The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या सात ‘गार्डियन एन्जल्स’कडे जगभरातलं इंटरनेट रिबूट करण्याची चावी आहे..!

by द पोस्टमन टीम
26 August 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


‘आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एक-दोन मैल अंतरावर लॉस एंजेलिच्या नैऋत्य भागात असलेल्या एका नॉनस्क्रिप्ट औद्योगिक वसाहतीतील मोठ्या हॉलमध्ये निवडक लोक एक समारंभ सुरू होण्याची वाट पाहत आहेत. बाहेर, फेब्रुवारीतील उबदार सूर्य चमकत आहे. त्या बंद खोलीमध्ये अमेरिकन, स्वीडिश, रशियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषांचे आवाज कानांवर पडत आहेत. तिथे जमलेले लोक पिझ्झा आणि सोड्याचा आनंद घेत चर्चा करत आहेत.’ हे वर्णन अण्वस्त्र प्रक्षेपणाच्या चर्चेचं किंवा कुठल्यातरी गोपनीय चर्चेचं, नाहीतर मग डॅन ब्राऊनच्या सायन्स फिक्शनचं कथानक वाटतं ना? मात्र, हा खराखुरा कार्यक्रम आहे.

जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या गटाकडे इंटरनेटच्या चाव्या आहेत! या चाव्यांना एकत्र करून ते एक ‘मास्टर की’ तयार करतात. ही चावी जगभरातील इंटरनेट नियंत्रित करते. इंटरनेटला खरचं चावी आहे का? हे की होल्डर्स आपल्या शक्तींचा वापर करून इंटरनेट बंद करू शकतात का? किंवा, जर कोणी पृथ्वीवर ह*ल्ला करून संपूर्ण इंटरनेट प्रणाली डाऊन केली तर हे लोक चावी वापरून ते पुन्हा चालू करू शकतील का? असे किती तरी प्रश्न तुमच्या मनात आले असतील. काळजी करू नका मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहे..!

ज्या इंटरनेटशिवाय आता आपला एकही दिवस जात नाही, असं इंटरनेट एक मुक्त आणि व्यापक गोष्ट आहे. एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या विशिष्ट वेबसाइटवर नियंत्रण असू शकतं. मात्र, इंटरनेट कोणीही नियंत्रित करु शकत नाही. आपण कोणत्याही परवानगीशिवाय आपल्याला पाहिजे असलेल्या वेबसाइट्स सेट करू शकतो, असा आपला समज आहे. ही गोष्ट काही प्रमाणात जरी खरी असली, तरी ते अर्धसत्य आहे.

जर तुम्ही इंटरनेटवरील नियंत्रण साखळीत वरपर्यंत गेलात तर अखेरीस या सात चाव्या असलेल्या ‘गार्डियन एन्जल्स’पर्यंत जाऊन पोहचाल. २०१० पासून वर्षातून चार वेळा हे की होल्डर्स प्रत्यक्षात एकमेकांना भेटतात. सर्वांना इंटरनेट सुरक्षेचा दीर्घ अनुभव आहे आणि ते विविध आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी काम करतात. त्यांचा अनुभव पाहून त्यांची निवड केली गेली आहे. कोणत्याही एका देशाला एकपेक्षा जास्त की होल्डर ठेवण्याची परवानगी नाही. ते जेव्हा भेटतात त्या कार्यक्रमाला ‘रूट सायनिंग सेरेमनी’ म्हणून ओळखलं जातं.

या की मास्टर्सकडे जाण्यापूर्वी, इंटरनेट कसं कार्य करतं याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. जेव्हा आपल्याला एखाद्या वेबसाईटवर जायचे असते तेव्हा आपण ब्राउझर उघडतो आणि बेवसाईटचं नाव टाईप करतो. आपण शोधत असलेली माहिती मिळवण्यासाठी आपल्या जगातील कोणत्या संगणकावर जायचं हे आपल्या ब्राउझरला कसं कळतं?



आपण ब्राउझरमध्ये टाइप केलेली नावं प्रत्यक्षात संगणक ओळखण्यासाठी वापरली जात नाहीत. इंटरनेटवरील प्रत्येक संगणकाला IP(इंटरनेट प्रोटोकॉल) ॲड्रेस असतो. हा एक ३२-बिट नंबर असतो. प्रत्येक गोष्टीसाठी इतकी मोठी आकडेवारी लक्षात ठेवणं गोंधळात टाकणारं असतं म्हणून त्याऐवजी, आपण डोमेन नेम वापरतो. हे डोमेन नेम आपल्याला पडद्यामागील IP ॲड्रेसपर्यंत पोहचवतं.

