The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारं दक्षिण आफ्रिकेचं वादळ आता शांत झालंय…!

by द पोस्टमन टीम
27 June 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


काही लोकांकडं जन्मजातचं विशेष क्षमता असते पण, याची त्यांना जाणीवही नसते. जेव्हा जाणीव होते आणि त्यांना संधी मिळते तेव्हा मात्र, यश त्यांच्या पायाशी असतं. आफ्रिकेतील झिम्बाव्वेमध्ये असाच एक मुलगा होता. वयाच्या दहाव्या वर्षी त्यानं पहिल्यांदा क्रिकेट कीट पाहिलं होतं. ख्रिसमसच्या सुट्ट्यांना त्याची चुलत भावंड हे क्रिकेट कीट घेऊन त्याच्या घरी आले होते. त्यावेळी पहिल्यांदा हातात घेतलेल्या बॉलच्या मदतीनं त्यानं पुढे अशी काही जादू केली की, जगभरातील दिग्गज फलंदाज देखील त्याच्या समोर टिकू शकले नाहीत.

३१ ऑगस्ट २०२१ रोजी त्यानं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. कदाचित तुमच्या लक्षात आलं असले मी कुणाबद्दल बोलते आहे. हो, He is none other than the ‘Steyn Gun’ of South Africa, Dale Steyn! स्टेननं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ‘आज मी मला सर्वांत जास्त आवडत असलेल्या खेळातून अधिकृतपणे निवृत्त होत आहे. प्रशिक्षण, सामने, प्रवास, हारजीत, जेट लॅग, आनंद आणि बंधुत्व यामध्ये २० वर्षे गेली. सांगण्यासारख्या खूप आठवणी आहेत. कुटुंब, सहकारी, चाहते आणि पत्रकार या सर्वांचे आभार. आपण सर्वांनी मिळून केलेला हा एक अविश्वसनीय प्रवास होता ‘,अशी भावनिक पोस्ट त्यानं केली.

डेल स्टेनचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. भारतीयांना मात्र, त्यानं आपल्या अनोख्या अंदाजाम ध्ये आपली ओळख करून दिली होती. २०१० सालातील फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिकेतील पहिलीचं कसोटी नागपूरच्या ‘विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम’वर खेळवली जात होती. हाशिम आमला आणि जॅक कॅलिसच्या शतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेनं ५५८ धावा करून आपला पहिला डाव घोषित केल्यानं भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. मात्र, डेल स्टेन नावाचं एक वादळ आलं आणि त्या वादळात भारतीय खेळाडू असे काही गुरफटून गेले की, त्यांना एका डावानं पराभव स्विकारावा लागला.

डेल स्टेननं पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या आणि भारतीय उपखंडाला आपली ओळख करून दिली. उपखंडात कसोटीच्या एका डावात एखाद्या विदेशी वेगवान गोलंदाजानं ७ विकेट्स घेणं नक्कीच आश्चर्याची गोष्ट होती. वीरेंद्र सेहवागसारखा रांगडा गडी, आपल्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यात असलेला सचिन तेंडुलकर आणि मुरली विजय, एमएस धोनी आणि गौतम गंभीरसारख्या तरुणांचा समावेश असलेल्या संघाची त्यांच्याच मायभूमीत दिशाभूल करणं कठिण होतं. मात्र, डेल स्टननं हे करून दाखवलं होतं.

भेदक नजर, फुगलेल्या हाताच्या शिरा आणि विकेट घेतल्यानंतर तितक्याचं आक्र*मकपणे आनंद साजरा करण्याच्या सवयीमुळं डेल स्टेन दक्षिण आफ्रिकेचा सर्वात घातक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. कमालीचा वेग, बॉल दोन्ही प्रकारे स्विंग करण्याची क्षमता आणि अचूकतेमुळं तो आफ्रिकेचा सर्वोत्तम बॉलर बनला.



झिम्बाव्वेमध्ये जन्मलेल्या स्टेनचं बालपणं दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उत्तरेकडील प्रांत फलाबोरवा येथे गेलं. त्यानं आपलं बालपण स्केटबोर्डिंगच्या वेडात घालवलं होतं. पुढे अपघातानं त्याच्या हातात क्रिकेटकीट पडलं. तेव्हा त्यालाचं त्याच्या क्षमतेची कल्पना नव्हती. पुढे जेव्हा तो प्रिटोरिया सारख्या मोठ्या शहरात गेला, तेव्हा त्याच्या क्षमतेला योग्य दिशा मिळाली. ‘बॉर्न टॅलेंट’ असलेल्या स्टेनला राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. दक्षिण आफ्रिकेच्या संघात निवड होण्यापूर्वी त्याने फक्त सात प्रथम श्रेणी सामने खेळले होते. २००४ मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हा तोच सामना होता ज्या सामन्यात ‘मिस्टर ३६०’ ए बी डिव्हिलियर्सनंसुद्धा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

डेल स्टेनची सुरुवात मात्र, विशेष परिणामकारक झाली नाही. त्यानं पुढील हिवाळा एसेक्ससाठी काउंटी चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन दोनमध्ये खेळून काढला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तो आपली दुसरी कसोटी मालिका खेळला. त्यात त्यानं १६ विकेट्स घेतल्या. २००६-०७ चा हंगाम त्याच्यासाठी प्रसिद्धी आणि यश दोन्ही घेऊन आला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

त्या हंगामात जोहान्सबर्ग येथे झालेल्या पहिल्या कसोटीत स्टेननं दहा बळी घेतले. त्यानंतर, सेंच्युरियनमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर स्टेनच्या बॉलचा जीवघेणेपणा समोर आला. त्यानं न्यूझीलंडचा खेळाडू क्रेग कमिंगला एक शॉर्ट बॉल टाकला. तो क्रेगच्या चेहऱ्यावर आदळला. बॉलचा वेग इतका जास्त होता की, क्रेगला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून सर्जरी करावी लागली होती.

