The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२५१ रुपयात मिळणाऱ्या स्मार्टफोनला भुलून ३० हजार लोकांनी बुकिंग केलं होतं..!

by Heramb
1 September 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच आजचं युग हे स्मार्टफोन्सचं युग आहे. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच. सगळी बहुतेक कामं आपल्याला घरबसल्या करता येतात. या मध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेटचा मोठा वाटा आहे. समाजातील अगदी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गाकडेही आपल्याला स्मार्टफोन्स असल्याचं दिसून येतं.

कोविड-१९ची  साथ आणि लॉकडाऊन यांमुळे तर शिक्षणासाठीही स्मार्टफोन असणं आवश्यक बनलं आहे. थोडक्यात, स्मार्टफोन ही आता एक “गरज” बनलेली आहे. असं असलं तरी भारतात अशी अनेक कुटुंबं आणि व्यक्ती आहेत ज्यांना स्मार्टफोन परवडत नाहीत, पण गरज असते.

मग यावर उपाय म्हणून जियो सह अनेक कंपन्यांनी परवडणारे स्मार्टफोन्स बाजारात आणायला सुरुवात केली. जियो वगळलं तर बाकी कोणत्याही कंपन्यांचे परवडणारे स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत विशेषत्वाने चालले नाहीत. पण पाच वर्षांपूर्वी एका महाशय आणि तथाकथित उद्योजकाने परवडणाऱ्या स्मार्टफोन्सची घोषणा केली. 

परवडणारे स्मार्टफोन्स म्हणजे फक्त २५१ रुपयांमध्ये स्मार्टफोन्स देण्याचा त्याने दावा केला. ‘फ्रीडम २५१’ हा स्मार्टफोन फक्त २५१ रुपयांच्या किमतीत भारतामध्ये विक्रीसाठी देण्यात आला होता. हे स्मार्टफोन्स रिंगिंग बेल्स प्रायवेट लिमिटेडद्वारे विकण्यात आले आणि “जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन” म्हणून त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरातही करण्यात आली.



कंपनीने फ्रिडम-२५१ च्या उदघाटनप्रसंगी अनेक दिग्गजांना निमंत्रणं पाठवली होती, यामध्ये भारताचे तत्कालीन रक्षामंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांचं सुद्धा नाव होतं, तसेच मध्यप्रदेशातील काही राजकीय नेत्यांची नावंही यात होती. प्रत्यक्ष मात्र मनोहर पर्रीकर या उदघाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. पण अशा बड्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा आहे म्हटल्यावर ही योजना अस्सल असणार या भ्रमात राहून सुमारे ३० हजार ग्राहकांनी या स्मार्टफोनचं प्री-बुकिंग केलं होतं. कंपनीच्या मते यांतील बहुतांश ग्राहकांना स्मार्टफोन पोहोचला होता तर ज्यांना स्मार्टफोन अद्याप पोहोचला नाही त्यांना त्यांचे पैसे परत देण्यात आले होते.

केवळ १८ ते २१ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ऑनलाईन बुकिंगद्वारे मर्यादित काळासाठी “प्रमोशनल” किंमत देण्यात आली होती. त्यामुळे  वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढून पहिल्याच दिवशी क्रॅश झाली. कंपनीने जून २०१६ पर्यंत ५० लाख फोन विकण्याची योजना आखली होती. ज्यावेळी वेबसाइट क्रॅश झाली, त्या वेळी त्याने २५१ रुपयांच्या किंमतीच्या फोनसाठी  फक्त ३० हजार बुकिंग्स घेतल्या होत्या.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

पण स्मार्टफोन २५१ रुपये इतक्या कमी किंमतीत कसा विकला जाऊ शकतो अशी शंका इंडियन सेल्युलर असोसिएशनने व्यक्त केली आणि तत्कालीन दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले. इंडियन सेल्युलर असोसिएशनच्या मते, अनुदानित विक्रीसह, स्मार्टफोनची विक्री किंमत ३५०० रुपयांपेक्षा कमी नसावी.

