The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या स्त्रीने तिच्या मुलीचं अपहरण करून ह*त्या करणाऱ्या दहा गुंडांना शोधून त्यांना संपवलं होतं

by Heramb
16 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सन २०१४. मेक्सिकोमधील सॅन फर्नांडो अजूनही २०११ च्या ह*त्याकांडातून सावरत होता. काही वर्षांपूर्वी गल्फ कार्टेलची सशस्त्र शाखा असलेल्या लॉस झेटासने जवळपास दोनशे लोकांची ह*त्या केली होती. परिसरातील सामुहिक कबरींमध्ये सापडलेल्यांपैकी बहुसंख्य लोक हे बसमधून अपहरण होऊन बळी पडलेले होते. त्यांच्यापैकी बहुतेक लोक विविध ड्रग कारटेल्सच्या आपापसातील यु*द्धांना निधी पुरवण्याच्या दृष्टीने, खंडणीसाठी पकडले गेले होते. या सगळ्या हिं*साचारामुळे अनेकांनी या भागातून पलायन केलं.

याच वेळी तामौलीपासच्या बाहेर पडलेल्या कुरणातील घाण उचलताना, मिरियम रॉड्रिग्जला तिच्या मुलीचा स्कार्फ सापडला. हा एक अतिशय दुःखद शोध होता. पुढे या भागांत सामुहिक कबरींमध्ये पुरलेल्या लोकांपैकी एक मुलगी मिरियम रॉड्रिग्जची होती. पण, मिरियम या गोष्टीने विचलित झाली नाही.

तिच्या मुलीचे अपहरण करून ह*त्या करणाऱ्या लोकांना शोधून काढून संपवण्याचा किंवा तुरुंगात टाकण्याचा निश्चय तिने केला होता. २००८ च्या चित्रपटातील ‘लियाम नीसन’च्या पात्राप्रमाणेच, मेक्सिकोमधील मिरियम रॉड्रिग्जने तिच्या मुलीचे अपहरण करून खू*न करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी बंदुका, बनावट आयडी आणि अगदी बनावट वेषही वापरला. नेमकं काय होतं हे मेक्सिकोला हदरवून टाकणारं प्रकरण, जाणून घेऊया आजच्या या लेखातून..

कॅरेनचा भाऊ, लुईसने, सॅन फर्नांडोमधून आधीच पलायन केले होते. परंतु कॅरेन फक्त वीस वर्षांची होती. तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते. तिच्या आईला रोडीओ बूट्स या काउबॉय स्टोअरमध्ये मदत करायची होती. कॅरेन बाहेर गेलेली असताना दोन कार्सनी तिच्या ट्रकला घेरले, तेव्हा कॅरेन स्वतः ड्रायव्हिंग करीत होती.



दोन बंदूकधारी लोकांनी तिला ट्रकबाहेर खेचले. त्यांनी तिला रॉड्रिग्जच्याच घरी नेले आणि त्याठिकाणी बांधून ठेवले. ते खंडणी वसूल करण्यासाठी आपली तयारी सुरु करणार, इतक्यात रॉड्रिग्ज कुटुंबाचा एक मित्र अचानक कामानिमित्ताने घरी आला. पुरेशी तयारी नसल्याने ते दोघेही किडनॅपर्स कॅरेनला घेऊन घराबाहेर पडले.

बघता बघता ही बातमी मिरियम आणि तिच्या कुटुंबाला मिळाली. मिरियम आणि तिच्या पतीने बँकेतून खंडणीचे कर्ज घेतले. बँक विशेषत: खंडणीसाठी कर्ज देत असे इतकी अपहरणं या भागात होत होती. टोळीच्या मागण्यांनुसारच मिरियम आणि कुटुंबीयांनी काम केले. टोळीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी खंडणीची रक्कम हेल्थ क्लिनिकजवळ टाकली आणि पुढील निर्देशांची वाट पाहण्यासाठी जवळच्या स्मशानभूमीत गेले. पण त्यांच्याशी कधीही संपर्क झाला नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

मिरियमने ‘लॉस झेटास’च्या सदस्यांना भेटायची विनंती आणि त्यांनी एल ज्युनियर या स्थानिक रेस्टॉरंटमध्ये भेटण्याचा होकार दिला. भेटीदरम्यान तिने तिच्या मुलीला मुक्त करण्यास त्या माणसाला विनवणी केली, पण कॅरेन त्यांच्याकडे नाही असे त्याने मिरियमला ​​सांगितले. फी देणार असाल तर मिरियमला शोधण्यात मदत करू शकतो असेही त्याने सांगितले. त्याच्या पट्ट्याशी जोडलेल्या स्वस्त प्लास्टिक रेडिओवरून सतत आवाज येत असल्याने, मिरियमला त्या माणसाचे नाव सॅम असल्याचे समजले. सॅमबरोबर आणखी एक चेहरा झाकलेला माणूस होता.

