The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगभरात वाढणारी बालगुन्हेगारांची संख्या आपल्या चिंतेचा विषय बनलीय..!

by Heramb
5 January 2026
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लहान मुलं देवाघरची फुलं असं म्हटलं जातं. पण काही लहान मुलं जेव्हा गुन्हे करतात ते प्रचंड गंभीर गुन्हे असतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१३ सालच्या सर्वेनुसार, आयपीसी किंवा भारतीय दंड संहितेअंतर्गत अल्पवयीन मुलांवर सुमारे ४३ हजार ५०६ गुन्हे नोंदवण्यात आले होते. यापैकी ६० टक्के गुन्हे हे १६ ते १८ वयोगटातील “अल्पवयीन” मुलांनी केले आहेत. एकूण संख्येच्या २.५ टक्के खून आणि ५.४ टक्के बलात्काराचे गुन्हे अल्पवयीन मुलांवर नोंदवले गेले आहेत.

१६ डिसेंबर, भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी तारीख! पण या सुवर्णाक्षरांवर काळिमा फासण्याचं काम केलं ते २०१२ साली घडलेल्या दिल्लीच्या निर्भया बला*त्कार आणि ह*त्या प्रकरणातील गुन्हेगारांनी. या प्रकरणातील सर्वांत अल्पवयीन आरोपी मोहम्मद अफरोझला ‘ज्युव्हेनाईल जस्टीस ऍक्ट (२०००)’च्या आधारावर तीन वर्षांच्या बाल सुधार गृहाच्या कैदेतून मुक्त करण्यात आले. या प्रकरणामुळे जनता, सरकार आणि न्यायव्यवस्था या सर्वांचं लक्ष वाढत्या बालगुन्हेगारीवर केंद्रित झालं.

किशोरवयीन मुले २० वर्षांची होईपर्यंत त्यांची बुद्धी प्रौढ व्यक्तीप्रमाणे परिपक्व होत नाही. म्हणजेच किशोरवयीन मुलांच्या मेंदूच्या विकासाच्या टप्प्यात अनेक भाग असतात. या काळात किशोरवयीन मुलांमध्ये अनकॅलक्युलेटेड रिस्क्स घेणे, वाढत्या भावना, अतिविचार, आवेग, अतिउत्साह आणि अविवेकीपणा या गोष्टी सहज आढळून येतात. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर, जगातील अनेक देशांमध्ये किशोरवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. गुन्हेगार म्हणून, १० मुलांच्या मागे १ या प्रमाणात मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त आहे.

अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलांद्वारे होणारी हिं*सा, मारामारी आणि ह*ल्ले यांचा समावेश असतो. किशोरवयीन मुले अनेकदा त्याच वयोगटातील हिं*साचारालाच बळी पडतात. ड्र*ग्ज आणि दारूचे सेवन हे किशोरवयीन मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र असू शकते. किशोरवयात असलेल्या प्रत्येकालाच काहीतरी नवीन करून पाहायचे असते किंवा त्यांचे सर्व मित्र जे करत असतात तेच करण्याची इच्छा त्यांनाही होते. ड्र*ग्ससारख्या पदार्थांमुळे व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी वर्तनाचा धोका या वयातील मुलांसाठी वाढत जातो.

एका संशोधनानुसार, तरुण गुन्हेगारांद्वारे केलेले बहुतेक हिं*सक गुन्हे हे इतर किशोरवयीन मुलांविरुद्धच असतात आणि त्यामुळे हे प्रमाण इंग्लंड, युनायटेड स्टेट्ससह जगभरातील इतर देशांमध्ये स्पष्ट झाले आहे. उदाहरणार्थ, जर्मनी आणि नेदरलँड्समध्ये, १५ ते १७ वयोगटातील तरुण लोक प्रौढांपेक्षा चार पटीने जास्त मारहाणीच्या प्रकरणांमध्ये गुन्हेगार ठरतात.

अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून बालगुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याला सामाजिक आणि आर्थिक अशी दुहेरी कारणेसुद्धा असू शकतात. आई-वडिलांचा घटस्फोट, गरिबी, बिघडलेली कौटुंबिक स्थिती इत्यादी कारणांमुळे देखील अमेरिकेतील अल्पवयीन मुलं-मुली गुन्हेगारीकडे वळतात. ब्रेंडा स्पेन्सर, अमरदीप सदा यांच्या गोष्टी तर आपल्याला माहीतच आहेत पण अमेरिकेत झालेल्या आणखी एका आश्चर्यकारक घटनेबद्दल आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत..



ही गोष्ट आहे १९२९ च्या एप्रिल-मे महिन्यातील, अमेरिकेतील केंटकी या कोळसा खाणकाम करणाऱ्या कामगारांच्या गावात, दोन मुलांमध्ये भंगारच्या एका तुकड्यावरून मोठे भांडण झाले. हे दोघे मुले भंगारमध्ये विकता येतील असे भाग शोधत होते. कार्ल महानने त्याचा मित्र सेसिल व्हॅन हूजपेक्षा जास्त विकण्यायोग्य भाग गोळा केले होते.

