The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा कार्यकर्ता लायब्ररीतून नुसती पुस्तकं चोरून करोडपती झाला होता..!

by द पोस्टमन टीम
8 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


ती डिसेंबर महिन्यातील एक सायंकाळ होती. हिवाळा सुरू असल्यानं पेनसिल्व्हेनिया प्रांतातील वातावरणात गारवा वाढला होता. अ‌ॅलेन्टॉउनमधील मुहलेनबर्ग कॉलेजच्या ‘हॅस लायब्ररीची’ची लायब्ररियन डियान मेलँचुक घरी जाण्याअगोदर एक लायब्ररीत एक फेरफटका मारत होती. तेव्हा तिला तिच्या डेस्कजवळच्या कार्ड कॅटलॉगभोवती एक मध्यमवयीन अनोळखी व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीचे केस पांढरे झालेले होते आणि तिनं कोट घातलेला होता. डियानला ती व्यक्ती कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती मात्र, तिला स्पष्ट आठवत नव्हतं. डियाननं त्या व्यक्तीचा लायब्ररीतील सहाव्या रांगेपर्यंत पाठलाग केला.

पाठलाग करताना तिला ती व्यक्ती कोण आहे हे आठवलं आणि तिच्या चेहऱ्यावर चिंतेची एक लकेर उमटली. ती कोटवाली व्यक्ती एक पुस्तक चोर होती. हो! पुस्तक चोर. जेम्स रिचर्ड शिन, असं त्या व्यक्तीचं नाव होतं आणि तो अट्टल पुस्तक चोर होता.

जेम्स रिचर्ड शिन हा एक अतिशय चलाख पुस्तक चोर होता. आधुनिक तंत्रज्ञान आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून त्यानं जागतिक दर्जाच्या विविध ग्रंथालयांमधून पाच लाख डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची पुस्तकं चोरली होती.

त्याचं पुस्तक चोरीचं कौशल्य पाहून पोलीस आणि डिटेक्टिव्हसुद्धा त्याची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. जेम्स हा मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात हुशार आणि धाडसी चोर असल्याचं फिलाडेल्फियातील एक डिटेक्टिव्ह म्हणाला होता.

‘हॅस लायब्ररीची’त जेम्सला पाहिल्यानंतर डियान मेलँचुकनं तत्काळ महाविद्यालयाच्या सुरक्षा विभागाला सावध केलं. सुरक्षा विभागाच्या प्रमुखानं एफबीयच्या कार्यालयाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर एक आठवडा काहीही घडलं नाही. मात्र, १६ डिसेंबरला सहाय्यक ग्रंथपाल डेनिस फिलीप्स यांनी पुन्हा जेम्सला हॅस लायब्ररीच्या आवारात पाहिलं. त्यांनी सुरक्षारक्षक आणि एफबीआयला याची खबर दिली. पोलिसांनी त्याला पकडून चौकशीसाठी ग्रंथालयाच्या कार्यालयात नेलं. मात्र, सिगरेट पिण्याच्या बहाण्यानं जेम्स शिन फरार झाला. पळताना एका मॉटेलचं बिल त्याच्या खिश्यातून खाली पडलं आणि त्याच बिलानं त्याचा घात केला. पोलिसांनी पार्क मॅनॉर मॉटेलमधून जेम्सला अटक केली.



जेम्सला पुस्तकांचा इतिहास, रिस्टोरेश, बायन्डिंग याबाबत सखोल ज्ञान होतं. त्याच्या खोलीची जेव्हा पोलिसांनी झडती घेतली तेव्हा त्यांना पुस्तकांशी संबंधित अनेक गोष्टी सापडल्या. शू पॉलिशच्या वेगवेगळ्या रंगाच्या डब्यांचाही त्यात समावेश होता. चोरलेल्या पुस्तकांतून लायब्ररीचे शिक्के झाकण्यासाठी तो शू पॉलिशचा वापर करायचा.

त्यापूर्वी, एप्रिल १९८१ साली लायब्ररी जर्नलमध्ये शिनचा फोटो छापून आला होता. ओबर्लिन कॉलेजचे लायब्ररीयन विल्यम मोफेट यांनी शिनला पकडलं होतं. तो ब्रिफकेसमध्ये पुस्तकं घेऊन जात होता. तेव्हाही त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. तेव्हा देखील पोलिसांनी शिन राहत असेलेल्या एका खोलीतून ६३ पुस्तकं हस्तगत केली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

ओबर्लिन लायब्ररी, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, फिलाडेल्फिया ल्युथरन थिओलॉजिकल सेमिनरीतील पुस्तकांचा त्यात समावेश होता. ३० हजार डॉलर्स किंमतीची ती पुस्तकं होती. ४० हजार डॉलर्सचा दंड भरल्यानंतर २९ एप्रिलला पोलिसांनी शिनची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर मात्र, तो अचानक गायब झाला होता.

२५ ऑक्टोबर १९३६ रोजी इंडियाना प्रांतात जेम्स शिनचा जन्म झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी तो लॉस एंजेलिसला पळून गेला तिथे काही दिवस काढल्यानंतर तो पुन्हा इंडियानाला परत आला. वयाच्या तीशी आणि चाळीशीमध्ये त्यानं अनेक घरफोड्या आणि शस्त्रांच्या चोऱ्या केल्या. हळूहळू पुरातन वस्तू आणि दुर्मिळ पुस्तकांकडं त्यानं आपला मोर्चा वळवला. १९७२मध्ये एका घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. त्यानंतर १९७३ मध्ये तीन लाख डॉलर्स किमतीच्या दुर्मिळ तिकिटांसह त्याला अटक झाली होती.

