The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रंगना हेराथने श्रीलंकन क्रिकेट टीमला मुथैय्या मुरलीधरनची कमी भासू दिली नाही

by द पोस्टमन टीम
23 October 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“मी कसोटी मालिकेपूर्वी काहीही ठरवलं नव्हत. जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणं खेळ करू असा विचार केला होता. या मालिकेमध्ये जसा खेळ केला तसाच खेळ मी पुढील सामन्यांमध्ये करेल, अशी मला आशा आहे,” हे शब्द आहेत रंगना हेराथ या श्रीलंकन खेळाडूचे. तोच ३८ वर्षीय रंगना हेराथ ज्यानं ३ कसोटी सामन्यांमध्ये १२.७५ च्या सरासरीनं २८ विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया संघाला व्हाईट वॉश केलं.

रंगनाच्या कामगिरीमुळं श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला व्हाईटवॉश नोंदवला. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या निवृत्तीनंतर काहीशा डळमळीत झालेल्या लंकन संघाला भक्कम आधार देण्याचं काम रंगना हेराथ नावाच्या एका बँक क्लर्कनं केलं! तुम्हाला कदाचित वाटेल बँक क्लर्क हा उल्लेख चुकून झाला असेल. नाही, चूक वगैरे काही झालेली नाही. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेला रंगना हेराथ खरोखर बँक क्लर्क आहे.

५ फूट ६ इंचा पेक्षा कमी उंची, गोलाकार चेहरा आणि काहीशी स्थूल शरीरयष्टी असलेल्या हेराथला एक बँक क्लर्क म्हणून इमॅजिन करणं कदाचित अनेकांना शक्य होणार नाही. मात्र, हा दिग्गज गोलंदाज कोलंबोमधील संपत बँकेमध्ये मार्केटिंग क्लर्क आहे. त्याला सन्मान म्हणून वगैरे हे पद मिळालेलं नाही. तो प्रत्यक्षात बँकेत जातो. एखाद्या क्लर्कप्रमाणं पडलेली सर्व कामं करतो.

क्रिकेट दौऱ्यांसाठी जेव्हा सुट्ट्यांची आवश्यकता असते तेव्हा तो रितसर ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटकडं लाँग लीव्हसाठी अर्ज करतो. तरुण वयात जेव्हा तो क्रिकेटचा नियमित सराव करत असे तेव्हा तो अभ्यास देखील करायचा. क्रिकेट आणि अभ्यास सांभाळून त्यानं बँकेची परिक्षा दिली. क्रिकेटच्या तुलनेत त्याला अभ्यासात लवकर यश मिळाल्याने त्याला संपत बँकेमध्ये क्लर्कची नोकरी मिळाली.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, रंगना हेराथला नोकरी करण्याची काय गरज? ज्यावेळी रंगना हेराथ क्रिकेटमध्ये येण्यासाठी धडपड करत होता तेव्हा मुथय्या मुरलीधरन नावाचा अवलिया लंकन क्रिकेटमध्ये कारकिर्दीच्या शिखरावर होता. ज्याप्रमाणं त्याचा रनअप संथ होता अगदी त्याप्रमाणचं क्रिकेटमधील उदय देखील संथ गतीनं झाला होता. त्याच्याकडे पाहून कुणालाही तो क्रिकेटर आहे असं वाटत नसे. लंकन क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाज अगोदरच मैदानावर राज्य करत होते.



त्यामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला निश्चित स्थान मिळेल की नाही, याची कदाचित त्याला शाश्वती वाटत नव्हती. अशा स्थितीमध्ये आपल्याकडं काही तरी काम असावं म्हणून त्यानं अभ्यासात देखील लक्ष दिलं होतं. २०१० साली मुरलीधरनच्या निवृत्तीनंतर, हेराथ लंकेचा एकमेव आधार ठरला. त्यानं जगातील सर्वांत यशस्वी फिरकीपटू होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. भारताप्रमाणं श्रीलंका देखील क्रिकेटवेडा देश आहे. मात्र, त्याठिकाणी क्रिकेटपटूंना एकदम सामान्य आयुष्य जगता येतं.

त्यांना सार्वजनिक ठिकाणी आरामात फिरता येतं तेही सुरक्षा रक्षकांशिवाय! ‘मी क्रिकेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर देखील नियमित बँकेत काम करतो. सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे कॅन्टीनमध्ये फिरतो आणि संध्याकाळी पाच वाजले की घरी जाण्यासाठी बॅग भरतो. श्रीलंकेत क्रिकेटर असणं ही अजिबात अडचणीची गोष्ट ठरत नाही. माझ्या घरी फक्त मी, माझी पत्नी आणि आमचं बाळ तिघेच राहतो. साहजिक आहे घरगुती गरजेच्या सर्व गोष्टी मी स्वत: खरेदी करून आणतो. अगदी भाजीबाजारात देखील मी एकदम मनमोकळं फिरू शकतो,’ अशी प्रतिक्रिया एकदा रंगना हेराथनं ईएसपीएन क्रिकइन्फोला दिली होती.