टोळीला २ हजार डॉलर्स खंडणी दिल्यांनतर मिरियमचे फोन कोणीही उचलले नाहीत. मात्र, शेवटी अपहरणकर्त्यांनी तिला फोन करून आणखी ५०० डॉलर्सची मागणी केली. रॉड्रिग्ज कुटुंब कॅरेन त्यांच्याकडे परत येण्याची वाट पाहत होते, त्यांनी आशा मात्र सोडली नाही. काही दिवसांनी मिरियम आपल्या पतीपासून वेगळं राहायला लागली. ती तिची मोठी मुलगी अझालियासोबत राहत होती. कालांतराने ‘कॅरेन परत घरी येणार नाही’ अशी दुःखद बातमी तिने सर्वांना सांगितली. परंतु, जोपर्यंत कॅरेनचं अपहरण करणारे लोक सापडत नाहीत तोपर्यंत ती थांबणार नाही असंही तिने आपल्या मोठ्या मुलीला सांगितलं.

तिने सॅमपासून सुरुवात केली. आपल्या मुलीबद्दल अधिक माहितीसाठी तिने सॅमची कसून चौकशी केली. यावरून अपहरणाच्या प्रकरणामध्ये तो सामील होता हे सिद्ध झालं. त्यानंतर तिने सोशल मीडियाची मदत घेतली. रेस्टॉरंटमध्ये सॅमबरोबर बसलेल्या माणसाचा चेहरा शोधण्याचा तिने प्रयत्न केला. फेसबुकवर तिने सॅमला शोधून काढले. त्याच्या एका फोटोमध्ये तो आईस्क्रीमच्या दुकानाचा गणवेश घातलेल्या महिलेच्या शेजारी उभा होता. हे स्टोअर दोन तासांच्या अंतरावर असलेल्या व्हिक्टोरियाच्या सियुडाड येथे होते.

मिरियमने आईस्क्रीम स्टोअरच्या बाहेर अनेक दिवस वाट पाहिली. सॅम त्याच्या जोडीदाराला भेटेल याचीच ती वाट पाहत होती. तो शेवटी दिसला, तेव्हा मिरियम त्यांच्या मागे त्यांच्या घरी गेली. तिने आपले रूप पालटले आणि अनेक वर्षांपूर्वी आरोग्य मंत्रालयात काम केले होते, तो गणवेश परिधान केला. दुसऱ्या दिवशी तिने सॅमच्या शेजाऱ्यांचे दरवाजे ठोठावले आणि त्यांना स्थानिक सर्वेक्षणात माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

खरं तर तिला सॅमला मारायचे नव्हते. तिला न्याय हवा होता. त्या माणसाबद्दल शक्य तितकी माहिती शोधणे, ती माहिती पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे तिचे ध्येय होते. मिळवलेली माहिती पोलिसांना देण्यासाठी तिने स्थानिक अधिकाऱ्यांना भेटायला सुरुवात केली. मेक्सिकोमध्ये ७० हजारहून अधिक लोक बेपत्ता होते आणि देशातील ह*त्यांच्या प्रकरणांचे प्रमाण दुप्पट झाले होते. पण कोणीही याची पर्वा केली नाही. सॅमचे अटक वॉरंट काढण्यात आले, पण तो अटक व्हायच्या आधीच गायब झाला.

त्यांनतर मिरियमच्या मुलाला, लुईसला सॅम सापडला. लुईस सियुडाड व्हिक्टोरियामध्‍ये स्‍टोअर बंद करत असताना त्‍याने अनेक फोटोग्राफ्स प्रसिद्ध झालेल्या माणसाला पहिले. अखेरीस मेक्सिकन स्वातंत्र्यदिनी सॅमला अटक करण्यात आली आणि सॅमने कॅरेनच्या अपहरणात सामील असलेल्या इतरांची नावे पोलिसांना सांगण्यास त्वरीत सुरुवात केली.

मिरियमला ​​तिच्या मुलीचे अपहरण करून मारणाऱ्या टोळी सदस्यांचा माग काढण्यासाठी तीन वर्षे लागली. तिला एकूण १० लोक सापडले. तिने आपला संपूर्ण अवतार बदलला होता. केस कापून रंगवले होते, बनावट ओळखपत्र खरेदी केले, तिचे कपडे परिधान करण्याची शैली बदलली. आरोग्य कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी म्हणून टोळीच्या कुटुंबातील सदस्यांच्या जवळ जाण्यास तिला मदत झाली.

