The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टॅलिनच्या या मुलीला सगळं आयुष्य रशियापासून दूर पळत वनवासात काढावं लागलं

by द पोस्टमन टीम
1 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१९६७ साली मार्च महिन्यातील एका रात्र. रात्रीच्या अंधारात प्रत्येकजण विसाव्याचे काही क्षण मिळवण्याच्या तयारीत होता. त्यावेळचे भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड सेलेस्टेसुद्धा झोपण्याची तयारी करत होते. मात्र, अचानक त्यांना अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयातून फोन आला. लवकरात लवकर त्यांनी कार्यालयात पोहचावं, असं फोनवर सांगण्यात आलं.

एक महिला एक जोडी सुटकेससह अमेरिकन दुतावासात आश्रय मागत असल्याचं रिचर्डला कार्यालयात पोहचल्यानंतर दिसलं. त्या महिलेनं रशियन पासपोर्ट सादर केला होता. आपण एकेकाळच्या रशियन हुकुमशाहची मुलगी असल्याचं ती सांगत होती. इतकचं नाही तर ती भारताची सून असल्याचंही सांगत होती. अशी महिला होती कोण? तिच्या येण्यानं अमेरिकन दूतावासात मध्यरात्री गोंधळ का उडाला होता? ही महिला खरोखर रशियन राज्यकर्ता जोसेफ स्टॅलिनची मुलगी, स्वेतलाना अलिलुयेवाच होती!

माजी अमेरिकन राजदूत रिचर्ड सेलेस्टे यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव एका पुस्तकामध्ये संकलित केले आहेत. त्यानिमित्त त्यांनी स्वेतलानाच्या भारत भेटीला उजाळा दिला. स्वेतलाना सांगत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं अमेरिकन्सना कठिण जात होतं, कारण तो काळ शीतयु*द्धाचा होता.

रशियन स्वेतलानाच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी कट शिजवत असल्याचा संशय घ्यायला जास्त कल्पनाशक्ती नक्कीच आवश्यक नव्हती. त्यात ती महिला होती. जर तिला रात्री आश्रय दिला आणि तिने अमेरिकन दूतावासातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर छळ केल्याचे आरोप केले तर अमेरिकेची प्रतिष्ठा नक्कीच पणाला लागली असती. त्यामुळं तिचं करायचं काय? असा कठिण प्रश्न निर्माण झाला होता.

तिच्याशी कॉन्सुलर कार्यालयात बोलणी केल्यानंतर अमेरिकन लोकांकडे तीन पर्याय समोर आले. भारत सरकारला कळवून तिची जाण्याची सोय करण्यासाठी मदतीची औपचारिक विनंती करणं, तिला कार्यालयातून हकलून लावणं किंवा अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा देणं, पण, अर्ध्याच रस्त्याचं टिकिट काढून देणं. याबाबत वॉशिंग्टनला एक केबल मेसेज देखील पाठवण्यात आला होता.



स्वेतलानाला रशियाला जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. या सर्व गोष्टींचा विचार करून तिला रोमपर्यंतचं तिकीट काढून देण्यात आलं. तिथून ती जिनिव्हाला गेली. या घटनेनंतर अमेरिका, भारत आणि रशियातील संबंधांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काहीही झालं तरी स्वेतलाना रशियातील एक महत्वाची व्यक्ती होती आणि भारतीयांनी या अत्यंत महत्वाच्या पाहुण्याची योग्य काळजी घेतली नव्हती.

या मुद्द्यावरून सोव्हिएत संघ इंदिरा गांधी सरकारवर नाराज झालं. काही आठवड्यांनंतर आपले मुख्य सचिव एल. के. झा यांना इंदिरा गांधींनी स्वित्झर्लंडमध्ये स्वेतलानाला भेटण्यासाठी पाठवलं. झा यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिचं असं देश सोडून जाणं दोन देशांमधील संबंधांना हानी पोहचवत असल्याचं सांगून सोव्हिएतला परत जाण्यासाठी समजूत घातली. निदान आपल्या मुलांसाठी तरी तिने परत जावे, अशी भावनिक विनंती झा यांनी तिला केली होती. मात्र, तिने ती मान्य केली नाही. काही काळ जिनिव्हामध्ये राहिल्यानंतर तिनं प्रयत्न करून अमेरिकेत आश्रय मिळवला.