हेराथला आपल्या गोष्टी सहज-सोप्या ठेवायला आवडतात. अनेकांना वाटतं की, २००९ साली आलेला एक फोन कॉल त्याच्या कारकिर्दीतील ‘टर्निंग पॉईंट’ होता. मात्र, त्यानं नशीब या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. त्याऐवजी त्यानं बॉल फिरवण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. २००९ मध्ये श्रीलंकनं संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. लाहोरमध्ये संघावर झालेल्या अति*रेकी ह*ल्ल्यानंतर लंकन संघ भीतीच्या सावटाखाली होता.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

भरीस भर म्हणजे जवळपास साडेतीन महिन्यांनंतर, पाकिस्ताननं श्रीलंकेला हरवून आयसीसी वर्ल्ड टी -20 चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर काही दिवसातच श्रीलंकेला याचा बदला घेण्याची संधी मिळाली. पाकिस्तानचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला. मात्र, ऐनवेळी मुरलीधरन जखमी झाला. त्याच्या जागा भरून काढण्यासाठी कुणाला बोलवावं या चिंतेत संघाचा नवीन कर्णधार संगकारा होता. मुरलीधरननं स्वत: ही चिंता दूर केली. आपल्या जागी रंगना हेराथला खेळण्यासाठी बोलवावं, असा सल्ला त्यानं दिला.

संगकारानं तत्काळ हेराथला फोन फिरवला. तो २ जुलैचा दिवस होता. त्यावेळी तो स्टॅफोर्डशायरमध्ये होता. हेराथ मुडियासेलेज रंगना कीर्थी बंदारा हेराथ दुपारचं जेवण केल्यानंतर जिमकडे जात होता. त्यावेळी त्याला एक फोन आला आणि त्यानंतर हेराथनं तातडीनं आपलं सामान बांधलं. संगा आणि मुरलीनं हेराथला फोन करून ४ जुलैला गाले येथे होणारा कसोटी सामना खेळण्याची विनंती केली.

हेराथ गालेची कसोटी खेळला, फक्त खेळलाच नाही तर संघाच्या विजयात मोलाचं योगदान देखील दिलं. त्यानं गाले कसोटीमध्ये ६७ धावा देऊन ५ बळी घेतले होते. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये त्यानं एकूण १५ बळी घेतले. यानंतर मात्र, त्यानं मागं वळून बघितलं नाही. रंगना हेराथ हा कसोटी क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला.

मुरलीधरन आणि रंगना हेराथ दोघांमध्ये नेहमीच एक प्रकारची स्पर्धा होती. मात्र, त्यात शत्रूत्व नव्हतं. मुथय्या मुरलीधरनच्या वर्चस्वाबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. मुरलीकडं हेराथच्या रुपात खमका उत्तराधिकारी होता. विशेष म्हणजे २००९ मध्ये ज्या गालेच्या मैदानातून रंगना हेराथच्या कारकिर्दीला नवसंजीवनी मिळाली होती त्याच मैदानावर दहा वर्षांपूर्वी १९९९ साली त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं.

१९९९ च्या उन्हाळ्यात उंचावलेल्या प्रतिष्ठेसह ऑस्ट्रेलियानं श्रीलंकन बेटाचा दौरा केला होता. श्रीलंकेनं मालिकेतील पहिली कसोटी जिंकली होती आणि दुसऱ्या कसोटीत रंगना हेराथनं पदार्पण केले. त्यानं ९७ धावांच्या बदल्यात ४ बळी घेतले होते. ती मालिका श्रीलंकने जिंकली होती. त्यानंतर जवळपास १७ वर्षांनी हेराथच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश देण्यात यश मिळवलं.

क्रिकेटच्या ग्लॅमरपासून कोसो दूर असलेला रंगना हेराथ हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी डावखुरा गोलंदाज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अल्बर्ट आईन्स्टाईनने इस्रायलच्या राष्ट्रपतीपदाची चालून आलेली संधी नाकारली होती

Next Post

आमदार-खासदार खरेदीच्या कार्यक्रमाला घोडेबाजार म्हणतात त्यामागे ही गोष्ट आहे

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

आमदार-खासदार खरेदीच्या कार्यक्रमाला घोडेबाजार म्हणतात त्यामागे ही गोष्ट आहे

अंधश्रद्धेपोटी केल्या जाणाऱ्या त*स्करीमुळे 'खवल्या मांजर' नामशेष होण्याच्या मार्गावर आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.