तिच्या या अभूतपूर्व ‘इन्वेस्टीगेशन’मुळे मेक्सिकोमध्ये ती प्रसिद्ध झाली आणि तिची खरी ओळख उघडकीस आली. कुख्यात टोळीशी लढणारी ती पन्नाशीतली स्त्री होती. ज्या पालकांच्या मुलांचं असं अपहरण झालं होतं अशा इतर पालकांना मदत करण्यासाठीही ती प्रयत्न करत होती. रॉड्रिग्जने ६०० कुटुंबांचा ‘कोलेटिव्हो डी देसापेरेसिडोस’ (द व्हॅनिश्ड कलेक्टिव्ह) हा ‘नॉन-गव्हर्नमेंट’ गट स्थापन केला.

यातील सदस्यांनी आपल्या नातेवाईकांचा आणि मुलांचा शोध घेण्यासाठी एकत्र काम केले. मेक्सिकन सरकारने संघटित गुन्हेगारीविरुद्ध (ऑर्गनाईझ्ड क्राईम) सर्वत्र ‘यु*द्ध’ घोषित केल्यापासून एका दशकात सुमारे २ लाख लोकांची ह*त्या करण्यात आली आणि ३० हजारहून अधिक लोक बेपत्ता झाले.

देशभरातील गुप्त सामूहिक कबरी शोधण्यात ‘कोलेटिव्हो डी देसापेरेसिडोस’ या नॉन-गव्हर्नमेंट गटातील पीडितांच्या नातेवाईकांनी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कबरींमध्ये शेकडो मृतदेह आहेत. परंतु अशा कामामुळे अनेकदा त्यांना संघटित गुन्हेगारी गटांचा सामना करावा लागला.

पण तिने केलेल्या या कामांमुळे ती आता सुरक्षित नव्हती. आपल्याला धोका आहे याची मिरियम रॉड्रिग्जला याची पूर्ण कल्पना होती. तिने शेवटी मेक्सिकन सरकारला तिच्या संरक्षणासाठी सशस्त्र रक्षकांची मागणी केली. पण जे व्हायचं ते झालंच.

मे २०१७ मध्ये, ‘मदर्स डे’च्या दिवशी मिरियमची तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून ह*त्या करण्यात आली. काही आठवड्यांपूर्वीच तिने टोळीतील आणखी एका सदस्याला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आयुष्याच्या संध्याकाळी ती तिच्या मुलीच्या सर्व मारेकऱ्यांना शोधण्याच्या एक पाऊल जवळ आली होती.

मिरियमचा मुलगा लुईस याने ‘कोलेटिव्हो डी देसापेरेसिडोस’ या नॉन-गव्हर्नमेंट गटाचे नेतृत्व केले. परंतु या गटातील सदस्य आता भयभीत झाल्यामुळे सदस्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. मिरियमच्या ह*त्येने टोळ्यांनी त्यांना एक मजबूत संदेश दिला होता.

मिरियमच्या मृत्यूनंतर एका महिन्याने, पोलिसांनी सॅन फर्नांडोपासून ५०० मैल दूर असलेल्या वेराक्रूझमध्ये एका महिलेला अटक केली. याबद्दलची टीप मिरियमकडूनच आली होती. ती महिला तिच्या मुलीच्या ह*त्येमध्ये संशयित असल्याचा तिचा विश्वास होता. अटकेत असलेली महिला आपल्या मुलासह सॅन फर्नांडोहून वेराक्रूझला पळून गेली होती आणि तेथे टॅक्सी चालवत होती. हिनेच कॅरेनला बराच त्रास दिला होता आणि मारहाण केली होती.

२०१७ पासून, मेक्सिकोमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वेगाने वाढले आहे. ७ जून २०२० रोजी २४ तासांत तब्बल ११७ ह*त्या झाल्या. तामौलीपासवर गल्फ कार्टेलचे फार पूर्वीपासून वर्चस्व राहिले आहे. पण २०१० साली गल्फ कार्टेलची ‘लॉस झेटास’ ही सशस्त्र शाखा सुरु झाल्यानंतर त्याठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजही तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘स्टार वॉर्स’च्या फॅन्सनी एकत्र येऊन सुरु केलेला मर्चन्डाईझ ब्रँड म्हणजे ‘द सोल्ड स्टोअर’

Next Post

अमेरिकेवर ह*ल्ला करण्यासाठी जपानने आत्मघा*तकी कामिकाझे तयार केले होते

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

अमेरिकेवर ह*ल्ला करण्यासाठी जपानने आत्मघा*तकी कामिकाझे तयार केले होते

एक्स्प्लेनर - भारत आणि रशियामधील एस-४०० मिसाईल्स एअर डिफेन्स सिस्टीम डील

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.