आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगातील टॉप सेलिब्रेटींच्या कमाईचा आकडा ऐकल्यावर आपले डोळे विस्फारले नाही तर नवलच! सेलिब्रेटी लोक त्यांच्या करियरच्या हायपॉईंटला प्रचंड पैसे कमवतातच पण जगाच्या पाठीवर काही असे स्टार आहेत जे त्यांच्या मृत्यूनंतरही पैसे कमावतायत.
जगातील अशा सेलिब्रेटींमध्ये पॉपस्टार मायकल जॅक्सनचा नंबर सर्वांत वर येतो. मायकल जॅक्सनच्या कमाईने भल्या भल्या सेलिब्रेटींचे कमाईचे आकडे मोडून टाकले. जॅक्सननंतर अमेरिकन प्रकाशक, व्यंगचित्रकार, कवी आणि फिल्ममेकर थेओडोर सुस, अमेरिकन कार्टूनकार आणि निर्माता चार्ल्स मोनरो यांचा समावेश होतो.
अशाच अजून सेलिब्रिटीजबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल. (२०२३ फोर्ब्स यादीनुसार)
मायकल जॅक्सन
जगात सर्वात भारी डान्सर म्हणून ख्याती कमावलेला पॉपस्टार मायकल जॅक्सनचा मृत्यू २००९ मध्ये झाला. मृत्यूनंतरही त्याच्या नावावर थोडीथोडकी नव्हे तर ४०० मिलियन डॉलर्सची कमाई झाली आहे. या कमाईमध्ये सर्वात मोठा वाटा प्रकाशनातील हक्कांचाआहे.
अनेक वर्षांपासून फोर्ब्सच्या “Top Earning Dead Celebrities”मध्ये मायकेल जॅक्सन पहिल्या क्रमांकावर टिकून आहे.
एल्विस प्रेस्ली
अमेरिकन गायक, संगीतकार आणि अभिनेता एल्विस प्रेस्लीने मरणोत्तर १० करोड डॉलर्सची कमाई केली आहे. त्याचा मृत्यू १९७७ साली झाला. पण एल्व्हिसच्या गाण्यांची लोकप्रियता एवढी प्रचंड आहे की आजही त्याच्या अल्बल्मला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
रे मांझारेक
अमेरिकन पियानोवादक रे मांझारेकने मरणोत्तर ४.५ करोड डॉलर्सची कामे केली आहे. त्याचा मृत्यू ७४व्या वर्षी २०१३ साली झाला.
डॉक्टर सुस
डॉक्टर सुसचा मृत्यू १९९१ सालीच झालाय. प्रसिद्ध लेखक, व्यंगचित्रकार, चित्रपट निर्माता, कवी आणि कलाकार असणाऱ्या डॉक्टर सुसची संपत्ती तब्बल ४ करोड डॉलर्स एवढी आहे. ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिणाऱ्या सुस यांची पुस्तके थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल ९५ देशांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती, आजही या पुस्तकांना प्रचंड मागणी असते. याच डॉक्टर सुसची ८८ लाख पुस्तके एका वर्षात विकण्यात आली.
चार्ल्स शुलट्स
चार्ल्स शुलट्सचे निधन २००० साली वयाच्या ७७ व्या वर्षी झाले. चार्ल्स शुलट्स नावाचे अमेरिकन व्यंगचित्रकार आणि वॉलनट कॉमिक सीरिजचे निर्माते. यांची मृत्यूनंतर संपत्ती वाढतेच आहे. आजच्या घडीला त्यांची संपत्ती सुमारे ३ करोड डॉलर्स एवढी आहे. चार्ल्स शुलट्स यांच्या मालकीच्या आयकॉनीक्स कंपनीत समाविष्ट असणाऱ्या वॉलनट कंपनीमधील ८० टक्के वाटा डीएचएक्स मीडियाने २०१७ या वर्षी ३४.५ करोड डॉलर्सला विकत घेतला.
अरनॉल्ड पाल्मर
गोल्फमधील किंग समजल्या जाणाऱ्या अरनॉल्ड पाल्मर याने मृत्यूनंतर १ करोड डॉलर्सची कमाई केली आहे. आशिया खंडातील ४०० पेक्षा जास्त स्टोअर्समध्ये अरनॉल्ड पाल्मरच्या ब्रँड शोरूममधून ब्रँडेड कपड्यांची विक्री केली जाते. अरनॉल्ड पाल्मरची एक कंपनी मद्य पेय क्षेत्रात पण असून मोल्सनकॉर्स कंपनीसोबत त्यांची भागीदारी आहे. अरनॉल्ड पाल्मरचे २०१६ साली ८७ व्या वर्षी निधन झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










