The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातली पहिली ह्युमनॉइड रोबोट ‘सोफिया’ जेव्हा भारतात आली होती..

by द पोस्टमन टीम
28 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळं कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही कम्प्युटर सायन्सचीच एक शाखा आहे. मानवी मेंदूप्रमाणं बुद्धिमत्ता असलेल्या मशीन तयार करण्याचं काम आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये केलं जातं.

२०१९ साली नीती आयोग आणि गुगलने एक सामंजस्य करार केला. या करारानुसार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML)च्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र काम केलं जाणार आहे. नीती आयोगाकडं एआयसारखे तंत्रज्ञान विकसित करण्याची आणि संशोधनाचा राष्ट्रीय कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी दिली गेली आहे.

याच दरम्यान सोफिया नावाचा पहिला ह्युमनॉईड रोबोट तयार करण्यात आला. हाँगकाँगमधील हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीनं ‘सोफिया’ या पहिल्या मानवी रोबोटची निर्मिती केली आहे. प्राचीन इजिप्शियन राणी नेफर्टिटीचं रूप सोफियाला देण्यात आलं आहे.

सोफियाच्या आर्किटेक्चरमध्ये स्क्रिप्टिंग सॉफ्टवेअर, एक चॅट सिस्टम आणि ओपनकॉग ही सामान्य तर्कनिर्मितीसाठी डिझाइन केलेली एआय प्रणाली आहे. सोफिया मानवी हावभाव आणि चेहऱ्यावरील भावांचे अनुकरण करते. विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यास आणि पूर्वनिर्धारित विषयांवर साधी संभाषणे करण्यास ती सक्षम आहे.

सोफिया समोरच्या व्यक्तींचं बोलणं समजून घेण्यासाठी अल्फाबेटचा (गूगलची मूळ कंपनी) वापर करते. विशेष म्हणजे सोफिया गाणे देखील गाऊ शकते. सोफियाचे इंटेलिजन्स सॉफ्टवेअर हॅन्सन रोबोटिक्स यांनी डिझाइन केलं आहे.



संगणकीय अल्गोरिदमच्या मदतीनं एकत्रित केलेले सोफियाच्या डोळ्यातील कॅमेरे तिला पाहण्याची क्षमता पुरवतात. ती मानवाप्रमाणं समोरच्या व्यक्तीशी आय कॉन्टॅक्ट साधू शकते आणि व्यक्तीला ओळखू शकते. सोफियाचे निर्माते डेव्हिड हॅन्सन यांच्या मते, ती आरोग्य सेवा, ग्राहक सेवा, थेरेपीज् आणि शिक्षण देण्यासाठी अतिशय सक्षम आहे.

१४ फेब्रुवारी २०१६ रोजी पहिल्यांदा सोफियाला ॲक्टिव्हेट करण्यात आलं. त्याच वर्षी मार्चमध्ये अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या ‘साऊथवेस्ट फेस्टिवल’मध्ये सोफियाला पहिल्यांदा जगासमोर आणलं गेलं. त्यानंतर काही कालावधीतच सोफिया एक सेलिब्रेटी झाली. अनेक प्रख्यात माध्यमांनी तिच्या मुलाखती घेतल्या.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

नोव्हेंबर २०१७मध्ये सोफियाला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेन्ट प्रोग्राममध्ये ‘इनोव्हेशन चॅम्पियन’ म्हणून किताब देण्यात आला. संयुक्त राष्ट्राचा असा मान मिळवणारी ती पहिलीच रोबोट आहे.

पहिली ह्युमन रोबोट असलेल्या सोफियाला सौदी अरेबियाचं नागरिकत्व मिळालं आहे. ऑक्टोबर २०१७मध्ये सौदी अरेबियानं तिला नागरिकत्व दिलं. एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळणारी सोफिया ही पहिलीचं रोबोट आहे.

सोफियाला कमीतकमी नऊ भावंडे आहेत. त्यांची निर्मिती देखील हॅन्सन रोबोटिक्सने केली आहे. अ‍ॅलिस, अल्बर्ट आइन्स्टाईन ह्युबो, बीआयएनए 48, हॅन, ज्यूलस, प्रोफेसर आइन्स्टाईन, फिलिप के. डिक अँड्रॉइड, झेनो, आणि जोए कॅओस, अशी त्यांची नावं आहेत. २०१९-२० या काळात हॅन्सनने ‘लिटल सोफिया’ नावाचा आणखी एक रोबोट तयार केला आहे. ही लिटल सोफिया लहान मुलांना पायथन, ब्लॉकली आणि रास्पबेरी पाईसह कोडींग कसे करावे हे शिकवू शकते.

सोफियाची भारत भेट

डिसेंबर २०१७ मध्ये सोफिया पहिल्यांदा भारतात आली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये सोफिया एका टेक्नॉलॉजी बेस्ड सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली. कोलकात्यात झालेल्या या कार्यक्रमात पारंपरिक लाल बंगाली साडी घालून तिने भाग घेतला होता. या ठिकाणी सोफियानं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देखील दिली. दुसऱ्यांदा भारतात येऊन आपल्याला आनंद झाल्याची भावना सोफियानं व्यक्त केली होती.

काय आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ?

सरळ साध्या शब्दात सांगायचं झाल्यास, यंत्रांमध्ये मानवाप्रमाणं विचार करण्याची क्षमता तयार करणं म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. एआयला कम्प्युटर सायन्सचं सर्वात विकसित रुप समजलं जातं. यामध्ये कम्प्युटरची हुशारी आणि मानवी विचार क्षमता यांचा मेळ साधला जातो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची सुरुवात १९९५ च्या दशकात झाली होती. अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी एआयचा जनक आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटवर तयार झालेले चित्रपट

हॉलीवुडमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, स्टार वॉर्स, आय रोबोट, टर्मिनेटर, ब्लेड रनर यासारखे चित्रपट तयार करण्यात आले आहेत. हे चित्रपट पाहून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स नेमकं काय आहे, याची सर्वसाधारण कल्पना आपल्याला येते. भारतात रजनीकांतचा ‘रोबोट’ हा चित्रपट एआयवर आधारित आहे. इतकचं नाही तर १९९७मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सकडून रशियाचा सर्वकालिन बुद्धिबळ महान खेळाडू गैरी कॉस्पोरोव्ह यांचा पराभव झाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हिमालयात दडलेल्या या ‘सांगाड्यांच्या तलावाचं’ रहस्य अजूनही उलगडलं नाही..!

Next Post

यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चिम्पांझीच्या संशोधन, संगोपन आणि संवर्धनासाठी खर्च केलंय

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चिम्पांझीच्या संशोधन, संगोपन आणि संवर्धनासाठी खर्च केलंय

भारतीय सैनिकांनी आफ्रिकेत गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष म्हणजे पुण्याच्या NDA मधला सुदान ब्लॉक

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.