The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

2 टन सोनं घेऊन निघालेली जपानची पाणबुडी समुद्रात बुडाली, आजही शोध सुरूच आहे

by द पोस्टमन टीम
7 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


समुद्राच्या तळाशी काय काय रहस्य दडलेली आहेत याचं नेहमीच मानवी मनाला आकर्षण राहिलं आहे. समुद्री वनस्पती, प्राणी, तिथलं वातावरण आणि तिथे असलेला खजिना याबद्दल सर्वांना नेहमीच अप्रूप वाटत आलेलं आहे. प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आपल्याला गुप्त खजिना मिळावा असा विचार आलेला असतो. अशातच जर तुम्हाला सांगितलं, की समुद्राच्या तळाशी एका बुडलेल्या पाणबुडीमध्ये दोन टन म्हणजे जवळपास २००० किलो सोनं आहे तर? खरंतर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण खरोखरच अशी पाणबुडी आहे.

I 52 पाणबुडी ही दुसऱ्या महायु*द्धाच्या वेळी खास वाहतुकीसाठी बनवली गेली होती. एका फुटबॉलच्या मैदानापेक्षा लांब असा तिचा महाकाय आकार होता. अशी ही पाणबुद्धी जेव्हा २००० किलो सोनं, रबर, टिन अशा गोष्टी घेऊन जर्मनीकडे निघाली होती, त्यावेळी अटलांटिक महासागरात तिच्यावर ह*ल्ला करण्यात आला.

या ह*ल्ल्यानंतर स्वतःसोबत असलेलं सोनं आणि दुसऱ्या महायु*द्धाच्या सोबत जोडल्या गेलेल्या अनेक गोष्टींचे पुरावे सोबत घेत ही पाणबुडी गायब झाली. पुढे त्या पाणबुडीचं काय झालं? सोनं आणि बाकीच्या सामनाचं काय? तो ह*ल्ला नेमका कोणी आणि का केला होता? याची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल.

दुसऱ्या महायु*द्धावेळी हि*टल*रला पूर्ण विश्वास होता की ना*झी आर्मी सगळ्यांना पुरून उरेल. पण त्याला संसाधनांची गरज होती. तर जपानचे चीनसोबत आधीच यु*द्ध सुरू होते, त्या यु*द्धासाठी जपानला आधुनिक शस्त्रसाठ्याची गरज होतीच. एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर्मनी – जपान – इटली हे तीन देश एकत्र आले आणि त्यांनी करार केला.



या करारानुसार, जपान हि*टल*रला सोने, टिन, रबर, मोलिब्डेनम इत्यादी देणार होतं आणि बदल्यात जर्मनीकडून आधुनिक शस्त्रे मिळणार होती. खरंतर ही वाहतूक एका रेल्वेच्या मदतीने होणार होती. तो मार्ग सोव्हिएत राष्ट्रांच्या मधून जात होता. हा मार्ग मोकळा करण्यासाठी हि*टल*रने सोव्हिएत राष्ट्रावर एक दिवस आक्र*मण केलं. पण त्याला त्यात यश मिळालं नाही. उलट या ठिणगीमुळे तिथून मालवाहतूक करणं अजूनच धोकादायक झालं. यावर उपाय म्हणून समुद्री मार्गाने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला, आणि I 52 या पाणबुडीचा जन्म झाला.

ठरल्याप्रमाणे मार्च १९४४ मध्ये I 52 दोन मेट्रीक टन सोने, २२८ टन टिन, मोलिब्डेनम आणि टंगस्टन, ५४ टन रबर , सैन्यासाठी लागणारी औषधे आणि १०९ माणसं घेऊन निघाली. ज्यामध्ये मित्सुबिशी इन्स्ट्रुमेंट कंपनीचे १४ तज्ज्ञ होते, जे जर्मन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि खरेदी करण्यासाठी सोबत होते.

