The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकन तरुणांना सैन्यात भरती व्हायला सांगणारा अंकल सॅम नेमका कोण होता..?

by Heramb
21 October 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


शाळेतील एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आपल्या मित्रांना त्यांच्या मूळ नावाने हाक न मारता, त्या मूळ नावामध्ये, आडनावामध्ये किंवा वडिलांच्या नावामध्ये गहन संशोधन करून त्याचं वेडंवाकडं स्वरूप शोधून त्या मित्राचं नामकरण करायचं आणि पुढे आयुष्यभर शाळेच्या मित्रांमध्ये त्याला ते नाव चिटकून राहतं. मग कधी अनिकेतचा अंड्या होतो, देशपांडेंचा पांड्या, अभिषेकचा अभ्या, एखाद्याच्या वडिलांचे नाव केशव असल्यास त्याचं नामकरण सर्रास ‘केशवसुत’ हे होतंच. फक्त शाळेतील आणि कॉलेजमधील विद्यार्थीच नाही तर साहित्यातील लेखकही वेगवेगळ्या टोपणनावांनी साहित्यरचना करतात. तर काही दिग्गज चित्रपट कलावंतसुद्धा त्यांच्या टोपणनावांनी प्रसिद्ध असतात.

अशी अगणित टोपणनावे आणि त्याची उदाहरणे सांगता येतील. पण कुठल्या देशाला अधिकृत ‘टोपण नाव’ असल्याचे तुम्ही ऐकले आहे का? पण स्वतःला ‘महासत्ता’ म्हणवणाऱ्या अमेरिकेला मात्र अगदी अधिकृत असं टोपण नाव आहे.

७ सप्टेंबर १८१३ रोजी युनायटेड स्टेट्सला त्याचे ‘अंकल सॅम’ हे टोपणनाव मिळाले. “अंकल सॅम” पात्राचे नेमके मूळ जरी अस्पष्ट असले तरी या लोकप्रिय आख्यायिकेनुसार “अंकल सॅम” हे नाव ‘सॅम्युअल विल्सन’पासून आले आहे. हे नाव न्यूयॉर्कच्या ट्रॉय येथील मांसाचे पॅकेजिंग करणाऱ्या सॅम्युएल विल्सन या व्यापाऱ्याशी संबंधित आहे. याच सॅम्युएल विल्सनने १८१२ च्या यु*द्धादरम्यान अमेरिकी सैन्याला बीफचे पॅकेज्ड बॅरल्स पुरवले होते.

त्यावेळी सरकारच्या कंत्राटदारांनी पाठवलेल्या पॅकेजेसवर त्यांच्या नावाचा शिक्का उमटवण्याची आवश्यकता होती आणि तसेच ते पाठवत असलेल्या अन्नावर ते पॅकेज कोठून आले हे असणेही आवश्यक होते.



विल्सनच्या पॅकेजेसवर “E.A.—U.S.” असे लेबल होते. कोणीतरी सहज विचारले हे असे कशासाठी आहे, तर एका सहकाऱ्याने विनोदाने उल्लेख करत “एल्बर्ट अँडरसन आणि अंकल सॅम” असे सांगितले. खरंतर यामधील एल्बर्ट अँडरसन हे त्या अन्नपुरवठ्यासंबंधी कंत्राटदाराचे नाव होते आणि यु.एस.चा अर्थ “युनायटेड स्टेट्स” असा होता.

स्थानिक वृत्तपत्राने या गोष्टीला प्रसिद्ध केले आणि अखेरीस प्रत्यक्षातच ‘अँकल सॅम’ला यूएस फेडरल सरकारचे व्यक्तित्मक रूप आणि टोपणनाव म्हणून लोकांमध्ये स्वीकृती मिळाली. पण अजून अंकल सॅम सगुण साकार झाला नव्हता.

१८६० आणि १८७० च्या उत्तरार्धात राजकीय व्यंगचित्रकार ‘थॉमस नॅस्ट’ याने अंकल सॅमची प्रतिमा लोकप्रिय करण्यास सुरुवात केली. नॅस्टने आपल्या प्रतिमेत आवश्यक ते बदल करत ती प्रतिमा विकसित करणे सुरू ठेवले. अखेरीस अंकल सॅमला आज जसा तो दिसतो त्याप्रमाणे पांढरी दाढी आणि तारे, पट्टे असलेला सूट घालून तयार करण्यात आले. 

