The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या महायु*द्धात बेपत्ता झालेल्या जपानच्या लाखो सैनिकांचा अजूनही शोध लागलेला नाही

by Heramb
29 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एका समर्थ राष्ट्राचा पाया प्रबळ सैन्य, सुधारित आणि मुक्त अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती आणि नागरिकांचे जीवनमान अशा काही महत्वपूर्ण स्तंभांनी बनतो. यामध्ये सर्वांत महत्वाचे काही असेल तर ती ‘राष्ट्रीय सुरक्षा’ आणि त्यासाठी आवश्यक सैन्यशक्ती. कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती, पत्रकारिता, इत्यादी स्वातंत्र्यांपेक्षा राष्ट्रीय सुरक्षा आणि सैन्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते.

कोणताही देश स्वतःच्या सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यात काहीही कमतरता ठेवत नाही. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मानार्थ देशांत अनेक योजना आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. पण चीन आणि पूर्वीच्या जपानसारखे देश मात्र याला अपवाद आहेत..

दोन्ही वैश्विक महायु*द्धांत झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल आपण जाणतोच. परंतु दुसरे महायु*द्ध अनेक बाबतींत विध्वं*सक होते. विशेष म्हणजे सात दशकांपूर्वी संपलेल्या या यु*द्धात बेपत्ता झालेल्या दहा लाख जपानी सैनिकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. परंतु त्यांच्या मृतदेहांचे अवशेष रशिया, चीन आणि मंगोलियापासून प्रशांत महासागर आणि आशियातील अनेक बेटांवर विखुरलेले आहेत. या लोकांच्या मृतदेहांचे सगळे अवशेष बहुधा कधीही सापडणार नाहीत आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्कारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारही नाहीत, इतके हे दुर्दैवी आहे.

जपानचे ‘आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालय’ अशा प्रकारच्या यु*द्धग्रस्त सैनिकी कुटुंबांना मदत करण्यासाठी जबाबदार आहे. मंत्रालयाच्या अधिकारांच्या मते, बेपत्ता झालेल्या सैनिकांपैकी केवळ निम्म्याच मृतदेहांचे अवशेष पुनर्प्राप्त केले जाऊ शकतात. उर्वरित सैनिकांचे मृतदेह समुद्राच्या तळाशी असावेत किंवा अज्ञात ठिकाणी दफन केलेले असावेत किंवा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक भागात दफन केलेले असावेत.



या सैनिकांचे काय झाले किंवा त्यांचे मृतदेह नेमके कुठे गेले हे शोधण्यासाठी अमेरिकेचे ‘संरक्षण विभाग’ जपानसोबत काम करत आहे. या मृतांचे नातेवाईक वृद्ध होतात, ते सुद्धा मरण पावतात, तेव्हा मात्र परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते. त्याचप्रमाणे यु*द्धाच्या काळात अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात मौल्यवान माहिती नष्ट झाली. त्या माहितीमध्ये यु*द्धात सहभागी असलेल्या सैनिकांचीसुद्धा माहिती होती. शिवाय आणखी एक समस्या म्हणजे पुनर्प्राप्त झालेल्या मृतदेहांच्या अवशेषांची साठवण-क्षमता. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिकव्हर केलेले मृतदेह, अथवा त्यांच्या अवशेषांचे जतन करण्यासाठी मोठ्या जागेची आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता भासते.

२०१६ साली मृतदेहांचे अवशेष पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न जपानी संसदेने सुरू केला होता. त्याप्रमाणे लागू झालेल्या कायद्यांनुसार, दक्षिण पॅसिफिकमधील यूएस लष्करी तळांच्या आसपास असलेल्या जपानी सैनिकांच्या मृतदेहांचे अवशेष पुनर्प्राप्त करण्यासाठी आठ वर्षांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तसेच डीएनए मॅचिंग करण्यासाठी यूएसचा संरक्षण विभाग जपानसोबत काम करत आहे.

२००३ सालापर्यंत, सापडलेल्या अवशेषांच्या निश्चितीसाठी जपानमध्ये सातत्यपूर्ण आणि नियमित डीएनए चाचणी केली जात नव्हती. त्यानंतर, अशी चाचणी केवळ कुटुंबांच्या विनंतीनुसार केली जात असत. २०१६ साली जे अवशेष सापडले त्यांच्या निश्चितीसाठी जपानने डीएनए चाचणी केंद्र उभारले आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

खरंतर जपानी अधिकाऱ्यांच्या मते मृतदेहांचे अवशेष परत मिळवणे महत्त्वाचे नाही. पहिल्यापासूनच जपानी सरकार मृत सैनिकांचे अवशेष पुनर्प्राप्त करण्याच्या बाबतीत उदासीन होते. १९४३ साली, यु*द्धात मृत्युमुखी पडलेल्या जपानी सैनिकांच्या कुटुंबांना केवळ दगडं असलेली शवपेटी मिळाली आणि सैनिकाने आपला जीव कोठे, कसा गमावला याबद्दल सरकारकडून त्यांना कोणतीही माहिती दिली गेली नाही.

१९५२ साली, जपानने मृतदेहांच्या अवशेषांच्या पुनर्प्राप्तीची मोहिम राबविण्यास सुरुवात केली. परंतु जपानच्या हिं*साचारामुळे अनेक आशियाई देशांमध्ये हे जपानी प्रयत्न अयशस्वी झाले. गोळा केलेले बहुतेक अवशेष कोणालाही ओळखता आले नाहीत आणि यामुळेच ते नातेवाईकांना परत केले गेले नाहीत.

यानंतर एका दशकामध्ये, अर्थात १९६२  पर्यंत, जपानने सुमारे १० हजार मृतदेह पुनर्प्राप्त केले होते. त्या वेळी, त्यांनी हा प्रकल्प थांबविण्याचा प्रयत्न केला, पण संपूर्ण देशातील सैनिकांची कुटुंबे आणि युद्धातील दिग्गजांच्या अनेक विनंत्यांनंतर त्यांनी हा प्रकल्प पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.

आजपर्यंत, मृतदेहांच्या अवशेषांचे सुमारे ३ लाख ४० हजार भाग सापडले आहेत. या पैकी अनेक अवशेष टोकियोमधील ‘चिदोरिगाफुची राष्ट्रीय अज्ञात सैनिक स्मशानभूमी’त दफन केले गेले. या अवशेषांची कधीच डीएनए चाचणी झाली नाही. विशेष म्हणजे, जपानी सैनिकांच्या या अवशेषांमध्ये कोरियन आणि तैवानी नागरिकांचेसुद्धा अवशेष आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्या मिस्ट्री स्पिनने भल्याभल्या बॅटर्सना बेजार करणारा ‘सुनील नरेन’ अजूनही दोन रूमच्या घरात राहतोय

Next Post

जॉन डॅनियल – या गोरिलाच्या पिलाला माणसाच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जॉन डॅनियल - या गोरिलाच्या पिलाला माणसाच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं

जोकोविकच्याही आधी दोन कार्यकर्त्यांनी विमानाच्या पंखांवर टेनिस मॅच खेळली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.