ही पाणबुडी सिंगापूरच्या बंदरावरून हिंदी महासागर पार करत आफ्रिकेला वळसा घालून पुढे निघाली होती. या संपूर्ण यात्रेदरम्यान जपान आणि जर्मनीमधील संभाषण गुप्त कोड लँग्वेजमध्ये होत होतं. मात्र, हे संभाषण डीकोड करण्यात शत्रू राष्ट्राला यश मिळालं, आणि त्यांना I 52, तिच्या सोबत असलेला माल आणि करार याबद्दल माहिती मिळाली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

२३ जून १९४४ रोजी I 52 ही जर्मनीच्या U 530 या दुसऱ्या पाणबुडीला मध्य अटलांटिक महासागरात भेटणार होती. तिथेच सामानाची देवाणघेवाण होणार होती. याचदरम्यान, युरोपातून अमेरिकेला परतणाऱ्या यूएसएस बोग या जहाजाला ही जपानी पाणबुडी शोधून नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर २४ जूनच्या रात्री झालेल्या धुमश्चक्रीत ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी नाहीशी झाली.

पुढे ३० ऑगस्ट १९४४ रोजी ही पाणबुडी, आणि त्यावरील सर्व लोक बे ऑफ बिस्के याठिकाणी बुडाल्याचे जर्मनीकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. २०२० साली १० डिसेंबरला जपानच्या लष्करानेही I 52 बुडाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. काही वर्षं पूर्ण शांततेत गेली, आणि मग सुरू झाला या पाणबुडीचा – खरंतर त्यावरील सोन्याचा शोध!

१९९४ साली रशियाच्या अकॅडेमिक केल्डिश या जहाजानं हा शोध सुरू केला. पण १९९५ च्या मार्चपर्यंत यातून काहीच हाती लागलं नसल्यामुळे हा शोध बंद करण्यात आला. रशियाच्याही आधीपासून, अमेरिकेच्या टेक्ससमधील एक रिसर्चर I 52 बाबत मिळेल ती माहिती गोळा करत होता. या रिसर्चरचं नाव होतं, पॉल टिडवेल.

पॉलने अमेरिकेचे सैन्य, जर्मन यू-बोट अशा विविध ठिकाणी मिळालेली माहिती, शिप लॉग्स असं सगळं एकत्र करुन I 52 वरील ह*ल्ल्याचं पुनरावलोकन केलं. या पाणबुडीचा मार्ग कसा असावा याचाही त्याने नव्याने अभ्यास केला. यासाठी त्याने कित्येक वर्षं हजारो कागदपत्रं तपासून पाहिली होती. या पाणबुडीबाबत अधिक अभ्यास करता यावा यासाठी तो चक्क आपल्या कुटुंबासह वॉशिंग्टनला शिफ्ट झाला होता. त्याने या मोहिमेसाठी साधारणपणे १० लाख डॉलर्सचा निधीही गोळा केला होता.

पॉलचा प्लॅन साधा आणि सरळ होता, पाणबुडी शोधायची, वर काढायची आणि सोनं मिळवायचं. आपण केलेल्या अभ्यासावर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे १९५५ साली त्याने पूर्ण तयारीनिशी ही शोधमोहीम सुरू केली. सुमारे दोन आठवड्यांपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. पण त्याच्या हातीसुद्धा काहीच लागलं नाही. पुढे अन्न आणि इंधन कमी असल्यामुळे ही शोधमोहीम बंद करण्यात आली, आणि हे सर्व समुद्राच्या तळातून बाहेर आले.

टायटॅनिक जहाजाच्या शोधामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले टॉम डेटवीलर हे या मोहिमेचे प्रोजेक्ट मॅनेजर होते. त्यांनी सर्च पॅटर्नबाबत काही प्रश्न उपस्थित करत ‘मेरिडियन सायन्सेस’ या कंपनीला संपर्क साधला. याच कंपनीला संपर्क साधण्याचे कारण होते, तिथले प्रेसिडेंट डेव्हिड जॉर्डन. जेव्हिड जॉर्डन यांनी एका न्यू*क्लिअर पाणबुडीत नौदलाचे अधिकारी म्हणून काम केलं होतं.