याचाचं अर्थ जेव्हा आपण वेबसाइटला भेट देतो तेव्हा आपण प्रथम डोमेन नेम सर्व्हरला (डीएनएस) भेट देतो. नंतर IP ॲड्रेसच्या सहाय्यानं वेबसाइटपर्यंत जाऊन पोहचतो. ही प्रक्रिया आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त वेगात घडते. ही डीएनएस यंत्रणा ट्री डायग्रामप्रमाणं श्रेणीबद्ध पद्धतीनं तयार केली जाते.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

डीएनएस सर्व्हरच्या वर डोमेन नेम जारी करणाऱ्या संस्था आहेत. गो-डॅडीसारख्या कंपन्या डोमेनसाठी डोमेन नेम जारी करतात. काही  डोमेन तुम्हाला माहिती असतीलच, उदाहरणार्थ .com, .net, .eu, .in. प्रत्येक डोमेनचं स्वतःचं मास्टर सर्व्हर असतं ज्यात सर्व माहिती असते. खालच्या स्तरावरील डीएनएसकडून त्यांचा डेटा मिळतो. प्रत्येक गोष्टीच्या अगदी वर, डीएनस प्रणालीसाठी जबाबदार असणारी एक संस्था असते. जी संस्था शेवटी सर्व IP ॲड्रेस जारी करण्यासाठी जबाबदार आहे. तिचं नाव आहे ‘इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइनड् नेम्स अँड नम्बर्स'(आयसीएएएन). आयसीएएनएन संपूर्ण डीएनएस प्रणालीसाठी रूट सर्व्हर चालवण्याचं काम करते.

सर्व डीएनएस सर्व्हर्स एनक्रिप्टेड स्वाक्षरीचा एक प्रकार वापरतात. ही स्वाक्षरी तिच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक डीएनएस सर्व्हरच्या विश्वासार्हता पडताळते. आयसीएएएनकडं एक क्रिप्टोग्राफिक स्वाक्षरी आहे ज्यावर सर्व काही अवलंबून आहे. या क्रिप्टोग्राफिक स्वाक्षरीमध्ये दोन भाग असतात. एक सार्वजनिक(दोन पब्लिक कीज्) आणि दुसरा खासगी(दोन प्रायव्हेट कीज्). प्रायव्हेट कीज्, हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्यूल(एचएसएम) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपकरणांवर सुरक्षित ठेवल्या जातात. सध्या एक की व्हिर्जिनियातील कल्पेपरमध्ये तर दुसरी कॅलिफोर्नियातील एल सेगुंडोमध्ये स्टोअर केलेल्या आहेत. या एचएसएममध्ये छेडछाड करता येत नाही आणि जर कोणी ते उघडण्याचा प्रयत्न केला त्या आपोआप बंद होतील, अशी सोय केलेली आहे.

जर एचएसएम अपयशी ठरलं तर काय होईल? इंटरनेटचं काय होईल? हे प्रश्न पडणं साहजिकच आहे. काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण त्याच्या मास्टर की पुन्हा तयार करता येतात.

अडचण असो किंवा नसो दर तीन महिन्यांनी मास्टर की तयार केल्या जातात. त्याला ‘की सायनिंग सेरेमनी’ म्हणतात. नवीन की तयार करण्यासाठी, सात स्मार्ट कार्ड आवश्यक आहेत. प्रत्येक स्मार्ट कार्ड तिजोरीत ठेवलेलं आहे आणि ही प्रत्येक तिजोरी देखील एका अनोख्या कीनं उघडली जाते. या तिजोऱ्यांच्या की ज्या सात लोकांकडे आहेत तेच आहेत आपल्या इंटरनेटचे ‘गार्डियन एन्जल्स’. सात जणांमधील प्रत्येक व्यक्ती विश्वासार्ह आणि आपल्या देशातील तांत्रिक तज्ञ आहे. त्यांची नावं आयसीएएनएन वेबसाइटवर जाहीरपणे सूचीबद्ध केलेली आहेत.

प्रत्येक ‘सायनिंग सेरेमनी’चं आयोजन १०० पेक्षा जास्त सुरक्षा चाचण्या पार करून केलं जातं. हा कार्यक्रम अल्ट्रा-सिक्युरिटीमध्ये होतो. त्यात प्रवेश करण्यासाठी पिन कोड, स्मार्ट कार्ड आणि बायोमेट्रिक स्कॅनची आवश्यकता असते.

प्रत्येक की सायनिंग सेरेमनीसाठी काही निमंत्रित साक्षीदार असतात. या साक्षीदारांना देखील खासगी ‘की हॅश’ दिलेला असतो. ‘की हॅश’ हा एक प्रकारचा कोड आहे जो ‘की’ सत्यापित(व्हेरिफाय) करू शकतो.

ही सर्व माहिती वाचल्यानंतर आता तुम्ही म्हणू शकता की जगातील सात लोकांकडे इंटरनेट रीबूट करण्याची क्षमता आहे. जर भविष्यात इंटरनेटवर ह*ल्ला झालाच तर त्यावेळी ‘हे सात’ लोक जगातील सर्वात जास्त महत्त्वाचे लोक असतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एबी डिव्हिलियर्सच्या फॅन्सनी बँगलोरच्या एका रस्त्याला परस्परच त्याचं नाव दिलं आहे..!

Next Post

हि*टल*रने इंग्लंडच्या माजी राजाचं अपहरण करायचा प्लॅन केला होता..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

हि*टल*रने इंग्लंडच्या माजी राजाचं अपहरण करायचा प्लॅन केला होता..!

एअर इंडियाचं '१८२ कनिष्क' विमान पाडून खलिस्तान्यांनी ३२९ नागरिकांचा बळी घेतला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.