The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपला ‘बंधुभाव’ जगासमोर व्यक्त करण्यासाठी दोन समाजवादी नेत्यांनी एकमेकांना किस केलं होतं

by Heramb
24 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसऱ्या महायु*द्धानंतरच्या जगामध्ये अनेक चित्र-विचित्र बदल घडून आले. वैयक्तिकरित्या घरांमध्ये घेतली जाणारी किस सार्वजनिक बंधुत्वाचे प्रतीक बनली होती. जगामध्ये एवढे मोठे ‘ट्रान्सफॉर्मेशन’ यायला बऱ्याच गोष्टी जबाबदार आहेत. जर्मनीमधील ‘द किस’चा हा प्रकार विचित्र तर आहेच पण ऑकवर्डसुद्धा आहे!

रोमान्समधील सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे ‘किस’! पण आपला ‘बंधुभाव’ जगासमोर व्यक्त करण्यासाठी दोन नेत्यांनी एकमेकांची ‘किस’ घेतल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? कदाचित ही अतिशयोक्ती किंवा विनोद वाटत असेल, पण ही वस्तुस्थिती आहे! इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध किस कम्युनिस्ट नेता एरिक होनेकर आणि सोव्हिएत नेता लिओनिड ब्रेझनेव्ह यांच्यात झाली.

‘द किस’:

१९७९ साली जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिकच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा जगप्रसिद्ध कार्यक्रम झाला. अर्ध्या युरोपच्या भवितव्याचा निर्णय घेणारे नेते बर्लिन वॉलसमोर भेटले. लिओनिड ब्रेझनेव्ह यांना जीडीआरमधील कम्युनिस्ट सत्तेचे प्रतिनिधी एरिक होनेकर यांनी आमंत्रित केले होते. बर्लिन शहर कम्युनिस्ट नियमांनुसार सुट्टीच्या तयारीत होते.

अधिकृतरीत्या तयार केलेल्या स्टेजवर गेल्यानंतर सोव्हिएत नेता लिओनिड ब्रेझनेव्हने भाषण दिले. भाषणानंतर तो एरीक होनेकरकडे वळला, त्याला मिठी मारली आणि संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून दोन्ही नेत्यांनी दीर्घकाळ एकमेकांना किस केलं. फोटोग्राफर रेगिस बॉसू यांनी तो क्षण उत्तम प्रकारे कॅमेऱ्यात कैद केला होता. जगभरातील प्रकाशने या संदर्भात माहिती द्यायची असेल तर याच फोटोचा वापर करतात. त्यांनी या किसला साधे पण उल्लेखनीय नाव दिले, ते म्हणजे ‘द किस’. 



किसमधील नेत्यांची ओळख – एरीक होनेकर:

एरिक अर्न्स्ट पॉल होनेकर हा जर्मनीच्या सोशलिस्ट युनिटी पार्टीचा सरचिटणीस होता. त्याने मॉस्कोमधील बड्या नेत्यांबरोबर जवळून काम केले होते, त्यामुळे पूर्व जर्मनीमध्ये सैन्य पाठवून पूर्व जर्मनी सुरक्षित राहील याची खात्री केली गेली. अगदी लहानपणापासूनच, एरिक फॅसिस्ट राजकीय व्यवस्थेत वाढत होता. त्याच्या वडिलांनी त्याच्यामध्ये साम्यवादाची आवड निर्माण केली होती. त्याचे वडील सामान्य खाणकामगार असूनही दुसरे महायु*द्ध सुरु होण्यापूर्वी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच, एरिक कम्युनिस्ट युवा चळवळीत सामील झाला आणि त्याने कम्युनिस्ट समर्थनार्थ अनेक बेकायदेशीर कामे केली. १९३५ साली त्याला गेस्टापोने पकडले आणि ना*झी पक्षाविरुद्ध केलेल्या सर्व गुन्ह्यांसाठी त्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. १९४५ साली सोव्हीएट्सनी जर्मनीचा ताबा घेतला तेव्हा एरिकची सुटका झाली.

