The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जोकोविकच्याही आधी दोन कार्यकर्त्यांनी विमानाच्या पंखांवर टेनिस मॅच खेळली होती

by Heramb
12 November 2024
in मनोरंजन, क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजपर्यंत तुम्ही कार, ट्रेन किंवा बाईकवर जीवघेण्या कसरती करणारे अनेक लोक पहिले असतील. ३६ हजार फुटीच्या उंचीवरून जाणाऱ्या विमानात किंवा विमानावर मात्र कोणीही स्टंट्स करायला धजावणार नाही. फार तर तुम्हाला पॅरा एसएफचे सैनिक जमिनीपासून ३० किलोमीटर अंतरावर उडणाऱ्या विमानातून उड्या मारताना दिसतील. पण त्याहून अधिक कोणत्या गोष्टीची अपेक्षा आपण ठेऊ शकतो?

एकेकाळी दोन टेनिसप्रेमींनी चक्क हवेत उडणाऱ्या विमानावर टेनिसची मॅच खेळल्याचं तुम्ही ऐकलंय का? कदाचित यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. पण कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाचा भाग नसून वास्तव असल्याचं अनेक स्रोतांमधून समोर आलं आहे. याबद्दलच आजचा हा विशेष लेख..

क्रिकेट आणि फुटबॉलप्रमाणेच टेनिस हा एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे आणि नेहमीच राहील. एकेकाळी, १९२५ साली, टेनिस हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ मानला जात असे. अलीकडेच नोव्हाक जोकोव्हिक नावाच्या सर्बियन टेनिसपटूने एका रशियन प्रॉप विमानाच्या पंखांवर टेनिस खेळल्याच्या बातम्या आल्याने तो चांगलाच चर्चेत होता.

पण जोकोव्हिकच्या आधीही दोन टेनिसपटूंनी विमानाच्या पंखांवर टेनिस खेळायचा स्टंट केला आहे. ग्लॅडिस रॉय आणि इव्हान उंगर या दोन स्टंटवुमन्सनी १ हजार मीटर उंचीवर असलेल्या बायप्लेनच्या पंखांवर टेनिस सामना खेळल्यामुळे हा खेळ जगभर प्रसिद्ध झाला.

एका शतकभरापूर्वी ग्लॅडिस रॉय जितकी प्रसिद्ध होती तितकी ती आज प्रसिद्ध नाही. विमान प्रचण्ड उंचीवर असूनही उडी मारण्याची भीती न बाळगता तिने दाखवलेल्या धैर्याने संपूर्ण जगाला चकित करून टाकले. तिने विमान उद्योगालाही एक प्रकारे मदतच केली, माणूस उड्डाण करण्यासाठी तांत्रिक प्रगतीच्या माध्यमांसह तयार आहे हे लोकांसमोर सिद्ध करून.



तेराव्या वेळी पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारताना ती जमिनीपासून सुमारे १०० फूट अंतरावर असताना एअर पॉकेटवर आदळली आणि तिचे क्रॅश-लँडींग झाले. यावेळी ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यावेळी सर्वांत कमी उंचीवरून पॅराशूट वापरून उडी मारण्याचा जागतिक विक्रम मोडणारी रॉय ही पहिली महिला होती. १९२५ साली तिने पुन्हा उडी मारण्याची इच्छा दर्शवली.

इवान उंगर रॉयइतकी प्रसिद्ध नव्हती. पण १९२५ साली त्या दोघींनी सादर केलेल्या स्टंटमुळे तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. या दोन्ही स्टंट करणाऱ्या महिलांनी एका बायप्लेनच्या पंखांवर टेनिस खेळण्याचे फक्त नाट्य केले आहे असे मानले जाते. कारण भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार प्रत्यक्षात कोणीही १०० किलोमीटर प्रति तास या वेगाने चालणाऱ्या बायप्लेनवर टेनिस खेळू शकत नाहीत.

या दोघींनी असा अशक्यप्राय स्टंट करणे हे त्या दोघींनी करण्याची पहिलीच वेळ नव्हती. विमानांच्या पंखांवर चालणे किंवा काही कर्तब करणे यालाच विंग वॉकिंग असेही म्हटले जाते. या प्रकाराला सुरुवातीच्या काळात परवानगी देण्यात आली होती. कारण तत्कालीन विमाने दुसऱ्या महायु*द्धाच्या काळातील विमानांपेक्षा कमी वेगवान होती. पण, टेनिसमुळे हा प्रकार खूप लोकप्रिय झाला, ती अशी गोष्ट होती जी रातोरात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि त्यामुळे या दोन महिला अत्यंत प्रसिद्ध झाल्या.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

रॉय आणि इव्हान दोघी प्रत्यक्षात वैमानिक होते, त्यामुळे बायप्लेनचे उड्डाण आणि एकूण तंत्र कसे होते याची माहिती असणे त्यांना असे कठीण स्टंट्स पूर्ण करण्यात फायदेशीर ठरणार होते. या दोघींना मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे ती प्रतिमा जगभर पोस्टर्स म्हणून, कॅलेंडर्समध्ये आणि मुख्यतः पोस्टकार्ड म्हणून वापरली गेली. 

स्टंटने मिळवलेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे, रॉय आणि इव्हान यांना जगभरातून पाचारण केले गेले. १९२७ साली, रॉयला एक प्रदर्शन करण्यासाठी रोमला बोलावण्यात आले होते, लेफ्टनंट डेल्मार स्नायडरसह तिची न्यूयॉर्क ते रोम पर्यंत फ्लाइटची योजना होती. उड्डाणाच्या आधी, रॉयने ओहायो सौंदर्य स्पर्धकाला आवश्यक असलेल्या फोटोसाठी पोझही दिली होती.

फोटो काढल्यानंतर रॉयने बायप्लेनचे इंजिन सुरू केले, पण ती विमानातून खाली उतरली. १५ ऑगस्ट १९२७ रोजी रॉयचा ओहायोमध्ये मृत्यू झाला. या दोन स्त्रियांनी स्त्रियांचे धैर्य तसेच त्यांचे कौशल्य सिद्ध करून समाजावर खूप मोठा प्रभाव पाडला. समाजातील स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जॉन डॅनियल – या गोरिलाच्या पिलाला माणसाच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं

Next Post

प्रसिद्ध ‘३००’ चित्रपटाची कथा या खऱ्या लढाईवरून घेण्यात आली आहे

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
Next Post

प्रसिद्ध '३००' चित्रपटाची कथा या खऱ्या लढाईवरून घेण्यात आली आहे

आदिवासींचा अभ्यास करायला गेलेला रॉकफेलर घराण्याचा वारस न*रभ*क्षक टोळीचं भक्ष्य बनला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सिग्नलवर भीक मागणाऱ्यांचे पुढे काय होते? वाचा या पडद्यामागच्या यंत्रणेबद्दल!

24 April 2026

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.