The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अटलांटात वांशिक दं*गल उसळण्याला एका वर्तमानपत्राचं उथळ वार्तांकन कारणीभूत होतं

by Heramb
10 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दं*गली या विकासाच्या मार्गात सर्वांत मोठे आव्हान बनून उभ्या असतात. अशा दं*गलींमध्ये विनाकारण जीवितहानी आणि वित्तहानी होते. यु*द्धाइतकंच गांभीर्य दं*गलींचंही आहे. कारण दं*गल म्हणजे एकप्रकारे अंतर्गत यु*द्धच! कोणत्याही राष्ट्राला बाह्य-यु*द्धांपेक्षा अंतर्गत यु*द्धापासून जास्त नुकसान होतं. भारतामध्ये अगदी स्वातंत्र्यापासूनच अशा दं*गली होत राहिल्या आहेत. पण जगातील सर्वच प्रगत राष्ट्रांना या वेदनांमधून जावंच लागतं. अशाच एका गंभीर दं*गलीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

अमेरिकेतील डाउनटाउन अटलांटाच्या मध्यभागी, ज्याठिकाणी काही रस्ते एकत्र येतात, त्या ठिकाणाला स्थानिक ‘फाईव्ह पॉईंट्स’ म्हणून ओळखतात. आजमितीस एक उद्यान, विद्यापीठ, अनेक उंच इमारती, वाहने आणि पादचाऱ्यांची गर्दी यामुळे हा परिसर गजबजलेला असतो.

याठिकाणी एकेकाळी झालेला मोठा रक्त*पात विस्मरणात गेला असून आता हा भाग आणि  आणि येथील लोक आधुनिकतेकडे जात आहेत. १९०६ साली हेच अटलांटामधील फाईव्ह पॉईंट्स ठिकाण वांशिक रक्त*पाताचं केंद्र ठरलं होतं. तब्बल दोन दिवस चाललेल्या या ह*त्याकां*डात किमान २५ आफ्रिकन-अमेरिकन लोकांचा तर दोन स्थानिकांचा जीव गेला होता.

चार दिवस सुरु असलेलं हे ह*त्या*कांड २२ सप्टेंबर १९०६ रोजी सुरु झालं. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यामध्ये चुकीच्या प्रकारे केली जाणारी किंवा अनेकदा बेकायदेशीररीत्या केली जाणारी पत्रकारिता अर्थात येलो जर्नलिजम, ब*लात्काराचे आरोप, मतदान आणि आर्थिक हक्क मिळावे म्हणून आंदोलने करणाऱ्या आफ्रिकन-अमेरिकन लोकांवरील स्थानिकांचा रोष या गोष्टी हिं*साचारासाठी कारणीभूत होत्या.

अमेरिकेतील पुनर्रचनेदरम्यान अनेक आफ्रिकन-अमेरिकन लोक नोकरीच्या संधींचा शोध घेण्यासाठी ग्रामीण भागातून अटलांटाला गेले. एक औद्योगिक, आर्थिक आणि रेल्वेमार्गाचे केंद्र असलेल्या अटलांटा शहराला ‘न्यू साउथ’ची राजधानी म्हणून ओळख प्राप्त झाली होती. पण त्याच वेळी हे शहर वांशिक संघर्षांनेही भरलेले होते.



अमेरिकेतील पुनर्रचना म्हणजे अमेरिकन गृह*यु*द्धानंतरचा अशांत काळ. यावेळी युनायटेड स्टेट्सच्या दक्षिणेकडील राज्यांना अमेरिकेत संघराज्यात सामील करून घेण्याचा प्रयत्न झाला होता. याबरोबरच, गुलामगिरीतून नव्याने मुक्त झालेल्या ४० लाख लोकांना अमेरिकेत एकत्र आणण्याचा प्रयत्नसुद्धा झाला होता.

१८६५ आणि १८६६ साली राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांच्या प्रशासनात, दक्षिणेकडील नवीन राज्याच्या विधानमंडळांनी आधीचे गुलाम लोक आणि इतर आफ्रिकन-अमेरिकन लोकांचे श्रम कमी करण्यासाठी “कृष्णवर्णीय संहिता” (ब्लॅक कोड) पास केले. या संहितांविरोधातील उत्तरेकडील संतापामुळे ‘प्रेसिडेन्शियल रिकन्स्ट्रक्शन’चे समर्थन कमी झाले आणि रिपब्लिकन पक्षाच्या कट्टरपंथी शाखेचा विजय झाला.

