The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका श्रीलंकन सैनिकाने राजीव गांधींवर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देतानाच ह*ल्ला केला होता

by द पोस्टमन टीम
12 August 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या. त्यात त्यांचे आणि श्रीलंकेचे संबंध तर कायमच चर्चेत राहिले. त्यांची परराष्ट्रीय धोरणे श्रीलंकेतील तामिळ रहिवाशांच्या विरोधात असल्याने त्यांना तामिळ संघटनांकडून कायमच विरोध झाला होता.

अशात १ मे १९९१ रोजी तामिळनाडूमध्ये घडणवण्यात आलेल्या बॉ*म्बस्फो*टात राजीव यांचा जागीच मृत्यू झाला. हे ह*त्याकांड जगभरात गाजलं. या ह*त्याकांडामागे ‘एलटीटीई’ या तामिळ बंडखोर संघटनेचा हात होता. ही संघटना श्रीलंका सरकारच्या विरोधात आपल्या मागण्यांसाठी लढत होती आणि श्रीलंका सरकारच्या दृष्टीने हे लोक देशद्रोही होते.

‘एलटीटीई’ला भारत सरकारकडून सक्षम पाठिंब्याची गरज होती पण तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी मात्र श्रीलंकन सरकारकडे मैत्रीचा हात पुढे केल्याने ‘एलटीटीई’ने हे ह*त्याकांड घडवून आणलं. पण आश्चर्याची बाब अशी की, या ह*त्याकांडाच्या चारच वर्षांपूर्वी म्हणजेच १९८७मध्ये राजीव यांच्यावर ह*ल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि तोही श्रीलंकेतल्या एका देशभक्ताकडून!

३० जुलै १९८७ रोजी राजीव गांधींवर जीवघेणा ह*ल्ला करणारा हा ह*ल्लेखोर आज श्रीलंकेमध्ये सीडी आणि कॅसेट्सचा विक्रेता आहे. आजच्या घडीला कोलंबोमध्ये व्हिडीओ पार्लर चालवणारा विजीथ रोहाना विजेमुनी हा पूर्वी श्रीलंकेच्या सैन्यदलात होता. राजीव गांधींवर ह*ल्ला केल्यानंतर त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं. विजीथ हा मूळचा श्रीलंकेच्या दक्षिणेकडे असलेल्या गाले राज्याचा रहिवासी होता. आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने नौदलात भरती होण्याचं ठरवलं. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परीक्षांमधून तो उत्तीर्ण होऊन रेडीओमन या पदावर नियुक्त झाला. त्यानंतर त्याची बदली एलारा या यु*द्धनौकेवर करण्यात आली. ही यु*द्धनौका १९८७च्या जूनमध्ये उत्तर श्रीलंकेतील तामिळ बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी राबवलेल्या ‘वडंमरच्छी ऑपरेशन’साठी वापरण्यात आली होती.

मे आणि जून १९८७मध्ये श्रीलंकेच्या उत्तरेकडे असलेल्या जाफना द्वीपकल्पावर श्रीलंकन सैन्याकडून ‘वडंमरच्छी ऑपरेशन’ राबवण्यात आले आणि श्रीलंका विरुद्ध ‘एलटीटीई’ यु*द्धाला तोंड फुटलं. श्रीलंकेतील हे त्याकाळचं सगळ्यात मोठं यु*द्ध मानलं जातं. श्रीलंकेकडून जवळपास ८०००हून अधिक सैनिकांची फौज या लढाईत उतरली होती तर ‘एलटीटीई’कडे अवघ्या १२०० जणांचं सैन्य होतं. श्रीलंकेची तयारी आणि अमाप फौजफाटा पाहता ‘एलटीटीई’चा पराभव हा ठरलेलाच होता. हे यु*द्ध आपल्या संघटनेसाठी शेवटचं यु*द्ध ठरणार याची भीती मनात जोम धरू लागल्यावर ‘एलटीटीई’ने तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकरवी भारताच्या केंद्र सरकारकडे मदत मागितली.



वास्तविक भारत सरकारने नोव्हेंबर १९८६मध्येच आपल्या देशातील ‘एलटीटीई’ची कारस्थाने मोडून काढली होती आणि त्याचबरोबर श्रीलंकेलाही ‘एलटीटीई’विरोधात कारवाया कमी करण्यासाठी सूचनाही दिल्या होत्या. यानंतर ‘एलटीटीई’ला मदत करणे म्हणजे श्रीलंकेशी अकारण अघोषित यु*द्ध पुकारण्यासारखंच होतं आणि केंद्र सरकारचा याला नकार होता. पण तामिळनाडूतील सत्ताकारणाचा विचार करता सत्ताधारी पक्षासाठी हीच सुवर्णसंधी ठरत होती. अखेर ‘सत्तेसाठी सारं काही’ला अनुसरून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘एलटीटीई’ला मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी त्यांनी नागरी सुरक्षेचं कारण देऊन श्रीलंकन सरकारला हे यु*द्ध थांबवायला सांगितलं.

