The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नॉर्वे आणि डेन्मार्कला जोडणाऱ्या या राजाची आठवण म्हणजे ‘ब्लूटूथ’ टेक्नॉलॉजी

by द पोस्टमन टीम
13 September 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नाव दिलं जातं. इतकचं नाही तर तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूला, तंत्रज्ञानाला देखील आपण नाव देतो आणि नावांच्या मागे काही रंजक गोष्टी देखील असतात. अशीच एक गोष्ट ‘ब्लूटूथ’ तंत्रज्ञानाच्या नावामागे देखील आहे. शब्दश: पाहिलं तर त्याचं मराठी भाषांतर ‘निळेदात’ असं होतं. मात्र, दात किंवा निळ्या रंगाशी याचा काहीही संबंध नव्हता. ब्लूटूथ अनेक वेगवेगळ्या उपकरणांमध्ये वायरलेस डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी एक सुरक्षित मार्ग तयार करते.

हे तंत्रज्ञान विकसित करीत असताना इंजिनिअर्सच्या डोक्यात डॅनिश वायकिंग राजा हॅराल्ड ब्लॉटँड (ब्लूटूथ) होता आणि त्यांनी तंत्रज्ञानाला राजाचं नावं देऊन टाकलं! पौराणिक कथेनुसार, या राजाकडे कुठलीही हिं*सा न करता केवळ वाटाघाटी करून लोकांना एकत्र आणण्याची एक विलक्षण क्षमता होती. त्याचे हे कौशल्य वापरूनच त्यानं डेन्मार्क आणि नॉर्वेला एकत्र केलं होतं!

हॅराल्ड ‘ब्लूटूथ’ गोर्मसन दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात डेन्मार्क आणि नॉर्वेच्या काही भागाचा राजा होता. त्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अतिशय थोडी माहिती उपलब्ध आहे. हॅराल्ड हा डेन्मार्कचा राजा ‘गॉर्म द ओल्ड’चा मुलगा होता. त्यानं आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर राज्य कारभार सुरू केला होता. नॉर्वेमधील हॅराल्ड ब्लूटूथच्याच एका माणसाने वेसाल प्रांताचा (तत्कालीन नॉर्वेचा भाग) शासक असलेल्या हॅराल्ड ग्रेक्लोकला ठार मारलं. त्यानंतर त्याभागावर हॅराल्ड ब्लूटूथचं शासन आलं, असं म्हटलं जातं.

डेन्मार्कमधील साहित्याचा संदर्भ घेतला असता, असंही समोर येतं की, त्याच्या मुलानं (स्वेन फोर्कबर्ड) त्याच्या मृत्यूपूर्वी त्याला जबरदस्ती सत्तेवरून हटवलं होतं. असं असूनही हॅराल्ड ब्लूटूथला आजही डेन्मार्कच्या सर्वात महत्त्वाच्या राजांमध्ये स्थान दिलं जातं. त्यानं आपल्या काळात ख्रिश्चन धर्माला राष्ट्रीय धर्म म्हणून स्वीकारलं होतं.

डेन्मार्कमध्ये ख्रिश्चन धर्माचा स्विकार आणि त्यानंतर स्कॅन्डिनेव्हियामध्ये या धर्माचा प्रसार ही हॅराल्डच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना मानली जाते. मात्र, हॅराल्डनं स्वत: धर्मांतर केलं होतं की नाही याबाबत पुरावे नाहीत. कारण उपलब्ध असलेल्या लेखांमध्ये विरोधाभास आहेत. बहुतेक लेखांमध्ये असं दिसतं की त्याचा बाप्तिस्मा पोप्पो नावाच्या प्रिस्टनं केला होता. धर्मांतर केल्यानंतर, हॅराल्डने ९६० च्या दशकात डेन्मार्कमध्ये एक चर्च बांधलं आणि धर्म परिवर्तन करण्यास प्रोत्साहन दिलं.



संपूर्ण स्कॅन्डिनेव्हियाच्या ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी प्रदीर्घ काळ लागला. त्याच्या मृत्यूनंतर कितीतरी दशकं ही प्रक्रिया सुरू होती. मात्र, हेराल्डला ही प्रक्रिया सुरु करणारा मानल जातं. हॅराल्ड इतर तत्कालीन युरोपीय राजांप्रमाणं ख्रिश्चन नव्हता. परंतु, त्याला बाप्तिस्मा मिळाला होता आणि त्यानं डेन्मार्क व नॉर्वे या दोन्ही देशांमध्ये धर्माचा प्रचार करण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके केले.