१९०६ साली राज्यपालपदाच्या निवडणुकांमुळे हे तणाव आणखीनच वाढले होते. या निवडणुकांच्या रिंगणात ‘द अटलांटा कॉन्स्टिट्यूशन’चे संपादक क्लार्क हॉवेल आणि ‘द अटलांटा जर्नल’चे माजी संपादक होक स्मिथ यांच्यात मोठी स्पर्धा होती. ‘डेमोक्रॅटिक पक्षाच्या’ या दोन्ही उमेदवारांनी कृष्णवर्णीय पुरुषांना वंचित ठेवण्याच्या योजनांवर जोर देऊन मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आफ्रिकन स्टडीज प्राध्यापक आणि मोरेहाऊस कॉलेजमध्ये मानवता विभाग अध्यक्षा, क्लेरिसा मायरिक-हॅरिस म्हणतात, “त्यांची उद्दिष्टं अगदी स्पष्ट होती. आपल्याकडे कृष्णवर्णियांची सत्ता असू शकत नाही. आपण त्यांना रोखले पाहिजे. आपण त्यांना मतदानापासून दूर ठेवले पाहिजे. ते पदभार स्वीकारत आहेत.”

मतदानाच्या हक्कांव्यतिरिक्त, अनेक स्थानिक आणि श्वेतवर्णीय रहिवाशांना डेकातूर स्ट्रीटवरील बार आणि काही दुकाने बंद करायची होती. या बार्स आणि इतर दुकानांमध्ये आफ्रिकन-अमेरिकन गुन्हेगार सतत येतात, असा काही स्थानिकांचा आरोप होता. पण कारण वेगळेच होते, त्या लोकांनी सलूनमध्ये कृष्णवर्णीय पुरुष आणि श्वेतवर्णीय महिलांच्या एकत्र येण्यावर आक्षेप घेतला होता. काहींनी कृष्णवर्णीय लोकांच्या व्यवसायांच्या यशाबद्दल नाराजी व्यक्त केली. हे कृष्णवर्णीय यशस्वी व्यापारी लोक आफ्रिकन-अमेरिकन लोकांना अटलांटाच्या आर्थिक मध्यम आणि उच्च वर्गात आणत होते.

स्थानिक प्रेसने काही वादग्रस्त लेखांसह अटलांटाच्या वाढत्या वांशिक वादाचा उपयोग नफा मिळवण्यासाठी केला. उन्हाळ्याच्या अखेरीस, दोन्ही राज्यपाल उमेदवारांशी संबंधित वर्तमानपत्रांमध्ये लेखांची एक मालिकाच सुरू झाली. या लेखांमध्ये श्वेतवर्णीय लोकांची मॉब-लिंचिंग, तसेच आफ्रिकन-अमेरिकन पुरुषांद्वारे स्थानिक, गोऱ्या महिलांवर लैंगिक अ*त्याचार होत आहेत असे आशय येऊ लागले.

काही ठिकाणी श्वेतवर्णीय महिलांनी साक्ष नोंदवली, “हे खरे नाही. माझ्या बाबतीत असे काहीही घडले नाही. ’’ पण याचा काही फरक पडला नाही. अटलांटा जॉर्जियन वृत्तपत्राने सात महिलांवरील दह*शतीच्या नावाखाली  तीन भागांची मालिका प्रकाशित केली होती. कृष्णवर्णीय समुदायाला आणि कृष्णवर्णीय पुरुषांना मूलतः नष्ट करण्याच्या कटात त्या सात स्थानिक श्वेतवर्णीय स्त्रिया प्यादे बनल्या. त्यावेळी कृष्णवर्णीय राजवटीची तथाकथित ‘भीती’ होती.

२२ सप्टेंबर १९०६ च्या संध्याकाळपर्यंत, हजारोंच्या संख्येने सशस्त्र श्वेतवर्णीय जमाव ‘फाईव्ह पॉईंट्स’वर उतरले आणि रस्त्यावर किंवा  कारमध्ये असलेल्या प्रत्येक कृष्णवर्णीय पुरुष, स्त्रिया आणि मुलांवर दादागिरी करायला सुरुवात केली. या हिं*सक जमावाने कृष्णवर्णीय लोकांच्या मालकीचे व्यवसाय आणि घरांवर ह*ल्ले केले. परिसरातील कृष्णवर्णीय लोकांसाठीची महाविद्यालये आणि विद्यापीठांना लक्ष्य करण्यात आले. देशाच्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन करोडपतींपैकी एक, अलोन्झो हर्नडन यांच्या मालकीच्या एका सलूनची तोडफोड करण्यात आली.

