The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साहित्यावर जसा विल्यम शेक्सपियरचा प्रभाव आहे तसाच मायकेलेंजेलोचा कलेवर आहे

by द पोस्टमन टीम
23 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना मला ऐतिहासिक घटना किंवा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कांदबऱ्या वाचण्याचं वेड लागलं होतं. कॉलेज ग्रंथालयात मी तासन् तास घालवून अशा मराठी-इंग्रजी कांदबऱ्या शोधायचे. त्याच काळात अमेरिकन लेखक डॅन ब्राऊन यांची ‘एंजल्स ॲण्ड डेमन्स’ नावाची एक कांदबरी माझ्या हातात पडली. ती कादंबरी वाचताना मला पहिल्यांदा व्हॅटिकनमधील प्रमुख स्थळ, सिस्टीन चॅपेल आणि मायकल एंजेलो यांचा संबंध समजला. त्यानंतर मी मायकेलेंजेलोबाबत अधिकाधिक माहिती मिळवत गेले.

आधुनिक इतिहासातील सर्वात प्रेरणादायी आणि प्रतिभावान कलाकारांमध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. त्याच्या कारकिर्दीदरम्यान पाश्चात्त्य जगात अनेक बदल झाले. रोमन साम्राज्याच्या पतनानंतर कदाचित ते सर्वांत उल्लेखनीय बदल होते. बदलांच्या या काळाला पुनरुज्जीवनाचा कालखंड समजलं जातं.

या काळानं धर्म, राजकारण आणि वैज्ञानिक क्षेत्रात अनेक बदल झालेले पाहिले. मायकेलेंजेलो हा या रोमांचक बदलांचा कट्टर समर्थक होता. आपल्या कामाच्या माध्यमातून त्यानं समकालीन समाजाचं प्रतिबिंब आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मायकेलेंजेलोचं काम आणि आयुष्य दोन्हीही गूढ होतं.

मायकेलेंजेलो बुआनारोतीचा (मायकेलेंजेलो डी लोडोविको बुआनारोती सिमोनी) जन्म ६ मार्च १४७५ रोजी इटलीच्या कॅप्रिस येथे झाला. त्याच्या वडिलांनी फ्लोरेन्टाईन सरकारसाठी काम केलं. मायकलच्या जन्मानंतर लवकरच त्याचं कुटुंब फ्लॉरेन्सला परतलं. इटालियन रेनेसन्स काळात फ्लॉरेन्स शहर आघाडीचं कला केंद्र होतं. त्यामुळं मायकेलेंजेलोमध्ये असलेली जन्मजात प्रतिभा विकसित आणि भरभराटीला येण्यासाठी हे शहर अतिशय योग्य जागा ठरलं.

मायकेलेंजेलो सहा वर्षांचा असताना त्याच्या आईचा मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या अंगी असलेली कला त्याचं करिअर होऊ शकतं, ही गोष्ट सुरुवातीला त्याच्या वडिलांच्या पचनी पडत नव्हती. त्यामुळं त्यांचा मायकलच्या चित्रकलेला विरोध होता. पण नंतर मात्र, त्यांनी त्याला पाठिंबा दिला.



वयाच्या तेराव्या वर्षी, मायकल एंजेलो, त्यावेळचे प्रसिद्ध चित्रकार डॉमिनिको गियरलँन्डो यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरवण्यासाठी गेला. डॉमिनिको त्याच्या भित्तीचित्रांसाठी विशेष प्रसिद्ध होते. एका वर्षानंतर, मायकलच्या प्रतिभेनं फ्लॉरेन्समधील आदरणीय व्यक्ती आणि कला संरक्षक असलेल्या लोरेन्झो डी मेडिसी यांचं लक्ष वेधलं. त्यांनी मायकलला आपल्या आलिशान घरातील एक खोली राहण्यासाठी दिली.