हळूहळू त्याचा विकेट्स घेण्याचा ओघ वाढत गेला अन् २००८ मध्ये, तो सर्वात वेगवान दक्षिण आफ्रिकन बनला. त्यावर्षी सप्टेंबरमध्ये आयसीसीनं त्याला सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवडलं. स्टेननं १४ सामन्यात १८.१० च्या सरासरीनं ८६ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर २०१४ पर्यंत सलग सात वर्ष आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघाचा भाग होता! बंदी उठल्यानंतर, पहिल्यांदाच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या दक्षिण आफ्रिकन संघाचा स्टेन हा हुकमी एक्का होता.

२०१० मध्ये, नागपूर कसोटीमध्ये स्टेननं आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून वसीम अक्रम आणि वकार युनूसची सर्वांना आठवण करून दिली. पुढे न्यूझीलंडविरुद्ध त्यानं आपला ३०० वा कसोटी बळी टिपला. हा टप्पा ओलांडणारा तो फक्त चौथा दक्षिण आफ्रिकन होता. त्यानं आपल्या देशासाठी ९३ कसोटी सामने खेळले आणि २२.९५ च्या सरासरीने ४३९ विकेटस् घेतल्या. कसोटीमध्ये जास्त विकेटस् घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आठव्या स्थानावर आहे.

कसोटीमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा स्टेन आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाचा देखील महत्त्वाचा भाग होता. १९६ एकदिवसीय सामने खेळून त्यानं २५.९५च्या सरासरीनं १९६ विकेट्स घेतलेल्या आहेत. त्याची टी-20 कारकीर्द मात्र, म्हणावी तितकी प्रभावी नाही. ४७ सामन्यांत त्यानं ६४ विकेट्स मिळवल्या आहेत.

दुखापती आणि वेगवान गोलंदाज यांचं एकदम अतूट नातं असल्याचं आपल्याला माहित आहे. कित्येक वेगवान गोलंदाजांना दुखापतींमुळं आपली कारकिर्द पणाला लावावी लागली आहे. मग त्यातून स्टेन तरी कसा सुटेल. वयाची तीशी ओलांडल्यानंतर दुखापतींनी स्टेनचा पाठलाग सुरू केला.

जून २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान स्टेनला सांधेदुखीचा त्रास झाला. २०१४ च्या सुरुवातीला त्याची एक बरगडी फ्रॅक्चर झाली. याशिवाय त्याला तीन हॅमस्ट्रिंग स्ट्रेनचा देखील सामना करावा लागला. मात्र, तरी देखील त्यानं तब्बल दोन दशकांनंतर श्रीलंकेत खेळणाऱ्या आपल्या संघाची साथ सोडली नाही.

दुखापतीतून सावरल्यानंतर २०१५ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकनं संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, तो त्यांच्या अपयशी मोहिमेचा चेहराही बनला. नोव्हेंबर २०१५ मध्ये, भारताविरुद्ध मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटी दरम्यान पुन्हा त्याला त्रास सुरू झाला आणि त्यामुळं चार सामन्यांच्या मालिकेला तो मुकला. २०१५-१६ च्या हंगामात स्टेन दक्षिण आफ्रिकेनं खेळलेल्या आठ कसोटींपैकी सहा आणि सर्व एकदिवसीय सामन्यांना मुकला.

शेवटी आता स्टेन क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र, त्याच्याकडे प्रशिक्षणाची संधी आहे. तो त्याच्या अचूक विश्लेषणासाठी आणि गोलंदाजीतील तांत्रिक गोष्टींसाठी ओळखला जातो. त्यानं अनेक युवा खेळाडूंना सल्ले दिले आहेत. PSL सारख्या स्पर्धांमध्ये त्यानं मार्गदर्शकाची भूमिका देखील बजावलेली आहे. आपल्या संघातील सहकाऱ्यांबाबत त्याच्या मनात प्रचंड आदर आहे.

एका मुलाखतीमध्ये त्यानं याबाबत माहिती दिली होती. चौकोणी कुटुंबात वाढलेल्या स्टेनला भावाची कमतरता जाणवायची मात्र, संघातील ‘भावांनी’ ती भरून काढली, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यानं मुलाखतीमध्ये दिली होती. क्रिकेटच्या मैदानाशिवाय डेल स्टेन ‘डॉग डॅड’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे चार प्रकारची कुत्री आहेत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं हा सध्या त्याचा आवडता छंद आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कम्युनिस्ट ‘पॉल पॉट’ने केलेला नृशंस नर*संहार इतिहासकारांनी जाणीपूर्वक दडवून ठेवला आहे

Next Post

बडोद्याच्या महाराणी सीतादेवींनी स्वतःच्या शानशौकीसाठी खजिना अक्षरशः रिकामा केला होता

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

बडोद्याच्या महाराणी सीतादेवींनी स्वतःच्या शानशौकीसाठी खजिना अक्षरशः रिकामा केला होता

२०१३ साली बांधलेल्या चेन्नईच्या विमानतळाचं छत तब्बल ६३ वेळा कोसळलंय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.