The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजही रस्त्यावर ‘पोर्श’ कार दिसल्यावर तिच्याकडे थांबून पाहायचा मोह आवरता येत नाही

by Heramb
4 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कार प्रेमी असाल आणि मुंबईवारी झाली तर फोर्ट, गेटवे ऑफ इंडिया, ताज आणि समुद्रकिनाऱ्यांसह एका ठिकाणी नक्कीच जाणं होतं, ते म्हणजे जुहूमधील ‘पोर्श’चं शोरूम! अनेक आलिशान आणि प्रीमियम पोर्श कंपनीच्या गाड्या याठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. पोर्श ही जगातील अनेक महागड्या पण सर्वोत्कृष्ट ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक आहे. ही एक जर्मन ऑटोमोबाईल कंपनी असून गेल्या अनेक वर्षांपासून उच्च कार्यक्षमता असलेल्या स्पोर्ट्स कार, एसयूव्ही कार्स आणि सेडान कार्स तयार करण्यात त्यांनी प्राविण्य मिळवलेलं आहे. या कंपनीचे मुख्यालय जर्मनीमधील स्टटगार्ट येथे आहे.

‘पोर्श’ ही कंपनी खरंतर ‘फोक्सवॅगन एजी’च्या मालकीची असून त्यांचा कंट्रोलिंग स्टॅक ‘पॉर्श ऑटोमोबिल होल्डिंग एसई’च्या मालकीचा आहे. पोर्श कंपनी सध्या ७१८ बॉक्सस्टर केमॅन, ९११ पॅनामेरा, मॅकन, कायेन आणि अत्याधुनिक टायकन यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करते.

आपलं महत्त्व वाढवत ही कंपनी आज जगातील सर्वोत्कृष्ट कार्स तयार करणारी कंपनी ठरली आहे हे विधान अतिशयोक्त ठरणार नाही. पण यशाचं शिखर गाठण्याआधी या कंपनीनेही अनेक चढ-उतार आणि आव्हानांवर मात केली आहे. एका लहानशा कार कंपनीपासून ते सर्वोत्कृष्ट कार कंपनीपर्यंतचा पोर्शचा हा प्रवास अविस्मरणीय आहे.

पोर्शचा सर्वांत पहिला लोगो

२५ वर्षीय ‘फर्डिनांड पोर्श’ला इलेक्ट्रिक लोहनेर-पोर्श या कारने प्रसिद्धी मिळवून दिली. इसवी सन १९०० साली पॉर्शने गॅसवर चालणारी रेस कार तसेच वीज आणि पेट्रोलवर चालणारी हायब्रिड वाहने विकसित केली. यालाच ‘काळाच्या पुढे असणे’ म्हणतात. मूळ लोहनेर-पोर्श ऑस्ट्रियन ‘रॉयल कॅरिज’ उत्पादक ‘जेकब लोहनेर आणि कंपनी’साठी तयार केली गेली होती आणि या कारचा वेग सुमारे ३७ मीटर प्रतितास इतका होता.



सन १९१० साली फर्डिनांड पोर्शने ‘ऑस्ट्रो-डेमलर’ टुरिंग कारचं डिझाईन केलं. या वरवर साध्या दिसणाऱ्या कारने अनेकांना प्रभावित केलं होतं, कारण ही कार मोठ्या प्रमाणात स्पर्धात्मक होती. मोटर इव्हेंट्समधील प्रिन्स हेन्नी ट्रायल्समध्ये ऑस्ट्रो-डेमलर टुरिंग कारने तीन विजय मिळवले.

ऑस्ट्रो-डेमलर

यानंतर फर्डिनांड पोर्श हे ऑटोमोटिव्ह कंपनी ‘डेमलर-मोटोरेन-गेसेलशाफ्ट’चे टेक्निकल डायरेक्टर म्हणजेच तांत्रिक संचालक आणि बोर्ड मेम्बर बनले आणि सन १९२३ मध्ये आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स कारपैकी एक असलेली ‘द मर्सिडीज कॉम्प्रेसर’ डिझाइन केली. पुढे १९२७ साली त्याने मर्सिडीज-बेंझ एस-टाईप तयार करत रेस कारमध्ये त्यांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले.