त्यानं डेन्मार्क आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या नॉर्वेमध्ये कुठलाही हिं*साचार न करता धर्मप्रसार केला होता. धर्मप्रसाराच्या दरम्यानच हॅराल्ड आणि त्याचा मुलगा स्वेन दरम्यान मतभेद झाले. त्याच्या विरुद्ध लढाईतच हॅराल्ड मारला गेला. डेन्मार्कमधील रोस्किल्ड येथील चर्चमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जेलिंग स्टोन्स हे दोन सर्वांत प्रसिद्ध आणि महत्वाचे रनस्टोन्स स्कॅन्डिनेव्हियामध्ये प्रसिद्ध आहेत. रनस्टोन हा सामान्यतः एक उंच दगड असतो. त्यावर विशिष्ट लिपीमध्ये मजकूर कोरलेला असतो. यासाठी शिलालेख हा शब्द देखील लागू केला जाऊ शकतो. ही परंपरा चौथ्या शतकात सुरू झाली आणि बाराव्या शतकापर्यंत टिकली. डेन्मार्कमधील बहुतेक रनस्टोन वाइकिंग युगाच्या उत्तरार्धातील आहेत. हे रनस्टोन अनेकदा मृत लोकांचं स्मारक म्हणून देखील उभारलेले असतात.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

सर्वाधिक रनस्टोन सध्याच्या स्वीडनमध्ये आढळतात. ‘जेलिंग रनस्टोन’ हे दोन दगड अनुक्रमे हॅराल्ड ब्लूटूथ आणि त्याचे वडील गॉर्म द ओल्ड यांनी उभे केले होते. गॉर्मने उभारलेला स्टोन त्याची पत्नी थायराबद्दल माहिती देणारं आहे. त्यावर थायराच्या सन्मानार्थ अनेक गोष्टी कोरलेल्या आहेत. तर, हॅराल्डनं उभारलेला स्टोन त्याच्या सर्व पूर्वजांना श्रद्धांजली देणारा आहे. ​​ही दोन्ही स्टोन्स डेन्मार्कमध्ये धार्मिक स्थळं मानली जातात.

वायकिंग रिंग फोर्ट्रेसचं श्रेय देखील हॅराल्ड ब्लूटूथला दिलं जातं. याला ट्रेलबॉर्ग्स असंही म्हणतात. हे फोर्ट्रेस वायकिंग युगात वापरले जाणारे किल्लेबंदीचे प्रकार आहेत. डेन्मार्कचा राजा म्हणून ब्लूटूथनं आपल्या काळात त्यांची बांधणी केली होती. ट्रेलबॉर्ग्स गोलाकार आकाराचे असून एखाद्या भुलभुलय्यासारखी त्यांची रचना आहे.

आजपर्यंत, डेन्मार्क आणि दक्षिण स्वीडनमध्ये एकूण सात ट्रेलबॉर्ग्स सापडले आहेत. हे सर्व ट्रेलबॉर्ग्स दहाव्या दशकाच्या उत्तरार्धात आणि अकराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील आहेत. हा काळ हॅराल्डचा होता. दक्षिणेला असलेल्या सॅक्सन लोकांविरूद्ध डेन्मार्कला बळकट करण्यासाठी हॅराल्ड ब्लूटूथच्या कारकिर्दीत बहुतेक किल्ले बांधले गेले होते. त्यांच्याभोवती हे ट्रेलबॉर्ग्स होते. आता सापडलेल्या ट्रेलबॉर्ग्सची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अशा या राजाची आठवण म्हणून ब्लूटूथ एसआयजीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या जिम कार्दच यांनी १९९६ साली आपल्या तंत्रज्ञानासाठी हॅराल्ड ब्लूटूथचं नाव सुचवलं. हॅराल्डनं डेन्मार्कला एकत्र केलं आणि डॅनिश लोकांचं ख्रिस्तीकरण केले. त्यामुळं त्याचं नाव तंत्रज्ञानासाठी चांगलं कोडनेम बनू शकतं, अशी कल्पना जिमच्या मनात आली आणि त्यांनी ती सत्यात उतरवली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

द्रौपदीच्या सन्मानार्थ तामिळनाडुत आजही आगीवरून चालण्याचा उत्सव साजरा करतात

Next Post

या कारणासाठी विल स्मिथने चालून आलेली सुपरमॅनची भूमिका नाकारली..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या कारणासाठी विल स्मिथने चालून आलेली सुपरमॅनची भूमिका नाकारली..!

या आहेत जगातील सगळ्यात जुन्या आणि आजही बोलल्या जाणाऱ्या भाषा..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.