काही दिवसांच्या हिं*साचारानंतर, स्टेट मिलिशियाने ही दं*गल शांत केली आणि सुमारे अडीचशे आफ्रिकन-अमेरिकन लोकांना अटक केली. पण ज्यांनी कृष्णवर्णीय लोकांना मार*हाण केली अशा हजारो श्वेतवर्णीय अटलांटन्सना अटक झालीच नाही. अनेक कृष्णवर्णीय अटलांटन्सना फक्त त्यांच्या कुटुंबाचे आणि परिसराचे रक्षण करण्यासाठी शस्त्र हाती घेतल्याने अटक करण्यात आली. खरंतर तथाकथित ‘२५’ या आकडेवारीपेक्षा ह*त्याकांडामध्ये सुमारे १०० आफ्रिकन अमेरिकन लोक मारले गेले. काही कृष्णवर्णीय लोकांच्या मते, या जमावात जे होते ते सर्व निम्नवर्ग, कामगार वर्ग, निरक्षर गोरे लोक नव्हते तर ते शहरातील उत्कृष्ट श्वेतवर्णीय नागरिक होते.

या ह*त्याकांडाच्या बातम्या संपूर्ण युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये पसरल्या, परंतु बहुतेक कव्हरेज चुकीचे होते कारण अटलांटाच्या अधिकार्‍यांनी शहराची प्रतिष्ठा आणि त्याचे व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी झालेल्या मृत्यू आणि विनाशाचे प्रमाण कमी दाखवले. शहरात आता सर्व शांत आहे’, ‘हिं*सा संपली आहे’ अशा आशयांचा अहवाल वृत्तपत्र देत होते. पण हा गंभीर हिं*साचार म्हणजे अटलांटाच्या इतिहासाला काळिमा फासणारी घटना होती.

पुन्हा दुसऱ्या वेळी वर्णभेदावरून दं*गल घडू नये यासाठी अटलांटाच्या कृष्णवर्णीय समाजातील प्रमुख व्यक्ती नियमितपणे भेटून हिं*साचारास कारणीभूत असलेल्या परिस्थितीवर चर्चा करत असत. शहरातील वांशिक तणाव वाढवणाऱ्या अयोग्य पत्रकारितेसाठी कुख्यात अटलांटा इव्हिनिंग न्यूजचे बंद पडले. ही वृत्तसंस्था आपल्या फायद्यासाठी चुकीच्या बातम्या किंवा योग्य बातम्यांनाही चुकीच्या स्वरूपात मांडण्याचं काम करीत असे.

या ह*त्याकांडाने नागरी हक्क चळवळीची बीज रोवले. ह*त्याकांडानंतर झालेल्या लोकांच्या सक्रिय सहभागाने २०व्या शतकाच्या मध्याच्या नागरी हक्क चळवळीचा मार्ग मोकळा केला. या दं*गलीच्या वेळी अवघ्या १३ वर्षीय वॉल्टर व्हाइटने एका कृष्णवर्णीय लहान मुलाला श्वेतवर्णीय जमावाने मारताना पहिले. या भयानक कृत्याचे त्याला कधीही विस्मरण झाले नाही आणि यामुळेच त्याने नागरी हक्क मिळवण्यासाठी आपली कारकीर्द बहाल केली. अखेरीस त्यांनी १९०९ साली स्थापन झालेल्या ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल’चे प्रमुख म्हणून काम केले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

नोकरी सोडून कोचिंग सुरु केलं आणि श्रीमंतांच्या यादीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

Next Post

या वैमानिकाने डिप्रेशनमध्ये विमान पर्वतावर धडकावून दीडशे लोकांचा जीव घेतला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या वैमानिकाने डिप्रेशनमध्ये विमान पर्वतावर धडकावून दीडशे लोकांचा जीव घेतला होता

भटकंती - छत्रपती संभाजीनगर शहरातला गरिबांचा ताजमहाल 'बीबी का मकबरा'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.