The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या राणीच्या योगदानामुळे कोरिया आणि तामिळ संस्कृतीमध्ये एवढं साधर्म्य दिसून येतं

by द पोस्टमन टीम
23 July 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


गेल्या काही दिवसांत भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंधामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. दोन्ही देशांच्या दरम्यान, माहिती आणि तंत्रज्ञान, वाहन उद्योग आणि इतर गरजेच्या गोष्टींची देवाण-घेवाण करण्यासाठी विविध मैत्रीपूर्ण करार झाले आहेत. मात्र, हे संबंध फक्त गेल्या काही वर्षांपासूनचे नाहीत तर, हजारो वर्षांपासूनचे आहेत! हो, जवळपास २ हजार वर्षांपासून कोरिया आणि भारत एकमेकांशी जोडलेले आहेत.

हजारो वर्षांपूर्वी एका भारतीय राजकुमारीनं कोरियन राजाशी विवाह केला होता. कोरियामध्ये या राजकुमारीला ‘हो हांग-ओके’ या नावानं ओळखतात.

ही राजकुमारी भारताच्या नेमक्या कुठल्या राज्यातील होती, याबाबत अभ्यासकांमध्ये दुमत आहे. काहींच्या मते ती आयोध्येची राजकुमारी सुरीरत्ना होती. दंतकथा आणि ऐतिहासिक कथांचा समावेश असलेल्या दक्षिण कोरियातील ‘सामगुक युसा’ या प्रसिद्ध ग्रंथात या राजकुमारीचा उल्लेख आहे. राणी ‘हो हांग’ भारतातील ‘अयुता’ राज्याची राजकन्या होती. अयुता म्हणजेच अयोध्या असा कोरियातील आणि भारतातील काही लोकांचा समज आहे.

मात्र, दक्षिण कोरियातील काही नवीन अभ्यासकांच्या मते राणी ‘हो’ मुळची तामिळनाडूतील होती आणि तिचं नाव ‘सीमपावलम’ होतं. तामिळनाडूवर प्राचीन काळापासून चेरा, चोळ, पल्लव आणि पंड्या राजांनी आपली सत्ता गाजवली आहे. तामिळनाडू आणि कोरियातील अनेक गोष्टींमध्ये साधर्म्य आहे. हे साधर्म्य दाखवण्यासाठी कोरियाचे कॉन्सुलेट जनरल क्युंग्सू किम यांनी ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ तमिळ स्टडीज्’च्या मदतीनं २०१५ मध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरवली होती.



या कॉन्फरन्समध्ये दिलेल्या माहितीनुसार कोरियन राणी ‘हो’ मूळची तामिळनाडूचं शेवटचं टोक असलेल्या कन्याकुमारीची होती. इसवी सन ४५ च्या आसपास ती कोरियातील ‘ज्युमग्वान गया’ येथे बोटीनं आली. 

तिच्यासोबत तिची एक सैन्याची तुकडी आणि जुळे मासे असलेलं राजचिन्ह होतं. ती जेव्हा कोरियामध्ये आली होती तेव्हा तिनं तिचं नाव ‘सीमपावलम’ असं सांगितलं होतं. कोरियन अभ्यासक असेही नमूद करतात की, कोरिया आणि तामिळनाडू येथून एकत्रित केलेले साहित्य, संस्कृती यांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास राणी “हो हांग ओके” तामिळ असल्याचंच सिद्ध होतं. तिचं जे वर्णन करून ठेवलं आहे ते देखील तत्कालीन तामिळ तरुणींशी साधर्म्य दाखवणारं आहे. अयोध्येचा विचार केला तर अयोध्या आणि तामिळनाडूमधील लोकजीवन भाषा, इतिहास आणि संस्कृती एकदम भिन्न आहेत.

भारतातून आलेल्या राजकुमारीनं तेथील राजा ‘सुरो’ याच्याशी लग्न केलं आणि ती ‘ज्युमग्वान गया’ राज्याची पहिली राणी बनली. तिला ‘हो हांग ओके’ हे नाव देण्यात आलं. तिच्या थडग्यातील अवशेषांचा, जोंग-सन एसईओ आणि किम जोंग-इल या दोन संशोधकांनी अलिकडच्या काळात अभ्यास केला. या अभ्यासानुसार तामिळ लोक आणि दक्षिण कोरियातील काही लोकांमध्ये अनुवंशिक समानता दिसून आली. त्यांच्या अंदाजानुसार सहा दशलक्षाहून अधिक कोरियन लोक राणी हो हांगचे वंशज आहेत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

संशोधकांच्या मते, जर आणखी सखोल अभ्यास केला भविष्यातही अनेक समानता समोर येतील. राणी हो आणि राजा सुरो यांना १२ मुलं झाली होती. मोठ्या मुलाचं नाव जिओडँग होतं. आपल्या पहिल्या दोन मुलांना तिचं आडनाव द्यावं, अशी विनंती राणीनं राजाला केली होती, असं सांगितलं जातं. वंशावळीचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांना आढळलं की, राजा-राणीच्या सात मुलांनी आपल्या चुलत्याच्या पायावर पाय ठेवत बौद्ध धर्माचा स्विकार केला आणि धर्माच्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांना हायजेन, गॅक्चो, जिगाम, दिओन्गिओन, डुमू, जेओन्गिओंग आणि गेजांग अशी या मुलांची नावं होती. त्यांना दोन मुली देखील होत्या त्यांची लग्नं अनुक्रमे तल्हाय आणि सिल्ला या कोरियन कुळांमध्ये झाली.

