The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मियांदादचा जीव अडकलेली ऑडी रवी शास्त्रींनी जिंकली आणि टशन के साथ मैदानावर फिरवली

by द पोस्टमन टीम
20 September 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


क्रिकेटपटू आणि महागड्या लक्झरियस गाड्या हे आता समीकरणच झालेलं आहे. जगभरातील क्रिकेटपटूंकडे ‘एक से बढकर एक’ दुचाकी आणि चारचाकी गाड्या आपल्याला पहायला मिळतात. भारतीय खेळाडूंचा विचार केला तर जवळपास सगळ्याच क्रिकेटपटूंकडे महागड्या गाड्या आहेत. थला महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहलीकडे तर महागड्या गाड्यांचा ताफाच आहे.

धोनीकडे पोर्श ९११, पोंटियॅक फायरबर्ड ट्रान्स एम, फेरारी ५९९ जीटीओ या व्हिन्टेज गाड्या तर निसान जोंगा, जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक, लँड रोव्हर फ्रीलँडर २, ऑडी क्यू ७ या आलिशान गाड्या आहेत. विराट कोहलीकडे देखील डझनभर गाड्या आहेत. यात ऑडी, बेंटले, रेंज रोव्हर अशा गाड्यांचा समावेश आहे. विराटकडे तब्बल सात गाड्या या ऑडी कंपनीच्या आहेत.

मात्र, याव्यतिरिक्त असा एक भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याच्याकडे असलेली ऑडी कार फक्त भारतातच नाही तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील प्रसिद्ध आहे! विशेष म्हणजे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ही गाडी अगदी व्यवस्थित सुरू आहे! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असा कुठला खेळाडू आहे ज्याची गाडी तीन देशांमध्ये प्रसिद्ध आहे? टीम इंडिया आणि मिमर्सचे लाडके शास्त्री मास्तर या गाडीचे मालक आहेत! हो, भारतातील सर्वात प्रसिद्ध ऑडी गाडी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या मालकीची आहे.

एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, कोच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सर्वोत्तम समालोचकांपैकी एक असलेले रवी शास्त्री कायम काही न काही कारणांमुळं प्रसिद्धीच्या झोतात असतात. २८ वर्षांनंतर भारताने २०११ साली दुसरा आयसीसी क्रिकेट विश्वचषक उंचावला तेव्हा बॅकग्राऊंडला असणारा रवी शास्त्रीचा आवाज कित्येक दशकं क्रिकेट रसिकांच्या कानात घुमत राहिला.

समालोचक म्हणून वावरत असताना शास्त्रींनी अनेक कॅचफ्रेज तयार केलेले आहेत. ‘like a tracer bullet’ हा त्यापैकीचं एक आहे. जेव्हा-जेव्हा बॅट्समननं मारलेला बॉल मैदानाच्या टर्फकडे जाई तेव्हा शास्त्री त्याच्या वेगाची तुलना ट्रेसर बुलेटसोबत करत असे. अशीच एक ट्रेसर बुलेट शास्त्रीच्या मालकीची आहे आणि ती म्हणजे त्यांची ‘ऑडी १००’ ही कार.



रवी शास्त्रीनं १९८५ साली क्रिकेटच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जिंकलेली ‘ऑडी १००’ सेडान भारतीय क्रिकेटच्या विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. ही गाडी प्रसिद्ध होण्यामागचं कारण फारच रंजक आहे.

१७ फेब्रुवारी ते १० मार्च १९८५ या काळात ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ‘बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट’ या नावानंही ओळखली जाते. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धींमध्ये या कपचा अंतिम सामना झाला होता. सुनील गावसकर यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये उतरला होता.

भारतानं आपले सर्व साखळी सामने जिंकून अंतिम सामन्यात जागा मिळवली होती. तिकडे पाकिस्ताननं देखील वेस्ट इंडिजचा पराभव करून अंतिम सामन्यात धडक मारली होती. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्रींनी नाबाद ६३ धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता.

