The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इजिप्तमधील या जुळ्या मंदिरांना वाचवण्यासाठी सगळं जग एकवटलं होतं

by द पोस्टमन टीम
2 December 2024
in इतिहास, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


वेरूळचं जगप्रसिद्ध कैलास मंदिर आपल्याला माहिती असेलच. एका अखंड खडकामध्ये द्रविड शैलीत हे मंदिर कोरण्यात आलं आहे. साधारण मंदिरांची किंवा कुठल्याही वास्तूची निर्मिती ही पायापासून कळसाच्या दिशेनं केली जाते. मात्र, वेरूळच्या मंदिराचा कळस आधी कोरण्यात आला आणि नंतर खालचा भाग.

वेरूळच्या मंदिरासारखीच आणखी दोन मंदिरं अस्तित्वात आहेत जी एका अखंड खडकामध्ये कोरलेली आहेत. इजिप्तच्या अबू सिमबेल शहरात ही दोन मंदिरं आहेत. १९५९ मध्ये युनेस्कोला इजिप्त आणि सुदानच्या सरकारांकडून एक विनंती अर्ज आला. अबू सिमबेलमधील अद्वितीय मंदिरांच्या बचावासंदर्भात ही अधिकृत विनंती होती. अस्वान धरणाच्या बांधकामामुळं सिमबेलची दोन प्राचीन मंदिरं बुडण्याची भीती होती.

३ हजार २०० वर्षांपूर्वी राजा रॅम्सेस द्वितीय यानं स्वत:चं आणि राणी नेफ्रतारीची स्मारक म्हणून ही जुळी मंदिरं बांधली होती.

युनेस्कोनं हा दोन्ही सरकारांचा विनंती अर्ज स्वीकारून त्यादृष्टीनं प्रयत्न करण्यास सुरुवात केली. या कामासाठी प्रचंड खर्च येणार हे तर साहजिकच होतं. त्यामुळं युनेस्कोनं १९६० पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी जमवण्यास सुरुवात केली. तरी ही प्राचीन भव्य मंदिर वाचवण्यासाठी नेमकं करावं तरी काय? प्रश्न कायम होता. पाणी पुरवठा तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या एका स्विडीश कंपनीनं (Vattenbyggnadsbyrån) यावर मार्ग शोधला. दोन्ही मंदिरं एकसंध खडकात कोरलेली असल्यामुळं तो खडकच त्या जागेवरून उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामात अनेक स्विडीश कंपन्यांनी देखील आपलं योगदान देण्याची तयारी दर्शवली. १९६४ साली इजिप्तमध्ये जगातील सर्वांत मोठा आणि नेत्रदीपक पुनर्वसन प्रकल्प सुरू झाला.

अबू सिमबेलच्या मंदिरांमध्ये असं नेमकं काय खास होतं की, त्यांना वाचवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले.



अबू सिमबेलचे हे ठिकाण इजिप्तमधील सर्वात प्राचीन स्थळांपैकी एक असून गेल्या ३ हजार वर्षांपासून ते नाईल नदीच्या मध्यभागी वसलेलं आहे. इसवी सन पूर्व १२४४ मध्ये अबू सिमबेल डोंगराच्या कडेला दोन जुळी मंदिरं कोरण्यात आली होती. या मंदिरांमध्ये फॅरो रॅम्सेस द्वितीयच्या (१३०३ -१२१३ बीसी) चार विशाल पुतळ्यांचा समावेश आहे. दोन्ही मंदिरांची प्रवेशद्वारं २१ मीटर उंचीची आहेत. प्रवेशद्वारांची रचना अशी केलेली आहे की, वर्षातून दोनदा (२२ ऑक्टोबर आणि २२ फेब्रुवारी) सूर्याची किरणं थेट आतमध्ये असलेल्या चारपैकी तीन मूर्तींवर पडतात. हा सूर्यकिरणांचा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक याठिकाणी गर्दी करत.

जे पहिलं मोठं मंदिर आहे, त्यात रॅम्सेसच्या सिंहासनावर बसलेल्या चार मूर्ती आहेत. सिंहासनाच्या पायथ्याला त्यानं विजय मिळवलेल्या नुबियन्स, लिबियन्स आणि हिटीटीस राज्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. राजाचे कुटुंबिय आणि विविध देवतांच्या देखील प्रतिमा मंदिरात आहेत. एका कोरलेल्या चित्रामध्ये राजा-राणी देवतांची पुजा करताना दिसतात.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

दुसरे लहान मंदिर हे रॅम्सेसनं आपली राणी नेफ्रतारीसाठी बांधलं होतं. या मंदिराच्या समोरील बाजूला राणीचे दोन आणि राजाचे चार बैठे पुतळे आहेत. प्रत्येकाची उंची ३३ फूट इतकी आहे.