लॉरेन्झोच्या मित्र परिवारामध्ये अनेक विद्वान, कलाकार आणि लेखकांचा समावेश होता. त्याच्या घरात राहत असताना मायकलची या सर्वांशी ओळख झाली. या लोकांच्या सहवासात राहून त्याला अनेक गोष्टी शिकता आल्या आणि काहीतरी उल्लेखनीय काम करण्याची प्रेरणा मिळाली. एका वर्षांच्या काळात मायकलला तत्त्वज्ञान आणि राजकारणाबद्दल माहिती मिळाली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

तिथेच प्रख्यात मूर्तिकार ‘बर्टोल्डो डी जिओव्हानी’ यांच्याशी मायकलची ओळख झाली. जिओव्हानी, लॉरेन्झोच्या घरी आणि त्याच्या बागेत असलेल्या प्राचीन रोमन शिल्पांच्या संग्रहाचा रखवालदार म्हणून काम करत होता. जिओव्हानी यांच्या मार्गर्शनाखाली मायकलनं मूर्तीकामाचं स्वत:चं तंत्र विकसीत केलं. मायकेलएंजोलेनं अनेक माध्यमांद्वारे आपली प्रतिभा लोकांना दाखवली असली त्याला आधी आपण स्वतः मूर्तिकार असल्याचाच अभिमान वाटे.

लॉरेन्झो डी मेडिसीच्या घरी राहत असतानाच मायकेलेंजेलोनं शिल्पकार म्हणून आपली पहिली दोन कामं पूर्ण केली होती. मॅडोना ऑफ द सीयर्स आणि बॅटल ऑफ द सेंटॉर्स अशी ही दोन शिल्प होती. त्याच्या वयाचा विचार करता ही दोन्ही शिल्प नक्कीच जटिल होती. अनेक जण त्याच्या कामामुळं प्रभावित झाले. अतिशय कमी काळात, मानवी चित्रण आणि शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यात तो तज्ञ बनला होता.

मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्याने कॅथोलिक चर्चकडून विशेष परवानगीही घेतली होती. यामुळं त्याला मानवी मृतदेह अभ्यासासाठी हाताळता येत होते. मानवी मृतदेहांच्या संपर्कात आल्यामुळे नंतर मात्र, त्याची तब्येत बिघडली होती. पुढे लॉरेन्झोच्या मृत्यूनंतर मायकल वयाच्या एकविसाव्या वर्षी रोमला गेला.

रोममध्ये काम करत असताना त्याला पोपच्या भेटीसाठी आलेले राजा चार्ल्स VIII चे दूत, कार्डिनल जीन बिल्हेरेस डी लाग्रौलासकडून एक कमिशन मिळालं. कार्डिनलला एक भव्य शिल्प तयार करायचं होतं, त्या शिल्पामध्ये व्हर्जिन मेरी आपल्या मृत मुलाला हातामध्ये घेऊन थांबली असल्याचं चित्रण होतं. हे शिल्प म्हणजेचं जगप्रसिद्ध झालेलं ‘पीएटा’ आहे.

पीएटा

६९ इंच उंच असलेल्या आणि मार्बलच्या एका ब्लॉकमध्ये कोरलेल्या दोन गुंतागुंतीच्या आकृती मायकेलेंजेलोच्या नाजूक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहेत. ही कलाकृती ५०० वर्षांपेक्षाही जुनी आहे तरीही सेंट पीटर बॅसिलिकाला भेट देणारी प्रत्येक व्यक्ती तिला पाहून स्तब्ध होते.

१५०१ साली मायकेलेंजेलो फ्लॉरेन्सला परतला. शहरातील सांता मारिया डेल फिओरे कॅथेड्रलमध्ये संगमरवरापासून एक मोठी पुरुषाची मूर्ती तयार करण्याचं काम त्याला मिळालं. त्यानं बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटमधील वीर, उत्साही, शक्तिशाली आणि आध्यात्मिक तरूण डेव्हिडची प्रतिमा या कामासाठी निवडली. १७ फूट उंचीचं हे शिल्प पाहताना ‘लार्जन दॅन लाइफ’ गोष्ट पाहत असल्याचा भास होतो.

