The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इतिहासातील सर्वात शक्तिशाली यो*द्धे असलेले रोमन ग्लॅडिएटर्स शुद्ध शाकाहारी होते!

by Heramb
16 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जर तुम्हाला शरीरयष्टी कमवायची असेल तर फक्त प्रचंड व्यायाम करून चालत नाही तर त्यासाठी खुराकसुद्धा तसाच मजबूत, मांसाहारी आणि प्रथिनयुक्त हवा. अशा अनेक गोष्टी आज आपण ऐकतो. व्यायामाबरोबरच प्रथिन आणि कैक जीवनसत्वांनी युक्त मांस खाल्ल्याने शरीराची उत्तम वाढ होतेही, पण तीच तत्वे शाकाहारी अन्नातूनही मिळतात असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

पण जगाच्या इतिहासात अनेक यो*द्धे आणि पैलवानही शाकाहारी असल्याचे आपण पाहतो. अगदी अलीकडचंच आणि उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर सुप्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेमधील ‘हनुमानाची’ भूमिका साकारणारे दारा सिंग (४ वेळा जागतिक कुस्तीपटू म्हणून स्थान मिळवलेले, रुस्तुम-ए-हिंद, रुस्तुम-ए-पंजाब, डब्लू.डब्लू.इ.च्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान असणारे) हे शुद्ध शाकाहारी आहार घेत असत.

भारताबाहेरही, प्राचीन रोममधील ‘ग्लॅडिएटर्स’ नावाचे मनोरंजक यो*द्धेसुद्धा शाकाहारी आहार घेत होते अशा अनेक नोंदी आपल्याला सापडतात. प्रसिद्ध रोमन लेखक प्लिनी यांनी ग्लॅडिएटर्सचे वर्णन ‘हॉर्डेरी’ असे केले आहे. याचेच भाषांतर “जव खाणारे” असे होते. कच्चे जव खाल्ल्याने शरीर मजबूत होते असा रोमनांचा विश्वास होता. जव आणि इतर दाण्यांशिवाय त्यांनी ओटमील आणि सुकामेवा यांचा देखील आपल्या आहारात समावेश केला होता.

रोमन काळात असे यु*द्धवजा मनोरंजक खेळांचे महत्त्व मोठे होते. संपूर्ण राज्यात ग्लॅडिएटर्सना प्रशिक्षण देणारी १०० हून अधिक केंद्रे अस्तित्वात होती. बहुतेक ग्लॅडिएटर्सची प्रशिक्षण केंद्रे कोलोसियमच्या आसपासच असत. ग्लॅडिएटर्सचे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र, ‘लुडस मॅग्नस’, एका भुयारी मार्गाच्या साहाय्याने कोलोसियमशी जोडलेले होते. अशा प्रकारच्या खेळांचे महत्त्व अधिक असल्याने अर्थकारणातही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे ग्लॅडिएटर्स ही त्यांच्या मालकांसाठी एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक असूनही त्यांच्या आहारात मांसाचा अभाव का असेल असा प्रश्न उद्भवतो.

अधिक चरबी असणे म्हणजे खेळाच्या रिंगणात (एरिना) जास्त वेळ जगण्याची शक्यता. चरबीच्या अतिरिक्त थराने नसा आणि स्नायूंचे संरक्षण होते असा रोमन लोकांचा समज होता. चरबीमुळे शस्त्राने झालेल्या जखमा कमी प्राणघातक ठरत होत्या. ‘ग्लॅडिएटर्स त्यांच्या आहारामुळे काही बाबतीत अतिशय कमकुवत होते’ या प्रकारच्या नोंदी गॅलेनसारख्या काही प्राचीन लेखकांनी केल्या आहेत.

आधुनिक अभ्यासांनुसारही, वाढलेली चरबी पोटाच्या भागाला हानीकारक जखमांपासून संरक्षण देऊ शकते हे सिद्ध होत आहे. चरबी असण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ग्लॅडिएटर्स त्यांच्या शरीरातून रक्त बाहेर पडत असतानाही लढा सुरू ठेवण्यास सक्षम असत. कारण चरबीच्या थरामुळे जखमा उथळ बनतात. प्रेक्षकांसाठी मात्र हे विलोभनीय दृश्य ठरतं!



खरंतर प्रशिक्षकांनासुद्धा ग्लॅडिएटर्सचे वजन वाढवायचे होते. अतिशय धारदार शस्त्रांनी लढत असताना हे ग्लॅडिएटर्स शरीराच्या रक्षणार्थ अतिशय कमी किंवा चिलखत घालतच नसत. ग्लॅडिएटर्सला कित्येक महिन्यांनंतरच्या कठोर प्रशिक्षणानंतरही मैदानात उतरल्यावर लगेचच मारले जावे हे साहजिकच प्रशिक्षकांना आवडत नव्हते. म्हणूनच या प्रशिक्षकांनी त्यांना एक प्रकारे संरक्षण कवचच प्रदान केले. ग्लॅडिएटर्स हे कवच नियमाची कोणतीही पर्वा न करता परिधान करू शकत होते. ते म्हणजे चरबी!