उदघाट्नच्या वेळी रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने जो स्मार्टफोनचा नमुना प्रसारमाध्यमं आणि लोकांसमोर ठेवला होता, तो मूळ वितरित स्मार्टफोनच्या नमुन्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. या मूळ प्रोटोटाइपचे स्वरूप पाहून ऍडकॉम उद्योगांनी रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडवर खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली होती. २० फेब्रुवारी २०१६ रोजी रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेड च्या कार्यालयांवर सरकारी कर्मचाऱ्यांनी छापे टाकले आणि या उत्पादनाकडे ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स सर्टिफिकेशन’चे प्रमाणपत्र का नाही याची चौकशी केली.

हा फोन चायनीज फोनसारखा असून त्याचं मूळ चिन्ह व्हाईटनरचा वापर करून लपवण्यात आलेलं आहे. मुख्य पडद्यावरील अँप्सच्या आयकॉनचे डिजाइन ॲपलच्या आयफोनमधून चोरलेले दिसतात. बर्‍याच लोकांनी हे फोन ऑनलाईन मागवले पण त्यांना कन्फर्मेशन ईमेल देखील मिळाला नाही.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या त्यांनी दूरसंचार मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि इतर विविध मंत्रालयांनी कंपनीची चौकशी करण्याची विनंती केली. या गोंधळाच्या वातावरणाचा परिणाम म्हणून, कंपनीला पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करवून देणाऱ्या पेयुबीझने रिंगिंग बेल्सला पेमेंट रोखण्याचा निर्णय घेतला.

दूरसंचार मंत्रालयाने फोनवर अंतर्गत मूल्यमापन केल्यानंतर फ्रिडम २५१ नावाचे स्मार्टफोन्स २३०० ते २४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकले जाऊ शकत नाहीत हे स्पष्ट केले. गाझियाबादमधील अयम एन्टरप्राइझेसच्या मालकाने रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकावर अर्थात मोहित गोयलवर १६ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपांवरून पोलिसात तक्रार दाखल केली. याच आरोपाखाली मोहित गोयलला पोलिसांनी अटक केली. सध्या या कंपनीचे डोमेन कालबाह्य झाले आहे.

रिंगिंग बेल्सच्या मते त्यांनी ९ जुलै २०१६ पर्यंत ‘फ्रिडम २५१’ ची ५००० युनिट्स वितरित केली होती.

यानंतर अन्य आरोपींप्रमाणे त्याचीही जामिनावर सुटका झाली. पण २०१८ मध्ये त्याला पुन्हा खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर आता काही दिवसापूर्वीच गोयलला ड्रायफ्रूट व्यवसायातील फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. इंदिरापुरमस्थित विकास मित्तल याने गोयल आणि इतर पाच जणांविरोधात ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. १९ ऑगस्ट रोजी गोयलने मित्तलला कारचा धक्का मारून ठार करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेतच मित्तलने गोयलविरोधात तक्रार दाखल केली, आणि काही दिवसापूर्वीच पुन्हा गोयलला अटक झाली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: freedom251mohit goelsmartphone
ShareTweet
Previous Post

२०१३ साली बांधलेल्या चेन्नईच्या विमानतळाचं छत तब्बल ६३ वेळा कोसळलंय..!

Next Post

अमेरिकेने मीम्सच्या संशोधनासाठी इंडियाना युनिव्हर्सिटीला तब्बल १ मिलियन डॉलर दिले आहेत

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

अमेरिकेने मीम्सच्या संशोधनासाठी इंडियाना युनिव्हर्सिटीला तब्बल १ मिलियन डॉलर दिले आहेत

हि*टल*रच्या सैन्याचा सेनापती ज्याला शेवटी विषप्राशन करून आत्मह*त्या करावी लागली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.