The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाहिरात करून सावज शोधणारा हा एकमेव न*रभ*क्षक होता

by Heramb
28 October 2023
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


इंटरनेट, अ*णु-ऊर्जा किंवा आधुनिक तंत्रज्ञानातील आणखी कोणत्याही शोधाचा मानव ते ‘कसं वापरतो’ यावरून चांगले-वाईटपण ठरले आहे. या शोधांपैकी, इंटरनेट किंवा संवादाच्या वाढत्या साधनांनी मानवतेच्या विकासासाठी उत्तम वाटा उचलला, पण त्याच बरोबर गेली अनेक वर्षे याच इंटरनेटचा वापर अनेक गुन्हेगारांनी आपली उद्दिष्टे सध्या करण्यासाठी केला आहे असे दिसून येते. जगभरातील अशाच गंभीर गुन्हेगारी घटनांपैकी ‘जर्मन न*रभ*क्ष*क प्रकरण’ हे इंटरनेटच्या मदतीने घडलेल्या सर्वात वाईट घटनांपैकी एक आहे.

तो एक साधा कम्प्युटर टेक्निशियन होता, पण आर्मिन मेईवेसकचे एक भयानक रहस्य होते. तो वयाच्या बाराव्या वर्षापासून न*रभ*क्षणाबद्दल म्हणजेच ‘मानवी शरीर खाण्याबद्दल’ कल्पना करत होता आणि त्याला नेहमीच मानवी देहाच्या मांसाची भूक होती. मार्च २००१ मध्ये, स्वतःची ही आयुष्यभराची कल्पना पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याने एका ऑनलाईन समलिंगी नियतकालिकात जाहिरात टाकली, त्यात त्याने “एखाद्या तरुण, सुदृढ माणसाला स्वतःचा देह कोणी खावा अशी इच्छा आहे का?” हे विचारले. 

त्याच्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन स्वेच्छेने बळी पडलेल्याला त्याने ठा*र मारले आणि खाल्ले. ही कथा उघड झाल्यानंतर त्याला “रिअल-लाईफ कॅ*निबल इटर” म्हणजेच “वास्तविक जीवनातील न*रभ*क्षक” म्हणून ओळखले जाऊ लागले. मेईवेसच्या मते, त्याने कधीही कोणालाही क*त्तल करून खाण्यास भाग पाडले नाही. त्याऐवजी, ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांच्याशी तो दयाळूपणे बोलायचा आणि जर त्यांनी माघार घेण्याचे ठरवले, तर त्याने त्यांच्या इच्छेचा आदरही केला.

त्याच्या कथेचा शेवट खूपच भीषण आहे. त्याला एक इच्छुक, ‘बर्ड जर्गेन आर्मंडो ब्रॅंडेस’ सापडला आणि ते ९ मार्च २००१ च्या संध्याकाळी ते भेटले. न*र-भ*क्षणाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, त्या तथाकथित “विवेकी” खु*नीने ब्रॅंडेसला अर्ध्या बाटलीच्या स्नॅप्ससह २० झोपेच्या गोळ्या दिल्या. ब्रँड्सने नंतर मेईवेसला त्याचे लिंग वि*च्छेदन करण्याची परवानगी दिली.

हे त्या दोघांनी एकत्र खाण्याचा प्रयत्न केला, पण ते च्वींगमसारखे होते. त्यानंतर ब्रॅन्डेस बेशुद्ध झाल्याने मेईवेसने त्याच्यासाठी अंघोळीची व्यवस्था केली. मेईवेस दर पंधरा मिनिटांनी त्याची तपासणी करत होता. हे करत असताना त्याने स्टार ट्रेकचे पुस्तक वाचले. त्याच्या म्हणण्यानुसार, “मला त्याला खाण्याची इच्छा होती; पण मला त्याला मारण्याची इच्छा नव्हती. ”

बराच संकोच आणि प्रार्थना केल्यानंतर, मेईवेसने अखेरीस ब्रॅंडेसच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याचा मृतदेह मांसाच्या हुकवर टांगला आणि पुढील दहा महिन्यांत त्याचे सेवन करण्यासाठी तो फ्रीझ करण्याची प्रक्रिया सुरु केली. त्या रात्रीची घटना चार तासांच्या व्हिडिओ टेपवर रेकॉर्ड केली गेली. एका वर्षानंतर, अशा प्रकारच्या अधिक जाहिराती ऑनलाईन पोस्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याची पोलिसांत तक्रार केली.



सध्या मेईवेसचे वय ५८ वर्षे आहे. त्याला २००४ साली दोषी ठरवण्यात आले आणि आठ वर्षांच्या तुरुंगवासामध्ये पाठवण्यात आले. नंतर पुन्हा त्याची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. कारण त्याच्याकडे पुन्हा अपराध करण्याची क्षमता असल्याचा संशय मानसशास्त्रज्ञाला आला होता. त्याच्या शिक्षेच्या सुनावणीनंतर, त्याने त्याच्या कृत्यांबद्दल तीव्र खेद व्यक्त केला आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेऊ पाहणाऱ्या कोणालाही यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तो म्हणतो, “अशा लोकांनी उपचारासाठी जायला हवे, जेणेकरून अशी प्रकरणे वाढणार नाहीत..”

गंमत म्हणजे, त्याने केलेल्या कृत्यांबद्दल माफी मागितल्यानंतर तो तुरुंगात असताना शाकाहारी झाला!

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हा भारतीय दिग्दर्शक सुपर नॅचरल हॉलिवूड चित्रपटांचा बादशाह आहे..!

Next Post

म्हणून ताजिकिस्तानसह नऊ देशांमध्ये असलेले भारतीय लष्करी बेस सामरिकदृष्ट्या महत्वाचे आहेत

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

म्हणून ताजिकिस्तानसह नऊ देशांमध्ये असलेले भारतीय लष्करी बेस सामरिकदृष्ट्या महत्वाचे आहेत

सोमवार आवडत नाही म्हणून या "हुशार" मुलीने शाळेवरच अंधाधुंद गोळीबार केला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.