The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा माणूस सिंहासारखा दिसायचा, त्याने आयुष्यभर सर्कशीत लोकांचं मनोरंजन केलं

by द पोस्टमन टीम
1 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तुम्हाला एमा वॅटसनचा ‘ब्युटी अँड द बिस्ट’ चित्रपट माहिती आहे का? त्यात एक शापित राजकुमार आणि एक साधारण मुलगी यांची गोष्ट दाखवली आहे. यात जो शापित राजकुमार दाखवला आहे त्याचा चेहरा अगदी एखाद्या शिंगं फुटलेल्या सिंहासारखा आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि सर्व शरीरावर सिंहाच्या आयाळीसारखे लांब-लांब केस आहेत. या केसांमुळं तो इतका विचित्र दिसतो की, बिचारी एमा वॅटसन (बेला) त्याला पाहूनच घाबरते.

चित्रपटात दिसणारा असा सिंहासारखा व्यक्ती जर प्रत्यक्षात तुमच्या समोर येऊन उभा राहिला तर? नक्कीच आपली भीतीनं गाळण उडेल. काहींना तर नक्कीच हार्ट अटॅक येईल. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात असा एक व्यक्ती खरोखर अस्तित्त्वात होता. स्टीफन बिब्रोवस्की, असं या व्यक्तीचं नाव होतं.

स्टीफन बिब्रोवस्की ‘लायनेल’ किंवा ‘सिंहासारखा चेहरा असलेला माणूस’ म्हणून ओळखला जात असे. तो एक प्रसिद्ध ‘साईड शो’ कलाकार होता. त्याच्या संपूर्ण शरीरावर मोठ्या प्रमाणात केस होते. त्यामुळं तो अगदी सिंहासारखा दिसे.

‘हायपरट्रिकोसिस’ नावाच्या दुर्मिळ आजारामुळं त्याची ही अवस्था झाली होती. हायपरट्रिकोसिस ही शरीरावर असामान्य केसांची वाढ होणारी एक समस्या आहे. याचे दोन प्रकार पडतात, एक ‘जनरलाईज्ड हायपरट्रिकोसिस’ आणि ‘लोकलाईज्ड हायपरट्रिकोसिस’. ‘जनरलाईज्ड हायपरट्रिकोसिस’मध्ये संपूर्ण शरीरावर अमर्याद केसांची वाढ होते. तर, ‘लोकलाईज्ड हायपरट्रिकोसिस’मध्ये शरीराच्या एखाद्या भागावरच केसांची वाढ होते. ही समस्या एकतर जन्मजात असते किंवा नंतरही उद्भवू शकते. लायनेल, स्टीफन बिब्रोवस्की या आजाराचं उदाहरण होता.

एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत ‘The Greatest Show on Earth’ या टॅगलाईनखाली रिंगलिंग ब्रदर्सची ‘बर्नम आणि बेली’ ही जगप्रसिद्ध सर्कस होती. स्टीफन बिब्रोवस्की या सर्कसचा अतिशय महत्त्वाचा भाग होता. याठिकाणीच त्याला ‘लायनेल’ हे नाव मिळालं. स्टीफन आपल्या इतर साथीदारांसह मिळून चित्तथरारक कसरती करून लोकांचं मनोरंजन करत असे. सर्कससोबत जगभरात फिरण्यातच त्यानं आपलं आयुष्य घालवलं.



लोकांमध्ये प्रसिद्ध असूनही त्याच्याबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही. जी काही माहिती आहे ती प्रत्यदर्शींच्या सांगण्यावरून नोंदवण्यात आलेली आहे. फ्रान्सिस हॉर्नबर्गर नावाच्या संशोधकानं लिहिलेल्या ‘कार्नी फोक’ या पुस्तकात देखील स्टीफनची काही माहिती मिळते.

कार्नी फोकनुसार, स्टीफन बिब्रोवस्कीचा जन्म १८९० साली पोलंडमधील वर्सोवा येथे झाला. जन्मत:च त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात केस होते. आपण गर्भवती असताना सिंहाने त्याच्या वडिलांवर ह*ल्ला केला होता म्हणून कदाचित स्टीफन असा जन्माला आला असावा, अशी गोष्ट त्याची आई सर्वांना सांगत असे. अशा विचित्र दिसणाऱ्या मुलाचं संगोपन करण्याऐवजी बिब्रोवस्कीच्या आईनं वयाच्या चौथ्या वर्षी त्याला सेडलमेयर नावाच्या स्थानिक सावकाराकडं दिलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सेडलमेयरनं मुलाची प्रतिभा ताडली आणि त्यानं त्याचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला. लायनमॅन म्हणून सेलडमेयरनं स्टीफनला युरोपभर फिरवलं.