यावरूनच ग्लॅडिएटर्सचा उच्च कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) आणि कमी प्रथिनयुक्त आहार हा हेतुपुरस्सर होता असे दिसते. ग्लॅडिएटर्सना पुरातन काळात किंवा आजही ज्या प्रमाणे दाखवले जाते, मजबूत ॲब्स, मसल्स नव्हते हे स्पष्ट होते. खरंतर ते अधिक जाड दिसत होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

मग ग्लॅडिएटर्सला खूप मसल्स असलेला पुरुष म्हणून का चित्रित केले गेले? असा प्रश्न यामुळे उद्भवतो. याचे उत्तर बहुधा प्राचीन ग्रीक कलेच्या क्षेत्रात सापडेल. ग्रीक शिल्पांमध्ये एक आदर्श पुरुष चित्रित केला जात असे.

आपल्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असल्याने, ग्लॅडिएटर्स लाकडापासून किंवा हाडांच्या राखेपासून तयार केलेले मद्यही पित असत. लाकूड आणि हाडांची राख या दोन्ही गोष्टी कॅल्शियमयुक्त असतात. आपली हाडे मजबूत करण्यासाठी ग्लॅडिएटर्सनी अनेक कॅल्शियम सप्लीमेंटसचा वापर केला.

ग्लॅडिएटर्स हे केवळ गुलामच असत असाही एक समज आहे. पण केवळ गुलामच ग्लॅडिएटर्स नव्हते, तर रोमन राज्यातील स्वतंत्र पुरुष किंवा स्त्रीसुद्धा ग्लॅडिएटर होत असत. स्त्रियांना ग्लॅडियाट्रिक्स म्हटले जात. असे स्वतंत्र रोमन स्त्री-पुरुष कौतुक आणि प्रसिद्धीच्या मोहापायी ग्लॅडीएटर्समध्ये सामील होत असत. महिलांमध्ये ग्लॅडिएटर्स अत्यंत लोकप्रिय होते. श्रीमंत रोमन स्त्री ग्लॅडिएटरसोबत एक रात्र घालवण्यासाठी मोठी रक्कम देत असत.

ग्लॅडिएटर्सच्या त्वचेतून निघालेला घाम एरंडेलच्या तेलाबरोबर आणि धुळीबरोबर मिसळून कामोत्तेजक औषध तयार केले जात असत. यावरून ग्लॅडिएटर्सची लोकप्रियता लक्षात येते. ग्लॅडियाट्रिक्स (स्त्री ग्लॅडिएटर्स) जरी या स्पर्धेत उतरत असल्या तरी त्यांना ग्लॅडिएटर्सच्या  प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जात नसत. महिला ग्लॅडिएटर्स ‘कॉलेजिया आयव्हेनम’मध्ये खाजगी शाखेत प्रशिक्षण घेत असत.

ग्लॅडिएटर्स कमी वेळा मृत्यूमुखी पडले असाही एक समज आहे. ग्लॅडिएटर्स हे मालकाच्या गुंतवणुकीचे मोठा भाग असल्याने विरोधकांना प्रत्यक्ष मारण्यापेक्षा त्यांनी स्वतःला प्रदर्शित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि कैक प्रसंगी ते विरोधाकडून मारलेही जात असत. किंबहुना, मालकांना ग्लॅडिएटर मरू नये असे वाटत होते कारण एक चांगला ग्लॅडिएटर मोठ्या प्रमाणावर पैसे मिळवून देऊ शकत होता.

ग्लॅडिएटोरियल लढाई आणि प्रशिक्षण यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर मानवी शरीराची ऊर्जा खर्च होत असे. यासाठी भरपूर कॅलरी आवश्यक होत्या. उच्च कर्बोदक (हाय कार्बोहायड्रेट्स) आहार शरीराला जलद इंधन देण्यास सक्षम असतात आणि ते स्वस्तही असतात.

बहुतेक ग्लॅडिएटर्स शाकाहारी होते, परंतु प्राण्यांच्या ह*त्येविरुद्ध किंवा त्यांच्याबद्दल दया आल्याने नाही. शाकाहारी आहार स्पर्धेमध्ये त्यांची जिंकण्याची शक्यता वाढवेल असा त्यांचा विश्वास होता. उच्च प्रथिनयुक्त आहार हा खेळाडूंसाठी नेहमीच आवश्यक आहार नसतो याचे ग्लेडिएटर्स हे उत्तम उदाहरण आहेत. तुम्ही शाकाहारी असलात तरीही तुम्ही उत्तम खेळाडू होऊ शकता!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आकाश चोप्राला मैदानावर जे मिळालं नाही, ते त्याने ‘कमेंट्री बॉक्स’मध्ये कमावलं

Next Post

या आहेत जगातील १० सर्वांत महागड्या कार्स!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या आहेत जगातील १० सर्वांत महागड्या कार्स!

त्यादिवशी उत्तर कोरियावर अणु*बॉ*म्ब टाकण्याची अमेरिकेने पूर्ण तयारी केली होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.