The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेच्या आर्थिक व्यवहाराचं केंद्र असलेल्या वॉल स्ट्रीटवर झालेल्या ह*ल्ल्याचा सूत्रधार अखेरपर्यंत सापडला नाही

by द पोस्टमन टीम
28 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१९२० चे दशक. त्यावेळी लोअर मॅनहटन हा आर्थिकदृष्ट्या संपन्न असा अमेरिकेतला जिल्हा होता. अमेरिकन भांडवलशाहीचे केंद्रच ते. याला भांडवलशाहीचे केंद्र म्हटले तर ‘वॉल स्ट्रीट’ अँड ‘ब्रॉड स्ट्रीट’ हे उत्तर टोकाला असलेले रस्ते हे या भांडवलशाहीचे महत्त्वाचे जंक्शन होते. येथेच ‘जे. पी. मॉर्गन’ या कंपनीचे मुख्यालय होते.

पहिल्या महायु*द्धानंतर जे पी मॉर्गन ही जागतिक स्तरावरची प्रभावशाली बँक म्हणून उदयाला आलेली होती. याच रस्त्यावर युएस सब ट्रेझरी तसेच ऍसे ऑफिस ही कार्यालयेही होती. सळसळत्या उत्साहाने मुसमुसणारी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची इमारतही याच रस्त्यावर होती. थोडक्यात अमेरिकेतल्या आर्थिक घडामोडींचा हा केंद्रबिंदू होता. अमेरिकेसारख्या महासत्तेचे हृदयच जणू.

तो दिवस होता १६ सप्टेंबर १९२०चा. त्या दिवशी पाऊस पडणार असा हवामानाचा अंदाज होता. बाकी व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. जवळच असलेल्या ट्रिनिटी चर्चच्या घंटा दुपारच्या वेळी नेहमीप्रमाणे वाजत होत्या. कॉरॉनर त्याच्या नेहमीच्या कामात व्यस्त होता. बँकेतील कारकून, स्टॉक ब्रोकर्स ही मंडळी इकडून तिकडे फिरत होती.

वाहने, मेसेंजर बॉईज यांच्या गर्दीने रस्ते जणू गुदमरून गेले होते. जो तो आपल्याच तंद्रीत होता. बहुतेक ऑफिसमध्ये आत्ता लंच ब्रेक असल्याने रस्त्यावर फुललेल्या गर्दीवर निवांतपणाचा पातळसा थर होता. त्याचवेळी ऍसे ऑफिसच्या समोर एक घोडागाडी उभी राहिली. घोडागाडी हाकणारा तिला तिथे सोडून काही क्षणात आजूबाजूच्या गर्दीत मिसळून गेला. एवढ्या गर्दीत कुणाचेही ना त्या ड्रायव्हरकडे लक्ष होते ना त्या घोडागाडीकडे.

दुपारचे बारा वाजून वर एक मिनिट झाला आणि अचानक कानठळ्या बसवणारा आवाज आला. हा आवाज त्या घोडागाडीच्या दिशेने आला. हा आवाज इतका प्रचंड होता की अनेकांना आपण बहिरे झालो आहोत की काय असेच वाटले. त्याच्यापाठोपाठ किंकाळ्या ऐकू आल्या. त्याचे कारण होते त्या घोडागाडीमध्ये लपवलेल्या शंभर पौंड वजनाच्या डा*यना*माईटचा स्फो*ट.



या स्फो*टामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि गाडीचे तुकडे जवळपास ३४ व्या मजल्यापर्यंत पोहोचतील इतके उंच फेकले गेले. त्या गाडीला जुंपलेला घोडा कधीच गतप्राण झाला होता. त्या घोड्याच्या शरीराचे तुकडेही शेकडो यार्डाच्या परिसरात इतस्ततः विखुरले होते. या स्फो*टात अनेक लोक जखमी झाले. यापैकीच एक म्हणजे स्टॉकब्रोकर असलेले जोसेफ केनेडी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे हे वडील.

त्यावेळी त्या घोडागाडीच्या जवळपास असलेले लोक मात्र तितके सुदैवी नव्हते. त्यातील काहीजण स्फो*टानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडले, तर काही जणांचे असंख्य तुकडे होऊन ते इकडेतिकडे विखुरले गेले. एका साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार आधी स्फो*टाचा मोठ्ठा आवाज आला. त्यानंतर हवेत धुराचा एक मोठा ढग तयार झाला. त्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले. काहींचे कपडे पेटलेले होते. या स्फो*टाने आजूबाजूच्या इमारतींचेही बरेच नुकसान झाले. खिडक्यांच्या काचा फुटल्या, जेपी मॉर्गनच्या इमारतीचा अंतर्भाग कचऱ्याने भरून गेला.

हा हाहा:कार एखाद्या यु*द्धभूमीवरच्या उत्पाताएवढाच भयंकर होता. एरवी उत्साहाने, चैतन्याने सळसळणारा वॉल स्ट्रीट एकदम मूक बनला होता. सर्वत्र रक्ताचे डाग, काचांचे तुकडे, आणि कोळसा झालेली प्रे*ते हे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. धूर आणि काजळी यांनी हवा भरून गेली होती. स्फोटात गंभीररीत्या जखमी झालेला एखादा माणूस कसाबसा उठून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता आणि विव्हळत कोसळत होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

काही क्षणातच परिस्थितीचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले. स्टॉक एक्सचेंजमधले व्यवहार थांबले. जवळपास दोन हजार पोलीस आणि रेड क्रॉस परिचारिका घटनास्थळी जमा झाले. या स्फो*टात एकूण ३८ जणांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक जखमी झाले. हा ह*ल्ला त्या काळात अमेरिकेच्या मुख्य भूमीवर झालेला सगळ्यात मोठा आणि विना*शकारी ह*ल्ला होता.

