The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कम्प्युटरचा जनक असलेल्या बॅबेजने कंटाळून शेवटी जुगाराचा धंदा चालू केला होता

by Heramb
14 November 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आधुनिक जगात संगणक किंवा तत्सम यंत्रांशिवाय आपलं पानही हलू शकत नाही. संगणकाच्या संशोधनाचे श्रेय अनेकांना दिले जाते, तर “संगणकाचे जनक” म्हणूनही अनेकांना ओळखले जाते. अशाच एका सर्वोत्तम ब्रिटिश गणितज्ज्ञ, मेकॅनिकल इंजिनिअर, तत्त्वज्ज्ञ आणि संशोधकाने संगणकाच्या संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. त्याला “आधुनिक संगणकाचे जनक” मानले जाते, कारण बॅबेजने डिजिटल प्रोग्रामेबल कॉम्प्युटरची संकल्पना निर्माण केली होती.

पहिला मेकॅनिकल कॉम्प्युटर, डिफरन्स इंजिनचे संशोधन करण्याचे श्रेय बॅबेजला दिले जाते. या दोन यंत्रांमुळेच क्लिष्ट असे इलेक्ट्रॉनिक डिझाइन्स तयार झाले. आधुनिक संगणकाच्या सर्व आवश्यक कल्पना बॅबेजच्या ॲनॅलिटीकल इंजिनमध्ये आढळतात. जॅकवर्ड लूममधून घेतलेल्या तत्त्वाचा वापर करून त्याने या कम्प्युटरसाठी प्रोग्राम केला होता.

बॅबेजचा जन्म १७९२ साली लंडनमध्ये झाला. शालेय विद्यार्थीदशेपासूनच तो गणितामध्ये अत्यंत हुशार विद्यार्थी होता. बॅबेजने कॅम्ब्रिज शहरातील ट्रिनिटी महाविद्यालयातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. बॅबेजला पॉलिमॅथची आवड तर होतीच शिवाय गणित, तत्त्वज्ञान आणि मेकॅनिकल इंजिनीरिंगमध्येसुद्धा रस होता.

त्याने अनेक संशोधने केली. या संशोधनांमध्ये सिस्मोग्राफ किंवा भूकंपलेखनयंत्र, ट्रेन्ससाठी तयार केलेला ब्लॅक बॉक्स आणि समुद्रीसपाटीपासूनची उंची मोजण्याचे यंत्र यांचा समावेश होता. कुतूहलापोटी चार्ल्स बॅबेज एकदा स्वतःहून ज्वालामुखीमध्ये उतरला. मानवी शरीरावर उष्णतेचे परिणाम पाहण्यासाठी त्याने २६५ फॅरेनहाईट म्हणजेच सुमारे १२९.४ डिग्री सेल्सियसवर थांबून अग्निपरीक्षा दिली. चंद्रावर स्वयंपाक कसा करायचा यावरही त्याने एक पुस्तक लिहिले आहे.

स्टॅटिस्टिक्सची प्रचंड आवड असल्याने त्याला मेकॅनिकल कॅल्क्युलेटरबद्दल समजले. बॅबेज मोठ्या प्रमाणातील डेटावर बरीच प्रक्रिया करून त्यामधील पॅटर्न्स शोधून काढण्यात तरबेज होता. चार्ल्स बॅबेजची लवकरच जॉन हर्शेलशी ओळख झाली. जॉन हर्शेल हा विलियम हर्शेलचा मुलगा होता. विलियम हर्शेलने युरेनस ग्रहाचा शोध लावला होता. खलाशांना सक्षम करण्यासाठी या दोघांनी ग्लोबवर अक्षांश आणि रेखांश अचूकपणे  प्लॉट करण्यासाठी एकत्र काम केले. या कामामुळे बॅबेजला मेकॅनिकल कॅल्क्युलेटर हाताळण्याची आणि अभ्यासण्याची संधी पुन्हा मिळाली.



१८२२ साली त्याने ‘डिफरन्स इंजिन’ नावाच्या मशीनची संकल्पना रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीमध्ये मांडली. डिफरन्स इंजिन आपोआप बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करू शकते, अशी संकल्पना होती. त्याची ही संकल्पना रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला आवडली. यामुळे त्याला इंग्लंडच्या सरकारकडून आर्थिक मदत मिळणे सोपे झाले. बॅबेजने इंजिन तयार करण्याच्या खर्चाकडे दुर्लक्ष करणे, इथूनच समस्यांना सुरुवात झाली होती.