श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ज्युनियस जयवर्धने यांना भारताचा हा हस्तक्षेप न पटल्याने त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी श्रीलंकेत याविरोधात जोरदार निदर्शने केली. पण भारताने या निदर्शनांकडे लक्ष न देता सरळ यु*द्धाची धमकी दिली. भारताच्या या आक्र*मक धोरणामुळे श्रीलंकेला नमतं घ्यावं लागलं आणि ही लढाई थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

प्रचंड नाखुशीने श्रीलंकन सेना या मोहिमेवरून परतली. २९ जुलै १९८७ रोजी श्रीलंकेमध्ये जयवर्धने आणि राजीव यांच्या उपस्थितीत ‘भारत-श्रीलंका करारनामा’ मांडण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजनैतिक शिष्टाचारांचा भाग म्हणून राजीव यांना ‘गार्ड ऑफ हॉनर’ देण्याचा समारंभ आयोजित केला गेला. या समारंभाची जबाबदारी लेफ्टनंट मेंडीस यांच्यावर सोपवण्यात आली.

पंतप्रधानांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यासाठी नियुक्त केल्या गेलेल्या राय*फलधारी सैनिकांमध्ये विजीथ रोहानाचाही समावेश होता. आपले सर्व देशबांधव आणि सैनिकांसारखाच विजीथच्या मनामध्येही भारत सरकारच्या हस्तक्षेपाबद्द्ल प्रचंड राग साचला होता आणि हा राग बाहेर काढण्यासाठी विजीथ या समारंभाची वाट पाहत होता. आपण जे करायला जात आहोत, त्याचे परिणाम भयंकर असल्याचं त्याला पुरतं ठाऊक होतं पण त्याच्या देशभक्तीपुढे इतर सर्वच शिक्षा त्याच्यासाठी गौण ठरत होत्या.

आपल्या मनाशी ठाम निश्चय करूनच तो या समारंभात सहभागी झाला. यावेळी राजीव यांच्यासोबत श्रीलंकेचे अर्थमंत्री रॉनी डी मेल, लेफ्टनंट मेंडीस आणि काही श्रीलंकन सुरक्षारक्षक होते.

समारंभ सुरु झाल्यावर जेव्हा राजीव विजीथसमोरून जाऊ लागले, तेव्हा त्याने हातातल्या राय*फलने त्यांच्या मानेवर प्रहार करायचा प्रयत्न केला. राजीव यांनी चपळाईने तो वार चुकवला आणि राय*फलचा जोरदार फटका बसण्यापासून ते थोडक्यात वाचले. मेंडीस आणि इतर सैनिकांनी प्रसंगावधान दाखवत विजीथवर नियंत्रण मिळवले आणि त्याची रवानगी सीआयडीच्या कस्टडीत केली गेली. त्यानंतर त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पण अडीच वर्षांतच त्याची ही शिक्षा माफ करण्यात आली.

तुरुंगातून सुटल्यावर विजीथने उदरनिर्वाहासाठी कोलंबो येथे एक व्हीडीओ पार्लर सुरु केलं. त्याचबरोबर तो ज्योतिषशास्त्रातही पारंगत असल्याने त्याने जोडधंदा म्हणून ज्योतिषी सुरु केली. त्याच्या वादग्रस्त भाकीतांमुळे तो कायमच चर्चेत राहिला. मध्यंतरी, त्याने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल श्रीसेना यांच्या हत्याकांडाबाबत वर्तवलेल्या भाकीतामुळे त्याला पुन्हा एकदा जेलची हवा खावी लागली होती. इतकंच नव्हे तर २००० साली त्याने एक निवडणूकही लढवली होती.

राजीव गांधींवर केलेल्या ह*ल्ल्याबद्दल विचारणा केल्यावर तो आजही आपल्या कृतीचं समर्थन करताना दिसतो. आजही कुणी श्रीलंकेच्या अंतर्गत मामल्यांमध्ये हस्तक्षेप केलाच तर माझ्याशी गाठ आहे, असं तो निक्षून सांगतो. त्या ह*ल्ल्याबाबत आणि त्यानंतर झालेल्या शिक्षेबाबत सांगताना त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही दिसत नाही. दिसते ती फक्त आणि फक्त प्रखर देशभक्ती!!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आजही नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समनला ‘मांकडिंग’ची भीती वाटत असते..!

Next Post

एका पिंजऱ्यात खुर्चीवर बसून एकाचवेळी १३ सिहांना तो आपल्या भोवती खेळवायचा

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post

एका पिंजऱ्यात खुर्चीवर बसून एकाचवेळी १३ सिहांना तो आपल्या भोवती खेळवायचा

या स्त्रीने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अणुप्रकल्पाची माहिती रशियाला पुरवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.