जॉर्डन यांना पहिल्यापासूनच ही मोहीम चुकीच्या दिशेने जात असल्याचा अंदाज होता. जॉर्डन यांनी सांगितलं, की पॉल आणि त्यांच्या इतर साथीदारांनी पाणबुडीचा शोध जुन्या माहितीच्या आधारे लावला आहे. मात्र, तेव्हाच्या काळी तंत्रज्ञान आजच्या इतकं प्रगत नव्हतं. त्यामुळे तेव्हाच्या रेकॉर्ड्समध्ये असलेली माहिती बऱ्याच बाबतीत सदोष असण्याची शक्यता आहे. या सर्वांनी मग जॉर्डनच्या मदतीने आपल्याकडील डेटा अधिक अचूक करुन घेतला.

१९९८ साली पॉल एका रशियन वैज्ञानिक रिसर्च शिपसोबत समुद्रात गेला. आर/व्ही केल्डीश नावाच्या या जहाजावर ‘नॅशनल जिओग्राफिक मॅगझीन’ मोहीमेसाठी सल्लागार म्हणून त्याची निवड झाली होती. या मॅगझीनच्या १९९९ च्या एडिशनमध्ये पॉलने सांगितलेली I 52ची कथा पब्लिश झाली होती.

पुढे, खजिन्याच्या शोधाबाबत ऑगस्ट २०११ मध्ये आणखी एक आर्टिकल प्रसिद्ध झालं. समुद्राच्या वरती एवढं काही सुरू असताना, I 52 मात्र शांतपणे समुद्राच्या तळाशी निद्रा घेत होती. अजूनही ही पाणबुडी त्याच ठिकाणी आहे. पॉलची किंवा कोणाचीही मोहीम अद्यापही यशस्वी झाली नाही. अर्थात, तेव्हा २५ लाख डॉलर्स किंमत असलेलं सोनं, आता मात्र १०० मिलियन डॉलर्सहून अधिक किंमतीचं झालं आहे.

पॉल सांगतात, की आजकाल तंत्रज्ञान अधिक प्रगत झाल्यामुळे अशा प्रकारची मोहीम पुन्हा राबवणं अजून सोपं होणार आहे. मात्र. यासाठी सुमारे ८ ते १० मिलियन डॉलर्सचा खर्च येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. आपण अमेरिका आणि जपान दोन्ही देशांशी चांगले संबंध राखले आहेत, त्यामुळे त्या पातळीवर काही अडचण येणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. १९९८ च्या मोहीमेनंतर जपान टाईम्सने असं वृत्त दिलं होतं, की पॉल २००५ किंवा २००६ मध्ये पुन्हा एक मोहीम राबवू शकतील. मात्र, अद्याप तरी पॉल यांनी अशी कोणतीही मोहीम राबवली नाही.

२००० साली नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने ‘Submarine I-52 : Search for WW2 Gold’ नावाची एक डॉक्युमेंट्री तयार केली होती. यासोबतच नॉटिकोजचे (तत्कालीन मेरिडेन सायन्सेस) प्रेसिडेंट आणि सीईओ डेव्हिड जॉर्डन यांनी I 52 पाणबुडीवर आधारित ‘ऑपरेशन रायजिंग सन’ नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारतीय पुराणांत वर्णन केलेल्या चौसष्ठ कला कोणत्या आहेत..? जाणून घ्या..!

Next Post

हा नियम आडवा आला, नाहीतर महेंद्र सिंग धोनी मुंबईचा कप्तान म्हणून दिसला असता..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

हा नियम आडवा आला, नाहीतर महेंद्र सिंग धोनी मुंबईचा कप्तान म्हणून दिसला असता..!

या हेराने दिलेली माहिती जर्मनीने गांभीर्याने घेतली असती तर दुसऱ्या महायु*द्धाचा निकाल बदलला असता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.