त्यानंतरच्या काही वर्षांत, त्यानं पुस्तक विक्रेत्यांशी आपले संबंध वाढवले. ‘चार्ल्स डब्ल्यू. बेकर’ आणि ‘रिचर्ड व्ही. अ‌ॅलन’ नावाखाली शिन दुर्मिळ पुस्तकांच्या व्यवसायात आला. डिसेंबर १९८१ला पेनसिल्व्हेनियामध्ये अटक होण्यापूर्वी कॅलिफोर्निया, ओहियो या ठिकाणीही पुस्तक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ‘वॉन्टेड’ होता.

मिसुरीमध्ये जेम्स शिनचं आलिशान घर होतं. मात्र, तो त्या ठिकाणी राहिला नाही. पत्नी लोलासह तो कायम पुस्तकांच्या शोधात फिरत असे. विशेष म्हणजे त्याच्या पुस्तक चोरीबाबत त्याच्या पत्नीला काहीही चुकीचं वाटत नव्हते. जेम्सला अटक झाल्यानंतर टाईम्सच्या रिपोर्टरनं तिची मुलाखत घेतली होती. ‘आमच्या दोघांच्या आयुष्यावर दोन छानशा कांदबऱ्या लिहिता येतील. मला नाही वाटत जेम्स काही चूकीचं काम करतो. लायब्ररीमध्ये जाऊन कपाटातील पुस्तक काढण्यात काय वाईट आहे?’, असे लोला म्हणाली होती.

जेम्स पूर्वनियोजन करून चोरी करत असे. लायब्ररी जर्नल्स वाचून तो जास्त मागणी असलेल्या आणि संख्येने कमी असलेल्या पुस्तकांची माहिती मिळवत असे. त्यानंतर नॅशनल युनियन कॅटलॉगच्या मदतीनं ती पुस्तकं असलेल्या लायब्ररीज शोधत असे. लायब्ररीमध्ये चोरी करण्याअगोदर तो तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा सखोल अभ्यास करत असे.

३०० डॉलर्सपेक्षा कमी किमतीची पुस्तकं तो चोरत नसे.

१५ जानेवारी १९८२ ला बेथलेहेम येथील एका स्टोरेज युनिटमधून पोलिसांनी ४०० पुस्तकं हस्तगत केली. ती सर्व पुस्तक जेम्सनं चोरलेली होती. मिशिगन युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड, लीहाय, कार्नेगी-मेलॉन, हेव्हरफोर्ड, ब्रायन मावर, जॉन हॉपकिन्स आणि देशभरातील इतर संस्थांमधील ही पुस्तकं होती. या पुस्तकांची किंमत जवळपास ५ लाख डॉलर्स होती.

२४ फेब्रुवारी १९८२रोजी जेम्स शिनवर दोन खटले दाखल करण्यात आले. त्याचवर्षी २० जुलैला तो दोषी असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याला १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ८ ऑगस्ट १९९५ ला परोलवर शिनची सुटका झाली. त्यानंतर मात्र, त्यानं एकही चोरी केली नाही. २००५ साली त्याचा मृत्यू झाला.

जेम्स शिन हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत ॲक्टिव्ह पुस्तक चोर होता. पुस्तकांच्या चोरीतून देखील कोट्यवधी रुपये कमवता येतात हे जेम्स शिननं लोकांच्या लक्षात आणून दिलं होतं. पुढे शिनपासून प्रेरणा घेत स्टिफन ब्लुमबर्ग या व्यक्तीनं पुस्तक चोरी सुरू केली होती. १९९० मध्ये पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्याच्याकडून ५ लाख डॉलर्स किमतीची २४ हजार पुस्तकं हस्तगत करण्यात आली होती.

जेम्स शिन नावाच्या या पुस्तक चोरामुळं अमेरिकन लायब्ररी असोसिएशनला मोठा फटका सहन करावा लागला. लायब्ररींच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पहिल्यांदा राष्ट्रीय मुद्दा झाला. प्रत्येक लायब्ररीला शासनाच्यावतीनं अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात आली. २७ एप्रिल १९८२ रोजी पेनसिल्व्हानियाचे गव्हर्नर डिक थॉर्नबर्ग यांनी आर्काइव्ह्ज, लायब्ररी आणि संग्रहालय संरक्षण अधिनियमन कायदा केला. त्यामुळे पेनसिल्व्हानियामध्ये पुस्तक चोरी हा कायद्यानं गुन्हा ठरू लागला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये नसतानासुद्धा ‘मॅन ऑफ द मॅच’ फक्त ‘जॉन्टी ऱ्होड्स’च होऊ शकतो..!

Next Post

या बौद्ध भिक्खूने म्यामनमारमध्ये मुस्लिमांचं जगणं मुश्किल करून टाकलंय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या बौद्ध भिक्खूने म्यामनमारमध्ये मुस्लिमांचं जगणं मुश्किल करून टाकलंय

दुसऱ्या महायु*द्धात डुप्लिकेट लाकडी रणगाड्यांनी हि*टल*रची झोप उडवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.