सेसीलने आपल्यापेक्षा जास्त भाग गोळा केले हे कार्लला आवडले नाही. म्हणून त्याने भंगारातील एक स्क्रॅप मेटल घेतला आणि कार्लच्या तोंडावर मारला. सहा वर्षीय कार्ल रडत घरी पळाला. घरी जाताच तो खुर्चीवर चढला आणि त्याच्या वडिलांची बारा-गेज शॉटगन घेतली. ती गन घेऊन तो पुन्हा सेसिलकडे गेला. “मी तुला मारणार आहे!” असं ओरडत त्याने ट्रिगर दाबला. या घटनेनंतर, १८ मे १९२९ रोजी, ‘कार्ल न्यूटन महान’ अमेरिकन इतिहासातील सर्वात लहान खुनी गुन्हेगार बनला.

अशा भीषण घटनेनंतर सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत, कार्लवर त्याचा मित्र सेसिलच्या ह*त्येचा खटला सुरू होता. आपण सेसिलची ह*त्या कशी झाली हे कार्लने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर दिवसभर चाललेल्या खटल्यामुळे तो त्याच्या वकिलाच्या टेबलावर आरामात झोपही काढली. अवघ्या तीस मिनिटांच्या चर्चेनंतर न्यायाधीशांनी या अल्पवयीन मुलाला दोषी ठरवले. त्यांनी कार्लला पंधरा वर्षांची सुधार गृहामध्ये ठेवण्याची शिक्षा सुनावली. कार्लला काही काळासाठी ५०० डॉलर्सच्या जामिनावर सोडण्यात आले.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

न्यायाधीशांचा हा निर्णय पत्रकारांपर्यंत पोहोचला तेव्हा या निर्णयावर प्रत्येक पत्रकाराने आपापली मते व्यक्त केली. काही पत्रकारांना ही शिक्षा फारच कठोर वाटली तर काहींना ही शिक्षा पुरेशी नाही असे वाटले. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, कार्ल्सच्या वडिलांचे मत होते, “त्या बंदुकीत गोळ्या आहेत हे कार्लला माहीत नव्हते. त्याला फक्त सेसिलला घाबरवायचे होते. जर बंदुकीत गोळ्या आहेत हे त्याला माहित असते तर त्याने गोळ्या बाहेर काढल्या असत्या!”

जेव्हा या प्रकरणाची पुनर्विचार याचिका कोर्टामध्ये दाखल केली गेली तेव्हा अनेक पत्रकारांनी कार्लला विविध स्वरूपांमध्ये दर्शवले. काही पत्रकारांनी त्याला सूट आणि टाय घातलेले दाखवून त्याला दोषी ठरवले. तर काही पत्रकारांनी कार्ल निर्दोष असल्याचा दावा करून त्याच्या आईच्या मांडीवर बसल्याचे फोटो घेतले. कार्लला मात्र या सगळ्याची मजा येत होती कारण त्याला फोटोंच्या बदल्यात पैसे मिळायचे.

काही महिन्यांनंतर, या खटल्याचा निकाल कार्लच्या बाजूने लागला. केंटकीच्या ॲटर्नी जनरलने यापुढे पुढील कारवाई न करण्याचा निर्णय घेऊन ही केस कायमची बंद केली. कार्ल महान आता मुक्त होता आणि त्याला त्याच्या पालकांसोबत राहण्याची परवानगी होती. त्यानंतर कार्ल महानबद्दल फारशी माहिती नाही. अखेरीस जेफरसन काउंटीमध्ये गेल्यानंतर, वयाच्या पस्तीसव्या वर्षी त्याचे निधन झाले.

कार्लच्या खटल्याच्या सुमारे ७१ वर्षांनंतर, २९ फेब्रुवारी २००० रोजी, एका दुसर्‍या सहा वर्षीय मुलाने त्यांच्या मित्राला आपल्या घरातून चोरलेल्या सेमिऑटोमॅटिक राय*फलने गोळ्या घातल्या. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुलाचे नाव बाहेर येऊ दिले नाही. या घटनेच्या एक दिवस आधी, दोन्ही मुले खेळाच्या मैदानात भांडत होती. त्यांच्या भांडणाला एक क्षुल्लक कारण होते ते म्हणजे हा सहा वर्षीय मुलगा पीडितेच्या टेबलवर थुंकला होता.

कार्लप्रमाणेच या मुलालादेखील निर्दोष सोडण्यात आले. पण ही केस कार्लप्रमाणे साधी नव्हती. तपासकर्त्यांना मुलाच्या घरातून शस्त्रास्त्रांचा मुद्देमाल आणि कोकेन सापडले. त्याच्या वडिलांवर अनेक गुन्हे दाखल असल्या कारणाने तो तुरुंगात होते. याशिवाय त्याच्या आईलासुद्धा काही कारणाने अटक करण्यात आली होती. तेव्हा ही केस इतक्या सहजासहजी बंद झालीच कशी यावर प्रश्नचिन्ह आहेच. शेवटी हा मुलगा आपल्या मावशीकडे राहायला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अल्काट्रेझ जेल आता बंद झालंय पण तिथले किस्से आजही जगभर प्रसिद्ध आहेत…!

Next Post

अमेरिकेच्या CIAने एक सिक्रेट ‘हार्ट अटॅक ग*न’ बनवली होती…!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

अमेरिकेच्या CIAने एक सिक्रेट 'हार्ट अटॅक ग*न' बनवली होती...!

कोरोना झाला, डेल्टा झाला, ओमायक्रॉन झाला आता आलाय आयएचयु!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.