या कृती दलातून ८ मे २०१८ रोजी अमेरिकेने माघार घेतली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

इराण हा संयुक्त राष्ट्र संघाच्या क्षेपणास्त्र नियंत्रक मंडळाचा सदस्य नसून इराणने आपल्या क्षेपणास्त्रांचा विकास मोठ्या प्रमाणावर केला आहे.

इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्सचं भांडार असून त्याचा वापर इराण वेळोवेळी केला आहे. इराणकडच्या रासायनिक आणि जैविक शस्त्रांचा साठा किती आहे, याबद्दल देखील सर्वत्र अनभिज्ञता आहे. पण त्यांच्याकडे अशी अस्त्रे मोठया प्रमाणावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१९५० साली मोहम्मद रझा ह्या इराणी जनरलने इराणच्या आण्विक क्षमतेचा विकास करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली. १९७४ साली शहाने इराणमध्ये ऍटॉमिक एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इराणची स्थापना केली.

त्याने २० रिएक्टर्स असलेला युरेनियम विकास प्रोजेक्ट सुरु केला. परंतु १९७९ साली इराणमध्ये झालेल्या इस्लामिक रिव्होल्यूशननंतर अयोतुल्ला खोमेनीने इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामवर केवळ ते इस्लाम विरोधी असल्याचं कारण देऊन ब्रेक आणला होता.

 

ayotullah the postman
Al Jazeera

१९८४ साली खोमेनीला पुन्हा जाग आली आणि जागतिक स्तरावरील आपल्या काही मित्र राष्ट्रांच्या मदतीने त्याने पुन्हा बशरार येथील अणुउर्जा प्रकल्प कार्यानिव्त केले.

सध्यस्थितीत इराणकडे एक भारदस्त अणु कार्यक्रम असून त्याच्या बळावर त्यांनी युरेनियम उत्खनन, प्रक्रिया आणि न्युक्लीअर फिजन व फ्युजन करू शकणारी एक मोठी यंत्रणा विकसित केली आहे.

२०१५ मध्ये इराणचा अणु कार्यक्रम हा त्याचा सर्वोच्च स्तरावर होता. जवळ जवळ २०००० सेंटरीफ्युज रेअक्टर्स इराणच्या तीन आण्विक उर्जा केंद्रात कार्यरत आहेत.

अमेरिका, जर्मनी, इंग्लंडने २००२ साली आण्विक निर्बंध लादले, २०१५ ला इराणने आपल्या काही मागण्या आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केल्यास आपण आपला आण्विक कार्यक्रम नियंत्रणात आणू असं घोषित केलं.

पण अमेरिकेने कृती दलाचं सदस्यत्व मागे घेतलं त्यानंतर मात्र इराणचा तोरा पालटला.

त्याने आण्विक कार्यक्रम अजून वेगाने विस्तारायला सुरुवात केली. एकेकाळी ४५० ग्राम युरेनियम उत्पादन इराणने आता ५ किलोग्राम इतकं वाढवलं असून लवकरच इराण एप्रिल महिन्यापर्यंत आण्विक शक्ती दुप्पट करणार आहे.

इराणने १९२९ साली जिनेव्हा करार केला होता, ह्या करारा अंतर्गत इराणवर जैविक शस्त्रास्त्र निर्मिती आणि खरेदी या विषयावर निर्बंध घालण्यात आले होते.

१९७३ साली इराणने त्त्या कराराचे पुनरुज्जीवन केलेलं असलं तरी अमेरिकेने काही दिवसांपूर्वी आरोप केला की इराणकडे जैविक अस्त्रांचा साठा आहे. पण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेकडे याला सिद्ध करू शकणारा कुठलाच खात्रीलायक पुरावा नाही आहे. त्यामुळे इराणकडे जैविक शस्त्रास्त्र असल्याचा दावा सत्य नाही.

इराणच्या रासयनिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इराण आणि इराकच्या दरम्यान झालेल्या युद्धात इराणला इराककडून करण्यात आलेल्या रासायनिक शास्त्रांच्या माऱ्यामुळे मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला होता. इराणला रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापराचा बऱ्यापैकी अनुभव आहे.

१९९७ साली इराणने रासायनिक शास्त्रांच्या वापरा संदर्भात रासायनिक शस्त्र आयोग स्थापला आणि इराण हा आंतराष्ट्रीय रासायनिक शस्त्रास्त्र नियंत्रक मंडळाचा देखील सदस्य बनला.

इराणने आपण रासायनिक शस्त्र निर्मिती करत नाही, अशी घोषणा करून संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधीना परीक्षणासाठी आमंत्रित केलं होतं.

परंतु अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा म्हणतात की इराणकडे रासायनिक शस्र निर्मितीचं मोठं तंत्रज्ञान आहे, ज्याच्या बळावर  इराणने आपली लष्करी कुमुक मजबूत केली आहे.

अमेरिकेच्या ह्या दाव्याला देखील समर्थन मिळू शकेल असा कुठलाच पुरावा अमेरिकी गुप्तचर संस्थेला सादर करता आलेला नसल्यामुळे ह्यात किती तथ्य आहे, हे कोणीच स्पष्ट करू शकत नाही.

इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा इतर कार्यक्रमाप्रमाणे लपून रहाणारा नाही. त्यांनी आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम गुप्त न ठेवता जाहीर केला आहे.

इराण हा मध्य पूर्वेतील अत्यंत प्रभावी बॅलेस्टिक मिसाईल तंत्रज्ञान असलेला एकमेव देश आहे. त्यांच्याकडे सॉलिड आणि लिक्विड अशा दोन प्रकारच्या इंधन तंत्रज्ञानांनी युक्त असे मिसाईल तंत्रज्ञान आहे.

आधी इराणचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हे उत्तर कोरियाच्या धोरणाववर आधारित होतं. पण कालांतराने त्यांनी देशांतर्गत क्षेपणास्त्र विकास तंत्रज्ञानाचा विकास करायला सुरवात केली.

 

iran missiles the postman
The National Interest

आज इराणकडे उत्तर कोरियाचे सोव्हिएत स्कड बी आणि सोव्हिएत स्कड सी अशी दोन क्षेपणास्त्रे आहेत. ज्यांचं पुढे शबाब १ आणि शबाब २ असं नामकरण करण्यात आलं. मग पुढे इराणने त्यांच्या स्वतःच्या शबाब ३ ची निर्मिती केली.

आता इराणकडे त्या शबाब ३ च्या अजून दोन सुधारित आवृत्त्या आहेत. गदर १ आणि इमाद असे ह्या दोन सुधारित आवृत्त्यांचे नाव आहे.

२००८ साली इराणने आपल्या दोन टप्प्यात कार्य करणाऱ्या सेज्जील ह्या सॉलिड फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली.

क्षेपणास्त्रांच्या बरोबरीला इराणकडे एक अत्याधुनिक अंतराळ संस्था देखील आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून इराणने अनेक उपग्रह प्रक्षेपण केले आहेत.

सिमोर्घ असे ह्या नव्या स्पेस लाँच व्हेईकलचे नाव आहे. अनेकांनी ह्या स्पेस लाँच व्हेईकलच्या दुहेरी वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, यामुळे इराण युद्धावेळी  आण्विक अस्त्रांच्या माऱ्यासाठी यांचा वापर करू शकतो.

सध्यस्थितीत इराणने आपल्या शस्त्र सज्जतेबाबत कमालीची गुप्तता बाळगली असली तरी अमेरिका आणि इराण दरम्यान संघर्षाची परिस्थिती उद्भवली तर इराण आपल्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात कुठलीच कसर सोडणार नाही.

इराणने २०१५ ला फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांच्या मध्यस्थीने केलेल्या अण्वस्त्र प्रसार बंदीच्या कार्यक्रमावर स्वाक्षरी केली होती, पण सुलेमानीच्या हत्येनंतर मात्र त्यांनी आपला पवित्रा बदलला.

ब्रिटन आणि जर्मनीने इराणला याबबत आण्विक शस्त्रास्त्र करार पाळण्याचे निर्देश दिलेले असले तरी यासंदर्भात इराण मात्र आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

 

iran the postman
Fox Business

अमेरिका आणि इराणमध्ये होऊ घातलेलं युद्ध टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु असून, अमेरीकेचे धोरण आक्रमक होत चालले आहे, जे चिंतेत भर घालणारे आहे.

अमेरिकेने होऊ घातलेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणच्या प्रतिनिधीना येण्यास मज्जाव केला आहे.

त्याचा पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या लष्करी तळांवर केल्या गेलेल्या हल्ल्यांचा योग्य तो सूड उगवला जाईल अशी एक धमकीवजा सूचना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

आता इराण अमेरिकेचा वाद हा प्रादेशिक नसून अटीतटीची अस्तित्वाची लढाई बनला आहे. ह्या लढ्यावर तोडगा काढण्यात संयुक्त राष्ट्र संघ आणि इतर शांततापूर्ण भूमिका असणारे राष्ट्र काय प्रयत्न करतात यावर सर्व मानवजातीचे अस्तित्व अवलंबून आहे.

जर दोन्ही बाजूने आण्विक शस्त्रांचा वापर झाला तर ते निश्चितच मानवजातीला विनाशाकडे घेऊन जाणारे पाउल ठरणार आहे.

===

स्त्रोत: –
१) Al Jazeera News
२) NTI.org/learn/countries/iran/

===

हे पण वाचा : 

  • स्वतःच्या घरात जीव मुठीत धरून जगणाऱ्या कुर्दिश लोकांची हृदयद्रावक कथा
  • अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेलेला इराणी लष्करप्रमुख कासीम सोलेमानी कोण होता?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: AmericaIran Defense PlanUS
ShareTweet
Previous Post

सिनेसृष्टीचं रामायण: चित्रपटातूनच चितारलेल्या रामगाथेचा इतिहास

Next Post

डॉक्टर म्हणाले धर्मेंद्रला गोळ्यांची नाही जेवणाची गरज आहे.!

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

डॉक्टर म्हणाले धर्मेंद्रला गोळ्यांची नाही जेवणाची गरज आहे.!

तुमचं व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषण कितपत सुरक्षित आहे?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.