पाश्चिमात्य असूनही साम्यवादाचा ‘कम्युनिस्ट’ भाग समजून घेणारा खरा कम्युनिस्ट म्हणून सगळीकडे त्याचा आदर करण्यात आला. त्याने पूर्व जर्मनीवर ठेवलेल्या नियंत्रणासाठी सोव्हिएत लोकांनी त्याच्यावर खूप प्रेम केले आणि आपला पाठिंबाही त्याला देऊ केला. तसेच त्याने  पूर्व जर्मनीला सोव्हिएत ईस्टर्न ब्लॉकमधील सर्वांत समृद्ध भागांपैकी एक भाग म्हणून तयार केले होते, याबद्दलही तो सोव्हिएत लोकांमध्ये लोकप्रिय होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

लिओनिड ब्रेझनेव्ह:

लिओनिड ब्रेझनेव्ह हा शीतयु*द्धाच्या काळातील तसेच युएसएसआरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम नेत्यांपैकी एक मानला जात होता. युक्रेनमध्ये जन्मलेल्या, लिओनिडचा जन्म खरा कम्युनिस्ट म्हणूनच झाला होता आणि त्याने त्याची १८ वर्षे पक्षाचा सरचिटणीस म्हणून काम केले होते. अनेक पाश्चिमात्य इतिहासकारांनी त्याला इतका चांगला नेता मानला नाही, कारण त्याने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले होते.

त्याशिवाय, लिओनिडने सोव्हिएत राजकीय व्यवस्थेत अत्यंत आवश्यक अशी कामे केली, ती म्हणजे सोव्हिएत राज्यात राजकीय स्थिरता आणणे तसेच जगभरातील इतर मोठ्या राष्ट्रांसोबत सोव्हिएतसोबत चांगली मुत्सद्दीगिरी करून संबंध राखून ठेवणे. ब्रेझनेव्हने एरिकशी मैत्रीपूर्ण, बंधुतुल्य संबंध जोडले, कारण त्या दोघांना लहानपणापासूनच साम्यवादाची कल्पना आवडली होती. लिओनिड वयाच्या सतराव्या वर्षी कम्युनिस्ट पार्टी युथ लीगमध्ये सामील झाला. म्हणजेच दोघेही लहानपणापासून समान विचारधारेसाठी आणि समान ध्येयासाठी लढले होते.

सोशॅलिस्ट फॅटर्नल किस:

किसिंग हे साम्यवादी राजकीय संस्कृतीचे प्रतीक आहे. “सोशॅलिस्ट फॅटर्नल किस” किंवा “समाजवादी बंधुत्वाची किस” हे खरे तर दोन नेत्यांमधील समंजसपणाचे प्रतीक मानले जाते. बहुतेकदा गालांवर किस घेतली जाते. पण अशा प्रकारच्या किसची ही परंपरा चर्चमधून आली आहे आणि समाजातील लोकांच्या दैनंदिन अभिव्यक्तीचा एक प्रकार आहे. कम्युनिस्ट राजकीय नेत्यांसाठी, ही किस एक औपचारिकता होती. सोशालिस्ट फॅटर्नल किस मिखाईल गोर्बाचेव्हने देखील केली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चिकन मंचुरियनचा शोध चीनमध्ये नाही तर मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये लागलाय..!

Next Post

राणी मेरी अँटोइनेटने ऑर्डर दिलेलं घड्याळ तिच्या मृत्यूनंतर ३४ वर्षांनी तयार झालं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

राणी मेरी अँटोइनेटने ऑर्डर दिलेलं घड्याळ तिच्या मृत्यूनंतर ३४ वर्षांनी तयार झालं होतं

डचांनी जायफळासाठी चक्क 'न्यू यॉर्क'च्या मालकीवर पाणी सोडलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.