पौराणिक कथांचा आधार घेतल्यास वयाच्या १५७व्या वर्षी राणी हो हांगचा मृत्यू झाला होता.

भारतीय राजकुमारीनं कोरियामध्ये जाऊन आपल्या राज्याची संस्कती आणि भाषा यांचा प्रसार केल्याचे पुरावे आजही आढळतात. संशोधकांना कोरियन आणि तामिळ भाषेमध्ये समान अर्थ असलेले तब्बल ५०० शब्द सापडले आहेत. दक्षिण भारतातून काही लोहार दक्षिण कोरियाकडे केल्याच्या देखील काही घटना पुराणांमध्ये नमूद आहेत. चीन आणि कोरियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या भिक्खूमध्ये दक्षिण भारतातील लोकांचा जास्त सहभाग असल्याचेही पुरावे संशोधकांना सापडले आहेत.

दक्षिण भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील समानता, दोन्ही ठिकाणांमधील आंतर-सांस्कृतिक देवाणघेवाणीतील समकालीन ऐतिहासिक दुवे तपासण्यासाठी लवकरच मोठा संशोधन प्रकल्प सुरू करण्याचा मानस २०१५च्या कॉन्फरन्समध्ये संशोधकांनी व्यक्त केला होता.

कोरियाचे कॉन्सुलेट जनरल क्युंग्सू किम यांनी ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ तामिळ स्टडीज्’च्या मदतीनं भरवलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये दोन्ही भाषांमध्ये समान असणारे काही शब्द उदाहरण म्हणून प्रस्तुत केले होते. ‘Apahada’ हा कोरियन आणि ‘Avadhippadu’ हा तामिळ शब्द आहे. मात्र, दोन्ही शब्द एकाचं अर्थानं वापरले जातात. ‘अतिशय दु:खदायक’ असा या शब्दांचा अर्थ होतो.

‘Omomo!’ हा कोरियन आणि ‘Amama!’ हा तामिळ शब्द, दोन्हीकडे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरले जातात.

दोन देशांमधील संबंधांवर व्यापकपणे संशोधन करणारे तामिळ हेरिटेज फाउंडेशनचे विद्वान कन्नन नारायण यांच्या मते, फक्त भाषाच नाही तर कोरिया आणि तामिळमध्ये इतर देखील अनेक समानता आहेत. कोरियातील ड्रम डान्स हा तामिळच्या थप्पटतमसारखाच आहे. तामिळ आणि कोरियन लोक घरात प्रवेश करण्यापूर्वी आणि वडिलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करण्यापूर्वी पायातील चप्पल बाहेर सोडतात.

कोरियामध्ये बाळ जन्मल्यानंतर घराच्याबाहेर हिरव्या मिरच्या लटकवल्या जातात. तामिळनाडूमध्ये देखील अशीच प्रथा आहे. गंमत म्हणजे तामिळनाडूमध्ये मुली पाच लहान-लहान दगडांचा जो खेळ खेळतात, तोच खेळ कोरियातील मुली देखील खेळतात. चेन्नईमध्ये जवळपास ४ हजार कोरियन राहतात आणि याठिकाणी सुमारे ३०० लहान-मोठ्या कंपन्या आहेत, ही बाब कुणालाही माहित नसेल.

एकूणचं तामिळनाडू आणि कोरियामध्ये असणाऱ्या या सर्व समानता राजकुमारी ‘सीमपावलम’मुळेच तयार झाली असल्याचं संशोधकाचं मत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कुख्यात गुंड ‘अल कपोन’मुळे दुधाच्या पॅकेटवर एक्स्पायरी डेट छापायला सुरु झाली

Next Post

जगातलं पहिलं एक्स्पेरिमेंटल व्हिलेज ‘ऑरोविल’ आपल्या स्वागतासाठी तयार आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

जगातलं पहिलं एक्स्पेरिमेंटल व्हिलेज 'ऑरोविल' आपल्या स्वागतासाठी तयार आहे

ऐश्वर्यासारखी दिसते म्हणून सलमानने लॉन्च केलेल्या स्नेहा उल्लालचं पुढे काय झालं..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.