फर्डिनांड पोर्शने १९३१ साली डॉ. डॉल्फ रोसेनबर्गर आणि अँटोन पिच यांच्यासह “डॉ. इंजी. सी. एफ. पोर्श जीएमबीएच” नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीचे मुख्य कार्यालय स्टुटगार्टमध्ये होते. सुरुवातीला, कंपनीने मोटार वाहन विकास आणि त्याबद्दलचा सल्ला देण्याची ऑफर दिली. परंतु स्वतःच्या नावाखाली कोणतीही कार तयार केली नाही.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१९३३ साली पोर्शने ‘ऑटो युनियन टाईप-ए’ विकसित केले. आपण ज्या कारला ‘एफ-१’ किंवा ‘फॉर्मुला-१’ म्हणून ओळखतो त्यातील बहुधा हे पहिलेच वाहन. ही उत्कृष्ट रेसकार ताशी १७० मैल इतका वेग गाठू शकते. याच गाडीच्या इंजिनचे डिझाईन पुढे वोक्सवॅगनच्या सुप्रसिद्ध बीटल कारसाठी वापरण्यात आले.

ऑटो युनियन टाईप-ए

“डॉ. इंजी. सी. एफ. पोर्श जीएमबीएच” कंपनीला मिळालेल्या पहिल्या काही कामांपैकी एक म्हणजे लोकांसाठी कार तयार करणे, हे काम जर्मनीच्या ना*झी सरकारने दिले होते. हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘वोक्सवॅगन’ कंपनीची स्थापना करून आतापर्यंतची सर्वांत यशस्वी व्हॉक्सवॅगन बीटल ही कर तयार करण्यात आली.

वोक्सवॅगन बीटल

पुढे १९३९ साली बीटलच्याच अनेक घटकांचा वापर करून पोर्श-६४ तयार करण्यात आली. बीटलच्या निर्मितीनंतर १९३९ सालीच ‘बर्लिन-रोम-वेगन’ नावाची वेगवान, स्टायलिश आणि तितकाच उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारी रेस-कार पोर्शने तयार केली.

बर्लिन-रोम रेस कार

डेर स्पीगेलने २००९ साली हे समोर आणले की कंपनी यु*द्धाच्या काळातील तिच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करते. फर्डिनांड पोर्श हि*टल*रचा सर्वात मोठा समर्थक नव्हता परंतु त्याने जबरदस्तीने श्रमिक कामगारांकडून ना*झींसाठी बख्तरबंद वाहने तयार करून घेतली. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, कंपनीने यु*द्धाच्या काळात जबरदस्तीने काम केले आहे हे सिद्ध करणाऱ्या प्रत्येकाला पैसे दिले. कंपनीच्या अंदाजानुसार ५० पेक्षा जास्त सक्तीचे कामगार वापरले गेले नाहीत. पण अनेकांच्या मते ही संख्या ३०० च्या आसपास आहे.

दुसऱ्या महायु*द्धानंतर उदयाला आलेली पोर्श-३५६ ही मर्सिडीज् किंवा डेमलर ऐवजी निर्मिलेली पोर्शची पहिली स्पोर्ट्स कार होती. या गाडीच्या लाँचनंतर तीन वर्षांनी १९५१ मध्ये फर्डिनांड पोर्श यांचे निधन झाले. १९५६ पर्यंत पोर्श-३५६ च्या १० हजार मॉडेल्स विकल्या गेल्या होत्या.

पोर्श-३५६

फर्डिनांड पोर्शच्या मृत्यूने खचून न जाता कंपनीने त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी ‘द ५५० स्पायडर’ या अभूतपूर्व गाडीचे अनावरण केले. या कारने १९५० च्या दशकात कित्येक प्रसंगी इटलीची ‘टारगा फ्लोरियो’ नावाची ‘ओपन रोड एन्ड्युरन्स मोटर रेस’ जिंकली. या रेसमध्ये खुल्या रस्त्यावर गाडीची सहनशक्ती पहिली जाते. पुढे १९६२ मध्ये ५० हजार कार्सचा उत्पादन टप्पा गाठल्यानंतर पोर्शने काहीशा वादग्रस्तपणे त्याचे सर्वात मोठे मॉडेल ९११ चे अनावरण केले. तर १९६९ साली फ्रँकफर्ट ऑटो शोमध्ये पॉर्श ने अधिक आयताकृती मॉडेल, व्ही-डब्लू पोर्श-९१४ अनावरित केले.