१९०१ साली, स्टेडलमेयरनं बिब्रोवस्कीला घेऊन अमेरिका गाठली. तिथे त्यानं अमेरिकेच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरील शहरांमध्ये स्टीफनचं प्रदर्शन सुरू केलं. तिथे असतानाचं बर्नम आणि बेली सर्कसच्या मालकाचं स्टीफनकडे लक्ष गेलं. त्यांनी तत्काळ त्याचा सर्कसमध्ये समावेश करून घेतला. तो सर्कसच्या साईड शोमध्ये ॲक्रोबॅटिक्स करत असे आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याचंही काम करत असे. पुढील १९ वर्ष स्टीफन बिब्रोवस्कीनं सर्कससोबत जगभर प्रवास केला. १९२० मध्ये तो काही काळ अमेरिकेत स्थायिक झाला. त्यानं न्यूयॉर्कच्या कोनी बेटावरील एका साइड शो पॉप-अपमध्ये काम केलं.

अनेक वर्ष एकत्र काम करत असूनही त्याच्या सहकलाकारांना त्याच्या खासगी आयुष्याबाबत विशेष माहिती नव्हती. कोनी बेटावर काम करत असताना पहिल्यांदा काही लोकांना स्टीफन बिब्रोवस्कीच्या जवळ येण्याची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. लहान असताना त्याला डेंटिस्ट होण्याची इच्छा होती. तो अतिशय साधा आणि सामान्य माणसासारखा होता. तो जितका क्रू*र दिसत होता तितकाच शांत आणि दयाळू होता. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या स्टीफनला पाच भाषा बोलता येत होत्या.

त्याच्या चेहऱ्यावर साधारण आठ इंच लांबीचे सोनेरी केस वाढले होते. शरीराच्या इतर भागांवर त्यांची लांबी चार इंच होती. फक्त त्याच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांवर केस नव्हते. जेव्हा कुणी त्याला त्याच्या आयुष्याबद्दल विचारत असे, तेव्हा तो काढता पाय घेत असे. १९२५ नंतर त्यानं अमेरिका सोडली आणि तो जर्मनीला गेला. १९३२ साली बर्लिनमध्ये त्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यावेळी तो ४१ वर्षांचा होता.

स्टीफन बिब्रोवस्कीबाबत अनेक गोष्टी अफवांप्रमाणं फिरत होत्या. काहींचं म्हणणं होतं की, त्याच्या आई-वडिलांनी त्याला कधीही अंतर दिलं नव्हतं. ते फक्त त्याला त्याच्या मनाप्रमाणं जगू देत होते. स्टीफन काम करत असलेल्या जगप्रसिद्ध सर्कशीमध्ये विचित्र शरिरयष्टी असलेल्या अनेक व्यक्ती काम करत होत्या. त्यांच्यामध्ये असलेल्या कमतरतांचं असं जाहीर प्रदर्शन करणं चुकीचं असल्याचं काही समाजसुधारकांचं मत होतं. एकदा तो राहत असलेल्या न्यूयॉर्कमधील हॉटेलला आग लागली होती. असं म्हटलं जातं की, हॉटेलचा दरवाजा तोडून बाहेर पडणारा तो पहिला व्यक्ती होता.

असामान्य आजार असलेल्या स्टीफननं आपलं संपूर्ण आयुष्य लोकांचं मनोरंजन करण्यातच घालवलं!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतात जन्मलेल्या या शास्त्रज्ञामुळे पाकिस्तान न्युक्लीअर पावर बनलाय

Next Post

वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी याने ७० हजार रोमन सैनिकांना यमसदनी धाडलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी याने ७० हजार रोमन सैनिकांना यमसदनी धाडलं होतं

डिजिटल जगात वावरताना हॅकिंगपासून कसं वाचायचं..? जाणून घ्या..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.