The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रिटनने हि*टल*रला ‘बाई’ बनवण्याचा सिक्रेट प्लॅन बनवला होता, जो फ्लॉप झाला

by Heramb
10 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इतिहासामध्ये कपटबलाने शत्रूला संपवण्यासाठी अनेक युक्त्यांचा अवलंब केला गेला. सीआयएने फिडेल कॅस्ट्रोला मारण्यासाठी केलेले प्रयत्न तर इतिहासात प्रसिद्ध असून क्युबामध्ये त्याचं स्वतंत्र संग्रहालय आहे. असे अनेक प्रयत्न हास्यास्पद आणि विचित्र होते. अशाच हास्यास्पद आणि विचित्र प्रयत्नांमध्ये हिट*ल*रला मारण्याचा किंवा त्याला शरण येण्यास प्रवृत्त करण्याचा कटसुद्धा सामील आहे. ब्रिटिश ‘ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस’ ओएसएस संघटनेने हिट*ल*रच्या अन्नामध्ये स्त्रीच्या शरीरात असणारे ‘एस्ट्रोजन’ हार्मोन मिसळून त्याची आक्र*मकता शांत करण्याचा प्रयत्न केला होता.

हिट*ल*रच्या लैंगिकतेबद्दल इतिहासात अनेक ठिकाणी चर्चांना उधाण आले होते. त्याच्या राजकीय शत्रूंनी त्याच्याबद्दल अनेक अफवा उठवल्या होत्या. हिट*ल*रला केवळ एकच टेस्टिकल असणे, तो समलैंगिक असणे आणि त्याच्यात ‘स्त्रीसंवेदनशीलता’ असणे अशा प्रकारचे अनेक सिद्धांत किंवा अफवा प्रसिद्ध आहेत. याच अफवांचा आणि सिद्धांतांचा आधार घेत ब्रिटिश ओएसएस संघटनेने हि*टल*रच्या भाजीपाल्यामध्ये फिमेल हार्मोन इंजेक्ट करण्याचे ठरवले.

असे मानवनिर्मित आणि काही प्रमाणात मानवी शरीरासाठी घातक असलेले हार्मोन्सची केस गळण्यास मदत होईल आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे एका मुलीसारख्या आवाजामुळे स्वतःच्या लोकांमध्येच त्याचा प्रचंड उपहास होऊ शकला असता. ब्रिटिशांची ही विचित्र योजना हि*टल*रला बदनाम करण्यासाठी आखण्यात आली होती शिवाय इस्ट्रोजेन हार्मोनच्या मदतीने त्याची आ*क्र*मकता कमी करण्याचा प्रयत्नही या योजनेत झाला होता. त्यावेळी हार्मोन्सवरील संशोधनामध्ये इतकी प्रगती झाली नव्हती तरी, इस्ट्रोजेन हि*टल*रच्या आक्र*मक प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत करू शकेल आणि त्याला त्याची बहीण पॉलासारखेच सौम्य स्वभावाचे बनवू शकेल असा योजनेत सहभागी असलेल्या ब्रिटिशांचा विचार होता.

हि*टल*रला चित्रकलेची आवड होती आणि तो स्वतःला एक उत्तम चित्रकार समजत असे. हार्वर्डमधील व्यक्तिमत्त्व तज्ज्ञ डॉ. हेन्री ए. मरे यांच्या मते त्याच्या आयुष्यात एक मोठा ‘स्त्रीलिंगी’ घटक होता. प्रत्यक्षात माहिती नाही, पण कागदावरील माहितीनुसार ब्रिटिशांची ही योजना यशस्वी होणार होती.

हि*टल*रच्या जेवणात ते औषध मिसळणे नक्कीच सोपे काम नव्हते. हि*ट*लर शाकाहारी होता आणि तो खात असलेल्या भाज्या या फक्त त्याच्या वुल्फ्स लायरमधील स्थानिक शेतातून येत असत. इतकंच नाही तर त्याच्या स्वयंपाकघरातील कर्मचारी आणि आहारतज्ञ यांची कसून तपासणी करण्यात येत असे. त्याच्याकडे १५ जण फक्त अन्न चाखण्यासाठी ठेवले गेले होते. हे १५ जण अन्न विषमुक्त आहे की नाही याची खात्री करून देत असत.



यु*द्धानंतर या १५ अन्न चाखणाऱ्या लोकांपैकी एकमेव माणूस जिवंत होता, त्याचे नाव मार्गोट वोल्क. त्याने एका मुलाखतीत सांगितले, “जेवण चांगले होते, पण आम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नव्हतो!”

इस्ट्रोजेन तुलनेने बेचव असते आणि शरीरावर त्याचा प्रभाव हळूहळू व्हायला सुरुवात होते. योजनेप्रमाणे, हि*टल*रच्या एका माळीला त्याच्या भाजीपाल्यांमध्ये इस्ट्रोजन इंजेक्ट करण्यासाठी लाच द्यायची होती. तसेच या एका ह*त्येमुळे संपूर्ण युरोप अस्थिर होईल असाही काहींचा विश्वास होता.

परंतु, ही योजना प्रथमतः पूर्ण झालीच नाही. ब्रिटिश एजन्सी ओएसएसने आखलेल्या अनेक निरुपयोगी योजनांपैकी ही एक योजना होती. हि*टल*रच्या माळीने त्याचे काम पूर्ण केले की नाही हेसुद्धा आजवर कोणाला समजले नाही. कदाचित त्याने ब्रिटिशांकडून पैसे घेऊन त्यांनाच डबल क्रॉस केले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हि*टल*रला स्त्री बनवण्याचा ‘दृष्टीकोन’ हे दुसरे महा*युद्ध जलद गतीने संपवण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी एक आहे. पण हा प्रयत्न सर्वांत विचित्र आणि हास्यास्पद वाटतो.

संदर्भ

Out: UK’s hormone plan to turn Hi*tl*er into woman – Times of India (indiatimes.com)


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जेव्हा राणी एलिझाबेथच्या ड्राइव्हिंगने सौदी अरेबियाच्या राजकुमाराला घाम फुटला होता

Next Post

या क्रिकेटरने दिवसा देशासाठी क्रिकेट खेळून रात्री कुटुंबासाठी विमा विकलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या क्रिकेटरने दिवसा देशासाठी क्रिकेट खेळून रात्री कुटुंबासाठी विमा विकलाय

आमच्या पिढीला इंग्रजी गाण्यांचं वेड लावलं ते एनरिक इग्लेसियसने

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.