The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वसिम अक्रमने विव रिचर्ड्सचे पाय धरून माफी मागितली आणि सांगितलं इथून पुढे असं होणार नाही.

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गोऱ्या साहेबांच्या, म्हणजेच इंग्रजांच्या देशात जन्मलेल्या क्रिकेटला ‘जंटलमन्स गेम’ म्हणूनही ओळखलं जातं. मात्र, या खेळाला लागलेलं ग्रहण म्हणजे ‘स्लेजिंग’. स्लेजिंगमुळे बऱ्याच वेळा चांगला चालत असलेला सामन्याची रंगत हरवून जाते. कित्येक वेळा स्लेजिंगमुळे गंभीर वातावरण होते. मात्र, अशा स्लेजिंगचे काही भन्नाट किस्सेही असतात. पाकिस्तानी निवृत्त बॉलर वसीम अक्रम काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. यावेळी त्याने वेस्ट इंडिजच्या व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत झालेला स्लेजिंगचा किस्सा सांगितला. वसीमने केलेल्या स्लेजिंगमुळे व्हिव्हियन एवढा चिडला होता, की तो अक्षरशः वसीमला मारण्यासाठी ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचला होता.

१९८८ साली बार्बाडोसमध्ये पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामना सुरू होता. या सामन्यामध्ये वसीम अक्रम सुरुवातीला बऱ्यापैकी गोलंदाजी करत होता. दिवसाच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र त्याला धावपट्टीचा आणि चेंडूचा चांगला अंदाज आला. त्याला हवा असलेला पेस तेव्हा आला होता. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल त्याने बाऊन्सर टाकला. समोर वेस्ट इंडिजचा व्हिव्हियन रिचर्ड्स बॅटिंग करत होता. व्हिव्हियनची सवय होती, की तो बॅटिंग करताना हेल्मेट ऐवजी टोपी घालत. वसीम पहिलाच बॉल बाऊन्सर टाकेल असं व्हिव्हियनला वाटलंही नव्हतं. त्यामुळे तो जरासा बेसावध होता.

हा बॉल त्याच्या एवढ्या जवळून गेला, की त्याची टोपीच खाली पडली. व्हिव्हियनची टोपी पडलेली पाहून वसीम त्याला तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये म्हणाला, ‘ओए! यू डोन्ट नो हाऊ टू बॅट?’ वसीम एवढ्यावरच थांबला असता तरी ठीक होतं. मात्र, तेव्हा 19-20 वर्षांचा असलेल्या वसीमने पुढे व्हिव्हियनला काही अपशब्दही सुनावले.

यावर व्हिव्हियनने पुढे येत “डोन्ट टॉक टू मी लाईक दॅट. आय विल किल यू!” असं वसीमला सुनावले. व्हिव्हियनची शरीरयष्टी आणि वसीमची शरीरयष्टी यात तेव्हा जमीन-आसमानचा फरक होता. वेस्ट इंडिजच्या इतर खेळाडूंप्रमाणेच व्हिव्हियनही अगदी तगडा होता. तर त्याच्यासमोर वसीम हा अगदीच पोरसवदा आणि किरकोळ दिसत होता. वसीम तेव्हा वयानेही लहान होता, आणि शरीरानेही अगदी सडपातळ होता. त्यामुळे मारुन टाकण्याची धमकी मिळताच वसीम घाबरुन इम्रान खानकडे गेला. तेव्हा इम्रान खान पाकिस्तानचा कॅप्टन होता. वसीम अक्रमने इम्रानकडे जात सांगितले की, व्हिव्हियन मला मारण्याची धमकी देतोय. इम्रान खानने त्याला आश्वस्त केले की तो असं काही करणार नाही. त्याने काही केलं तर मी बघून घेईल. तू अजून बाऊन्सर टाक.

मग तर वसीमने पुढचाही बॉल बाऊन्सर टाकला. हा बॉलही व्हिव्हियनला खेळता आला नाही, आणि पुन्हा त्याची टोपी खाली पडली. त्यामुळे मग वसीमला अजूनच चेव चढला. त्याने पुन्हा पुढे येत हाताने इशारे करत व्हिव्हियनची स्लेजिंग केली. तेव्हा रेफ्री तिथे नव्हते, शिवाय कॅप्टनच स्वतः म्हणलेला की काही झालं तर मी पाहून घेईल. त्यामुळे स्लेजिंग करताना वसीमला कसलीच भीती वाटली नाही.



यानंतर त्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर, भरपूर कॉन्फिडन्समध्ये आणि जोशात असलेल्या वसीमने व्हिव्हियनला क्लीन बोल्ड केले. यानंतर हरखून जात वसीमने भलताच आनंद साजरा केला. या जल्लोषामध्ये त्याने आपल्याला इंग्रजीमध्ये येत असलेल्या काही शिव्याही सुनावल्या. व्हिव्हियन मात्र चरफडत आणि वसीमकडे रागाने पाहत पॅव्हेलियनमध्ये परत गेला. पुढे लगेच उरलेले तीन बॉल झाले आणि त्या दिवसाचा खेळ संपवून दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या ड्रेसिंग रुममध्ये परत गेले.

ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर वसीम अक्रम त्याचे बूट काढत होता. तेवढ्यात वेस्ट इंडिजच्या चमूमधील एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने वसीमला बाहेर बोलावले. तो वसीमला म्हणाला, की बाहेर कोणीतरी तुझी वाट बघतंय. वसीमने आश्चर्यचकित होत विचारलं, कोण? त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘तूच येऊन बघ’. ती व्यक्ती एकदम गंभीरपणे बोलत असल्यामुळे एक बूट तिथेच आणि एक बूट पायात ठेऊन वसीम बाहेर गेला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

तिथे त्यानं पाहिलं, की व्हिव्हियन रिचर्ड्स एका हातात बॅट घेऊन अगदी रागात त्याची वाट पाहत होता. व्हिव्हियनच्या संपूर्ण शरीरातून घाम निथळत होता, आणि त्याने आपला शर्टही काढूुन ठेवला होता. एकंदरीत गल्लीत एखाद्याला मारायला जाताना ज्याप्रमाणे कोणी जाईल, तशा अवतारात तो पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुमबाहेर थांबला होता.

बाहेर असा यमदूत उभा असलेला बघून वसीम धावत इम्रानकडे गेला. इम्रानला त्याने सांगितलं, की व्हिव्हियन मला मारण्यासाठी बाहेर आलाय, आणि तुम्ही काहीतरी करा अशी विनंतीही त्याने केली. त्यावर इम्रानने मात्र ‘मग मी काय करु? ही तुझी लढाई आहे, तूच जाऊन लढ बाबा’ असं म्हणत हात वर केले. इम्रानने हात वर केल्यानंतर मात्र वसीमला स्वर्गच दिसू लागला. मग शेवटी त्याने जात सरळ व्हिव्हियनचे पायच धरले. “व्हिव्हियन, आयम सो सॉरी. इट विल नेव्हर हॅपन अगेन” असं म्हणत त्याने व्हिव्हियनची माफी मागितली. असं परत करणार नाही म्हटल्यावर व्हिव्हियननेही ‘तुझ्यासाठी तेच योग्य राहील’ असं म्हणत हे प्रकरण इथेच संपवलं.

यासोबतच, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याचा मजेशीर रन आऊट आणि खेळाडूंचे इतर काही किस्सेही वसीम अक्रमने या शोमध्ये दिलखुलासपणे सांगितले होते. ज्यामध्ये एक किस्सा असा होता, की २००३ च्या वर्ल्डकपवेळी क्वार्टर फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरू होता. यावेळी अक्रम यांची बॉलिंग सुरू असताना सचिनचा कॅच अब्दुल रझाकने सोडला होता. यावेळी आपण रझाकला वाईट शिवी दिल्याचेही वसीमने या शोमध्ये बोलताना सांगितले. या सामन्यात पुढे सचिनने धावांचा डोंगर उभारला होता. या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान त्याच फेरीत बाहेर पडले होते, तर भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. हा कॅच सुटला नसता, तर कदाचित पाकिस्तान हा सामना जिंकलाही असता. हा कॅच अगदी महत्त्वाचा होता, आणि म्हणूनच तो सोडल्यानंतर वसीमने रझाकला शिवी दिली, आणि पुढे म्हणाला की, तू कॅच नाही, तर वर्ल्डकप हातातून सोडला आहेस.

वसीम अक्रम पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आहे. त्याने १९८४ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये, तर १९८५ साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले.२००२ मध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने वनडेमधूनही निवृत्ती जाहीर केली. आपल्या एकूण करिअरमध्ये तो १०४ कसोटी आणि ३५६ एकदिवसीय सामने खेळला आहे. त्याने कसोटीमध्ये ४१४, तर एकदिवसीय सामन्यामध्ये एकूण ५०२ बळी घेतले आहेत. २५हून अधिक वेळा टेस्टच्या एका डावामध्ये ५ बळी घेणारा तो पाकिस्तानचा आतापर्यंतचे एकमेव गोलंदाज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

धुळ्याच्या या डॉक्टरने पेशंटच्या किडनीतून १ लाख ७२ हजार १५५ खडे काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवलंय

Next Post

लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टोबे मॅगुइर म्हणजे हॉलिवूडचे जय-वीरू..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टोबे मॅगुइर म्हणजे हॉलिवूडचे जय-वीरू..!

जगप्रसिद्ध 'क्वॅकर'ने दिव्यांग मुलांना प्रयोग म्हणून रेडिओऍक्टिव ओटमिल खाऊ घातलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.