या ह*ल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे शोधताना सुरुवातीला बरीच मेहनत करावी लागली. एक गोष्ट स्पष्ट होती – या ह*ल्ल्याचे लक्ष्य जेपी मॉर्गन बँक होते. जाणकारांच्या मते या बँकेला पहिल्या महायु*द्धातल्या विनाशामुळे बराच फायदा झाला होता. परंतु ह*ल्ल्यात मारले गेलेले लोक मुख्यतः स्टेनोग्राफर किंवा कारकून असे साधे कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी होते, श्रीमंत व्यवसायिक किंवा बँकेचे उच्चाधिकारी नव्हते.

ह*ल्ला झाला त्यावेळी जेपी मॉर्गन जुनियर स्वतः हजारो मैल दूर युरोपात होता. थोडक्यात या ह*ल्ल्याचे टार्गेट सामान्य लोक होते. लोकांमध्ये द*हशत पसरवणे हा या ह*ल्ल्याचा हेतू असावा असा अंदाज वर्तवला गेला. त्यानंतर काही भांडवलशाहीविरोधी कम्युनिस्ट गटांकडे बोट दाखवले गेले. त्यांना या आधीदेखील अनेकदा बॉ*म्ब ह*ल्ल्यांसाठी जबाबदार धरले गेले होते.

हा संशय गडद होण्यास अजून एक कारण ठरले. १७ सप्टेंबर रोजी पोस्टात काम करणाऱ्या लोकांना स्फो*टाआधी काही मिनिटे फायनान्शिअल डिस्ट्रिक्टच्या मेल बॉक्समध्ये टाकलेले काही फ्लायर्स दिसले. त्यावर लिहिले होते- ‘लक्षात ठेवा; आम्ही अजून सहन करणार नाही. राजकीय कैद्यांची मुक्तता करा. अन्यथा तुम्हा सर्वांचा मृत्यू अटळ आहे. – अमेरिकन अनार्किस्ट फायटर्स’

हे कागद याआधी जून १९१९ साली झालेल्या दह*शत*वादी मोहिमांच्या आधी फिरवल्या गेलेल्या पत्रांशी बरेच मिळतेजुळते होते. तेव्हापासून पोलिसांना असा संशय होता, की या कटाचा बेत गॅलियानिस्ट्स नावाच्या देशविरोधी कारवाया करणाऱ्या इटालियन लोकांच्या गटाने केला होता.

तपास अधिकाऱ्यांसाठी हे रहस्यमय फ्लायर्स एक महत्त्वाचा दुवा होते. तीन वर्षे पोलीस आणि एफबीआय यांनी त्या घोडागाडीच्या फरार ड्रायव्हर शोधण्याचा आणि ह*ल्लेखोरांचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. याखेरीज एडवर्ड फिशर नावाच्या मनोरुग्ण असलेल्या एका टेनिसपटूकडेही पोलिसांचे लक्ष होते. त्याने याआधी अनेकदा वॉल स्ट्रीटपासून लोकांनी लांब रहावे अशा आशयाच्या सूचना दिल्या होत्या. पण नंतर तपासादरम्यान तो मनोरुग्ण आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला आरोपातून मुक्त करत मनोरुग्णालयात दाखल केले.

१९४४ साली या प्रकरणाची अखेरची चौकशी झाली आणि एफबीआयने हा ह*ल्ला इटालियन द*हश*तवाद्यांनी केल्याचा निष्कर्ष काढला. मारिओ बुडा नावाच्या संशयितांवर पोलीस आणि एफबीआय लक्ष ठेवून होते. त्यांच्या मते आधीच्या एका खु*नाच्या घटनेचा बदला म्हणून त्याने आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने हा स्फो*ट घडवून आणला होता. परंतु बुडा स्फो*टानंतर थोड्याच काळाने इटलीला पळून गेला आणि अखेरपर्यंत तिथेच राहिला.

त्यानंतर १६ सप्टेंबरच्या ह*ल्ल्यासाठी कुणालाही दोषी ठरवले गेले नाही. ‘शो मस्ट गो ऑन’ या सूत्रानुसार वॉल स्ट्रीटने स्फो*ट झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी कार्यरत होत आपल्या व्यवसायिकतेचे दर्शन घडवले. बँडेज लावलेले जखमी कर्मचारी आपापल्या ऑफिसमध्ये दाखल झाले. कालांतराने या महाभयंकर घटनेच्या खाणाखुणा पुसल्या गेल्या.

आजही मॉर्गनची संगमरवरी इमारत बॉम्बच्या तुकड्यांनी पडलेली छिद्रे अंगाखांद्यावर खेळवत उभी आहे. या खुणा तिच्यासाठी शौर्य पदकांच्या बरोबरीच्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आजही जगभर अनेक बाळं शेपटी घेऊन जन्माला येतात..!

Next Post

ब*लात्का*राच्या आरोपाखाली मृत्युदंड झाला, आणि ७० वर्षांनंतर त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

ब*लात्का*राच्या आरोपाखाली मृत्युदंड झाला, आणि ७० वर्षांनंतर त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं

आजही 'विलियम टेल'ची गोष्ट स्वित्झर्लंडमध्ये धैर्य आणि स्वाभिमानाचे उदाहरण आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.