कालांतराने ‘डिफरन्स इंजिन’मधील चार्ल्स बॅबेजचा रस अचानक कमी झाला. त्यामुळे डिफरन्स इंजिनच्या बजेट आणि अंतिम मुदतीवर परिणाम झाला. आता बॅबेजला हायड्रोजन ब्लो लॅम्पच्या सहाय्याने बॅले डान्सरच्या ड्रेसमध्ये रंग आणण्यात रस होता. मग बॅबेजने ‘पेनी पोस्ट सिस्टीम’ तयार केली. या पोस्ट सिस्टीममध्ये प्रवासाच्या एकूण अंतराकडे दुर्लक्ष करून, अगदी स्वस्त किमतीत वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवण्याचे काम होत असे. या पद्धतीमुळे इंग्लंडच्या ‘रॉयल मेल’ला मोठा नफा झाला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

डिफरन्स इंजिन तयार करण्याच्या कालावधीत बॅबेजला मोठे वैयक्तिक नुकसान सहन करावे लागले. शास्त्रज्ञांबरोबर विविध मुद्द्यांवर होत असलेल्या वादांमध्ये तो व्यस्त राहत असे. पण वादाला काहीच अर्थ नसतो, डिफरन्स इंजिनवर काम करून ते विकसित करण्याचा आपला बहुमूल्य वेळ त्याने निरर्थक वादांमध्ये घालवला.

यानंतर, एकेकाळी न्यूटनने भूषविलेल्या पदावर चार्ल्स बॅबेजला नियुक्त करण्यात आले. त्याची नियुक्ती कॅम्ब्रिज विद्यापीठात ‘गणिताचा प्राध्यापक’ म्हणून करण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ११ वर्षांच्या विद्यापीठामधील कार्यकाळात त्याने एकही लेक्चर दिले नाही. आपला सगळा वेळ डिफरन्स इंजिनच्या संशोधनाच्या कामात जात असल्याचा त्याने दावा केला. काहींनी हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे सांगितले.

बॅबेजने राजकारणात जाण्याचाही प्रयत्न केला, पण त्याला यात मोठे अपयश मिळाले. दुसरीकडे सरकार ‘डिफरन्स मशीन’ची संयमाने आणि आतुरतेने वाट पाहत होते. मशीन तयार न झाल्याने बॅबेजच्या संशोधनासाठी होत असलेल्या एकूण खर्चापैकी कमी खर्च करण्याचं सरकारने ठरवलं. सरकारने खर्च अगदी निम्म्यावर आणला. बॅबेजच्या संशोधनावर झालेल्या खर्चाने इंग्लंडने दोन युध्दनौका तयार केल्या असत्या.

बॅबेजने त्याच्या डिझाईनमध्ये सुधारणा केली आणि ‘अ‍ॅनालिटिकल इंजिन’ तयार केले. यामुळे या उपकरणावर होणारा खर्च आणि त्याची अंतिम मुदत वाढली. अखेर १८४२ साली सरकारने संपूर्ण डिफरन्स इंजिन प्रोजेक्ट बंद केला आणि त्या ऐवजी बॅबेजला ‘नाईटहूड’ प्रदान करण्याचा निर्णय घेतला, पण त्याने हा सन्मान स्वीकारला नाही.

डिफरन्स इंजिन प्रकल्प बंद पडल्यानंतर बॅबेजने प्रसिद्ध महिला गणितज्ज्ञ ‘अ‍ॅडा लेव्हलेस‘ बरोबर जुगाराचा नवा व्यवसाय सुरु केला. पण जुगाराच्या व्यवसायामुळे त्या दोघांना बराच मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. बॅबेजने त्याचं काही प्रमाणात तयार झालेलं ‘डिफरन्स इंजिन’ १८६२च्या लंडन प्रदर्शनामध्ये ठेवण्याचा आग्रह धरला. पण डिफरन्स इंजिनला प्रदर्शनाच्या एका कोपऱ्यात जागा मिळाल्याने बॅबेजच्या तळपायातील आग मस्तकात गेली.

आयुष्याच्या संध्याकाळी बॅबेज एकटा पडला होता आणि वयाच्या ८०व्या वर्षी १८७१ साली त्याचे निधन झाले. ‘डिफरन्स इंजिन’च्या प्रोजेक्टला देशाच्या उन्नतीसाठी सरकारने पाठिंबा द्यायला हवा होता असा त्याचा आग्रह होता. पण अत्यंत नित्कृष्ट नियोजन आणि नको तिथे मन विचलित झाल्याने त्याने ही सुवर्णसंधी गमावली.

‘विल्हेल्म शिकार्ड’ या जर्मन गणितज्ञाने डिफरन्स इंजिनचे वर्किंग मॉडेल तयार केले असले तरी “आधुनिक संगणकाचे जनक” म्हणून चार्ल्स बॅबेज यांना श्रेय दिले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘आंद्रे नेल’ला सिक्स मारून श्रीसंतने मैदानात नाचून केलेलं सेलिब्रेशन आजही आपलं फेव्हरेट आहे

Next Post

IIT मुंबईच्या मुलांनी इलॉन मस्क फाउंडेशनचं २५०००० डॉलर्सचं अनुदान जिंकलंय

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

IIT मुंबईच्या मुलांनी इलॉन मस्क फाउंडेशनचं २५०००० डॉलर्सचं अनुदान जिंकलंय

व्हायरल फोटोत जोकोविचच्या घरात दिसणाऱ्या कृष्णाच्या पेंटिंगचं सत्य काय आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.