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जर्मनीमध्ये जन्मलेल्या नॅस्टला सांताक्लॉजची आधुनिक प्रतिमा तयार करण्याबरोबरच अमेरिकेतील दोन प्रमुख राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हं तयार करण्याचे श्रेय जाते. त्याने डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रतीक म्हणून गाढव आणि रिपब्लिकन पार्टीचे प्रतीक म्हणून हत्ती ही दोन चिन्हे तयार केली. नॅस्टने आपल्या संपादकीय व्यंगचित्रांमध्ये न्यूयॉर्क शहराच्या टॅमनी हॉलमधील भ्रष्टाचाराला प्रसिद्धी दिली. यामुळे टॅमनी नेता विलियम ट्विड यांच्या पालनासाठी काही अंशी नॅस्टला जबाबदार ठरवण्यात येते.

अंकल सॅमची सर्वात प्रसिद्ध प्रतिमा, कलाकार जेम्स मॉन्टगोमेरी फ्लॅगने तयार केली होती. फ्लॅगच्या या आवृत्तीत, अंकल सॅम एक उंच टोपी आणि निळं जाकीट घालून आपल्या बोटाने थेट दर्शकाकडे निर्देश करत आहे. पहिल्या महायु*द्धादरम्यान, “आय वॉन्ट यू फॉर द यूएस आर्मी” या शब्दासह सॅमचे हे चित्र सैन्य-भरती पोस्टर म्हणून वापरले गेले.

अत्यंत लोकप्रिय झालेली ही प्रतिमा जुलै १९१६ मध्ये लेस्लीच्या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर “तुम्ही तयारीसाठी काय करत आहात?” या मथळ्याखाली प्रथम वापरली गेली. हे पोस्टर मोठ्या प्रमाणावर वितरीत केले गेले आणि नंतर वेगवेगळ्या शीर्षकांसह आणेल वेळा वापरले गेले.

सप्टेंबर १९६१ मध्ये यूएस काँग्रेसने सॅम्युअल विल्सनला “अमेरिकेच्या राष्ट्रीय अंकल सॅमचे पूर्वज” म्हणून मान्यता दिली. १९८९ साली “अंकल सॅम डे”सुद्धा अधिकृत झाला. सॅम्युअल विल्सनचा जन्मदिवस १३ सप्टेंबर १९८९ रोजी ‘१३ सप्टेंबर’ हा “अंकल सॅम डे” म्हणून साजरा करण्याचा ठराव काँग्रेसने पास केला.

सॅम्युअल विल्सनची आठवण करून देणारी या ‘अंकल सॅमची’ दोन स्मारकं आहेत: ‘आर्लिंग्टन, मॅसेच्युसेट्समधील अंकल सॅम मेमोरियल पुतळा’, हे त्याच्या जन्मस्थानाजवळ आहे आणि रिव्हरफ्रंट पार्क, ट्रॉय, न्यूयॉर्क मधील त्याच्या दीर्घकालीन निवासस्थानाजवळ एक स्मारक आहे. न्यू हॅम्पशायरच्या मेसनमध्ये विल्सनच्या बालपणातील घरालाही भेट देता येते.

सॅम्युअल विल्सनचे ३१ जुलै १८५४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्याची कबर त्याच्या पत्नीच्या म्हणजेच बेट्सी मानच्या कबरीशेजारीच करण्यात आली. या दोघांनाही न्यूयॉर्कमधील ट्रॉयच्या ओकवूड दफनभूमीत दफन करण्यात आले. याच दफनभूमीला ‘अंकल सॅमचे घर’ असेही म्हणतात. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

मीम बनलेल्या या लहान मुलाने इंटरनेटवरुन मदत उभी करून वडिलांचं किडनी ट्रान्सप्लांट केलंय

Next Post

एका मोठ्या गैरसमजातून प्लेग डॉक्टर्स विचित्र चोचीच्या आकाराचे मास्क वापरायचे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एका मोठ्या गैरसमजातून प्लेग डॉक्टर्स विचित्र चोचीच्या आकाराचे मास्क वापरायचे

सांगूनही खरं वाटणार नाही, आज उच्चभ्रू लोकांचा खेळ असलेल्या 'पोलो'चा शोध भारतात लागलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.