१५०५ साली, पोप ज्युलियस II ने मायकेलेंजेलोला ४० शिल्प असलेलं एक भव्य थडगं तयार करण्याचं काम दिलं. मायकलनं कामाला सुरुवात केली. परंतु, पोप लष्करी वादात अडकला आणि कामासाठी निधीची कमतरता जाणवू लागली. या प्रकारामुळं नाराज मायकेलेंजेलो रोम सोडून निघून गेला.

१५०८ साली, ज्युलियसने मायकेलेंजेलोला कमी खर्चिक, पण तरीही महत्वाकांक्षी कामासाठी रोमला परत बोलवलं. सिस्टिन चॅपलच्या छतावर १२ प्रेषितांचं चित्रण करण्याचं काम त्याला देण्यात आलं.

सिस्टीन चॅपेलच्या छतावरील शिल्पे

सिस्टिन चॅपेल व्हॅटिकनचा सर्वात पवित्र भाग मानला जातो. त्याठिकाणी नवीन पोप निवडले जातात. चार वर्षे अथक परिश्रम करून मायकलनं चॅपेलच्या छताच्या सीमेभोवती १२ चित्रे रेखाटली. ‘द क्रिएशन ऑफ ॲडम’ हे सिस्टीन चॅपेल सीलिंगवरील सर्वात प्रसिद्ध पेंटिंग आहे. ज्यामध्ये देव आणि ॲडम एकमेकांकडे हात करत असल्याचं चित्रण आहे.

सिस्टीन चॅपेलच्या छतावरील ‘क्रिएशन ऑफ ॲडम’ शिल्प

मायकेलेंजेलो एक शिल्पकार आणि चित्रकार म्हणून सर्वांना माहित आहे. मात्र, त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक पैलू आहे. तो एक उत्तम कवी होता. त्यानं ३०० पेक्षा जास्त कवितांची रचना केलेली होती. आपली जवळची मैत्रिण विटोरिया कोलोनाला त्यानं पत्राच्या माध्यमातून अनेक प्रभावी सॉनेट्स पाठवल्या होत्या.

मायकल त्याच्या काळातील सर्वात श्रीमंत कलाकार होता. जेव्हा त्याचं निधन झाल, तेव्हा त्याच्या मागे ५० हजार फ्लोरिन्सची (आताचे ५० करोड डॉलर्स) मालमत्ता होती. १५६४ साली वयाच्या ८९व्या वर्षी मायकेलेंजेलोचं निधन झालं. एका मोठ्या औपचारिक समारंभात सेंट अपोस्तोली चर्चमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला.

मायकेलेंजेलोचे थडगे

साहित्यावर जसा विल्यम शेक्सपियर, मानसशास्त्रावर सिग्मंड फ्रुएडचा प्रभाव मानला जातो तसाच कलेवर मायकेलेंजेलोचा प्रचंड प्रभाव आहे. त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा होती आणि आपल्या विविध कलाकृतींमधून त्यानं ती लोकांना दाखवून दिली. गेल्या कित्येक शतकांपासून कलेच्या क्षेत्रातील लोकांना प्रेरणा देण्याचं काम तो करतो आहे. रेनेसान्स काळातील कलेसाठी मायकेलेंजेलो हे नाव जणू समानअर्थी शब्दच झालेला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

शाही कुटुंबात जन्मलेल्या या महिलेने ३०० मुलींचा अमानुष छळ करून ह*त्या केली होती

Next Post

‘आंद्रे द जायंट’च्या तशा अवाढव्य शरीरामागे एक मोठी शोकांतिका होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

'आंद्रे द जायंट'च्या तशा अवाढव्य शरीरामागे एक मोठी शोकांतिका होती

२८ वर्ष पोलिसांना न उलगडलेलं कोडं, १५ वर्षांच्या पोराने 'गो प्रो' कॅमेऱ्याच्या मदतीने सोडवलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.