व्ही-डब्लू पोर्श-९१४

सन १९७२ साली निर्णयात्मक वळण घेत फर्डिनांड पोर्शचा मुलगा फेरी पोर्शच्या नेतृत्वाखाली पोर्श कम्पनी ‘पब्लिक कम्पनी’ म्हणून उदयास आली. यावेळी कंपनी प्रामुख्याने त्याचं सदाबहार असलेलं मॉडेल, मॉडेल-९११ कॅरेराचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करीत होती.

कंपनीने पोर्श-९५९चा लुक आणि मॉडेल-९११चा लुक एकत्रित करून पोर्श-९१४च्या स्क्वेअर बॅक-एन्डसह नव्याने मॉडेल-९११ तयार केले. हे नवे मॉडेल १९८५च्या फ्रँकफर्ट ऑटो शोमध्ये सादर करण्यात आले. तीन वर्षांनंतर कंपनीने ऑल-व्हील-ड्राइव्हसह क्लासिक कारचे मॉडेल ऑफर करून मॉडेल-९११चे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले.

पोर्श-९११

आतापर्यंत सबंध जगामध्ये गाड्यांची उत्पादने, विक्री आणि उपयोग वाढला होता. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते, अशाच अपघातांमधील जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने आणि प्रवाशांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने कारमध्येच काहीतरी व्यवस्था असणे गरजेचे होते. १९९१ साली, पुढे बसणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व कार्समध्ये एअरबॅगची सुविधा देणारी पोर्श ही पहिलीच जर्मन कर कंपनी बनली.

‘बॉक्सस्टर’ या सर्वोत्कृष्ट रोडस्टरसाठी १९९३ साली योजनांचे अनावरण केल्यानंतर, पोर्शने १९९६ साली बॉक्सस्टरचे उत्पादन सुरु केले. या मॉडेलच्या लोकप्रियतेमुळे १९९९ साली बॉक्सस्टर-एस ही अद्ययावत कार पोर्शने बाजारात आणली. १९९६ मध्ये काही कारणाने दहा लाख पोर्श प्रोडक्शन लाईन्स बंद होत्या तरीही या ‘बॉक्सस्टर’ मॉडेलची लोकप्रियता कमी झाली नाही.

बॉक्सस्टर

सन २००० नंतर मात्र काही प्रमाणात पोर्शची लोकप्रियता कमी झाली. २००० आणि २००२ मध्ये काहीसं हास्यास्पद सूप-अप कॅरेरा जीटी रिलीज केल्यावर कंपनीने ‘केयने’ मालिका, पोर्शची पहिली ‘एसयूव्ही’ योजना जाहीर केली. दलदलीतून अस्वस्थपणे चालणाऱ्या मगरीप्रमाणे दिसणाऱ्या त्या पोर्श एसयुव्हीची कल्पनाही आपण आज करू शकत नाही.

पण या समस्येवर मात करत २००९ साली म्हणजेच पोर्श कार्सच्या शतकमहोत्सवी वर्षात कंपनीने एक स्पोर्टी चार-दरवाजाचे मॉडेल रिलीज केले, पॅनामेरा स्पोर्ट्स कारला एका लक्झरीअस कारसह कम्बाईन करून त्यांनी हे मॉडेल तयार केले होते आणि या मॉडेलनेही बाजारात आपली किमया दाखवून दिली.

९१८ स्पायडर

२०११ साली ९१८ स्पायडर मॉडेल रिलीज करण्यात आले. ९१८ स्पायडर कदाचित सर्व हायब्रिड कारची जननी आहे. सध्याच्या युगात नैसर्गिक साधनसंपत्तीचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने आणि सगळीकडेच इंधनदर वाढल्याने विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांची मागणी वाढत आहे. आजमितीस पोर्श कंपनी टायकन गाड्यांची निर्मिती करीत आहे, हे मॉडेल विद्युत उर्जेवर कार्यान्वित होणारं पोर्शचं पहिलं मॉडेल आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

तरुणांनी आंदोलन केलं म्हणून महानगरपालिका न्यूयॉर्कच्या रस्त्यावरचा कचरा उचलायला लागली

Next Post

राजपरिवारातील व्यक्तींना स्पर्श करण्याची परवानगी नव्हती म्हणून राजकुमारी सुनंदाने जीव गमावला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

राजपरिवारातील व्यक्तींना स्पर्श करण्याची परवानगी नव्हती म्हणून राजकुमारी सुनंदाने जीव गमावला

राजा राम वर्मन कुलशेखर हा इस्लामचा स्वीकार करणारा पहिला भारतीय राजा होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.