The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्कॉटलंडने विनंती केली आणि राहुल द्रविड स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय मॅच खेळला..!

by द पोस्टमन टीम
4 July 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


प्रत्येक खेळाडू आपल्या विशिष्ट शैलीसाठी ओळखला जातो. शांत आणि संयमी खेळी करणारा राहुल द्रविड भारतीय क्रिकेटची ‘द वॅाल’ म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे. १९९६ ते २०१२ या आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. मात्र, खूप कमी लोकांना माहिती असेल की, द्रविड स्कॉटलंडच्या राष्ट्रीय संघात देखील खेळला आहे. संकटकाळात भारतीय संघाचा आधार ठरणारा राहुल दुसऱ्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून कसा काय खेळला? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

तर ही गोष्ट आहे २००३मधील. २००३च्या विश्वचषकात भारतीय संघाने अपेक्षेपेक्षा जबरदस्त कामगिरी केली होती. कर्णधार सौरव गांगुली आणि उपकर्णधार राहुल द्रविड यांच्या नेतृत्व गुणांची सर्वत्र वाहवा सुरू होती. त्याचवेळी स्कॉटलंड क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्वेन जोन्स हे एखाद्या प्रतिभावंत भारतीय खेळाडूच्या शोधात होते. त्यांनी भारताचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक जॉन राईटशी संपर्क साधला.

‘इंग्लिश काऊंटी नॅशनल क्रिकेट लीग’च्या दुसर्‍या सत्रात सचिन तेंडुलकरनं स्कॉटलंडसाठी खेळावं, अशी जोन्स यांची इच्छा होती. मात्र, राईट यांच्या मनात मात्र, राहुल द्रविडचं नाव होतं. त्यांनी परदेशी खेळाडू म्हणून स्कॉटलंडलाच्या संघासाठी राहुल द्रविडचं नाव सुचवलं.

अनिवासी भारतीयांनी दिलेल्या फंडच्या मदतीनं स्कॅाटलंडनं राहुल द्रविड समोर ४५ हजार पाउंड्सच्या कराराचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी नुकताच विवाहबंधनात अडकलेल्या राहुलनं तो प्रस्ताव स्वीकारला आणि पत्नी विजेतासोबत स्कॅाटलंड गाठलं. तीन महिन्यांच्या काळात त्यानं लीग क्रिकेटचे ११ आणि पाकिस्तानसोबतचा एक सामने खेळले.
‘ते तीन महिने माझ्या आणि माझ्या पत्नीच्या कायम आठवणीत राहतील स्कॅाटलंडमध्ये आम्हाला लोकांनी खूप प्रेम आणि आदर दिला. अनेक क्रिकेट खेळाडूंसोबत माझी चांगली मैत्रा झाली. ती आजतागायत टिकून आहे. एक खेळाडू म्हणून मला अनेक गोष्टी शिकता आल्या,’ अशी प्रतिक्रिया २००७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राहुल द्रविडनं दिली होती.

स्कॅाटीश कर्णधार क्रेग राईटच्या संघाला राहुल द्रविडच्या उपस्थितीमुळं मोठा फायदा झाला. संघातील नवख्या खेळाडूंच्या मनावर आणि खेळण्याच्या शैलीवर द्रविडच्या सल्ल्यांचा सकारात्मक परिणाम झाला. ‘तो रेडिओ हेडसेट सुरू ठेवून फलंदाजी करायचा. प्रत्येक खेळाडूला त्यानं केलेलं मार्गदर्शन नक्कीच अमुल्य आहे. तो तीन महिन्यांचा कालावधी माझ्यासाठी अविस्मरणीय होता’, अशी भावना स्कॅाटलंडचे तत्कालीन प्रशिक्षक टोनी जड यांनी व्यक्त केली होती.



स्कॉटलंडच्या संघाकडून राहुलनं आपला पहिला सामना हॅम्पशायर विरुद्ध खेळला होता. पहिल्या सामन्यात तो समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात त्यानं २५ धावा केल्या. त्यानंतर त्यानं सॅामरसेट अन् नॉटिंघमशायरविरुद्ध चमकदार कामगिरी केली. सॅामरसेटविरुद्ध त्यानं १२० धावांची तर नॉटिंघमशायरविरुद्ध १२९ धावांची तडाखेबंद खेळी केली. याशिवाय एसेक्सविरुद्ध ६९ धावा, हॅम्पशायरविरुद्ध ८१ धावा आणि  नॉर्दम्प्टनशायरविरुद्ध त्यानं ११४ धावा केल्या होत्या.

स्कॅाटलंडच्या संघाकडून खेळताना राहुलनं १२ सामन्यात एकूण ६०० धावा फटकावल्या आहेत. यात तीन शतकांचा समावेश आहे.

स्कॅाटलंडमध्ये लीग क्रिकेट खेळून आल्यानंतर २००३-०४ चा हंगाम द्रविडसाठी जबरदस्त राहिला. त्यानं आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये ९५.४६च्या सरासरीनं धावा केल्या. त्यात २७० धावांच्या खेळीचा देखील समावेश होता. याच काळात एकदिवसीय सामन्यांमध्ये सात अर्धशतकांच्या सहाय्यानं त्यानं ४१.७७ सरासरीनं धावा केल्या.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. पाकिस्तानसोबत सामना खेळताना अंगात एक वेगळीच उर्जा संचारते, असं आतापर्यंत अनेक खेळाडूंनी सांगितलंय. मात्र, राहुल द्रविड हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याला दुसऱ्या देशाच्या संघाकडून पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. ७ जून २००३ रोजी खेळवल्या गेलेल्या स्कॉटलंडविरुद्ध पाकिस्तान या सामन्यात राहुल स्कॉटलंडच्या संघाचा एक भाग होता. मात्र, या सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आला नव्हती. पहिल्याच चेंडू खेळताना तो शून्यावर बाद झाला होता. १ गडी राखून पाकिस्ताननं हा सामना जिंकला होता.

भारतीय संघाकडून खेळताना राहुल द्रविडनं कसोटी कारकिर्दीमध्ये १६४ सामन्यांमध्ये १३ हजार २८८ धावा केल्या. यामध्ये ३६ शतकाचा समावेश आहे. तर, ३४४ एकदिवसीय सामने खेळून त्यानं १० हजार ८८९ धावा केलेल्या आहेत.

सध्या भारतीय क्रिकेट संघ ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या अंतिम सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. त्यामुळे संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवि शास्त्री, भारत अरूण आणि विक्रम राठोर कसोटी संघासोबत व्यस्त असणार आहेत. त्याच वेळी भारत आणि श्रीलंकेदरम्यान देखील एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. या संघासाठी राहुल द्रविड पुन्हा एकदा भारतीय संघासाठी ‘संकटमोचक’ ठरणार आहे. एकदिवसीय संघासोबत द्रविड प्रशिक्षक म्हणून जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबची घोषणा केली आहे.

आपल्या लाडक्या द्रविडबद्दल अजून काही फारसे ज्ञात नसलेले किस्से जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समधून आम्हाला नक्की कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ज्या बेटावरून श्रीराम लंकेवर चाल करून गेले होते ते बेट कॉंग्रेसने श्रीलंकेला देऊन टाकलं

Next Post

मेल्यावरसुद्धा ‘विजेने’ या माणसाचा पिच्छा सोडला नव्हता..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

मेल्यावरसुद्धा 'विजेने' या माणसाचा पिच्छा सोडला नव्हता..!

आयुष्यभर खुंखार मगरींसोबत राहिला पण एका निरुपद्रवी माशाचा शिकार बनला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.