हा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर दोन प्रश्न नक्कीच उपस्थित राहतात. पहिला म्हणजे स्वेतलाना देश सोडून भारतातच का आली आणि दुसरा, भारतीय दुतावासानं तिला मदत का नाही केली? स्टॅलिनची ‘लिटील स्पॅरो’ स्वेतलाना एका भारतीय व्यक्तीच्या प्रेमात होती! १९३०च्या दशकात मॉस्कोला आपलं घर बनवणाऱ्या अनेक भारतीय कम्युनिस्टांपैकी एक असलेल्या सौम्य आणि हुशार ब्रजेश सिंह यांच्याशी स्वेतलानाचे प्रेमसंबंध होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

१९६३ साली टॉन्सिलेक्टॉमीसाठी रुग्णालयात असताना स्वेतलाना आणि कुंवर ब्रजेश सिंह यांची पहिल्यांदा भेट झाली होती. ब्रिजेश यांना श्वसनलिकेचा गंभीर आजार होता. मात्र, तरी देखील दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. स्वेतलानानं ब्रजेशला तिचा पती मानलं होतं. तसं ती जाहीरपणे सांगत देखील होती. मात्र, सोव्हिएत अधिकाऱ्यांनी दोघांना कधीही लग्न करण्याची परवानगी दिली नव्हती. १९६६ साली ब्रिजेश सिंह यांचं निधन झालं. त्यांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी स्वेतलाना भारतात येण्यास प्रयत्नशील होती.

सोव्हिएत नेत्यांनी तिला सिंहच्या अस्थीसह भारतात येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिनं भारताला भेट दिलीच. उत्तर प्रदेशातील ब्रिजेश यांच्या वडिलोपार्जित गावामध्ये जाऊन स्वेतलानाने त्यांचे अंतिम विधी पूर्ण केले. नेमकं ज्यावेळी भारतात सार्वत्रिक निवडणुकी तोंडावर होत्या त्यावेळी ती दिल्लीत आली. या निवडणुकांमुळे मीडिया किंवा कोणत्याही राजकीय नेत्यानं स्वेतलानाच्या दिल्लीतील उपस्थितीत रस घेतला नाही. तिकडे रशिया तिला परत येण्यासाठी दबाब टाकत होता. परिणामी तिनं अमेरिकन दुतावासाची मदत घेतली. त्यांच्या मदतीनं अगोदर तिनं जिनिव्हा गाठलं आणि नंतर अमेरिका!

जेव्हा स्वेतलाना अमेरिकेत पोहोचली तेव्हा तिनं साम्यवाद, तिचे वडील आणि त्यांच्या धोरणांचा जाहीर निषेध केला. स्टॅलिनला तिनं ‘नैतिक आणि आध्यात्मिक राक्षस’ म्हटलं. स्वेतलानाला राजकीय आश्रय दिल्यामुळं जागतिक स्तरावर अमेरिकेला देखील मोठ्या प्रमाणात कौतुक मिळालं. काही वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर १९८०च्या दशकात ती सोव्हिएत युनियनमध्ये परतली.

मात्र, नातेवाईकांशी भांडण केल्यावर ती पुन्हा अमेरिकेत गेली. आपल्या वडिलांनी निर्माण केलेल्या राज्यात आपण कधीच राहू शकत नाही याची जाणीव तिला या घटनेतून झाली होती. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी वडिलांच्या कृत्यांमुळं आपल्याला एक राजकीय कैदी म्हणूनच वागणूक दिली जाते, अशी खंत स्वेतलानानं एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

स्वेतलाना एक समिक्षक आणि लेखिका देखील होती. सोव्हिएत युनियनमध्ये असताना, १९६३ साली रशियन भाषेत एक संस्मरण(मेमॉयर) लिहिलं होतं. भारतातीय राजदूत टी. एन. कौल यांनी सुरक्षितपणे ते हस्तलिखित तिच्यापर्यंत पोहचवलं होतं. नवी दिल्लीत असताना तिनं ते हस्तलिखित सीआयए एजंट रॉबर्ट रायले यांच्या स्वाधिन केलं होतं.

रायले यांनी ते तिच्या नावाखाली प्रकाशित केलं. अमेरिकेमध्ये तिच्या या पुस्तकाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. २२ नोव्हेंबर २०११ रोजी वयाच्या ८५व्या वर्षी स्वेतलानाचा मृत्यू झाला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील केअर होममध्ये तिनं अखेरचा श्वास घेतला. तिला आतड्याचा कर्करोग झाला होता.

स्वेतलाना एकेकाळी जगातील सर्वात प्रभावशाली नेता असलेल्या स्टॅलिनची मुलगी होती. तिला एखाद्या राजकुमारीप्रमाणं वागणूक मिळणं अपेक्षित होतं मात्र, तिला एखाद्या राजकीय कैद्याप्रमाण आपलं आयुष्य काढाव लागलं, ही खेदाची गोष्ट आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकन शेअर बाजारात लिस्ट झालेल्या या भारतीय कंपनीने ५०० कर्मचाऱ्यांना करोडपती बनवलंय

Next Post

ब्रिटनने बर्फापासून विमानवाहू युद्धनौका बनवण्याचा प्लॅन केला होता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

ब्रिटनने बर्फापासून विमानवाहू युद्धनौका बनवण्याचा प्लॅन केला होता

चक दे इंडियातील कोच 'कबीर खान' म्हणजे खऱ्या आयुष्यातील मीर रंजन नेगी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.