इजिप्तच्या इतिहासात ती दुसरी वेळ होती जेव्हा एखाद्या राजानं आपल्या राणीसाठी मंदिर तयार केलं होतं. रॅम्सेसच्या अगोदर फॅरो अखेन्तोन यानं आपल्या राणीसाठी मंदिर बांधलं होतं.

फॅरो रॅम्सेस द्वितीय हा इजिप्तमधील पराक्रमी राजा होता. त्यानं लेवन्टपर्यंत आपलं साम्राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला होता. ‘हिटीटीस’ नावाच्या दुसऱ्या एका साम्राज्याशी त्यानं लढा दिला होता. सिरीयातील कादेशमध्ये उभय साम्राज्यांमध्ये यु*द्ध झालं होतं. नंतर दोघांनी शांततेचा तह केला. याशिवाय नुबियाविरोधात देखील त्यानं मोहिम सुरू केली होती.

कादेशच्या यु*द्धानंतर त्यानं अबू सिमबेलची मंदिरं बांधली. कादेशच्या यु*द्धातील काही घटना मंदिरांमध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मोठ्या मंदिरातील एका प्रतिमेत राजा आपल्या रथातून बाण सोडताना दिसत आहे. कादेशच्या शांतता तहानंतर रॅम्सेसनं हिटीटीसच्या राजकुमारीशी विवाह केला होता, हा प्रसंग देखील सिमबेलच्या मंदिरात आपल्याला पहायला मिळतो.

असं म्हटलं जातं की, काळाच्या ओघात या मंदिरांची प्रवेशद्वारं वाळूच्या वादळांमुळं बुजली गेली होती. १८१७ मध्ये सर्कसमध्ये काम करणाऱ्या जिओवनी बेलझोनी नावाच्या एका बलवान मनुष्याने मंदिरांची प्रवेशद्वार मोकळी केली. पुढे १९६ ०मध्ये इजिप्शियन सरकारनं नाईल नदीवर आस्वान धरण बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र, या धरण प्रकल्पामुळं अबू सिमबेलची दोन्ही मंदिरं पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यामुळे युनेस्कोच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर या मंदिरांना वाचवण्यासाठी प्रयत्न झाले.

१९६४ ते ६८ या चार वर्षांच्या काळात मंदिरांच्या पुनर्वसनाचं काम करण्यात आलं. दोन्ही मंदिरं मूळ जागेवरून हलवली आणि २१३ फूट उंच असणाऱ्या एका डोंगराच्या सपाट माथ्यावर ठेवण्यात आली. या कामासाठी ४.२ करोड अमेरिकन डॉलर्सचा खर्च झाला आणि ३ हजार कामगारांनी चार वर्षं हे काम केलं. मंदिर एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवताना त्याचे २०-२० टनांचे तीन तुकडे करण्यात आले आणि नंतर पुन्हा ते काळजीपूर्वक एकमेकांना जोडण्यात आले.

मुख्य आस्वान शहरापासून २८० किलोमीटरवर अबू सिमबेल आहे. बहुतांशी पर्यटक हे दिवसा मंदिरांना भेट देऊन रात्री पुन्हा आस्वानमध्ये परत येतात. ज्यांना रात्री सिमबेलमध्येच मुक्काम करण्याची इच्छा आहे, अशांसाठी स्थानिक प्रशासनानं राहण्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय याठिकाणी येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या सोयीसाठी या गावाचं स्वतःचं एक विमानतळ देखील आहे.

गिझाच्या पिरॅमिड्सनंतर अबू सिमबेल हे इजिप्तमधील सर्वात जास्त आकर्षणाचं ठिकाण आहे. कधी इजिप्तला जायचं ठरलं तर या मंदिरांना नक्कीच भेट द्या!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या माणसाने जगाला बेफिकिरीच्या हिप्पी लाइफस्टाइलचं वेड लावलं होतं..!

Next Post

या चिनी खलाशाने कोलंबसच्या दुप्पट समुद्री प्रवास करून चिनी माल जगभर पसरवला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
Next Post

या चिनी खलाशाने कोलंबसच्या दुप्पट समुद्री प्रवास करून चिनी माल जगभर पसरवला होता

अपघाताने लागलेल्या 'गन पावडर'च्या शोधाने जगाचा नकाशाच बदलून टाकला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.