१९८३च्या विश्वचषकानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून भारत देखील जागतिक स्पर्धा जिंकू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं. अंतिम सामन्याच्या प्रेझेंटेशन सेरेमनीच्या वेळी ‘न भूतो न भविष्यती’ अशी घटना घडली होती. क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदा एक ऑडी कार आली होती आणि त्या कारवर बसून भारतीय संघातील खेळाडू विजयाचा आनंद साजरा करत होते. मालिकावीर म्हणून भारतीय खेळाडू रवी शास्त्री यांना ती ऑडी १०० बक्षिस म्हणून मिळाली होती.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

बक्षिस म्हणून ऑडी १०० मिळवण्यासाठी पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज जावेद मियांदाद देखील शर्यतीत होता. याबाबत अंतिम सामन्यातील किस्सा शास्त्रींनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे. शास्त्री मैदानावर फलंदाजी करत असताना त्यांचं मैदानाबाहेर असलेल्या गाडीकडं सहज लक्ष गेलं. त्याचं वेळी मियांदादनं रवी शास्त्रीला टोमणा मारला होता. ‘काय गाडी पाहतो आहेत का? बघू नको तिच्याकडे, ती आमच्यासोबत पाकिस्तानला जाणार’ असा तो टोमणा होता.

मात्र, शेवटी ती क्लासिक ऑडी १०० भारतात आली! गंमत म्हणजे, स्पर्धेतील सर्व वैयक्तिक बक्षिसं भारताकडे आली होती. शास्त्रीला चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट, के श्रीकांतला सर्वाधिक (२३८) धावा आणि लक्ष्मण शिवरामकृष्णनला सर्वाधिक (१०) विकेट्स घेण्यासाठी पुरस्कार मिळाले होते. खरंतर, या भारतीय संघाला विस्डेननं ‘द इंडियन टीम ऑफ द सेंच्युरी’ म्हणून घोषित केलं होतं.

रवी शास्त्रींना मिळालेली गाडी भारतासाठी खरंच खास होती. कारण तो उदारीकरणापूर्वीचा काळ होता. त्यावेळी भारतात खूप कमी आलिशान गाड्या होत्या. सामान्य नागरिकांसाठी तर आलिशान चारचाकी गाडी हे एक स्वप्नच होतं. जेव्हा रवीला आलिशान गाडी बक्षिस म्हणून मिळाल्याचं तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना समजलं तेव्हा त्यांनी कस्टम अधिकाऱ्यांना गाडीचं आयात शुल्क माफ करण्याचे आदेश देऊन टाकले. जेणेकरून ही गाडी आरामात शास्त्रीच्या घरी येऊ शकेल. शास्त्रींचा या कारवर इतका जीव आहे की त्यांनी ती आजही व्यवस्थित जपून ठेवली आहे. अगदी त्यांचे वडील देखील गाडीला हात लावण्यापूर्वी रवीला विचारत. कारण रवीच्या मते, ती गाडी फक्त त्याच्या एकट्याची नाही तर संपूर्ण देशाची आहे.

१९६८ साली बाजारात दाखल झालेली ऑडी १०० ही गाडी १९९४ पर्यंत उपलब्ध होती. ही कार बाजारात बरीच लोकप्रिय झाली होती. त्यावेळच्या जगभरातील सर्व मोठ्या सेलिब्रिटींनी ऑडी १०० चालवली होती. शास्त्रींना मिळालेली गाडी ही मुळ गाडीची तिसरी आवृत्ती होती. १९८२ साली ती लॉन्च झाली होती. त्यात १.८ लीटर पेट्रोल इंजिन आणि २.५ लीटर डिझेल इंजिन होतं.

तिचा पावर आउटपुट ७५ पीएस पासून १६५ पीएस होता. त्यावेळी फ्लश फिटिंग विंडो सुविधा असलेल्या मोजक्या गाड्यांमध्ये या गाडीचा समावेश होत होता. १९८५मध्ये ‘ऑडी १००’ ऑस्ट्रेलियामधील किंमत २ हजार १०० डॉलर होती. CarsGuideच्या आकडेवारीनुसार सध्या या विंटेज सेडानची किंमत ३ ते ७ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी होते.

रवी शास्त्रींच्या गॅरेजमध्ये असलेली ‘ऑडी १००’ ही त्या प्रकारची सध्या भारतात उपलब्ध असलेली एकमेव गाडी आहे. त्यामुळं जर तुम्हाला रस्त्यावर या मॉडेलची गाडी दिसली तर निश्चितच त्यात रवी शास्त्री बसलेले आहेत!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

१० हजार उधारीवर घेऊन सुरु केलेला व्यवसाय आज करोडोंची उलाढाल करतोय..!

Next Post

रशियाने तयार केलाय जगातील सगळ्यात शक्तिशाली बॉ*म्ब ‘झार बॉ*म्ब’..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

रशियाने तयार केलाय जगातील सगळ्यात शक्तिशाली बॉ*म्ब 'झार बॉ*म्ब'..!

आजही ही राणी राष्ट्रनिष्ठा, धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक म्हणून अजरामर आहे.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.