The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्या स्पर्धेत लहान दिसतो म्हणून प्रवेश नाकारला तिथेच गामा पैलवानाने सगळ्यांना अस्मान दाखवलं

by द पोस्टमन टीम
12 July 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे‌ ‌सर्व‌ ‌लेख‌ ‌आणि‌ ‌व्हिडीओ‌ ‌मिळवण्यासाठी‌ ‌फॉलो‌ ‌करा‌ ‌:‌‌ ‌फेसबुक‌‌ ‌|‌‌ ‌युट्युब‌ ‌ ‌


वाह रे पठ्या! शब्द कानावर पडले की पैलवान बोलतोय असे आपण समजून जायचं. पैलवानकीत मर्दुमकी गाजवावी तर धिप्पाड पैलवानाने! आपल्या देशात एक असा पैलवान होऊन गेलाय की ज्याच्या कर्तृत्वाचे दाखले आज पण नवख्या पैलवानांना दिले जातात.

तुम्ही ओळखलं असेलच पण तरीही सांगतो, त्याचं नाव आहे गामा पैलवान!

गामा पैलवान हा तोच पैलवान होता ज्याने भारतातील कुस्तीचा पाया रचला. कुस्तीची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब राज्यातील अमृतसर गावाजवळील दतिया या ठिकाणी २२ मे ११८१ रोजी गामाचा जन्म झाला. त्यांच्या घरात काका, चुलत भाऊ आणि वडील हे सर्वच नामी मल्ल होते.

गामा लहानपणापासूनच कुस्त्यांच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला लागला. गामा जसजसा मोठा होऊ लागला तसतसा तो पैलवान म्हणून नाव काढणार हे कळायला लागले होते. पैलवानकी ताकदीतून सिद्ध होते पण सोबतच युक्ती पण असावी लागते हे गामा खेळता खेळता शिकू लागला होता.



१८९० साली राजस्थानच्या राजाने कुस्तीची स्पर्धा भरवली होती, त्या स्पर्धेत दूर देशांमधून पैलवानांनी हजेरी लावली होती. त्यात गामासुद्धा  सहभागी व्हायला गेलेला.

गामा बाकीच्या उपस्थित पैलवानांपेक्षा वयाने आणि उंचीने पण कमीच होता. पण या सगळ्या पैलवानांना धोबीपछाड देऊन गामा विजयी ठरला. 

आता गामा पैलवानाची गाडी सुसाट सुटली होती. गामाचा आहार पण तब्येतीला साजेल असा  होता. गामा आहारात ६ गावरान कोंबड्या, १० लिटर दूध, अर्धा लिटर तूप, अर्धा किलो बदाम, पाव किलो रबडी, जिलेबी, बकऱ्याच्या हाडाची आकनी एवढं खायचा. आता आहार एवढा म्हटल्यावर व्यायाम पण तसाच असेल ना! गामा ५००० जोर आणि ५००० बैठका, पोहणे, धावणे आणि रोज ३ तास कुस्तीचा सराव करत असे.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

गामाने रुस्तम-ए-हिंद किताबासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याची गाठ त्या वेळचा सर्वात ताकदवान पैलवानांपैकी रहीम बक्ष सुलतान याच्याशी पडली. दोघांमध्ये लढत रंगल्यावर कधी गामा भारी पडत होता तर कधी सुलतान. शेवटी दोघांमधील लढत अनिर्णित ठरली. पण गामाचे नाव देशभरात गाजले. गामा पैलवान कुस्तीच्या मैदानात उतरला तर तो जिंकणार असे ठरलेच होते. गामाने त्यावेळच्या दातियाच्या गुलाम मोहिउद्दीन, भोपाळच्या प्रतापसिंह, इंदौरच्या अली बाबा सेन आणि मुल्कानच्या हसन बक्ष यांना मैदानात पाणी पाजले होते.

१९१० हे वर्ष गामासाठी महत्त्वाचे ठरले. गामा आता वर्ल्ड रेसलिंग चॅंपियनशीपमध्ये उतरला होता पण त्याला या स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला. तेव्हा त्याने तेथे उपस्थित मल्लांना आव्हान दिले, “जो कोणी माझ्यासमोर ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकून दाखवेल त्याला मी ५ पौंडाचे बक्षीस देईल”. गामा पैलवानाच्या या आव्हानापुढे तेथील एक पण मल्ल टिकला नाही आणि गामाला प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

एकदा त्याच्यापुढे शड्डू ठोकून जगज्जेता झेबास्को उभा ठाकला. दोघांमधील कुस्ती अशी रंगत चालली होती की उपस्थित प्रेक्षकपण कधी झेबास्को तर कधी गामाच्या नावाने प्रोत्साहन देत होते.

पण या दोघांमधील कुस्तीचा काहीच निर्णय लागत नव्हता शेवटी अंधार पडल्यावर तिला थांबवण्यात आले. परत आठ दिवसांनी जेव्हा परत कुस्ती भरवण्यात आली तेव्हा झेबास्को उपस्थित न राहिल्यामुळे गामाला बुल टेस्ट बेल्ट आणि चांदीची गदा देऊन गौरण्यात आले.

१९११ साली गामा आणि रहीम समोरासमोर आले. दोन वेळेला एकमेकांच्या विरोधात बरोबरी झाल्यावर यावेळी मात्र गामाने रहिमला धोबीपछाड दिली. गामा हा असा पैलवान ठरला जो ५३ वर्षाच्या काळात अजिंक्य ठरला.

भारताची जेव्हा फाळणी झाली तेव्हा गामाने पाकिस्तानात जाणे पसंत केले. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात जेव्हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तणाव वाढला तेव्हा त्यांनी अनेक हिंदूंना भारतात पोचवण्यास मदत केली. गामा पैलवानाचा मृत्यू २३ में १९६० रोजी झाला.

कुस्ती आणि ताकदवान दोन शब्द ऐकण्यात येईल तेव्हा गामा पैलवान यांचे नाव आदराने घेतले जाईल. गामा पैलवान त्यांच्या ताकद, वागणूक आणि विचारांनी अमर झाले. आजही पैलवान गामा पैलवान यांना प्रेरणास्थान मानतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या माणसाने रोबोट्सना नियम घालून दिलेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत..!

Next Post

दोन देशांना जेरीस आणणारी सौंदर्यवती; जिच्यामुळे ५० हजारांहून अधिक सैनिकांचा जीव गेला..

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

दोन देशांना जेरीस आणणारी सौंदर्यवती; जिच्यामुळे ५० हजारांहून अधिक सैनिकांचा जीव गेला..

पद्मावतीसाठी राडा करणाऱ्या खिलजीचा खरा जीव तर मलिक काफूरवरच होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.